कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in जनातलं, मनातलं
5 Mar 2016 - 12:44 am

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.

यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

10 Jul 2016 - 9:38 am | माहितगार

काश्मिरी दहशतवाद्याच्या समर्थनार्थ उमर खालीदची नवी फेसबुक विवादास्पद पोस्ट आल्याची बातमी आहे. 'सुडो-सेक्युलर' लोक सांशंकीतांच्या लंगड्या बाजू उचलण्याचे, नाही त्यांचे पाणी भरण्याचे उपद्व्याप का करतात कुणास ठाऊक. :(

गामा पैलवान's picture

10 Jul 2016 - 7:37 pm | गामा पैलवान

च्यायला, उमर खलिदने चे गव्हाराची विधानं सांगणे म्हणजे उंदराला मांजर साक्षी! तो चे गव्हारा एक नंबरचा हलकट आणि घाबरट माणूस होता, ते वेगळंच.

-गा.पै.