देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
प्रतिक्रिया
5 Mar 2016 - 2:16 pm | तर्राट जोकर
एवढंच मागे लागायचं असेल ना बोकाशेठ तर निव्वळ वरवर विचार करणार्या नादखुळांच्या मागं का नाही लागत? कन्हय्याविरुद्ध बोलायला ठोस मुद्दे नाहीत तर असल्या आढ्यताखोर टिप्पण्या तरी कशाला कराव्यात ह्या अर्थाने तो प्रतिसाद आहे.
मुद्दा एवढाच आहे की अभाविपमधूनही अनेक तळठोकू, जेलगोईन्ग, तोडफोड विद्यार्थी निघालेत त्याबद्दल कधी ओरड होतांना दिसली नाही. खुद्द अभाविपचे जुने मेंबर वैंकेया नायडू (he started his career in politics as a student leader of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad in the year 1973–74 after being elected as the president of the students union of Andhra University Colleges. He came into spotlight for his prominent role in the Jai Andhra Movement of 1972. While Kakani Venkataratnam led the movement from Vijayawada, Venkaiah Naidu took active part in the agitation in Nellore, until it was called off a year later. हे करत असतांना ते २५-२६ वर्षाचे होते.) विद्यार्थ्यांनी शिक्षण करावे राजकारण करु नये म्हणतात तेव्हा तुम्ही असेच सल्ले भाजपसरकारमधल्या कमीत कमी अर्ध्या मंत्रिमंडळाला द्याल का असा सवाल कोणी करतांना दिसत नाही. इथे कन्हयाकुमारवर शेलके टोमणे मारण्याचे कारण फक्त त्याने आपल्या आवडत्या मोदींना, संघ, भाजपाला शिव्या घातल्यात. तो विद्यार्थी आहे म्हणून हे टोमणे नाहीत. हेच त्याने काँग्रेसविरूद्ध केले असते तर हेच लोक आनंदाने नाचले असते.
निवडनूका जिंकण्यासाठी कितीतरी अट्टल गुन्हेगार, घोटाळेबाज, पूर्वकॉंग्रेसी यांना पायघड्या घालून भाजप्ने टिकिट्स दिलेत. त्याबद्दल भाजपभक्त कधी शेलके टोमणे मारतांना दिसत नाहीत.
असो. विचारांमधे संतुलन ठेवा असे आपण सगळ्यांना म्हणायचे आणि शेंबुड आपल्यच नाकाला आहे हे विसरुन जायचे.
अभाविपने खालील उद्योग करतांना विद्यार्थ्यांनी शिक्षण करावे, इतर उद्योग करु नये असले सल्ले द्यायला भाजपभक्त पुढे आलेले दिसले नाहीत.
ABVP has been in the news due to violent incidents and alleged right-wing extremism:
23 April 2011 : Student activists of ABVP attacked the anchors of MTV's Roadies show in Pune.
18 August 2011 : ABVP cadres ransack missionary school over Anna protest in Jharkhand.
26 January 2012 : ABVP members set ablaze reels of Telugu film 'Businessman (film)' on the Osmania University campus.
29 January 2012 : ABVP protested against the screening of Sanjay Kak's documentary Jashn-e-Azadi, forcing Symbiosis College of Arts and Commerce, Pune to indefinitely postpone the seminar Voices of Kashmir.
14 April 2012 : ABVP members attacked Beef Festival in Osmania University.
24 August 2013 : After the screening of Jai Bhim Comrade and the performance by Kabir Kala Manch, ABVP attacked students of Film and Television Institute of India, Pune and KKM members blaming them as Naxalite, and asked them to say Jai Narendra Modi.
7 September 2013 : A Kashmiri film fest was targeted by the group of right wing extremists in Hyderabad. A group of ABVP workers entered the venue just few hours after the programme started and indulged in vandalism.
30 December 2014 : PK, the film, was obstructed by ABVP.
वरील सगळ्या घटना शिक्षणाशीच संबंधित आहेत ह्यावर भक्तांचा दुर्दम्य विश्वास असेल. किंवा हे सर्व अभाविप जाज्वल्य देशाभिमानासाठी करते आणि बाकीचे.....
पुन्हा, असो.
5 Mar 2016 - 2:24 pm | वैभव जाधव
आपल्या प्रतिसादात नेहमीच संदीप डांगे दिसतात.
प्रतिसाद आवडला!
5 Mar 2016 - 2:26 pm | तर्राट जोकर
हायला! ठे ते, कुठे आम्ही.;-)
5 Mar 2016 - 2:27 pm | तर्राट जोकर
हायला! कुठे ते, कुठे आम्ही.;-)
5 Mar 2016 - 2:37 pm | मार्मिक गोडसे
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, परंतू डांगेंची उणीव तुम्ही जाणवू देत नाहीत हे ही खरे आहे. अगदी मुद्देसूद विचार मांडत आहात..
5 Mar 2016 - 5:01 pm | अभ्या..
जाधवसाहेब आपल्या प्रतिसादात मात्र आम्हाला वर्मावर अचूक घाव घालणारे एक जुने जाणते व्यासंगी मिपाडेटाबँक सदस्य दिसतात. ;)
5 Mar 2016 - 7:55 pm | वैभव जाधव
ओ मालक, मी वैभव जाधव. सध्या सुट्टीवर आलोय म्हणून मिपावर जमतंय. काय बोलून ऱ्हायला बे उगा?
5 Mar 2016 - 10:16 pm | अशोक पतिल
विवेचनपुर्ण प्रतिसाद !
5 Mar 2016 - 7:54 pm | जेपी
तजो, why so serious ?
5 Mar 2016 - 12:05 pm | सतिश गावडे
जाऊ दे. फार मनावर नको घेऊ. तू तुझ्या या अनुभवांवर "आमचा बापूस आणि आम्ही" असं पुस्तक लिही. मी ते वीस टक्के सवलत असेल तर विकत घेईन.
5 Mar 2016 - 12:21 pm | बोका-ए-आझम
उदाहरणार्थ मिपावर संपादक वगैरे?
5 Mar 2016 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर विनोदी लेख ! और आंदो !! =)) =)) =))
कल्पनाविलास = वास्तविकता
कांगावाखोरपणा = प्रांजळपणा
बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू = सादगीपूर्ण इंटरव्यू
अश्या मराठी भाषेत अनेक नवनवीन क्रांतीकारक व्याख्या करणारा, "इतर जनतेला डोके नाही, मी त्यांना काहीही विकू शकेन" हे (नेहमीप्रमाणेच) केवळ स्वानुभवावर आधारलेले वैश्विक सत्य मांडणारा व एक नवीन वैचारीक रस्ता तयार करणारा लेख (मात्र, तो रस्ता कुठे घेऊन जाईल ते विचारू नका. पण हरकत नाही. म्हणतातच ना की गंतव्याला पोचण्यापेक्षा प्रवासात जास्त मजा असते. ते अक्षरशः खरं आहे, हे पटून जातं. :) ;) )
एक सावधगिरीची सुचना : लेखात बरखा दत्त यांच्यावर लेखकाने केलेल्या आरोपांबद्दल, दत्त यांच्याकडून पूर्वपरवानगी घेतली नसली तर, लेखकावर त्या कायदेशीर कारवाई करतील की काय असा संशय येत आहे !
और आंदो, और आंदते रहो ! मज्जा येते वाचायला... म्हंजे... लेखापेक्षा जास्त प्रतिक्रिया वाचायला मज्जाच मज्जा येते.
======
रच्याकने :
सुटून आल्यावर जनेविमधे केलेल्या संपूर्ण भाषणभर कन्हैया कुमार स्मितहास्य करत होता किंवा चक्क हसतही होता... इतका की अन्यायाविरुद्ध आणि सद्यव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे स्वतःच्याच भाषणातले शब्द त्यालाच विनोदी वाटत होते का, असा संशय यावा इतके !!!
5 Mar 2016 - 4:53 pm | अजया
:)
5 Mar 2016 - 12:27 pm | lakhu risbud
क्षीरसागर सर,तुम्हाला १-२ वर्षापूर्वी केजरीवाल सुद्धा असेच वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट असणारे वाटले होते.मिपा वर तुम्ही या अशाच प्रकारचा केजारीवालांचा धागा काढला होता. तीन वर्षानंतर त्यांच्या बद्दल जनतेची मते काय आहेत हे सुद्धा जगासमोर आहे. आणि आत्ता तुम्ही कन्हैय्या बद्दल असाच धागा काढलाय……….
तुम्ही तुमची चूक काही काबुल करू नका.अजून २-३ वर्षानंतर तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीच्या प्रांजळपणाची खात्री पटेल//साक्षात्कार होईल !
तुमच्या साक्षात्काराची सामान्य मिपाकराने काय किंमत मोजायची ते एकदा ठरवून द्या.
5 Mar 2016 - 1:08 pm | तर्राट जोकर
चार दिन की चांदनी, फिर अंधेरी रात है. भारतीय अशा कन्हयांवर कायम चेकाळत आलेले आहेत. हे आज नाही कैकदा घडले आहे. लोकांना असलं कायतरी लागतंच. आपल्या मनातल्या आदर्शवादाला दॄश्यरुपात बघित्लं की एक भावना सुखावते. त्या सुखावणार्या भावनांच्या नादात लोक अशा कन्हय्यांवर फिदा होतात. मसिहा करतात. तो आला म्हणजे आपले सगळे दुख-दर्द दूर होतील अशी वेडी स्वप्ने बघतात. स्वतःच्या स्वप्नांना पुरं करायला स्वत: खपायला लागतं हे विसरतात. मग भ्रमनिरास होतो. मग केज्रीवालला पडतात तशा शिव्या पडतात. पवारसारखे लोक आयुष्यभर राज्य करतात. अजून काय काय घडतं. पण लोक आशा सोडत नाहीत. कोनतरी उत्थान करणारा येईल ह्याची वाट बघत बसतात. असले कन्हया त्या वाट बघण्यातले हुरळलेले क्षण असतात.
काही असो. भारतीय लोकांचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान, चीन नाही तर त्यांचा आळस आहे. सर्वच बाबतीतला. विचार करण्यापासून ते कृती करण्यापर्यंतचा. त्याला एक मोठं कारण आहे. ते हे:
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् |
परित्राणाय साधुनाम विनाशाय च: दुष्कृताम, धर्मं संस्थापनार्थाय सम्भावामी युगे युगे ||
असले कन्हय्या हेच नेहमी अधोरेखीत करत आले आहेत.
7 Mar 2016 - 12:17 pm | चिगो
'अवतारा'ची अपेक्षा, आणखी काय?
अवांतर : मला मिपासदस्य 'अवतार' ह्यांचे विचार पटतात आणि आवडतात.. बाकी ह्या असल्या अवतारांमुळे आता 'विना न्युजचॅनेल' कुठला सबस्क्रिप्शन पॅक आहे का, हे बघावसं वाटतं.. कचर्याचे पैसे का द्या?
7 Mar 2016 - 1:19 pm | रॉजरमूर
दूरदर्शन चे फ्री DTH घेऊन टाका . डोक्याला शॉट नाही .
आवश्यक तेवढ्याच बातम्या . वर अजून सासू सुनांच्या कट कारस्थानी मालिकांपासून मुक्तता .
मुलेही निमूटपणे अभ्यास करतात कार्टून नसल्यामुळे हा एक अवांतर फायदा .
5 Mar 2016 - 2:03 pm | माहितगार
=))
5 Mar 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी
विठांनी २ वर्षांपूर्वी "अरविंदबरोबर दीड तास" असा धागा काढला होता. परंतु अरविंद बद्द वाजणारे नाणे निघाल्याने ते नवीन नायकाच्या शोधात होते. आता कन्हैय्याच्या रूपात त्यांना "बाल केजरीवाल" सापडला आहे.
बादवे, मोदी विरोधक सातत्याने एका हीरोच्या शोधात असतात. २०१४ मध्ये आधी केजरीवाल व नंतर राहुलचा प्रयोग करून झाला. २०१५ मध्ये आधी केजरीवाल व नंतर नितीशकुमार आणि लालूच्या रूपात त्यांना मसीहा सापडला आहे. आता २०१६ मध्ये बाल केजरीवाल सापडलाय.
6 Mar 2016 - 1:04 pm | नाना स्कॉच
साक्षात् तीर्थरूपांसम असलेल्या अडवाणीजीना नारळ देणे, प्रत्येकाला जमत नाही हो!
6 Mar 2016 - 1:12 pm | श्रीगुरुजी
न जमायला काय झालं? सीताराम केसरींना तर स्वच्छतागृहात कोंडून बाहेरून श्रीफल प्रदान करण्यात आले होते.
6 Mar 2016 - 1:16 pm | नाना स्कॉच
मग पार्टी विथ डिफरेंस जुमला का? :D , केसरींच्या पार्टीने शेण खाल्ले म्हणून तर अडवाणी ह्यांच्या पार्टीला आणले , की आता ,"त्यांनी शेण खाल्ले म्हणून आम्हीही खाणार, आम्हाला बोलायचे नाही वगैरे आहे म्हणणे?"
6 Mar 2016 - 2:04 pm | श्रीगुरुजी
अडवाणींना "नारळ" दिला म्हणजे नक्की काय केलं हे जरा समजावून सांगितलं तर बरं होईल.
6 Mar 2016 - 2:05 pm | श्री गावसेना प्रमुख
मला तर वाटते कि इथले मोदी विरोधक हे अडवाणींचे हेर असावेत।
6 Mar 2016 - 2:20 pm | नाना स्कॉच
कर दी न हलकी वाली बात! बड़ा सोचो!
6 Mar 2016 - 2:30 pm | श्री गावसेना प्रमुख
6 Mar 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी
अडवाणींच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये भाजपने निवडणुक लढविली होती. त्यावेळी अडवाणींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. परंतु त्या निवडणुकीत भाजपला फक्त ११६ जागा मिळाल्या (२००४ मध्ये १३८ जागा होत्या). २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी अडवाणींचे वय ८६ होते. अडवाणींचा जनमानसावरील प्रभाव संपल्याचे २००९ मध्येच दिसून आले होते. अडवाणी-वाजपेयी युग संपुष्टात आल्याचे स्पष्ट दिसत होते. अडवाणींच्या नावावर फारशी मते मिळू शकत नाहीत हेही दिसून आले होते. काँग्रेसविरोधी लाट स्पष्ट दिसत होती, पण त्या लाटेवर स्वार व्हायला योग्य ते नवीन नेतृत्व हवे होते. यात अडवाणींचा नारळ द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता कारण मधल्या काळात अडवाणी तसेही फारसे पक्षकार्यात नव्हते. अडवाणींना संधी दिलेली होती आणि सुषमा स्वराज, रा़जनाथसिंग, नितीन गडकरी, अरूण जेटली यांच्या तुलनेत लागोपाठ ३ निवडणुका जिंकलेल्या मोदींचा प्रभाव खूप जास्त आहे हे स्पष्ट दिसत होते. नितीन गडकरी व अरूण जेटली हे यापूर्वी कधीही निवडणुकीला उभे राहिले नव्हते. राजनाथसिंग हे उत्तरप्रदेश पुरते मर्यादित होते. सुषमा स्वराज नक्कीच बर्यापैकी तुल्यबळ होत्या, परंतु मोदींचा करिश्मा जास्त होता. हे सर्व लक्षात घेऊनच २०१३ च्या जूनमध्ये मोदींचे नाव कार्यकारिणीने पुढे आणले व रीतसर लोकशाही मार्गाने त्यांची निवड केली. यात अडवाणींना नारळ देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचे वय, संपलेला करिश्मा, पक्षकार्यातून कमी झालेला त्यांचा सहभाग आणि जनतेसाठी त्यांच्याकडे असलेल्या नवीन कल्पनांचा अभाव हे लक्षात घेऊनच त्यांची निवड झालेली नव्हती.
याऊलट सीताराम केसरींचे प्रकरण आहे. सीताराम केसरी हे १९९७ मध्ये काँग्रेस अंतर्गत झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण मतांपैकी तब्बल ८५% मते मिळवून पक्षाध्यक्ष झाले होते. त्यांच्याविरूद्ध उभ्या असलेल्या शरद पवार व राजेश पायलट या दोघांना एकत्रित १५% मते होती. केसरींची निवड ३ वर्षांसाठी होती. १९९८ मध्ये सोनिया गांधींना राजकारणात आणण्यासाठी सर्व कॉंग्रेस नेते (शरद पवारांसकट) प्रयत्नशील होते कारण त्यांच्याकडे मते मागण्यासाठी प्रभावी चेहरा नव्हता. पोस्टर्सवर केसरी, तिवारी, अर्जुनसिंग इ. ची चित्रे छापून मते मिळणार नाहीत हे काँग्रेसजनांनी ओळखले होते. मार्च १९९८ च्या निवडणुकीत काही प्रचारसभेत भाषण करताना सोनिया गांधींच्या सभेला उसळलेली गर्दी स्पष्ट संकेत देत होती. १९९६ मध्ये फक्त १४० जागा मिळालेल्या काँग्रेसला १९९८ मध्ये सुद्धा १४० च जागा मिळाल्यामुळे आपल्याला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही हे काँग्रेसजनांनी ओळखले. त्यामुळे केसरींच्या हकालपट्टीची योजना निश्चित करून कार्यकारिणीची बैठक सुरू असताना ते स्वच्छतागृहात गेल्याचे निमित्त करून कार्यक्रमपत्रिकेवर नसलेला नेतृत्वबदलाचा विषय अचानक पुढे आणून सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे असा ठराव बहुमताने मंजूर केला गेला. त्यावेळी ठराव मंजूर होईपर्यंत स्वच्छतागृहाचे दार बाहेरून लावून घेण्यात आले होते असे छापून आले होते. केसरी हे विद्यमान अध्यक्ष असताना त्यांना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगून मग रीतसर सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड केली असती तर ८५% मते मिळवून अध्यक्ष झालेल्या केसरींचा मान राखला गेला असता व त्यांची अवहेलना टाळता आली असती.
या दोन्ही प्रकारांची तुलना करा आणि मग 'पार्टी विथ डिफरेंस' हे खरे का खोटे हे ठरवा.
8 Mar 2016 - 9:33 pm | llपुण्याचे पेशवेll
हैला मला हे माहीत नव्हते. पण याचा डिफेन्स करायला कसे कोणी येत नाहीत अजून.
5 Mar 2016 - 2:31 pm | भाते
चघळायला नविन विषय मिळेपर्यंत दोन-चार दिवस मिडियावाले याला डोक्यावर घेतील. नविन विषय मिळाल्यावर इतरांप्रमाणे यालासुध्दा अडगळीत टाकतील.
5 Mar 2016 - 2:49 pm | श्री गावसेना प्रमुख
बाल कन्हैय्या ने डोहात उडी मारलिये पण त्याला झेपता येतंय का,कि नाका तोंडात पाणी जाईल।
5 Mar 2016 - 2:55 pm | तिमा
बाल कन्हैय्या ने डोहात उडी मारलिये पण
दोघेही एकमेकांना 'तूच कालिया' असं म्हणत एकमेकांचे मर्दन करत आहेत.
5 Mar 2016 - 7:20 pm | सुबोध खरे
या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
हे सर्व मान्य केले तरीही के के-- कन्हैया कुमार ना ( ए के -- अरविंद केजरीवाल सारखे) या सिस्टीम पासून स्वातंत्र्य हवंय. पण म्हणजे काय आणि कसं ते त्यांनि कोणत्याच मुलाखतीत सांगितलं नाही. हि प्रणाली नीट चालत नाही पण त्याला त्यांच्याकडे पर्याय आहे का?
असे या व्यवस्थेला झुगारून द्या म्हणणारे पाहत आमचे किती पावसाळे गेले पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही. न नक्षलवाद्यानकडे आहे ना कम्युनिस्तांकडे ना क्रांतीवाद्यांकडे.
अव्यवस्था (anarchy) हेच जर त्यांचे साध्य असेल तर त्यांच्यात आणि दहशतवाद्यामध्ये फरक काय?
आम्हाला लग्न संस्था नको म्हणणारे तरुण शेवटी गपचूप लग्न करून संसाराला लागतात तसेच हे के के साहेब उच्चभ्रू नोकरी पत्करून जनेवि ( JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) सारख्या कोणत्यातरी विद्यापीठात प्राध्यापकी करत राहतील असे माझे भाकीत आहे. माझ्या स्वतःच्या अंदाजाप्रमाणे यांची बौद्धिक लायकी आणि चातुर्याची पातळी केजरीवाल यांच्या इतकी वरची नाही. त्यामुळे चार दिवस झाले कि लोक यांना विसरतील
5 Mar 2016 - 7:50 pm | आनन्दा
+१०००
5 Mar 2016 - 9:14 pm | विकास
गुगल मधे सर्च किती झाला हे लोकांचा इंटरेस्ट किती आहे हे पहाण्याचे एक साधन आहे. (एकच नाही)... त्यात गंमत म्हणून मोदी, केजरीवाल, रागा आणि कन्हैय्या यांच्याबद्दलची माहिती पाहीली. त्यांच्यात तुलना करायचा संबंध नाही कारण कन्हैय्या - नया है वह... ;) तरी तरी देखील साधारण गेल्या एक दोन आठवड्यात त्याच्याबद्दल किती शोधले गेले ते समजले...
5 Mar 2016 - 11:34 pm | विवेक ठाकूर
तुम्ही मुलाखत बारकाईनं पाहिलीत तर तोच कन्हैयाचा वेगळेपणा आहे. तो म्हणतो की समतेसाठी प्रत्येकाला राजकारणात उतरायची गरज नाही, एक मिनिमम युनिटी पुरेशी आहे. त्यासाठी वेगळा पक्ष देखिल असण्याची गरज नाही. जो ज्या क्षेत्रात आहे तिथे त्यानं समतेसाठी काम केलं की झालं. उदाहरणार्थ, एक कामगार मालकाच्या एकाधिकारशाही विरुद्ध लढू शकतो. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देशातली गरीबी हटवण्यासाठी प्रेरित करू शकतो. एखादा सरकारी अधिकारी स्वच्छ प्रशासनाचा आदर्श निर्माण करु शकतो. एखादा कन्हैया राजकारणाला समाजाभिमुख करु शकतो.... आणि मला वाटतं हा विचार फार मूलगामी आहे.
इथे सगळे प्रत्येक विचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करुन बदलाची शक्यताच पुसून टाकतायंत. एक कन्हैया काय करणार ? आपली अशी कल्पना आहे की एक त्राता यावा आणि त्यानं सर्व परिस्थिती बदलावी.
मला लोकांच्या विचारसरणीचं नवल वाटतं. कन्हैयाकडे एक व्यक्ती म्हणून पाहून त्याला कम्युनिस्ट ठरवून टाकला की झालं ! त्याच्या साहसाकडे एक निष्पक्ष विचारसरणी आणि बदल घडवून आणण्याची जिद्द म्हणून आपण पाहात नाही. इथेच कुणीतरी लिहीलंय की विशीत बहुतेक सर्व साम्यवादी असतात आणि चाळीशीनंतर बदल घडणार नाही हे पटून भांडवलवादी होतात. जवळजवळ सर्व प्रतिसादातून याचाच प्रत्यय येतोयं.
समता, साम्यवाद, गरीबांना समान संधी, त्यांच्या विकासाठी मनात जागा ही गोष्ट इतक्या सहजी पुसली जात असेल तर आपली संवेदनक्षमता संपली का असा प्रश्न कुणाला पडू नये? राजकारणी स्वतःच्या तुंबड्या भरतात म्हणून आपण असहाय्य होऊन प्राप्त परिस्थितीत काहीच करायचं नाही ? की तो समतेचा भाव जागा ठेवून शेवटापर्यंत आपल्याकडून त्यासाठी काही ना काही करत राहायचं ?
एखाद्याला कम्युनिस्ट पप्पू ठरवून आपण काय मोठं काम करतो ? वृंदा कारतच्या साड्या आणि त्याचे विचार किंवा त्याला सिपीआयचा नवा पित्त्या म्हणून आपण जो लोकांचा बुद्धीभेद करतो त्यातून काय साधतो? आपण फक्त तो विचार आणि बदल घडवून आणण्याची आपली जवाबदारी झटकून टाकतो. मग पुन्हा व्यवस्था अशीच राहाणार म्हणायला आपण मोकळे ! मला वाटतं इतका ढोबळ विचार हीच वैचारिक पप्पुगिरी आहे.
6 Mar 2016 - 12:56 am | सुबोध खरे
भाबडा पण भंपक प्रतिसाद
6 Mar 2016 - 1:10 am | शलभ
+१
मला तर मिपावर कधी कधी एखाद्या टिनपाट कवितेची समीक्षा करतात त्याची आठवण आली.
6 Mar 2016 - 7:55 am | विवेक ठाकूर
तुम्हाला मुद्दाच कळला नाही पण तरीही व्यक्तिगत न होता, पुन्हा तुमचा मान राखतो.
6 Mar 2016 - 12:56 am | तर्राट जोकर
मस्त हो सर. प्रतिसाद लाखमोलाचा आहे.
6 Mar 2016 - 1:07 am | विकास
कन्हैयाकडे एक व्यक्ती म्हणून पाहून त्याला कम्युनिस्ट ठरवून टाकला की झालं !
त्याला विकी वरील पहीलेच वाक्य बदलायला सांगा ना साहेब!
Kanhaiya Kumar is a leader of the All India Student Federation (AISF), the student wing of the Communist Party of India (CPI). He was elected president of the Jawaharlal Nehru University Students' Uni
6 Mar 2016 - 7:53 am | विवेक ठाकूर
आपली व्यवस्थेकडे बघायची मानसिकता बदलायचा प्रश्न आहे.
6 Mar 2016 - 10:19 am | भंकस बाबा
तुम्ही खरोकरच भाबड़े आहात हो!
जागतिक राजकारणात जिथे जिथे कमुनिस्ट राजवटित जनता भरडली गेली तेथील नेते अगदी ऐषोआरामात रहात होते. कमुनिस्ट राजवटित भरडणे जाणे हां शब्दप्रयोगच फसला आहे कारण कमुनिस्ट राजवट म्हणजे सामान्य जनतेचे मरणच! जरा तुम्हीच प्रकाश टाका कुठे कमुनिस्ट सुखी आहेत ते.
आता ग्रीस , स्पेन ,पोर्तुगालचे उदाहरण देऊ नका. या देशानी सुबत्ता उपभोगलि आहे. पण कमुनिस्ट भिकारी होते व् भिकारिच रहाणार.
हुकुमशाहित तुम्हाला माहीत अस्त की तुम्ही सत्ताविरोधी बोलू शकत नाही, पण कमुनिस्ट राजवटित तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र्यचे गाजर दाखवले जाते, दाखवले जाते , खायला देत नाहीत.
कन्हैयाला फ़क्त राजकीय फायद्यासाठी डावे वापरणार नंतर फेकून देणार. एकतर तो धोबीचा कुत्ता झाला आहे. खाजगी क्षेत्रात या पराक्रमामुळे कोणी घेणार नाही आणि राजकारणात डाव्याच्या बाजूने उतरल्यास फक्त भाषणासाठी त्याचा उपयोग करून घेतील. म्हणजे आज इटालियन बहू आणि पप्पू जशे आपल्या पूर्वजाच्या बलिदानावर रड़तात तसाच हां देखिल जेनयूमधे त्याच्यावर झालेल्या तथाकथित अत्याचारांचे दळन दळत बसणार.
6 Mar 2016 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकीचं सगळं जाऊंद्या पण...
तुमाला तुमचं सोडून इतर कोणाचं (कन्हयाचं का होईना) मत पटलं याचंच लई कौतीक वाटतया बगा !
(आजचा दिवस फार वेगळा दिसतो आहे. बाहेर जावून सूर्य कोठून उगवला ते पहावे असे प्रकर्षाने वाटले, पण त्याची चर्चा इथे नको.)
कन्हैय्या म्हणतोय सगळ्याच पक्षांची स्ट्रक्चर्स चुकीची आहेत आणि त्यांचा नाश करायला पाहिजे. पण त्याजागी काय आणायचे याची कल्पना तो देत नाही. म्हणजे त्याला फक्त प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावायचा आहे... ही कम्युनिझमची जुनी परंपरा आहे. पण, इथे मुख्य फरक असा की, भारताबाहेरच्या कम्युनिस्टांकडे, वाईट का होईना, पण निदान एका पर्यायी व्यवस्थेची कल्पना (पक्षी : कामगारांच्या नावाखाली त्यांच्या नेत्यांनी चालवलेली हुकुमशाही) असते/आहे. कन्हैय्या "प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावायचा" इथेच थांबतो... म्हणजे थोडक्यात तो स्ट्रक्चर(व्यवस्था)विरहित अराजकाला आमंत्रण देतो आहे... भारताला सद्याचा इराक करायला यापेक्षा जास्त उत्तम पर्याय मिळणे कठीण आहे !
अराजक निर्माण करण्याच्या मुद्द्यावर कन्हैय्या व (स्वघोषीत अराजकसंवर्धक) केजरीवाल यांचे जमले हे आश्चर्याचे नाही. मग, कट्टर केजरीवालसमर्थक असलेल्या धागालेखकाने कन्हैय्याचे कौतूक करावे यात आश्चर्य ते काय !
कन्हैय्याच्या वागण्यामागे दोन मुख्य कारणे शक्य आहेत...
१. तो काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी घटं भिंद्यात...; स्फोटक बोलून; वेळप्रसंगी फुटीरवादाला / अतिरेक्यांना पाठींबा देऊन; आणि इतके सर्व करून ज्या भारतिय घटनेला सुरुंग लावायच्या घोषणा करायच्या तिचाच दाखला देऊन तिचेच संरक्षण मागायचे; इ काहीही त्याला वर्ज्य नाही. जनेविच्या प्रसंगाने तर त्याला आयतीच संधी मिळाली आहे. तो राजकारणी आहे हा त्याचा स्वतःचा दावा आहे. तेव्हा, सद्याच्या कोणतीही साधनशुचिता न पाळण्याच्या (अगदी देशहिताकडे प्रत्यक्ष/दुरान्वयाने दुर्लक्ष करणे वर्ज्य नसणे) गढूळलेल्या राजकारणात तो असे करतो आहे यात फारसे आश्चर्य नाही... पण याचा अर्थ ते क्षम्य आहे असे निश्चितच नाही.
२. वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र त्याला (आणि त्याच्या पाठीराख्यांना) एखाद्या चांगल्या वैद्यकिय तज्ञाच्या सल्ल्याची गरज आहे. पण, बोलताना त्याच्या डोळ्यात येणारी चलाख चमक पाहता ही दुसरी शक्यता फार कमी आहे... ती केवळ दूरची सैधांतिक शक्यता (रेअर थिएरेटिकल पॉसिबिलिटी) म्हणुनच नोंदली आहे.
6 Mar 2016 - 3:44 pm | विवेक ठाकूर
आहो तेच तर तो सांगतोयं! वरती सुबोधजींना मी दिलेला प्रतिसाद वाचलात तर कल्पना येईल.
तो काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहे...
भारीच ज्योक मारतायं ! सत्तेविरुद्ध लढायला हिंमत लागते असं नाही वाटत ?
तेव्हा, सद्याच्या कोणतीही साधनशुचिता न पाळण्याच्या (अगदी देशहिताकडे प्रत्यक्ष/दुरान्वयाने दुर्लक्ष करणे वर्ज्य नसणे)
तो कायम कायद्याच्या मर्यादेत राहतोयं. तुम्ही त्याचं बेल मिळाल्यावरचं जेएनयूमधलं भाषण ऐका, बरखा दत्तची तिथली मुलाखत पाहा किंवा पोस्टमधे दिलेला विडिओ पाहा.
वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र त्याला (आणि त्याच्या पाठीराख्यांना) एखाद्या चांगल्या वैद्यकिय तज्ञाच्या सल्ल्याची गरज आहे. पण, बोलताना त्याच्या डोळ्यात येणारी चलाख चमक पाहता ही दुसरी शक्यता फार कमी आहे.
अजिबात नाही ! तो प्रत्येकानं आपापल्या दायर्यात समतेसाठी काम करावं असं म्हणतोयं... म्हणजे तुम्ही वरचा विडिओ बहुदा पाहिलाच नाही. आणि सुहासजी किमान तुमच्याकडून तरी इतर तद्दन आयडींसारखी ` वैद्यकीय उपचार' वगैरेची भाषा निदान मला तरी अपेक्षित नाही.
7 Mar 2016 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी प्रतिसादाबाबत काही लिहिण्यासारखे नाहीच. पण...
सुहासजी किमान तुमच्याकडून तरी इतर तद्दन आयडींसारखी ` वैद्यकीय उपचार' वगैरेची भाषा निदान मला तरी अपेक्षित नाही.
या भागाबद्दल काही...
त्या शब्दयोजनेअगोदरची "वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र..." ही वाक्यरचना गाळून केवळ काही संदर्भविरहित शब्द उचलून आपल्याला हवा तो अर्थ लावण्याचे आश्चर्य वाटले नाही, इतकेच !
तुमच्यासाठी खास शास्त्रिय विश्लेषण : "अराजकातून" "आपोआप" काही चांगले बाहेर येईल असा "खरा खरा विश्वास" असणार्या कोणत्याही माणसाचे मानसिक संतुलन ढळले आहे असे मानसशास्त्राच्या आधारे म्हणता येईल.
8 Mar 2016 - 9:40 pm | llपुण्याचे पेशवेll
>> एक कामगार मालकाच्या एकाधिकारशाही विरुद्ध लढू शकतो
मालकाची एकाधिकारशाही म्हणजे? मालकाच्या कारखान्यात मालकाची एकाधिकारशाही नसणार तर कोणाची असणार युनियनची?
सध्या मार्केट इतकं खुलं आहे की नोकर न सांभाळू शकणारा मालक आत्मघातास कारणीभूत ठरतो आणि त्याच कारणामुळे अतिरेकी आकांक्षा असणारा नोकरही. आता मालकाची एकाधिकारशाही संपवायची म्हणजे काय बरे?
>> समता, साम्यवाद, गरीबांना समान संधी
बर मग समता साम्यवाद समान संधी ही चैन श्रीमंतांसाठी नाही का? का त्यानी फक्त आयकर भरत बसायचे? समान सम्धी जर हवी तर ती 'सर्वाना' का नको?
8 Mar 2016 - 10:53 pm | मम्बाजी सर्वज्ञ
'वैचारिक पप्पुगिरि' हि टर्म भारी आहे. आवडली.... बाकीचं चालू द्या.
9 Mar 2016 - 12:39 am | ट्रेड मार्क
गरिबांना कुठल्या संधी नाकारल्या गेल्यात हे जरा विस्ताराने सांगाल का? कन्हैयाच्या कुटुंबाचे उत्पन्न रु. ३००० प्रती महिना आहे. म्हणजे तो गरीब म्हणून गणला जावा. त्याला कुठली संधी नाकारली गेली? जनेवि मध्ये Ph.D करतोय याचा अर्थ मास्टर्स केलं असेलच. ते पण सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीवर. वय २८/२९ असून, घराची परिस्थिती हलाखीची असून दुसरा कुठला काम धंदा न करता एवढे उच्च शिक्षण मिळतंय. मग कुठला अन्याय होतोय? कोणावर होतोय? कुठल्या विषमतेबद्दल बोलतोय हा? बरं हा आणि अश्या बाकी गरीब मुलांना संधी मिळू नये म्हणून कोणी काही काड्या केल्यात का? संधी तर सर्वांना समानच आहेत किंबहुना आरक्षणामुळे एका गटाला संधी पण नाकारली गेलीये.
जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे मग सगळं समान कसं असेल? प्रत्येकाला त्याच्या वकुबाप्रमाणे यश, पैसे, प्रसिद्धी, मान मरातब मिळतो. उगाच सर्व सगळ्याच बाबतीत समान असावेत ही इच्छा धरणे हे निसर्गनियमांविरुद्ध आहे.
5 Mar 2016 - 11:57 pm | प्रतापराव
खरे, केजरीवालांबद्दलही लोक आधी असेच बोलत होते.
6 Mar 2016 - 12:26 am | विवेक ठाकूर
मुद्दा विचारधारेचा आणि आपली विचारसरणी बदलण्याचा आहे.
5 Mar 2016 - 8:33 pm | कट्टापा
भाषण एक नंबर ! शंभर तोफंची सलामी !!
Modi ji Your PM of entire nation , not of RSS ideology
क्या बात है!! :)
आज पर्यंत फक्त क्रांति, मार्क्स, चेग्वेरा, लेनिन, विधार्थी आंदोलने या बद्दल फक्त ऐकून होतो, काल तोच जोश कन्हैया मधे दिसत होता.
#भावा_फुल्ल_सप्पोर्ट
7 Mar 2016 - 4:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिल्यांदा तुमी बिचार्या सज्जन बाहुबलीला का मारलंत ते सांगा ! मग तुमचं कायबी ऐकायला तयार हौत :) ;)
5 Mar 2016 - 8:45 pm | अनुप ढेरे
वेगळा विचार वगैरे काही नाही. ही असलीच भाषणं डावे पक्ष अनेक वर्ष देत आहेत. गरीबी हटाओ, मनुवाद हाय हाय वगैरे वगैरे. यात नवं काहीच नाही. मोदी/भाजपा विरोधी लोकांना कोणीतरी रॅलिंग पॉईंट मिळाला म्हणून सगळे टाळ्या पिटतायत.
पण तुरुंगात जाउन आल्यावर भारत की बरबादी होगी, भारत तेरे टुक्डे होंगे वगैरे घोषणा चूक होत्या, संविधानात/ न्याय व्यवस्थेत माझा विश्वास आहे ही उपरती झाली हेही नसे थोडके.
5 Mar 2016 - 9:15 pm | श्री गावसेना प्रमुख
टार्गेट कितीचं आहे,नाही ते अश्या साठी कि जरा धुरळा खाली बसला कि काही लोक जोरात गाड्या घेऊन जातात ना हो।
5 Mar 2016 - 9:56 pm | विकास
धुराळाच आहे तो, त्यामुळे कधीतरी खाली बसणारच... तरी पण जितका जास्त धुराळा, तितकी जास्त धुळफेक असे शिंपल मॅथ आहे.
5 Mar 2016 - 10:35 pm | तर्राट जोकर
तीव्र सहमत ;-)
6 Mar 2016 - 12:56 am | विकास
सहमतीबद्दल आभार.
धुराळा - आझादी च्या आणि सरकार विरोधी बोंबा. अथवा अॅवार्ड वापसी-लीला..
धुळफेक - सरकार म्हणजे वाईटच, हिंदू म्हणजे सगळे अंधश्रद्धा, वगैरे वगैरे.
6 Mar 2016 - 12:59 am | तर्राट जोकर
सरकार म्हणजे वाईटच >> आपलं सरकार आल्यावर उपरती होतेच म्हणा. ;-)
6 Mar 2016 - 12:03 am | प्रतापराव
सहमत पण हे मोदिंनाही लागु होते
6 Mar 2016 - 1:03 am | सुबोध खरे
6 Mar 2016 - 1:12 am | सुबोध खरे
6 Mar 2016 - 1:20 am | सुबोध खरे
मोबाईल वर पेस्ट होत नाही ?
7 Mar 2016 - 5:19 pm | sagarpdy
प्रतिसादात मोबाईल कीबोर्ड ला येणाऱ्या स्मायली टाकू नका. तसेच काही विशेष अक्षरे.
7 Mar 2016 - 7:29 pm | सुबोध खरे
7 Mar 2016 - 7:29 pm | सुबोध खरे
6 Mar 2016 - 9:46 am | मंदार कात्रे
कन्हैया कुमारला 6 महिन्यांसाठी अंतरिम जामीन मिळाला.
दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला, ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. जामीनाबाबत न्यायालयाची दिशा अतिशय स्पष्ट असते. त्यानुसार जामीन मिळणार हे काही वेगळं नव्हतं. अगदी कन्हैया ची केस कपिल सिब्बलच काय पण कोणीही लढली, असती तरी तो मिळणारच होता.
पण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आदेशात ज्या गोष्टी नमूद केल्या त्याचा विचार ही करणे अतिशय आवश्यक आहे.
- आदेशाच्या परिच्छेद 39 मध्ये न्यायमूर्ती म्हणतात कि, यातील जामीन अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ते हे जे स्वतंत्र उपभोगत आहेत ते केवळ सीमेवर सैन्य रक्षा करण्यासाठी आहे म्हणून.
-परिच्छेद 41:- अफजलगुरु आणि मकबूल भट्ट च्या नावाने युनिवर्सिटी कॅम्पस च्या सेफ वातावरणात जे लोक घोषणा देत होते, त्यांना हे स्वतंत्र मिळत आहे ते केवळ आपल्या सैन्यामुळेच, जे सैन्य प्राणवायूचा कामतरतेमध्ये ही संरक्षण करत आहेत. देश विरोधी घोषणा देणारे तिथे तासभरही थांबू शकणार नाहीत.
-परिच्छेद 42:- अशा घोषणांमुळे, शहिदांच्या परिवाराचे खच्चीकरण होते आहे.
-परिच्छेद 43:- जामीन अर्जदार (कन्हैया) घटनेच्या आर्टिकल 19-1- a अंतर्गत बोलण्याचे स्वातंत्र्य मागत आहे, त्याने हे ही लक्षात ठेवावे की घटनेच्या आर्टिकल 51 A मध्ये नागरिकांच्या जबाबदाऱ्या (fundamental duties) सांगितल्या आहेत.
यापुढे जाऊन मा. न्यायमूर्ती असेही म्हणतात कि, JNU मध्ये अशाप्रकारचा प्रोग्रॅम घेणारे व देश विरोधी घोषणा देणाऱ्यांना fundamental right to freedom of speech and expression अंतर्गत संरक्षण मागता येणार नाही.
हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, असा साथीचा रोग झालेल्या विद्यार्थ्यांचा हा रोग काबूत ठेवला पाहिजे/ दूर केला पाहिजे. हा रोग पसारण्यापूर्वीच antibiotics दिले पाहिजे, आणि त्याचा उपयोग होत नसेल तर शस्त्रक्रिया ही करावी लागेल. गँगरिन झाल्यास तो भाग कापून काढावा लागेल.
दिल्ली उच्च न्यायालयाचा रोख स्पष्ट आहे. जामीन मिळाला म्हणून कुणी खुश होण्याची गरज नाही. आणि कुणी न्यायालयाला नावे ठेवण्याची पण गरज नाही.
©आदित्य रुईकर, Advocate.
6 Mar 2016 - 10:15 am | तर्राट जोकर
म्हणजे न्यायालयाने खटला चालण्याआधीच निकाल दिला म्हणायचा का?
6 Mar 2016 - 10:22 am | बोका-ए-आझम
Trial by media मध्ये काय वेगळं होत असतं? ते अधिकार नसताना निर्णय देऊन मोकळे होतात. इथे न्यायालयाला अधिकार तरी आहेत.
रच्याकने आपलं त्या अभाविपवरचं बोलणं अर्धवट राहिलंय. खरडवहीत लिहू का?
6 Mar 2016 - 10:37 am | तर्राट जोकर
तुम्हीच ठरवा कुठे लिहायचे ते.
6 Mar 2016 - 11:52 am | डॉ. एस. पी. दोरुगडे
कन्हैया कुमार ला पुढील राजकीय वाटचालिसाठी शुभेच्छा. तो PM होईल असं नाही वाटत. पण मोदी होतील असं तरी कुठे वाटलं होतं?
(सर्वच डाव्यांप्रमाणे) आक्रस्ताळी स्वभाव वाटतो त्याचा ( हल्ली आक्रस्ताळी नेते सर्वच पक्षात सापड़तात हे ही खरं). आपणच या देशाचे तारणहार (या शब्दातील हार तेवढी खरी) आहोत हा अशांचा पक्का (चुकीचा) समज.
7 Mar 2016 - 12:23 pm | नितीनचंद्र
जे एन यु चे रजिस्ट्रार म्हणतात की काही विद्यार्थ्यांनी अफजल च्या स्मृती दिना दिवशी मेळावा इ. परवानगी ( जे एन यु ) परिसरात मागीतली होती जी रजिस्ट्रार यांनी नाकारली. यावर कनैह्या ह्यांनी अध्यक्ष म्हणुन विरोध प्रकट केल्याचा पुरावा आहे. आज ही बातमी दुरदर्शनच्या एन डी टी व्ही वर प्रसिध्द झाली आहे.
वास्तवीक विद्यार्थी त्यांच्या संदर्भातल्या पॉलीसीचा विरोध विद्यापीठ आवारात करत असतील तर गैर नाही पण राजकीय आणि गुन्हा सिध्द होऊन फाशी झालेल्या माणसाचे गोडवे गाण्यासाठी परवानगी मागत असतील तर गैर आहे.
परवानगी नाकारल्यावर निदर्शने / मेळावा घेतल्याचे सिध्द झाल्यास यांना जे एन यु मधुन हाकलणे योग्य ठरावे.
7 Mar 2016 - 12:34 pm | विवेक ठाकूर
तुम्ही लिंक द्याल का ?
7 Mar 2016 - 1:08 pm | श्रीगुरुजी
मी देतो. ही घ्या लिंक. हा संदर्भ असणार्या अजून बर्याच लिंक्स आहेत.
http://www.newindianexpress.com/nation/Kanhaiya-Had-Objected-to-Cancella...
Kanhaiya Had Objected to Cancellation of Permission for Afzal Guru Event: JNU Registrar
NEW DELHI: JNUSU president Kanhaiya Kumar had objected to cancellation of permission for the controversial event against hanging of Parliament attack convict Afzal Guru, JNU Registrar Bhupinder Zutshi has claimed.
Around 3 pm, we had a discussion on the bus route. After 10 minutes, Saurav Sharma (ABVP member and JNSU joint secretary) also came. We all discussed the bus route for 10 minutes.
"Sharma later showed me a pamphlet regarding the 'cultural event' on 'judicial killing of Afzal Guru' and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba," Zutshi has told the committee.
The Registrar has further maintained that when the varsity decided to withdraw the permission, Kanhaiya had called him objecting to the cancellation.
7 Mar 2016 - 1:36 pm | विवेक ठाकूर
ती कन्हैयाची चूक आहे हे मान्य .
7 Mar 2016 - 5:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
केवळ हीच एक चूक नाही तर भूतकाळात झालेल्या अनेक सभांच्या पत्रकांच्या ज्या प्रती इराणींनी त्याच्या लोकसभेच्या भाषणात पुरावा म्हणून दाखवल्या होत्या त्याही विद्यापिठाच्या रेकॉर्ड्प्रमाणे सत्य आहेत हे सुद्धा रजिस्ट्रारने लेखी उत्तराने कळवले आहे !
त्या सर्व पत्रकांत देशविरोधी काय काय लिहीले होते हे कळण्यासाठी व ते पुरावे का सबळ होते (जे आता परत एकदा सिद्ध झाले आहे) हे माझ्या त्यासंबधीच्या धाग्यातील चित्रफीत परत पाहिल्यास कळेल !
जनेविमधे हे सगळे इतका काळ चालले असताना जर कन्हैय्या म्हणतो तसे "त्याला काहीच माहीत नाही" किंवा "त्याचा या सगळ्याला पाठींबा नसतानाही त्याने विद्यार्थी संघटनेचा सर्वोच्च नेता या नात्याने काही केले नाही/करण्याची क्षमता दाखली नाही"... तर मग तो कोणत्या लायकीचा नेता आहे ? आणि जर त्याने देशद्रोही कारवायांकडे हेतूपुर्स्सर दुर्लक्ष केले असेल तर मग त्याची देशद्रोह्यांबरोबर हातमिळवणी आहे असे म्हटले तर काय चुकले ?
सत्य हेच आहे की अश्या देशविरोधी कारवाया फार पूर्वीपासून जनेवित चालत आलेल्या आहेत पण लांगुलचालन आणि स्वार्थी राजकारणामुळे त्याविरुद्ध पूर्वी कारवाई झाली नाही... आणि पूर्वानुभवावरून पाहता आताही ती होणारच नाही असा त्या लोकांचा ठाम समज झालेला होता... तो झालेल्या कारवाईने खोटा ठरला.
इतके रामायण झाल्यावर आणि बाजू आपल्यावर उलटल्यावर कोणीही मीदोषी आहे असे म्हणेल काय ? उलट आपली कातडी बचावण्यासाठी "माझ्यासारखा घटनेचा पाईक मीच" असेच म्हणणार... कन्हैय्या तेच करत आहे.
शेवटचा निर्णय कोर्टात केस पूर्णपणे चालल्यावरच येईल. पण, कन्हैय्याला जामीन देताना कोर्टाने वैद्यकीय परिभाषेत लिहिलेल्या काही टिप्पण्या पाहिल्या तर कोर्टापुढे कोणते व किती सबळ पुरावे ठेवले असावेत याचा काहिसा अंदाज (बिटविन द लाईन्स वाचल्यास) यायला हरकत नाही.
बुद्धीला अजून काही खाद्य : सुरुवातीला अतीजोरात असलेला कनहैयामागचा राजकीय पाठींबा आता बर्याच अंशी गायब झाला आहे यामागे काय गुपीत असावे बरे ? (कम्युनिस्ट त्याला बंगालमधे नेऊ म्हणतात ते सोडा. तिथे कम्युनिस्टांची हालत इतकी खस्ता झाली आहे की तेथे जाणे कन्हैय्याचा राजकीय आत्मघात ठरेल !)
7 Mar 2016 - 6:32 pm | विवेक ठाकूर
याच न्यायानं रोहित वेमुला प्रकरणात डॉ. राजश्रींची स्टेटमंटस बघितली तर बाईंनी धादांत खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत हे मान्य कराल का ?
सुरुवातीला अतीजोरात असलेला कनहैयामागचा राजकीय पाठींबा आता बर्याच अंशी गायब झाला आहे यामागे काय गुपीत असावे बरे ?
त्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला तर त्याच्या वक्तव्यातला दुभंग लोकांसमोर येईल. पण दिलेला विडिओ आणि त्या नंतर झालेले त्याचे इंटरव्यूज पाहिले तर त्याचा विद्रोह सत्तेविरुद्ध आहे, देशाविरुद्ध नाही हे विदाऊट एनी इन बिटवीन लक्षात येतं. शिवाय न्यायालयानं त्याला जामिन दिला आहे आणि इतर आरोपींना तो मिळालेला नाही ही वस्तुस्थिती सुद्धा समोर आहेच.
7 Mar 2016 - 5:34 pm | शलभ
छान. आवडला तुमचा प्रांजळपणा (हे खोचकपणे नाहीय)
आता नविन (म्हंजे जुन्याच पण तुमच्यासमोर नविन) आलेल्या तथ्यानुसार तुमचे वरचे विचार परत एकदा मांडा.
7 Mar 2016 - 6:19 pm | विवेक ठाकूर
"Sharma later showed me a pamphlet regarding the 'cultural event' on 'judicial killing of Afzal Guru' and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba," Zutshi has told the committee.
हे तुमच्या नजरेतून सुटलं का ? आता शर्मा त्या कार्यक्रमाची परवानगी मागायला गेला होता का त्या विरोधात तक्रार करायला ? याची शहानिशा व्हायला हवी आणि मग निवाडा होऊ शकतो.
7 Mar 2016 - 7:03 pm | शलभ
सुटलं नाही. पण शर्माचं objection असतं तर रजिस्ट्रार ने त्याचं पण नाव घेतलं असतं. शर्मा चुकला असेल तर त्यालाही आत घ्या. चुकीला माफी नाही.
ते जाऊदे पण कन्हैयाचं चुकलं असं मान्य केलय तुम्हीच तर त्याविषयी बोला.
तुम्ही प्रांजळ्पणा सोडू नका (एवढेच ह. घ्या ;))
7 Mar 2016 - 2:08 pm | नितीनचंद्र
ती कन्हैयाची चूक आहे हे मान्य म्हणुन काय देशद्रोह होतो का ? अजाणते पणी सरकारी स्कॉलरशिप वर राहुन कधी कधी बुध्दी भ्र्ष्ट होते माणसाची. जाऊद्या तो लहान आहे, विद्यार्थी आहे. अस म्हणणारे आता पुढे या.
7 Mar 2016 - 2:26 pm | तर्राट जोकर
अजाणते पणी सरकारी स्कॉलरशिप वर राहुन कधी कधी बुध्दी भ्र्ष्ट होते माणसाची.
>> काय हे? या वाक्याचा अर्थ काय?
7 Mar 2016 - 4:19 pm | नितीनचंद्र
या वाक्याचा अर्थ भारतात असहिष्णुता आहे. उगाचच विरोधी पक्षाच्या लोकांना तुरुंगात डांबण्यात येते असा तुम्ही लाऊ शकता.
7 Mar 2016 - 4:30 pm | तर्राट जोकर
कुठल्या सरकारी स्कॉलरशीपवर राहून आपले हे असे झाले?
7 Mar 2016 - 5:49 pm | चेक आणि मेट
कन्हैयाला अफजलगुरूबद्दल प्रश्न विचारल्यावर एखाद्या मुरलेल्या नेत्याप्रमाणे गोलगोल उत्तर देवून मोकळा होतो.
बाकि सगळं चालू द्या ओ,मोदींना,संघाला,हिंदुत्ववादाला कितीही विरोध करा,पण त्याच्याआडून आपण भलतचं काहीतरी दुसरं करतोय हे समजण्याइतकी तरी बुद्धी आहे का त्या कन्हैयाला?
8 Mar 2016 - 9:49 am | विकास
भाषण स्वातंत्र्याची ऐशीतैशी
8 Mar 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी
हेच लिहायला आलो होतो. आता हळूहळू या प्रकरणातील सत्य बाहेर येत आहे. विद्यापीठाच्या रजिस्ट्रॉरने दिलेल्या साक्षीवरून "आपल्याला अफझल गुरूवरील कार्यक्रमाची माहिती नव्हती" हा कन्हैय्याचा दावा खोटा ठरल्याचे दिसत आहे. सर्व प्रकार ठरवून केल्याचे स्पष्ट होत आहे.
8 Mar 2016 - 8:16 pm | साती
विठांशी कन्हैयाबद्दलच्या बहुतेक मतांबाबत सहमत.
9 Mar 2016 - 7:19 am | विवेक ठाकूर
इथले विचारवंत काय विचार करतात याच खरंच नवल वाटतं. मुद्दा काय आणि चर्चा काय ! मी एक साधी गोष्ट सांगण्यासाठी ही पोस्ट टाकली होती की समता ही प्रत्येक सुजाण नागरिकाची, वैयक्तिक जवाबदारी सुद्धा आहे. आणि त्या संदर्भात कन्हैयाचे विचार अत्यंत योग्य आहेत. इथल्या मान्यवरांसकट सर्वांनी इतक्या साध्या गोष्टीला संपूर्ण राजकीय रंग फासून त्या संवेदनाशील विचारांची वाट लावली.
कन्हैया दोषी आहे किंवा कसं हे न्यायालय ठरवेल पण त्याचे या विडिओत व्यक्त झालेले विचार अत्यंत मननीय आहेत. अत्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणं, मग बिजेपी आणि शेवटी आपवर घसरणं हे फक्त एकच गोष्ट दर्शवतं ` वंचितांप्रती संवेदनाशीलता' हा लोकांना पक्षीय अजेंडा वाटतो. ती व्यक्तिगत जीवनात अनुसरायची गोष्ट होऊ शकते हे लक्षातच येत नाही.
तस्मात, इंदिरा गांधी काय की मोदी काय की आणखी कुणी काय लोकांच्या या मानसिकतेचा कायम फायदा घेत राहातील आणि स्वतःचं कल्याण साधत राहातील. आणि वंचितांना शेवटपर्यंत वंचनाच मिळत राहील.
9 Mar 2016 - 1:13 pm | शलभ
काय हे. वरती तर म्हणालात कि कन्हैयाची चूक झाली. आता परत पल्टी.
संपला का तुमचा प्रांजळपणा..
9 Mar 2016 - 2:30 pm | श्रीगुरुजी
कमाल आहे. तो आणि त्याचे कुटुंबिय हे पूर्वीपासूनच कम्युनिस्ट आहेत. जो मुळातच कम्युनिस्ट आहे त्याला कम्युनिस्ट म्हणणे म्हणजे नादानपणा?