आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी येतो,
उगाचच खूप मोठे झाल्याचे भासवतो,
मित्रांच्या शुभेच्छा संदेश पहात भूतकाळात रमवतो,
शाळेच्या वर्गात, क्रिकेटच्या ग्राउंडवर, मंदिराच्या पायऱ्यांवर, रेल्वेच्या क्रॉसींगवर, गावच्या नदीवर,
कधी धरणावर तर कधी विष्णूच्या तळ्यावर फक्त मनानेच हुंदडत असतो,
पाणावलेल्या डोळ्यांत एकच प्रश्न अनुत्तरीत असतो,
आपण उगाचच एवढे मोठे का होत असतो,
आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी पुन्हा येतो.