Elementary, my dear Watson!

केडी's picture
केडी in जनातलं, मनातलं
23 Feb 2016 - 4:46 pm

शेरलॉक होल्म्स साठी जरी काही गोष्टी इतक्या elementary असायच्या तरीही माझ्या आयुष्यात मात्र "elementary exam" हि काही इतकी elementary गोष्ट न्हवती. त्या काळी, म्हणजे अस्मादिक जेंव्हा आठवीत होते, तेव्हा आमच्या पालकांना कोणी सांगितला कोणास ठाऊक, कि बुवा elementary आणि Intermediate ह्या २ चित्रकला परीक्षा पास झाल्या कि दाहावीच्या परीक्षेत अर्धा का एक टक्का बोनस मिळतो म्हणे! तसेही, आमची अभ्यासातली एकंदर गती बघता ,आमची drawing च्या क्लास ला रवानगी न झाली तरच नवल! आणि त्या काळी, मी हे करणार नाही, किंवा मला जमणार नाही असे ऐकून घेणारे समजूतदार पालक जन्माला यायचे होते.

तर, माझी elementary आणि त्या नंतर Intermediate ची तयारी सुरु झाली. घरा जवळच एक drawing च्या शिक्षिका होत्या, त्यांच्याकडे दर शनिवार आणि रविवार, दुपारची झोप मोडून मी drawing च्या तासाला जायला लागलो. एकंदरीत माझी आणि चित्रकलेची गट्टी कधी जमलीच नाही (हो उगाच खोटं कशाला बोलू). त्या बाई मात्र दिवस रात्र प्रयत्न करून माझ्या कडून चित्र विचित्र चित्र काढून घेत. पण माझी एकूण प्रगती बघता त्या देखील कधीतरी लाजेकाजेस्तव मला चित्राचं रेखाटन करून देत. ते चित्र मी पेन्सिल ने गिरवून त्यात रंग भारत असे.

हे असं जरा बंर आलेले चित्र घरी दाखवावे तर, "हे तू काढलाय?" असा प्रश्न आणि मग "परत काढून दाखव बघू"! मग मी माझी चित्रकारिता पणाला लावून तेच चित्र पुन्हा काढायचा केविलवाणा प्रयत्न करायचो. (अर्थात तेच चित्र पुन्हा तसंच येणार नाही ह्याची खात्री असून सुद्धा).

आणि शेवटी ती परीक्षा! ३ तासात काढायचे ते still life चित्र! हे still life माझेच life stand still करून टाकायचे! प्रत्येक वर्गात नेहमी तेच चित्र (आता नेहमी ह्याचा अर्थ काही सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेला असेलच, कि आमचा निकाल काय लागायचा ते!)

कुठल्या तरी आगम्य रंगाची एक बदली, त्याच्या शेजारीच एक वेगळ्याच रंगाचा टमरेल, एक टॉवेल त्या बादलीतून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय आणि शेजारी त्या season मध्ये असलेली काही मोजकी फळे, त्यात केळी हि हमखास! उगाच कधीतरी बद्दल म्हणून एखादा ब्रेड आणि त्याचे तीन चार तुकडे मान टाकून पडलेले.

अश्या ह्या नयनरम्य देखाव्याचे आम्ही रेखाटन करायचे, त्यात रंग भरायचे आणि ते भरताना, खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे होणाऱ्या रंगछटा ह्या देखील दाखवायच्या! आता माझी रंगछटा म्हणजे एकीकडे लख सूर्यप्रकाश, तर दुसरीकडे भरून आलेले पावसाळी ढग अशीच दिसायची. एकतर ते चित्र काढताना, कधी टमरेलच बदली एवढे मोठे व्हायचे. केळी आणि सफरचंदांच तर काही विचारूच नका! आजूबाजूचे मात्र, एक डोळा बंद करून पेन्सिलीने मापं घेत ते चित्र रेखाटण्यात दंग असायचे. मला मात्र ते नक्की काय करतायत हे कधीच उमजलं नाही. मी देखील एक दोनदा तसा प्रयत्न करून पाहिला, पण त्यात फार काही यश आल नाही. त्यात परत ते चित्र काढून रंगवे पर्येंत ती पिवळी धम्मक केळी काळी पडून जायची, म्हणजे आली का पुन्हा पंचाईत!

ह्या Elementary च्या परीक्षेने माझी दोन वर्ष खाल्ली! शेवटी एकदाचा "C" grade मध्ये ती परीक्षा मी कशीबशी पास झालो! Intermediate चे एक दोन प्रयत्न करून शेवटी जेव्हा तो अर्धा का एक टक्का रद्दबादल झाला, तेव्हा कुठे माझी सुटका झाली!

So Mr. Holmes, the next time you think its elementary, think twice!

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

हाहाहा! शेवटच्या टायपोने अजूनच हसवलं! ;-)

धन्यवाद चुकीची दुरुस्ती केली आहे।

एस's picture

25 Feb 2016 - 2:27 pm | एस

मस्त लिहिलेय तुम्ही! मीही या परीक्षा कशाबशा पास झालो. खरेतर पास झालो की नाही हेही आठवत नाहीये कारण रिझल्ट पहायला मिळालाच नव्हता. मास्तरांनी पकडून आणून बसवलं परीक्षेला म्हणून बसलो. ती सदाफुलीची फुलंपण आम्हीच फिरून, शोधून आणायचो. अशी एकंदरीत परिस्थिती असल्यामुळे माझी चित्रकला अजिबात सुधारली नाही. त्यामुळे ह्या दोन परीक्षा पास झालेल्यांकडे मी 'अजि म्यां ब्रह्म पाहिलें' असे पाहत असतो!

आमच्याकडे या प्रकाराला ग्रेड परीक्षा म्हणायचे, कर्तव्य भुमिती, स्थीरचीत्र, मुक्तहस्तचीत्र, स्मरणचीत्र असले काहीबाही नाव असलेले प्रकार असायचे, नेचर मध्ये सदाफुली ची फांदी परमनंट असायची, मला चित्र रेखाटता बर्यापैकी यायची मात्र रंग देण्याऐवजी गिरगुटकालाच/खरकाटणेच जास्त व्हायचे

नावाने वाटले एक निघाले वेगळेच.

बबन ताम्बे's picture

23 Feb 2016 - 6:05 pm | बबन ताम्बे

खूप वर्षांपूर्वीची त्रेधातिरपिट आठवली.
छान लिहीलेय.

उगा काहितरीच's picture

23 Feb 2016 - 6:29 pm | उगा काहितरीच

मी लहान असतांना सकाळ वगैरे पेपरमधे चित्र रंगवा नावाचे सदर यायचे रवीवारी. ते रंगवण्यापलीकडे चित्रकलेमधे कधीच प्रगती केली नाही . ;-) रच्याकने लेख छान आहे.

लेख मस्त...

केडी's picture

23 Feb 2016 - 8:46 pm | केडी

लेखा मधली शेवटची ओळ अशी असावी
So Mr. Holmes, the next time you think its elementary, think twice!

रातराणी's picture

24 Feb 2016 - 12:39 am | रातराणी

खुसखुशीत मजा आली :)

अभ्या..'s picture

24 Feb 2016 - 12:42 am | अभ्या..

काय राव, इलिमेंटरीलाच कंटाळलात? मजा असते ओ. पुढे इंटरमिडिएट करुन ड्रॉईंग कॉलेजला आला असतात की. काय लोकांना पण चित्रे सोडून गणिते न अभ्यासाची आवड असते कोण जाणे? ;)

यशोधरा's picture

24 Feb 2016 - 5:22 am | यशोधरा

मस्त लिहिलंय! स्टिल लाईफ, आवडता विषय आणि फुलाचे चित्र. झेनिया द्यायचे.

अर्धवटराव's picture

24 Feb 2016 - 5:36 am | अर्धवटराव

महाबळेश्वर, दिवेआगार कसं विसरेल मित्रा. तिथेही फिलॉसॉफीकल गप्पा. काकुंनी दिलेली पुरणपोळी खात पौर्णीमीच्या रात्री राजमाचीची भटकंती... कसलं निवांत होतं राव.
यंदा सुट्टी काढुन नक्की पुण्याला येणार. रायगडावर बसु रात्रीचं. मी असच अधे मधे सह्याद्रीचे फोटो बघत नॉस्टेल्जीक होत असतो.
तुमचे मोबाइल नंबर द्या रे. वीकांताला कॉल करतो.

सं.मं... प्रतिसाद उडवा प्लीज.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2016 - 7:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे हे हे. मस्तं खुसखुशीत लेख. माझी स्वतःचीही चित्रकलेमधे गती अशीचं होती. मी घोडा काढायला सुरुवात केला की चित्र संपेपर्यंत माकडसदृष्य प्राणी तयार होत असे. निसर्गचित्र नामक प्रकारामधे एवढी रिडंडन्सी की आज काढलेलं चित्र गेल्या वर्षी काढलेल्या चित्राची फोटोकॉपी वाटावी. चित्रकलेमधे फक्तं गाड्या नामक प्रकारामधे उत्तम गती होती. बाकी सगळा आनंदी आनंद होता. शाळेमधे चित्रकलेच्या तासाला आम्ही सगळे वह्यांमधे कमी आणि एकमेकांच्या शर्टांवर जास्तं रंगकाम करायचो. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या एकदम. चायला सक्काळी सक्काळी नॉस्टॅल्जिया फार वाईट.

पैसा's picture

24 Feb 2016 - 11:35 am | पैसा

मस्त लिहिलंय!

मृत्युन्जय's picture

24 Feb 2016 - 1:49 pm | मृत्युन्जय

हाहाहा, लेख मस्त. तुम्ही पास झालात आणि मी एलिमेंटरी मध्ये पण नापास झालो ही गोष्ट वेगळी (अंदरकी बात अशी की मी परीक्षेलाच बसलो नाही. )

सुमीत भातखंडे's picture

25 Feb 2016 - 9:09 pm | सुमीत भातखंडे

छान लिवलय.

चलत मुसाफिर's picture

25 Feb 2016 - 10:03 pm | चलत मुसाफिर

येलमेंटरी परीक्षेत दोनदा नापास होण्याचा पराक्रम केलेला मी जगात एकटाच आहे, असे मी अभिमानाने सांगत असतो. आज अभिमान पंक्चरला!!

स्वामी संकेतानंद's picture

25 Feb 2016 - 11:06 pm | स्वामी संकेतानंद

मी कोणत्याही चित्रकलेच्या परीक्षेत बसलोच नाही. आम्हां भावडांपैकी मीच असा एक चित्रशत्रू निघालो.