रामा मेघ दे : नाटकाच्या अगोदरचे पूर्वांक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Feb 2016 - 12:24 pm

नाटक वेड्या मंडळीचे नाटक वेड हा एक लेखनाचा वेगळा विषय ठरावा. नाटकासाठी हे मंडळी कायकाय करतील सांगणे कट्।ईण आहे. स्टेजवर येवून सादरीकरण करतानाची उण्यापुर्‍या अडीच तीन तासांची ती झिंग त्याना आयुष्यभर जिवंत ठेवते.
एखाद्या नाटकाच्या संहीता लिहीण्या पासून ते ते नाटक स्टेजवर अवतरणापर्यन्त प्रवास हा काही वेगळाच असतो.
दक्षीण अफ्रीकेत असताना मी एक नाटक लिहिले. अस्सल आपल्या मातीतले.
इकडे आल्यानंतर मी ते काही निर्मात्याना दाखवले. नाटकाचा विषय अगदी आपल्या नेहमीच्या परिचयातला. निर्मात्याना नाटकाची थीम आवडायची पण नाटकात पंधरा सोळा कलाकार आहेत म्हंटल्यावर गाडी व्यावसायीक गणीताच्या रुळांवर अडकायची. तसेच इतक्या कलाकारांच्या तारखांची गणीते हा अवघड विषय होताच.
मुलीचा बाप ज्या प्रमाणे एका स्थळाकडून नकार आल्यानंतरही चिकाटी सोडत नाही दुसरे स्थळ बघत रहातो. कारण त्याला आपली सद्गुणी सालस मुलीला एका चांगल्या हातात सोपवायची असते त्याच चिकाटीने आम्ही निर्मात्याचा शोध घेत राहिलो.
नोकरीच्या अडनीड वेळा आणि बहुतांश मुंबई बाहेरच्या असाईनमेंट यामुळे लोकाना भेटता येईना.
घरातून " काय नसती थेरं चालवलीत. अगोदरच इतके व्याप आहेत आता हे आणखी कशाला घेतलय डोक्यात. " हे आणि " नाटकाचे व्यसन हे दारू गांजाच्या व्यसना पेक्षा ही वैट्ट" असे तत्सम शेरे मिळतच होते.
तरीही मी आणि माझ्या पेक्षाही जास्त चिकाटीने वेशभुषाकार चंदर पाटील, आम्ही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नाटकाचा विषय छेडत राहिलो. एका वाचनाच्या निमित्ताने दिग्दर्शक संदेश गायकवाडची भेट झाली. संदेशला नाटकाची थीम खूपच आवडली. आता चंदर पाटीलच्या जोडीने आणखी एक शिलेदार आमच्या जोडीला आला. निर्मात्याचा शोध चालूच राहिला. बोलता बोलता संदेश म्हणाला की आपण नाटक बसवायला घेवूया आणि दरम्यान निर्माता मिळेल असे बघुया.
आता प्रश्न आला पात्रे गोळा करण्याचा. मुंबईत अस्सल मराठी बोली बोलणारी माणसे शोधायची हे वाटले तितके सोपे नव्हते. नामांतर कांबळे श्रीकान्त हांडे , गणेश खाडे आमोद सावंत ज्ञानेश्वर शिंदे , आमोद सावन्त, श्रुती चव्हाण
असे अनेक कलाकार नाटकाचा विषय आवडल्यामुळे टीम मधे सामील झाले.
लगान चित्रपटातील भुवन ने जशी टीम बनवली तसाच काहीसा अनुभव होता हा.
त्या नंतर स्त्री कलाकार मिळवणे ही आणखी एक वेगळी कसरत सुरू झाली.
कलाकार यायचे. नाटकात केंद्रभागी असलेली ग्लॅमरस भूमीका नाही हे कळाल्यावर दुसरे दिवशी स्क्रीप्ट छान आहे पण मला सिरीयल्स ची कामी आहेत हे कळवायचे. काहीजणी नाटकात काम केल्यावर किती सिरीयल्स मिळतील याचे हिशेब विचारायच्या. अस्सल मराठी नावे असणार्‍या दोघीतीघींचे स्वच्छ मराठी उच्चारांचे वांधे होते.
शेवटी एक कलाकार मिळाली तीचे मराठी चांगले होते. तीने दोन दिवस प्रॅक्टीसही केली पण आम्ही निर्माता अजून शोधतोय हे कळाल्यावर तिनेही अचानक सिरीयल्स मिळाल्याचे निमित्त सांगून आम्हाला टांग मारली.
अचानक संदेशला आपण "कल्पना कदमाना" ओळखतो हे आठवले. नाटकाचा विषय ऐकल्यावर कल्पना कदम नाटकाच्या टीमला लगेच जॉईन झाल्या. मराठी उच्चारांची उत्तम जाण असणारी एक अनुभवी कलावंत आता आमच्या
टीम मधे होती.
नाटकातील सूत्रधार हे पात्र अधूनमधून गाणी म्हणते. चांगले मराठी उच्चार असणारे कलाकार स्टेजवर गाणे म्हणायचे म्हंटल्यावर गाणे शिकवा म्हणू लागले.
नाटकाच्या प्रॅक्टीसला जागा मिळवणे ही रोजची कसरत होती. आज मुंबई युनिव्हर्सिटी , उद्या यशवंत नाट्यगृहाची गच्ची , परवा डी एम सी सी चा हॉल, असे करत तालमी चालल्या होत्या. भरीत भर म्हणून माझ्या ऑफिस ने मला तळोज्याला असाईनमेंट दिली. संदेश मात्र हिरीरीने चिकाटीने किल्ला लढवत होता.
काही कलाकार इतर संस्थांच्या नाटकात किंवा सिरीयल्स मधे काम करत होते त्यांच्या तारखा आणि तालमीच्या वेळा यांचे गणीत म्हणजे औटकीची पाढाच झाला होता.
पण एक होते दोन कलाकार कुठे एकत्र जमले की ते एकमेकाची प्रॅक्टीस घेत होते. हा एक सुखद अनुभव होता.
कलाकारांच्या डोक्यात या नाटकाशिवाय दुसरा विषय येत नव्हता. एखादा कलाकार तालमीला जर नसेल तर त्याच्या जागेवर दुसरा कलाकार तात्पुरता उभा करून प्रॅक्टीस सुरू ठेवायची संदेशची आयडीया बरेच मोठे मोलाचे काम करुन गेली.
आता प्रश्न होता नाटकातील गाणी तयार करण्याचा. संदेशने दोन तीन गीतकाराना विचारून पाहिले. त्यांचे वेळापत्रक जमेना. नाटकातील गीते लिहिणे हे कामही मग नाटकाच्या लेखकानेच अंगावर घेतले. या गाण्याना साउंड ट्रॅक वापरायचे ठरवले. मग संगीतकार वादक गायक शोधणे हे नवे काम लामागे लागले. मी तिकडे तळोजात होतो.
संदेश इतर जुळवाजुळवीत असायचा. शेवटी हिय्या करून गाण्याना चाली लावल्या. त्या चाली मी तळोजात असताना माझ्या आवाजात मोबाईलव्र रेकॉर्ड करून रेकॉर्डिस्ट गिरीश छत्रेकडे पाठवल्या. मधले पिसेस सुचवले.
वादकांचा प्रश्न अभिजीत डोंगरीकरने एक हाती सोडविला. गायीका कोण हा प्रष्न होताच.मला स्त्री गायीकेच्या आवाजतली गाणी अगदी खर्जातल्या पट्टीत म्हणजे काळी एक मधे हवी होती. त्यासाठी शास्त्रीय संगीत गाणार्‍या गायीका माधुरी बियावताना मोठे धाडस करून विचारले. त्यानीही आनंदाने तयारी दर्शवली. त्याना माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेली गाणी फोनवर पाठवली आणि त्यानी काळी एक मधे अक्शरशः एका टेक मधे गाणी रेकॉर्ड करुन दिली.
नाटकातील गाणी तयार झाली आता गरज होती या गाण्यावर नृत्य करणार्‍या कलाकाराची. सुदैवाने संदेशच्या फोनला यश आले. नृत्य करणार्‍या कलाकाराना गाणी फोनवर पाठवली. त्यानी त्यावर संदेशच्या सांगण्यानुसार अ‍ॅक्शन बसवल्या. स्वतःच्या स्टेज शोज चे वेळापत्रक सांभाळत त्या आमच्या तलामीना हजेरी लाऊ लागल्या.
आमचा निर्मात्याचा शोध चालुच होता. इतक्या कलाकारांचे नाटक सुरू करून आम्ही एक शिवधनुष्य उचललेले आहे याची आता आम्हाला जाणीव होतीच. पण हे धनुष्य इतके मोठे असेल ही मात्र कल्पना नव्हती.
नाटकाच्या तालमीना आम्ही निर्मात्याना बोलावत होतो. त्याना नाटक आवडत होते. सगळेच जण नाटक खूपच मस्त आहे वगैरे सांगायचे. नाटकाची तालीम बघताना त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव बघून आमच्या आशा पालवायच्या.
पण दुसरे तिसरे दिवशी ते निर्माते माझे दुसरे एक प्रोजेक्ट येतेय सांगायचे.
एक निर्माते आले त्याना नाटकातला लीड रोल हवा होता. लीड रोल असेल तरच ते निर्माते म्हणून येणार होते सर्व खर्च करणार होते. अर्थातच मला टीम मोडायची नव्हती. त्याना आम्ही नम्र नकार दिला.
दुसरे एक निर्माते तालीम बघायला आले. त्याना नाटक आवडले निर्माता म्हणून १०० % तयार आहे साम्गितले. ते काही कामासाठी दिल्लीला जाणार होते दोन तीन दिवसानी ते आले. एका भोजपुरी सिनेमाच्या शुटींगमधे ते होते. फोन केल्यावर " मी आता षॉट मधे आहे नंतर एका तासा नंतर फोन करतो" म्हणून फोन कट करत. त्यानंतर फोन एकसारखा बीझी लागतोय.
आणखी एक निर्माते होऊ इच्छीणारे आले त्यानाही नाटक खूप आवडले. नक्की करतो म्हणून ते पूर्ण उत्साहात गेले. त्याना फोन केल्या नंतर "त्यांच्या पार्टनरचे काल संध्याकाळीच लग्न ठरले आणि तो त्यात बिझी आहे. मी एकटा तुम्हाला फायनास करेन" असे उत्तर आले. नंतरच्या प्रत्येक फोनला या सबबी वेळोवेळी बदलत गेल्या
निर्मात्याचा शोध घेताना " निर्माता मिळायच्या अगोदरच नाटक करताय? धन्य आहे तुमची . " किंवा " करा करा बघुया कसं जमतय तुम्हाला ते" असले शेरे मिळतच होते.

काहीं मार्गदर्शक सल्ले , काही कुत्सीत रीमार्क्स यांचे वेगवेगळे अनुभव येत होते.
नाट्य निर्माता होणे म्हणजे काहितरी फार मोठे पाप असते असे सांगणारे भेटत होते.
आता पर्यन्त कलाकारांची चांगलीच प्रॅक्टीस झाली होती. नामांतर कांबळे आणि नाटक स्टेजवर यायला हवे होते.
नाटकाला थेटर मिळणे ही आणखी एक वेगळी कसरत असते. त्याबद्दल नंतर कधीतरी. प्रयोगासाठी थेटर मिळाले.
संदेश गायकवाडच्या उत्तम दिग्दर्शनाने बहरलेल्या, चंदर पाटीलच्या अस्सल हजरजबाबी विनोदी अभिनयाने रंगलेल्या, नामांतर कांबळे , श्रीकांत हांडे कल्पना कदम, श्रुती चव्हाण या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजवलेल्या , लोक संगीताने नटलेल्या अशा माझ्या "रामा मेघ दे " या विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या सोमवारी माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदीरात संध्याकाळी ८ वाजता आहे.
नेहमी लक्षात राहील अशी एक आनंदी, हास्य विनोदाने बहरलेली संध्याकाळ साजरी करण्यासाठी

एक मिपाकर म्हणून मी तुम्हा सर्वाना आमंत्रीत करतोय.
आपला
विजुभाऊ ( चकोर शाह)

नाट्यअनुभव

प्रतिक्रिया

क्या बात है! तुम्हां सर्वांना खूपखूप शुभेच्छा!

अभिनंदन, विजुभाऊ. तुम्हाला आणि नाटकाला शुभेच्छा.

उगा काहितरीच's picture

4 Feb 2016 - 12:50 pm | उगा काहितरीच

अभिनंदन आणी शुभेच्छा !

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Feb 2016 - 12:51 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे वा! अभिनंदन. स्वप्न साकार होतंय तुमचं! छान!

प्रीत-मोहर's picture

4 Feb 2016 - 12:55 pm | प्रीत-मोहर

अभिनण्दन इजाभाउ

नंदन's picture

4 Feb 2016 - 2:14 pm | नंदन

हार्दिक अभिनंदन!

नाखु's picture

4 Feb 2016 - 2:19 pm | नाखु

मनःपुर्वक अभिनंदन, विजुभाऊ. तुम्हाला आणि नाटकाला भरघोस शुभेच्छा.

पद्मावति's picture

4 Feb 2016 - 2:38 pm | पद्मावति

वाह! अभीनन्दन आणि मन:पूर्वक शुभेच्छा तुम्हाला.

बोका-ए-आझम's picture

4 Feb 2016 - 4:54 pm | बोका-ए-आझम

नाटक धुमाकूळ घालणार! दणदणीत शुभेच्छा!

विजुभाऊ. तुम्हाला आणि नाटकाला भरघोस शुभेच्छा...!
पुण्यात असेल तेव्हा नक्की कळवा.

विजूभाऊ, हार्दिक अभिनंदन! पुण्यात कधी प्रयोग असणार आहे?
नक्की कळवा, येणार बघायला :)

आनंदयात्री's picture

4 Feb 2016 - 6:49 pm | आनंदयात्री

विजुभाऊ, चिकाटीने केलेल्या प्रयतनांना नक्की यश येईल, तुम्हाला आणि टिमला शुभेच्छा.

पैसा's picture

4 Feb 2016 - 7:22 pm | पैसा

अभिनंदन आणि शुभेच्छा विजुभाऊ! संधी मिळेल तेव्हा नाटक नक्की बघणार!

रामदास's picture

4 Feb 2016 - 7:39 pm | रामदास

नाटक बघायला उत्सुक आहे. येतो सोमवारी वेळेवर , किंवा जमल्यास आधीच !!
नाटकानंतर काय हा प्रश्न सोडवायला मदत लागेल तुमची ?
भेटूच आपण .

रामदास's picture

4 Feb 2016 - 7:41 pm | रामदास

एक नाटक्या नावाचा आयडी होता. तो इसम कुठे हरवला काय कळत नाहीए बॉ.

अनामिक२४१०'s picture

4 Feb 2016 - 9:52 pm | अनामिक२४१०

नाटकाला शुभेच्छा
उत्तमात उत्तम नाटक होऊ द्या ...

माहितगार's picture

4 Feb 2016 - 10:07 pm | माहितगार

ग्रेट, मुंबईतले मिपाकरहो नुसत्या दुरुन शुभेच्छा देऊ नका, त्यांच्या लेखनातून त्यांचे कष्ट दिसत आहेत, शक्यतो सोमवारी माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदीरात संध्याकाळी ८ वाजता उपस्थिती लावून त्यांच्या कष्टांना जरुर न्याय द्या.

वाह ! अभिनंदन आणि शुभेच्छा !!

प्राची अश्विनी's picture

5 Feb 2016 - 10:20 am | प्राची अश्विनी

धन्य आहे तुमच्या चिकाटीची ! अभिनंदन आणि शुभेच्छा!
अशाच अनुभवतून मीही जातेय! जरा स्थिरस्थावर झालं की शेअर करीनच!

विजुभाऊ, नाटकासाठी शुभेच्छा

विजुभाऊ's picture

7 Feb 2016 - 7:04 pm | विजुभाऊ

_/\_

स्वाती दिनेश's picture

7 Feb 2016 - 7:10 pm | स्वाती दिनेश

अभिनंदन आणि शुभेच्छा विजुभाऊ,
स्वाती

निशिकान्त's picture

7 Feb 2016 - 10:59 pm | निशिकान्त

नाटकासाठी शुभेच्छा

विजुभाऊ's picture

14 Feb 2016 - 6:22 pm | विजुभाऊ

धन्यवाद मित्रानो.
शुभारंभाचा प्रयोग एकदम धमाल झाला.
खरोखरच " गडगडाटी हास्याची ढगफुटी झाली "

विजूभाऊ अभिनंदन.
फोटो टाका.

प्रदीप's picture

14 Feb 2016 - 8:00 pm | प्रदीप

मी मुंबईत त्या दिवशी नसल्याने शोला काही येता येणार नाही. पण तुमच्या ह्या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!