रोहिथ,आपण आधी कधी एकमेकांना भेटलो आहे का ? पण काल तू स्वप्नात आलास ,अन आपण बोललो,हे कस काय ? काय बोललो हे तुलाही माहितेय अन मलाही पण तेच आज लिहावास वाटतंय -
मी - तू जगलास काय किंवा मेलास काय इथं कुणाला काही 'घंटा' फरक पडणार नाही .काही दिवस तुझी चर्चा होईल TV आणी वर्तमानपत्रात वर अन पुन्हा 'जैसे थे' तू आत्महत्या करायला नको होतीस ! स्वत जीव देऊन युद्ध नाहीत जिंकता येत मित्रा ! रणांगणात दुसऱ्याकडून लढता लढता मेलं तर ते वेगळ पण असा जीव देण मनाला हुरहूर करून सोडणार आहे .
तू - I would not be around when you read this letter. Don’t get angry on me. I know some of you truly cared for me, loved me and treated me very well. I have no complaints on anyone. It was always with myself I had problems. I feel a growing gap between my soul and my body. And I have become a monster. I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan. At last, this is the only letter I am getting to write.
मी- तू किती 'परिस्थितीमुळे विस्कटलेला' आहेस हे ह्यावरून कळते ! तुझी स्वप्न तू पूर्ण करायला हवी होतीस ! कदाचित तुझं हे शेवटच पत्र खूप प्रसिद्ध होईल ,जर तू पुस्तकं लिहिली असतीस तर त्याच्या पेक्षा जास्त ! पण खरच आत्महत्येचा हा निर्णय योग्य आहे का ?
तू - I loved Science, Stars, Nature, but then I loved people without knowing that people have long since divorced from nature. Our feelings are second handed. Our love is constructed. Our beliefs colored. Our originality valid through artificial art.
मी- अन तेच प्रेम साध्य करण्यासाठी तू निसर्गाकडे गेलास का ? अरे इथं जनावरांच्या जीवाची काळजी माणसाच्या जिवापेक्षा जास्त होते ,हे ठाऊक नव्हत का तुला ?
तू -It has become truly difficult to love without getting hurt.The value of a man was reduced to his immediate identity and nearest possibility. To a vote. To a number. To a thing. Never was a man treated as a mind. As a glorious thing made up of star dust. In very field, in studies, in streets, in politics, and in dying and living.I am writing this kind of letter for the first time. My first time of a final letter. Forgive me if I fail to make sense.
मी- आता मात्र मी शांत आहे ,इथं माझ्याकडे तुझ्यासाठी उत्तर नाही , 'माणसाचा जीव' हा फक्त स्वार्थासाठी आहे !
तू - May be I was wrong, all the while, in understanding world. In understanding love, pain, life, death. There was no urgency. But I always was rushing. Desperate to start a life. All the while, some people, for them, life itself is curse. My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.[ I myself strike these words off.]
मी- दलित कुटुंबात जन्म घेण ह्याचा अर्थ तुझ्याकडे संघर्ष करण्याची ताकद जास्त आहे ! अरे दलितांचा जन्म हा फक्त संघर्ष करण्यासाठी झाला आहे .क्षेत्र कोणतही असो जर तू दलित आहेस तर संघर्ष आलाच !
तू - I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this.
मी- .............!
तू - People may dub me as a coward. And selfish, or stupid once I am gone. I am not bothered about what I am called. I don’t believe in after-death stories, ghosts, or spirits. If there is anything at all I believe, I believe that I can travel to the stars. And know about the other worlds.
मी- तेच तर मी म्हणतोय , आत्महत्या हा पर्याय नव्हे !
तू - If you, who is reading this letter can do anything for me, I have to get 7 months of my fellowship, one lakh and seventy five thousand rupees. Please see to it that my family is paid that. I have to give some 40 thousand to Ramji. He never asked them back. But please pay that to him from that
मी- समजतंय ,तुझी तुझ्या घरच्याबद्दल ची काळजी ! तुझे वडील security guard अन आई टेलर , ह्यात तुझ्या शिक्षणाचा खर्च ! चूक आपलीच आहे यार की आपल्यात स्वाभिमान एवढा भरलाय की घरून पैसे मागायला ही लाज वाटते ! घरी गेलो की सगळे विचारतात 'किती ताप देनारेस अजून आईबापांना नोकरी कर कोणतीतरी , मरेपर्यंत त्यांना काम करू देणार आहेस का ? शेवटी पर्याय म्हणून तू तुझ्या मित्राकडून पैसे घ्यायला सुरुवात केलीस …पण 'भीक' मागणे अन स्वार्थासाठी झुकणे हे आपल्या स्वभावात नाही , तू एवढा तुटला होतास का ह्या जाती -व्यवस्थेमुळे ?
तू - Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive.
मी- हे कसं शक्य आहे ? तुझं मरण हे एका माणसाचा मरण म्हणून नाही तर एका दलित माणसाच मरण म्हणून कितीतरी दिवस चालेल इथं . राजकारणी आपापले तवे घेऊन पोळ्या भाजायला तुझ्या चितेवर येतील !
“From shadows to the stars.” Bye.
मी- नको !
तू - Uma anna, sorry for using your room for this thing.
To ASA family, sorry for disappointing all of you. You loved me very much. I wish all the very best for the future.
For one last time,
Jai Bheem
मी- जय भीम आत्महत्या करताना शोभत नाही !
तू - I forgot to write the formalities. No one is responsible for my this act of killing myself.
No one has instigated me, whether by their acts or by their words to this act.
This is my decision and I am the only one responsible for this.
Do not trouble my friends and enemies on this after I am gone.
मी- ही शेवटी formalities आहे . सर्वाना माहितेय कि तू का आत्महत्या करत आहेस ! पण त्याने काही फरक पडेल का ? आपलेच नेते सत्तेसाठी स्वताला विकत आहेत तिथं दुसऱ्याकडून काय अपेक्षा ठेवावी ? तू जातोयेस कदाचित तुझी मानसिकता मला कळायला वेळ लागेल किंवा ज्याची जळते त्यालाच कळते असाही असेल , पण एक लाख सत्तर हजारात तुझे आई -वडील बाकीच आयुष्य कस काय सारतील ? त्यांची जबाबदारी कुणाची ? तुझ्या विद्यापीठान तुझी हक्काची जबाबदरी स्वीकारली नाही तर ती तुझ्या घरच्यांची तरी कशी स्वीकारतील !!!!
रोहिथ , तुझी वाढलेली दाढी , विस्कटलेले केस , डोळ्यात system बरोबर लढताना हरल्याचा निरागस भाव कितीतरी रात्री मला नीट झोपू नाही देणार !
प्रतिक्रिया
31 Jan 2016 - 3:34 pm | गामा पैलवान
रोहितला याकूब मेमनच्या फाशीविरोधाचा फलक हातात घ्यायची काय गरज होती? त्याने तो स्वत:हून धरला होता का? की कोणी भरीस पाडलं? की तो अगतिक होऊन त्या कंपूत सामील झाला होता?
असो.
दलित असलेल्या रोहितच्या आत्महत्येमुळे देशभरातले विचारवंत विचलित झालेत. पण विकास कांबळे या निरपराध दलिताच्या हत्येमुळे त्यांच्या तोंडावरची माशीही उडालेली नाही. का बरं?
-गा.पै.
-गा.पै.
31 Jan 2016 - 4:39 pm | साती
पैलवानजी, तुम्हाला त्या विकास कांबळेच्या बातमीबद्दल काय डिटेल्स माहित्येयत का हो?
त्या फेसबुकवरच्या 'हिंदू जागृती समाचार' मधून घेतलेल्या पोस्टशिवाय?
तो मृत्यू व्यक्तिगत वैमनस्यातून झालेला आहे.
आणि रोहितचा मृत्यू एका सिस्टीमविरुद्ध लढा देत असताना आलेल्या निराशादायी अनुभवांमुळे.
तुम्हाला यातला फरक कळत नसला तरी रोहितच्या मृत्यूमुळे खरेच व्यथित झालेल्या जनतेला या दोन्हींतला फरक अचूक कळतो.
त्यामुळे विकास कांबळेची बातमी देऊन मुस्लिमांविरुद्ध लोकांना भडकाविण्याचे कृष्णकृत्य कृपयाच थांबवा.
वरच्या लेखात चर्चेचा विषय काय हे लक्षात न घेता उगाच संदर्भ आणि सूत्र नसलेला तिसराच मुद्दा मांडायची तुम्हाला गरज काय हे आम्हाला बरोबर कळते.
तरीही तुमची इच्छा असल्यास तुम्ही विकास कांबळेच्या नावाने एखादा धागा काढून आपले दु:ख व्यक्त करू शकताच.
शुभेच्छा!
31 Jan 2016 - 5:15 pm | माहितगार
सातीतै,
रोहीतचा आत्महत्येचा(?- अजून चौकशी पुर्ण व्हायची असावी आणि इन ड्यू कोर्स ती होईलही, म्हणून प्रश्नचिन्ह) निर्णय खेदकारकच म्हणावा लागेल. मिपावर मागचा धागा निघाला तेव्हा मी त्या बाजूने पण पुरेसे लिहिले आहे. तरीही काही प्रश्न अनुत्तरीत राहतात असे वाटते म्हणून प्रश्नाची दुसरी बाजू मांडतो.
१) सिस्टीम विरुद्धचे लढे दीर्घ कालिन असतात आत्महत्या(?) हे त्यावरचे सोल्युशन होऊ शकत नाही, विद्यार्थी दशेतील व्यक्ती संवेदनशील असतात भावनेच्या आहारी जाऊन काही बाही निर्णय घेतात त्यांचा केवळ राजकीय हत्यार म्हणून उपयोग करून घेण्या पलिकडे राजकारण आणि समाजकारणातल्या जबाबदार व्यक्तिंची कुठे थांबायच याचे मार्गदर्शन करणार्या व्यवस्थेची गरज असेल का ? यात सर्वच राजकीय पक्ष कमी पडत असतील तसे दलित चळवळसुद्धा कुठे कमी पडली असू शकेल का ?
२) याच्या किंवा त्याच्या मृत्यूवर केलेल्या राजकारणामुळे सिस्टीम सुधारल्या असत्या तर त्या मागेच सुधारल्या नसत्या का आणि रोहीतवरचा हा प्रसंग टळला नसता का ? लोकशाहीत राजकारण ही न टळणारी गोष्ट आहे, राजकारणात रचनात्मकता आणि समाजकारण किती हा महत्वाचा प्रश्न असू शकेल का ?
३) याकुब मेमनचा जो काही रोल होता त्यात मृत्यू पावणारे सर्व दलित राहीले असते तरीही रोहीतने (आणि त्याच्या सोबतच्या मंडळींनी) याकुब मेमनच्या फाशीस विरोध केला असता का ? अजून एक अवघड उपप्रश्न आहे पण भावना दुखावू नयेत म्हणून सोडून देतो.
४) विकास कांबळे दलित असेल त्यास धार्मिक रंग नसेल पण आपण म्हणता तसे व्यक्तिगत वैमनस्य असेल, केवळ व्यक्तिगत वैमनस्याची केस असेल तरीही दलित संघटना त्याच्या बाजूने उभ्या टाकल्या नसत्या का ? आता शिवसेना आणि सनातनने प्रश्न उचलला म्हणून विकास कांबळे परका होतो का ? आणि पुन्हा एकदा प्रकरण हातघाईवर पोहोचण्यापुर्वी सुयोग्य मार्गदर्शन आनि साहाय्य अगदी व्यक्तीगत वैमनस्याच्या केसमध्ये पोहोचवण्यात दलित चळवळ सामाजिक दृष्ट्या अयशस्वी होते आहे का ?
उपरोक्त प्रश्न भावना दुखावण्याच्या हेतुने विचारलेले नाहीत केवळ वैचारीक चर्चा आहे, वृत्तपत्रिय बातम्यांच्या अचूकते बद्दल नेमकेपणाने सांगता येत नाही म्हणून चु.भू.दे.घे.
31 Jan 2016 - 5:32 pm | साती
पहिल्या दोन मुद्द्यांशी सहमत आहे.
मुद्दा क्रमांक ३-४ करिता, पूर्वग्रह सोडा, अभ्यास वाढवा इ. इ.
मुद्दा क्र ३ मधल्या न विचारलेल्या उपप्रश्नाबाबत - वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे!
31 Jan 2016 - 5:42 pm | माहितगार
मी समस्येचा वाचन आणि लेखन मुळीच एकतर्फी केलेले नाही रोहीत वेमुलाची सुयोग्य बाजू मागच्या धाग्यात उचलून धरलेली आहे. मी सनातन ते आप काँग्रेस ते कम्युनीस्ट कोणत्याही विचारधारेस बांधलेला नाही, त्यामुळे एकतर्फी विचार आम्हाला जमत नाही. पूर्वग्रह सोडण्यास, अभ्यास वाढवण्यास मी नेहमीच मनमोकळा आहे, जे एकतर्फी भावनेत वाहवले आहेत त्यांचे मन पूर्वग्रह सोडण्यास, अभ्यास वाढवण्यास खरेच मोकळे आहे का ? असेल तर आमचा मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?
ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास, बौद्धिक कृष्णविवर ह्या आमच्या मिपा धाग्यातील माहिती आणि चर्चा सादर भेट.
31 Jan 2016 - 5:44 pm | साती
अर्थात, इथे शुभेच्छा सार्कॅस्टीक नाहीत.
तुम्ही उत्तम विचार करू शकताय. आणि अधिकाधिक माहिती जाणून घ्यायची इच्छाही तुमच्यात आहे.
मात्र संवेदनांचा परीघ वाढवला पाहिजे.
याकरिता वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
31 Jan 2016 - 5:54 pm | माहितगार
काय आहे सातीताई तर्कशुद्ध विचार संवेदनशील राहू शकतो भावूक होऊ शकत नाही. भावना = संवेदना नसते हे लक्षात घेणे जरासे अवघड असते, आमच्या संवेदनांचे ठिक चालले आहे, त्या (रोहीतच्या केससहित) व्यवस्थित जागेवर आहेत. या धाग्यावर मुद्दा ३ आणि ४ मधिल प्रश्न संवेदना म्हणून रोहीत वरच्या मागच्या मिपा धाग्यात उपस्थित केले नाहीत.
याकुब मेमनच्या फाशी बाबतच्या मागच्या चर्चा धाग्यात मी सहभाग घेतलेला नाही. संवेदनेचा भाग म्हणून आणि या धाग्यात अवांतर नको म्हणून तुर्तास चर्चा आवरतो पण नंतर कधी तरी याकुब मेमन आधी बाजूस ठेऊन फाशी असावी का नसावी यावर आधी चर्चा करूयात मग त्या नंतर याकुब मेमनच्या फाशी बाबत चर्चा करूयात.
31 Jan 2016 - 6:45 pm | खटासि खट
याकूब मेमनच्या फाशीचं समर्थन केलं म्हणून आत्महत्या समर्थनीय आहे कि त्याच्यावर झालेली कारवाई ?
31 Jan 2016 - 8:25 pm | माहितगार
हैदराबाद विद्यापिठातील आत्महत्यांच्या समस्यांसंदर्भाने माझे मत मी मागील रोहीत वेमुला विषयक धाग्यात सॉलिडॅरिटीचा अहवाल निसटत्या बाजू १ निसटत्या बाजू २ आणि बरेच मांडले आहे कारवाई बाबत गल्लत नेमकी कुठे झाली या बद्दलही मी तेथे जरासे लिहिले आहे त्याची येथे पुर्नरुक्ती टाळतो.
एकतर रोहीत आणि मंडळींनी याकूब मेमनला फाशी देण्याचे समर्थन नाही विरोध केला. (आपण वाक्य कदाचित अनवधानाने लिहिले असावे) रोहीतवर झालेली कारवाई आणि त्याची आत्महत्या यांचा रोहीत आणि मंडळींच्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या विरोधी आंदोलनाशी प्रत्यक्ष संबंध नाही. रोहीतवर झालेली कारवाई प्रत्यक्षतः (तथाकथीत?) इतर कुणा विद्यार्थ्यावर हात उचलण्याबद्दलच्या (?) आक्षेपावरून झाली. (हैदराबाद विद्यापिठातील हि मंडळी याकूब मेमनच्या फाशीचा विरोध करतात याचे उल्लेख कारवाई आधी आणि नंतर रोहीत आणि मंडळींवर आक्षेप घेण्याच्या सोयीच्या दृष्टीने अथवा पुस्ती म्हणून आहेत या अर्थाने कारवाई आणि याकुब मेमनच्या फाशीचा विरोध यांचा संबंध अत्यंत अप्रत्यक्ष स्वरुपाचा असावा)
उजव्या गटाचे राजकारणी आणि त्यांचे समर्थक रोहीत आणि मंडळींचा 'याकुब मेमनच्या फाशीचा विरोध' हा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडणार हे आपसूक आणि त्यांच्यासाठी नैसर्गिक आहे. कोणत्याही फाशीचा विरोध म्हणून अथवा अगदी याकुब मेमनला पश्चाताप झालेला असण्याची शक्यता म्हणून फाशीस विरोध समजता येऊ शकतो रोहीत आणि मंडळींचा विरोध अंशतः समजता येऊ शकतो. रोहीत आणि मंडळींची 'याकुब मेमनच्या फाशीचा विरोध' हि भूमिका वरवर तात्विक दिसत असलीतरी त्या भूमिकेच्या त्यांनाही न लक्षात आलेल्या मर्यादा होत्या दुसरे राजकीय रंग राहीला असण्याची शक्यता दिसते. समजा राम विलास पासवान अथवा रामदास आठवले भारताचे पंतप्रधान राहीले असते, किंवा कम्युनिस्ट ज्योती बसू भारताचे पंतरधान राहीले असते, फाशीच्या शिक्षेस त्यांचा तत्वतः विरोध राहीला नसता याकुब मेमनचा सहभाग अधिक प्रत्यक्ष आणि तो कसाब प्रमाणे प्रत्यक्ष पकडलेला असता आणि त्यांच्या बींब स्फोटात मेलेली मंडळी दलित किंवा कम्युनिस्ट किंवा काँग्रेसी राहीली असती तर त्या त्या गटांनी मग त्यात रोहित वेमुलां आणि मंडळी आली राहुल गांधी आले फाशीच्या शिक्षेचा प्रामाणिकाणे विरोध केला असता का ? या प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तराची आणि रोहीत येमुलांना आंदोलनांसाठी वापरुन घेत असलेल्या/ उचकवणार्या राजकारण्यांच्या आत्मपरिक्षणाची गरज आहे का ?
रोहीत येमुलां आणि मंडळींनी त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले याकुब मेमनच्या फाशी विषयी एक वेगळा दृष्टीकोण बाळगला यात खूप काही गैर आहे असे नव्हे महत्वाचा मुद्दा याकुब मेमनच्या कृतीच्या परिणामांनी मेलेले दलित असते किंवा तसे माहित असते तर त्याच आग्रहानी फाशी विरोधी भूमिका मांडण्या एवढे रोहीत वेमुला आणि मंडळी तटस्थ दृष्टीकोणाची खरेच होती का ? या बाबत तुमची (त्यांची) भूमिका सब्जेक्टीव्ह राहण्याची शक्यता असेल तर अशी भूमिका सबळ ठरत नाही मग फाशी देण्याचे समर्थन करणार्यांच्या भूमिकेतही अंशतःतरी तथ्य आहे असे होते, याकुब मेमनने देशातल्या देशात काही केले तरीही प्रश्न नव्हता दुर्दैवाने एका शत्रुराष्ट्राची त्या कृतीत मदत घेतली गेली हे वास्तव कसे नाकारता येईल. जिथे देशा बाहेरच्या लोकांना आवाहन केले म्हणून बाकी कोणतीही हिंसक कृती नसतनाही सौदी अरेबियासारखा देश एका व्यक्तिला फाशी देतो का तर देशप्रेमाच्या तत्वाचा भंग झाला देशा बाहेरच्या लोकांना सौदीत हस्तक्षेपाचे आवाहन केले (अर्थात प्रत्यक्ष कृती कोणतीही झालेली नाही) . सौदीत काय झाले हे महत्वाचे नाही महत्वाचे हे आहे की देशप्रेमाचे तत्व जसे सौदी अरेबीयास लागू होते तसे ते भारतासही लागू होते. शत्रुराष्ट्राची कुकृत्यात मदत घेण्याबद्दल देशप्रेमी व्यक्तींना भावना असण्यात असहाजिक काही नाही. इतर वेळी फाशीचा विरोध केला तर डोळ्यात भरले नसते; ज्या व्यक्तीने शत्रुराष्ट्राची कुकृत्यात मदत घेतली आहे त्याचा तथाकथित पश्चाताप स्विकारावा कि नाही आणि त्याला माह करून कमी शिक्षा दिल्याने कोणता संदेश जातो हे सब्जेक्टीव्ह प्रश्न आहेत. जिथे प्रश्न सब्जेक्टीव्ह आहे तिथे दुसरा गटाची मते रोहीत वेमुला आणि मंडळींपेक्षा सहाजिक पणे वेगळी असतील. देशप्रेमाच्या मुद्या भोवती तडजोड करणे बहुतांश लोकांना आवडणारे नसते. रोहीत वेमुलांच्या आत्महत्ये नंतर सहानुभूती आणि संवेदना म्हणून लोक बोलणार नाहीत परंतु न बोलणार्या लोकांनाही रोहीत वेमुलां आणि मंडळींचा याकुब मेमन करता फाशी विरोध पटला अथवा आवडला असेलच असे नाही.
रोहीत वेमुला आणि मंडळींची एका सामाजिक सहानुभूती गमावू शकणार्या मुद्यावरची भूमिका त्यांच्या दृष्टीने कितीही बरोबर असली तरी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या किती प्रियॉरिटीची ठरते ? अशी आंदोलने काही काळ बातमीत येण्यापुरती ठिक असतात, सामाजीक सहानुभूती गमावणार्या आंदोलनांचा दीर्घ काळात बोजवारा उडतो लोक दुर्लक्ष करू लागतात. त्यामुळे सामाजिक सहानुभूती गमावल्या जाणार्या विषयात रस घेण्याची प्रियॉरिटी किती याचा विचार भावनिक वयातील रोहीत वेमुला आणि विद्यापिठीय सहाध्यायी करण्यास चुकले तर वावगे नाही. चळवळी आणि आंदोलनांचा दीर्घ काळाचा अनुभव असलेली मंडळींनी याचा विचार करून आंदोलनांना दिशा देण्याचे काम केले पाहीजे त्यात ज्येष्ठ मंडळी चुकली का ? की राजकीय पोळी भाजण्यात त्यांनाही रस असल्यामुळे स्टेटमनशीप बाजूस पडते आणि केवळ राजकारण होते?
एकुण रोहीत वेमुलांनी याकुब मेमनच्या फाशीस विरोध करून खुप प्रचंड काही गैर केले असे कदाचित नसेलही तरीही त्यांचा तो चॉईस कितपत पॉलीटकली करेक्ट (जसे आपण पॉलीटकली करेक्ट बोलणे म्हणतो) किंवा कितपत पॉलीटकली स्मार्ट चॉईस आहे या बाबत साशंकता जाणवते.
31 Jan 2016 - 10:26 pm | खटासि खट
एका ओळीच्या प्रश्नाचं एव्हढं उत्तर असेल हे माहीत अस्तं तर ??
बाकी हाती कायच नाही लागलं. याकूबच्या फाशीला विरोध केला कि काय केला हे आपल्याला काय माहीत ? त्याचे शब्द काय आहेत हे काय माहीत ? ते माहीत होतील तेव्हां होतील. एक क्षण समजून चला की त्याने याकूबला का फाशी देता म्हटले असेल. त्याने तसे का म्हटले याचा अहवाला आलाय का ?
रोहील वेमुलाने ही भूमिका घेतली म्हणून टीव्ही पॅनेलिस्ट म्हणून मिरवणा-या न्या.काटजू, न्या. कोचर अन्य काही विधीज्ञ यांनी याकूबच्या दयेचं समर्थन केलं का ? जर रोहीत देशद्रोही आहे तर या लोकांना टीव्हीवर परवानगी का? हा जर देशद्रोह असेल तर या लोकांवर काय कारवाई झाली हे कळेल का ?
उपप्रश्न असा की
व्हिडीओ स्क्रीनिंगच्या कार्यक्रमाबाहेर अभाविपचे कार्यकर्ते गुलाबाचे फूल घेऊन गेले होते किंवा कसे ?
31 Jan 2016 - 11:13 pm | माहितगार
कोणतीही एकच बाजू घेणे मला होत नाही, विश्लेषण शक्यतोवर सविस्तर करतो, पटणे न पटणे वाचकाच्या हातात आहे, पटल घ्या नाही तर सोडून द्या. या धाग्यावरील सातीताईंना मी दिलेल्या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक ३ मधील प्रश्नाचेही उत्तर केवळ हो किंवा नाहीत देता आले असते, त्यांनी त्याचे उत्तर माझा विषयाचा अभ्यास कमी असल्याचा जावई शोध लावून टाळले ते ठिक.
आपण सुद्धा एखाद्या मनात ठरवलेल्या विशीष्ट उत्तराच्या अपेक्षेने प्रश्नास प्रति प्रश्न केला होता का ? मी वर सातीताईंना ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास चा दुवा दिला तोच आपणासही देईन कोणतीही गोष्ट केवळ काळ्या किंवा पांढर्या रंगाने पहाण्या पेक्षा त्यास अधिक कंगोरे असू शकतात का ? मला पाहीजे त्याच बाजूचे समर्थन केले तर बरोबर बाकीच्या सर्व ग्रे शेड्स चुकीच्या असे काही अपेक्षीत आहे का ?
मी टिव्हीवरील चर्चा/बातम्या पाहिलेल्या नाहीत (माझ्या घरी मुलांच्या अभ्यासामूळे टिव्ही बंदच असतो) त्याबद्दल काही सांगू शकत नाही. आंतरजालावर रोहीथ वेमुलाची बातम्या आणि गेल्या दहा वर्षापासून हैदराबाद विद्यापीठात होत असलेल्या बातम्या गूगल व्यवस्थीत खोदून माझ्या समोर आलेल्या सर्व बाजू कंगोरे मनात पुर्वग्रह न ठेवता वाचल्या आहेत. एवढे करूनही वृत्तपत्रीय आणि माध्यमातील बातम्या अचूकच असतील असे सांगता येत नाही म्हणून आधीच्या प्रतिसादा चुभूदेघे प्रोबॅबिलीटी ऑफ एरर शक्य आहे हे नमुद केलेच आहे आपल्या साठी पुन्हा एकदा नमुद करतो.
रोहीतचे नाव घेऊन देशद्रोही म्हणून कुणी उल्लेख केला आहे का ? तसे उल्लेख फारसे कुणि केले असावेत असे वाटत नाही. देशद्रोह्याचे समर्थन केले म्हणणे आणि देशद्रोही म्हणणे यात फरक असावा. याकुब मेमनच्या फाशी विरोधातील आंदोलनांवर उजव्या गटांचे आक्षेप असू शकतात तेवढेच त्यांनी नोंदवले असावेत याचा अर्थ रोहीतला देशद्रोही ठरवले असा होत असण्याची शक्यता वाटत नाही. -देशद्रोह्यांचे समर्थन अभिव्यक्तीस्वांतंत्र्याच्या कक्षेत जेथपर्यंत बसते तिथपर्यंत- याकुबसाठी दयेच्या समर्थनाने कोणी देशद्रोही होत नाही परंतु देशद्रोह्याचे समर्थन केले हा आक्षेप (ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांच्या दृष्टीने) शिल्लक राहतो. मग ते टिव्ही वरचे पॅनलीस्ट असोत अथवा रोहीत वेमुला आणि त्यांचे साथीदार किंवा अजून कुणी.
31 Jan 2016 - 11:18 pm | खटासि खट
शक्य झाल्यास जेव्हढ्यास तेव्हढेच उत्तर दिले तर बरं जाईल. जर रोहीत देशद्रोही नव्हता तर भांडणाचं कारण नाही उरत ना ? आणि असेल तर टीव्हीवरच्या पॅनेलिस्टना शिक्षा हवी. त्याला देशद्रोही कोण म्हणतंय यासाठी गूगलदेवांना उदबत्ती ओवाळा. व्हिडीओज फिरताहेत, डॉक्युमेंटरीज फिरताहेत. माहीती घेऊन बोलूयात, तोपर्यंत अंगावर घेऊन बसतो. गार लागतंय.
31 Jan 2016 - 11:53 pm | माहितगार
पूर्ण व्यक्त न होणे मला शक्य नाही. वाचण्यासाठी वेळ/इच्छा नसेल तर आपणास सोईस्कर इतरांशी चर्चा करावीत, माझी उत्तरे इतरांच्या अपेक्षेत बसण्यासाठी लिहिली जातील, एकपक्षी असतील याची शाश्वती कमी असते.
माझ्या दृष्टीने देशद्रोह्याचे समर्थन आणि देशद्रोही म्हणणे यात फरक आहे, उजव्या गटातल्या भरकटलेल्या काहींनी हा फरक न करणे वेगळे पण रोहीथ वेमुलाची बाजू घेणार्यांनीही हा मुद्दा कितपत उगाळावा ह्या बद्दल मी साशंक आहे. सोशल अॅड्व्होकसी आणि सोशल मार्क्टेटींगच्या तत्वात फरक असतो. अॅडव्ह्कसीवाल्यांना आपण बर्याचदा अप्रत्यक्षपणे विरोधकांचे मार्केटींग करतो आहोत हेही कळत नाही. रोहीथ वेमुलाची बाजू घेणारे जेवढ्या वेळा हा मुद्दा उगाळतील तेवढ्यावेळा अप्रत्यक्षपणे उजव्या गटातील लोकांची बाजूच मांडत असतील सर्वसामान्य जनतेपर्यंत पुन्हा पुन्हा त्याने अतिरेक्यांची बाजू घेतली एवढेच पोहोचत राहील.
मी टेक्स्ट वाचतो व्हिडीओज फिरताहेत, डॉक्युमेंटरीज टिव्ही पासून दूर असतो हि माझ्या विवेचनाची मर्यादा असू शकते, त्या बद्दल क्षमस्व.
31 Jan 2016 - 11:58 pm | खटासि खट
तुम्ही माहिती घेत नाही आहात आणि देशद्रोही म्हटले कि नाही माहीत नाही असेही म्हणत आहात. आभार.
1 Feb 2016 - 12:08 am | माहितगार
मी जे टेक्स्ट मध्ये आहे लिखीत मजकुर तेवढीच माहिती घेतो. टेक्स्ट माहितीचे शोध आणि संदर्भ निर्देश सोपे जातात, मी इतरही काही कामात व्यस्त असतो व्हिडीओ डॉक्यूमेंतरीज पहाणे शक्य होत नाही ती माझी मर्यादा मी कबूल केलीच आहे.
'देशद्रोही' शब्दाचा मुद्दा (विवादाच्या कोणत्याही बाजूच्या व्यक्तीने) घासणे, उगाळणे मला पॉलीटीकली स्मार्ट वाटत नाही हे मी आधीच म्हटले आहे त्यामुळे त्याबद्द्ल एकदा माझे मत व्यक्त केल्या नंतर मी अजून काय बोलणार, असो.
1 Feb 2016 - 12:14 am | खटासि खट
अँटी नॅशनल म्हणजे काय ?
असं पत्र केंद्र् सरकारच्या एका मंत्र्याने दुस-या मंत्र्याला लिहीलेलं आहे. ही गोष्ट उगाळणे, घासणे असं म्हणण्याइतकी सहज वाटते का ? केंद्र सरकारचे दोन मंत्री अँटी नॅशनल अॅक्टीव्हिटीजबद्दल पत्रव्यवहार करत असतील तर याचा अर्थ सरकारने राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा कामाला लावून त्याला ताब्यात घ्यायला हवं होतं.
तुमचं म्हणणं तुम्ही माहितीच घेत नाहीत म्हणून देशद्रोही शब्दाची चर्चा स्मार्ट वाटत नाही असा अर्थ निघतो. तुम्ही माहिती घेतली नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण माहिती घेतली असती तर तुम्हाला वेगळं काही वाटलं असतं, नाही का ?
थांबूयात का इथे ?
1 Feb 2016 - 12:35 am | माहितगार
एकतर हैदराबाद विद्यापिठाची अधिकृतपणे कारवाई गटांमधील हाणामारीवर अवलंबून असावी. मंत्र्यांनी काय लिहिल ते वाचले आहे. एका गटाच्या विद्यार्थ्यांनी आमदाराला काहीतरी सांगितले आमदाराने त्यावर अवलंबून पत्र मंत्र्याने दुसर्या मंत्र्याने पाठवले मग दुसर्या मंत्र्याने विद्यापिठाला पाठवले. तरीही विद्यापिठाची चौकशी आणि निर्णय तांत्रिक दृष्ट्या स्वायत्त असतात, (मंत्र्यांचा अप्रत्यक्ष दबाव काय असेल तो वेगळा मुद्दा) विद्यापिठाची चौकशी आणि निर्णय जर अधिकृतपणे कारवाई गटांमधील हाणामारीवर अवलंबून असतील तर तथाकथित देशविरोधी कारवाईचा मुद्दा दोन्ही बाजूने चघळून त्यांच्या त्यांच्या बाजूला काय फायदा ते मला समजत नाही. रोहीथ वेमुला बद्द्ल कितीही देशविरोधी म्हणून अपप्रचार भाजपाने केला तर एका हद्दी पलिकडे त्याचा त्यांना फायदा नाही कारण त्यात तथ्य नाही, दुसरे दलितांशी जुळवून घेण्या शिवाय त्यांना राजकीय दृष्ट्या दुसरा मार्ग नाही तेव्हा ती गोष्ट त्यांनी अती चघळण्यात त्यांचाही फायदा दिसत नाही. रोहीथ वेमुला बद्दल सहानुभूती कर्त्यांनी सुद्धा मुद्दा पुन्हा पुन्हा घासणे ज्यात काही नाही त्यात काही आहे असे भासवल्यासारखे होईल भाजपा पेक्षा भाजपा विरोधकच त्या मुद्द्याचा प्रसार करतात असे होईल अशी शक्यता वाटते म्हणुन मला दोन्ही बाजूसांठी ते पॉलीटीकली स्मार्ट वाटत नाही. असो थांबतो इथे.
1 Feb 2016 - 7:07 am | खटासि खट
२) याच्या किंवा त्याच्या मृत्यूवर केलेल्या राजकारणामुळे सिस्टीम सुधारल्या असत्या तर त्या मागेच सुधारल्या नसत्या का आणि रोहीतवरचा हा प्रसंग टळला नसता का ? लोकशाहीत राजकारण ही न टळणारी गोष्ट आहे, राजकारणात रचनात्मकता आणि समाजकारण किती हा महत्वाचा प्रश्न असू शकेल का ?
३) याकुब मेमनचा जो काही रोल होता त्यात मृत्यू पावणारे सर्व दलित राहीले असते तरीही रोहीतने (आणि त्याच्या सोबतच्या मंडळींनी) याकुब मेमनच्या फाशीस विरो >>>>>>> हे तुम्हीच विचारले ना ?
1 Feb 2016 - 11:47 am | माहितगार
होय अगदी, आपण मागच्या धाग्यातील माझे सॉलिडॅरिटीचा अहवाल, निसटत्या बाजू १, निसटत्या बाजू २ हे तीनही प्रतिसाद सविस्तर वाचले आहेत का ?
खास करून प्रश्न क्रमांक २ समजून घेण्यासाठी याच धाग्यात अजाझ अश्रफचे दहा मुद्दे तुम्हाला कितपत पटतात ? यावर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करून पहावा. कदाचित तुम्हाला माझी भूमिका लक्षात येईल.
माझ्या व्यक्तीगत मतानुसार रोहीथ वेमुलाच्या आत्महत्ये(?)वरुन जे सध्या काही राजकारण केले जात आहे ते तू-मी, तू-मी स्वरुपाचे आहे. फार-फारतर भाजपाच्या विरोधी पक्षांना पुढील काही निवडणूकात यश मिळण्यात मदत होईल, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर उपकुलगुरु, त्यांचे काही सहपाठी, भाजपाचे काही राजकारणी यांची गच्छंती होईल, रोहित येमुलाच्या कुटूंबीयांना अधिक आर्थीक हातभार मिळेल आणि तत्सम अजून एक दोन गोष्टी घडतील. पण एवढ्यातून लोकांची मने जवळ आणणारे परस्पर विश्वास निर्माण करणारे नेमक्या कोणत्या समाजकारणावर काम केले जात आहे ? भाजपविरोधी सेक्युलर पक्ष पुन्हा काही निवडणूकात निवडून येतील हे ठिक, भाजपा सत्तेत नसलेल्या मोठ्या कालावधीत सत्ता सेक्युलरांच्या हातीच होती तरीही केवळ रोहीथ येमुलाच नव्हे त्या आधी हैदराबाद विद्यापिठात झालेल्या आत्महत्यांबाबत तोडगा काढण्यात यश सेक्युलरांकडेही दिसत नाही, मग भाजपा असो अथवा त्यांचे विरोधक जर मने जवळ आणणारे रचनात्मक काम होत नसेल तर या सध्याच्या राजकारणाच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह का उपस्थीत करु नये ? राजकारणी लोकांकडून केवळ राजकारणाच्या पलिकडे जर काही होण्याची शक्यता नसेल तर तुमच्या माझ्या सारख्यांनी राजकारण्यांच्या राजकीय मुद्द्यांची री ओढण्यापेक्षा ज्यांना या विषयाबाबत खरेच काही वाटते त्यांनी 'सॉलिडॅरिटीचा अहवाल', आणि 'अजाझ अश्रफचे दहा मुद्दे' यावर मनमोकळ्या चर्चेत सहभागी होऊन चर्चेतून काही सकारात्म्क रचनात्मक निघेल असे का पाहू नये ?
तुम्ही माझे आधीचे निसटत्या बाजू १, निसटत्या बाजू २ हे दोन प्रतिसाद पाहिलेत तर रोहीथ वेमुला आणि मंडळींनी त्यांची मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून जरूर मांडावीत पण त्यांना मार्गदर्शन करणार्या ज्येष्ठ राजकारणी मंडळींनी सामाजिक सहानुभूती गमावू शकणार्या मुद्यावरची भूमिका त्यांच्या दृष्टीने कितीही बरोबर असली तरी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या किती प्रियॉरिटीची ठरते ? -इज इट पॉलीटीकली स्मार्ट ?- इज इट सोशली स्मार्ट ? जर एका रोहीथ वेमुलांच्या मृत्यूने असंख्यांची मने दुखावली असतील तर ती तशीच याकुब मेमनच्या कृतीतून झालेल्या मृत्यूंनीही असंख्यांची मने दुखावलेली असतील प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष याकुब मेमनची बाजू उचलून धरण्याने ज्यांची मने दुखावली आहेत त्यांच्या सोबत मने सांधण्याची कोणती कृती सोपी होते.? - आपली भूमिका समाजात मने सांधण्यात त्यामुळे मदत होणारे समाजकारण साधणारी आहे का ?- आणि कोणते आंदोलन किती आणि कुठपर्यंत ताणायचे या बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची नेत्यांची जबाबदारी नाही का ? माझ्या टिकेचा रोख रोहीथ वेमुला आणि त्याच्या सोबतच्या मित्रांकडे नाही त्यांच्या मागे उभे टाकून राजकारण करणार्या नेत्यांवर आहे. मला वाटते रोहीथ वेमुलाच्या कोणत्याशा पत्रात त्यांची किंमत राजकारणातल्या केवळ एका मता पलिकडे उरत नाही आहे ह्याची खंत व्यक्त केली आहे कारण या सर्व राजकीय भूमिकांच्या खेळातून परस्पर विश्वास साधणारे सकारात्मक काही निघत नाही आहे आणि म्हणून रोहीथ वेमुलासाठी नव्हे त्यांच्या पाठी मागे उभे टाकून केवळ मतांसाठीच्या राजकारण करणार्यांच्या मर्यादांकडे लक्ष वेधणे हा माझ्या प्रश्न क्रमांक ३चा ही उद्देश होय; रोहीथ वेमुलाच्या देशप्रेमावर शंका घेणे नव्हे !
आशा आहे उपरोक्त लेखनाने माझी भूमिका पुरेशी क्लिअर झाली असावी आणि आपण आणि ज्यांना तू-मी च्या राजकारणापलिकडे जाऊन चर्चा करावयाची आहे त्यांनी सॉलिडॅरिटीचा अहवाल आणि अजाझ अश्रफने या विषयावर मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा करावी.
1 Feb 2016 - 11:57 am | खटासि खट
सबगोलंकारी प्रतिसाद वाटले. भूमिका काय ते राहूच द्या. प्रश्न पण विचारता, उत्तर द्यायला गेले की हे नको ते नको म्हणता, हे वाचा नाही, ते बघत नाही, उजवा असे, डाव असे. काय करायचय?
तथ्य काय आहे एव्हढंच माझ्यासाठी महत्वाचे. मला कै सरकार नै खेचायचे खाली.
1 Feb 2016 - 12:05 pm | माहितगार
आपल्या अपेक्षेपेक्षा मी वेगळे दळण दळले नसेल. मतांतरे असतात ? तथ्य काय आहे ते पहायला न्यायालय व्यवस्था समर्थ आहे. मी इथे कोणतेही मत मांडले तरी त्याने राजकारण आणि राजकारण्यांना फरक पडणार नाही. मी माझी मते मोकळेपणाने मांडतो त्यात समाजाची मने सांधण्याची किमान स्वरुपाची सकारात्मक भूमिका आहे असे मला वाटते. इतरांना ते पटलेच पाहीजे असे नाही.
1 Feb 2016 - 12:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुमचे प्रतिसाद माहीतीप्रचुर अन उद्बोधक असतात माहितगारजी , आमच्यासारख्यांना आवडतात
1 Feb 2016 - 1:17 pm | माहितगार
धन्यवाद
1 Feb 2016 - 12:36 pm | खटासि खट
३) याकुब मेमनचा जो काही रोल होता त्यात मृत्यू पावणारे सर्व दलित राहीले असते तरीही रोहीतने (आणि त्याच्या सोबतच्या मंडळींनी) याकुब मेमनच्या फाशीस विरोध केला असता का ? अजून एक अवघड उपप्रश्न आहे पण भावना दुखावू नयेत म्हणून सोडून देतो.>>>
हा प्रश्न होता. म्हणून विचारले की,
याकूब मेमनच्या फाशीचं समर्थन केलं म्हणून आत्महत्या समर्थनीय आहे कि त्याच्यावर झालेली कारवाई ?
त्यानंतर च्या प्रश्नोत्तराचा एकमेकांशी काही संबंध आहे असे त्रयस्थपणे वाटत नाही.
तुमच्या प्रतिसादात हा सूर उमटत आहे..
माझ्या दृष्टीने देशद्रोह्याचे समर्थन आणि देशद्रोही म्हणणे यात फरक आहे, उजव्या गटातल्या भरकटलेल्या काहींनी हा फरक न करणे वेगळे पण रोहीथ वेमुलाची बाजू घेणार्यांनीही हा मुद्दा कितपत उगाळावा ह्या बद्दल मी साशंक आहे. सोशल अॅड्व्होकसी आणि सोशल मार्क्टेटींगच्या तत्वात फरक असतो. अॅडव्ह्कसीवाल्यांना आपण बर्याचदा अप्रत्यक्षपणे विरोधकांचे मार्केटींग करतो आहोत हेही कळत नाही. रोहीथ वेमुलाची बाजू घेणारे जेवढ्या वेळा हा मुद्दा उगाळतील तेवढ्यावेळा अप्रत्यक्षपणे उजव्या गटातील लोकांची बाजूच मांडत असतील सर्वसामान्य जनतेपर्यंत पुन्हा पुन्हा त्याने अतिरेक्यांची बाजू घेतली एवढेच पोहोचत राहील.
आता न्यायालयाचा मुद्दा आल्याने तुमचा आधीचे प्रतिसाद तपासून घ्यावे. आभार आपले.
1 Feb 2016 - 1:02 pm | माहितगार
तुमच्या अर्ध्या प्रश्नाचे उत्तर माझ्या मागच्या निसटत्या बाजू १, निसटत्या बाजू २ या दोन प्रतिसादात होते, ते प्रतिसादही मेगा बायटी असल्याने मी त्यांची पुर्नउक्ती केली नाही. न्यायालयीन आयोग आणि न्यायालये तथ्यांविषयी प्रकाश पाडू शकतील. त्यांच्या निकाल आणि अहवालांशिवाय पर्याय नसतो. माझे लेखन प्रिंट मिडीयात वाचलेल्या बातम्यांवर त्या मिडियाच्या बातम्यांच्या अचूकते बाबतच्या मर्यादांसहीत त्यामुळे माझे विश्लेषण अंतीम सत्य असल्याचा मला स्वतःलाही भ्रम नाही. (हे माझे वाक्य वाचनाने ज्यांना पुर्नप्रत्ययाचा आनंद मिळत असेल त्यांनी तो जरूर घ्यावा:)) न्यायालयीन आयोगाचे अहवाल ऑनलाईन उपलब्ध झाले आणि माझ्या मतांमध्ये बदल करण्याची जरुर भासेल ते तसे मी मनमोकळे पणाने करेन. न्यायालयीन आयोगाच्या अहवालावर तथ्ये अवलंबून आहेत हे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे.
न्यायालये आणि न्यायालयीन आयोग समाजकारण करू शकत नाहीत. समाज म्हणजे तुम्ही आणि आम्ही असू, आणि आमच्या समाजातील दुही सांधण्यात आमच्या नेते मंडळींना यश येत नसेल तर त्या नेते मंडळींशिवाय समाजानेच आपापसात चर्चा करून पुढे गेले पाहीजे त्यासाठी माझे लेखन उपयूक्त पडेलच एवढा मी मोठा नाही. पण ज्या कुणास पटेल तेवढे एक सकारात्मक पाऊल पुढे पडणे, तळे साचेल का माहित नाही आम्ही आमच्या थेंबाचे योगदान दिले एवढेच असो. इथे थांबतो तेच उत्तम.
3 Feb 2016 - 10:26 am | असंका
सुंदर!!!
धन्यवाद!!
1 Feb 2016 - 12:03 am | खटासि खट
तुमचा हा प्रतिसाद.त्यातली बोल्ड केलेली वाक्यं पहा.
कोणतीही एकच बाजू घेणे मला होत नाही, विश्लेषण शक्यतोवर सविस्तर करतो, पटणे न पटणे वाचकाच्या हातात आहे, पटल घ्या नाही तर सोडून द्या. या धाग्यावरील सातीताईंना मी दिलेल्या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक ३ मधील प्रश्नाचेही उत्तर केवळ हो किंवा नाहीत देता आले असते, त्यांनी त्याचे उत्तर माझा विषयाचा अभ्यास कमी असल्याचा जावई शोध लावून टाळले ते ठिक.
आपण सुद्धा एखाद्या मनात ठरवलेल्या विशीष्ट उत्तराच्या अपेक्षेने प्रश्नास प्रति प्रश्न केला होता का ? मी वर सातीताईंना ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास चा दुवा दिला तोच आपणासही देईन कोणतीही गोष्ट केवळ काळ्या किंवा पांढर्या रंगाने पहाण्या पेक्षा त्यास अधिक कंगोरे असू शकतात का ? मला पाहीजे त्याच बाजूचे समर्थन केले तर बरोबर बाकीच्या सर्व ग्रे शेड्स चुकीच्या असे काही अपेक्षीत आहे का ?
मी टिव्हीवरील चर्चा/बातम्या पाहिलेल्या नाहीत (माझ्या घरी मुलांच्या अभ्यासामूळे टिव्ही बंदच असतो) त्याबद्दल काही सांगू शकत नाही. आंतरजालावर रोहीथ वेमुलाची बातम्या आणि गेल्या दहा वर्षापासून हैदराबाद विद्यापीठात होत असलेल्या बातम्या गूगल व्यवस्थीत खोदून माझ्या समोर आलेल्या सर्व बाजू कंगोरे मनात पुर्वग्रह न ठेवता वाचल्या आहेत. एवढे करूनही वृत्तपत्रीय आणि माध्यमातील बातम्या अचूकच असतील असे सांगता येत नाही म्हणून आधीच्या प्रतिसादा चुभूदेघे प्रोबॅबिलीटी ऑफ एरर शक्य आहे हे नमुद केलेच आहे आपल्या साठी पुन्हा एकदा नमुद करतो.
रोहीतचे नाव घेऊन देशद्रोही म्हणून कुणी उल्लेख केला आहे का ? तसे उल्लेख फारसे कुणि केले असावेत असे वाटत नाही. देशद्रोह्याचे समर्थन केले म्हणणे आणि देशद्रोही म्हणणे यात फरक असावा. याकुब मेमनच्या फाशी विरोधातील आंदोलनांवर उजव्या गटांचे आक्षेप असू शकतात तेवढेच त्यांनी नोंदवले असावेत याचा अर्थ रोहीतला देशद्रोही ठरवले असा होत असण्याची शक्यता वाटत नाही. -देशद्रोह्यांचे समर्थन अभिव्यक्तीस्वांतंत्र्याच्या कक्षेत जेथपर्यंत बसते तिथपर्यंत- याकुबसाठी दयेच्या समर्थनाने कोणी देशद्रोही होत नाही परंतु देशद्रोह्याचे समर्थन केले हा आक्षेप (ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांच्या दृष्टीने) शिल्लक राहतो. मग ते टिव्ही वरचे पॅनलीस्ट असोत अथवा रोहीत वेमुला आणि त्यांचे साथीदार किंवा अजून कुणी.
वरील प्रतिसादातील ती वाक्ये डिलीट केली असती तर मुद्देसूद झाला असता प्रतिसाद. कामाच्या गोष्टीच तेव्हढ्या वाचल्या गेल्या असत्या. ही सुचवणी आहे. गैस नसावा.
1 Feb 2016 - 12:10 am | माहितगार
नोंद घेतली, मनमोकळ्या सुचवणी बद्द्ल मनमोकळे आभार.
1 Feb 2016 - 1:21 pm | गामा पैलवान
साती,
विकास कांबळेचा मृत्यू वैमनस्यातून झालेला नाही. वैमनस्य होतं ते अजिंक्य आणि धर्मांध यांच्यात. विकास आणि इतर दोघे जण केवळ अजिंक्यचे मित्र होते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. त्यांच्या दुर्दैवाने ते नको त्या वेळेस नको त्या ठिकाणी सापडले. म्हणून मुस्लिम गुंडांनी तिघांना बेदम मारहाण केली. त्यात विकास अधिक दुर्दैवी ठरला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला.
विकासच्या जीवाची किंमत शून्य आहे हे आम्हाला माहितीये. मी फक्त कारण शोधतोय. जर रोहित दलित आहे म्हणून एव्हढा आरडाओरडा केला जातोय, तर विकास काय दलित नाही का?
आ.न.,
-गा.पै.
1 Feb 2016 - 9:04 pm | साती
गापै, इतकं सांगूनही तुम्ही हे विचारताय याचा अर्थ तुम्ही शुद्ध 'पैलवान' आहात.
असो.
2 Feb 2016 - 12:22 am | गामा पैलवान
साती,
मी शुद्ध पैलवान (म्हणजे बिनडोक) आहे हे तुमचं मत एकदम मान्य. आता समस्या अशी आहे की बहुतांश हिंदू माझ्यासारखाच विचार करताहेत. तुम्ही त्याला बिनडोक म्हणा नाहीतर आजून काही.
सामान्य हिंदूच्या मनात येणारा विचार आहे की, देशद्रोही याकूबला सनदशीर मार्गाने फासावर लटकावलं तर निषेध करणारा रोहित माझा नक्की कोण लागतो? दुसरा प्रश्न असा की, केवळ हिंदू आहेत म्हणून मारले जाणारे विकास कांबळे आणि सावन राठोड यांच्या जागी उद्या मी असेन तर?
या दोन प्रश्नांची बिनडोक उत्तरं जरा शोधून पहा. आपली शासनयंत्रणा कोणत्या ज्वालामुखीवर उभी आहे ते तत्काळ ध्यानात येईल.
आ.न.,
-गा.पै.
31 Jan 2016 - 4:42 pm | माहितगार
रोहीतच्या बाबतीत ज्युडीशीअल एन्क्वायरीचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, पुढच्या संसदीय आधिवेशनाच्या आधी ज्युडीशीअल एन्क्वायरीचा रिपोर्ट येऊन विवीध गोष्टी स्पष्ट होतील असे वाटते.
विकास कांबळेच्या बाबतीत आपण दिलेल्या सनातन-चेपु दुव्यात आणि एशिअन एजच्या या वृत्तात जरासे अंतर आहे. काही गोष्टी नमुद कराव्याशा वाटतात, विकास कांबळेच्या मित्राच्या नावात फरक दिसतो आहे, बातमी सनातन असो अथवा एशीअन एजची असो जी कोणती बरोबर असेल विकास कांबळेच्या मित्रास कायदा हातात घेण्या एवजी, कायदेशीर संरक्षण मिळवण्याचे आणि गरजेनुसार कोर्टातून रिट पिटीशन द्वारे पोलीसांवर दबाव टाकण्याचे पर्याय उपलब्ध असण्याची शक्यता असावी पण त्यासंबंधाने कायदेविषयक सल्ला घेण्याचे कुणी सुचवले नसेल अथवा कायदे विषयक सजगता कमी पडली असे काही झाले असेल का? वृत्तपत्रीय बातम्यांच्या अचुकतेची खात्री नसल्यामुळे नेमकेपणाने सांगणे अवघड आहे त्यामुळे चु.भू.दे.घे.
दुसरा मुद्दा देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्रालय सांभाळत असताना, पोलीसांना विनंती करुन संरक्षण मिळत नसेल तर देवंद्र फडणवीसांच्या नावाने मंत्रालयात एक दहा रुपायांचा टेलीग्राम पाठवला तरी सरकार आणि पोलीस यंत्रणा हलावयस हवी होती. शिवसेनेच्या आमदारांपर्यंत नंतर पोहोचण्या पेक्षा आधी का नाही पोहोचले. आणि समजा विकास कांबळे दलित नाही त्याच्याही काही चूका असतील तरीही सर्व सामान्य व्यक्ति म्हणूनही दलित चळवळीतील लोकांनी प्रकरण वाढण्यापुर्वीच सुयोग्य मार्गदर्शन आणि मदतीत पुढाकार का घेऊ नये ?
बाकी विवीध सामुदायीक गटांमध्ये तेढ न राहता विश्वास आणि सौहार्दाची निर्मिती होण्यासाठी Truth and reconciliation commission सारख्या व्यवस्थेची गरज असावी असे मी मागेही एका धाग्यातून म्हटले आहे.
अर्थात हे सर्व वृत्तपत्रीय बातम्यांवर विसंबून असल्यामुळे चु.भू.दे.घे.
31 Jan 2016 - 4:55 pm | साती
समजा तो विकास कांबळे दलित असेलही , पण हा सगळा वाद वैयक्तिक स्वरूपाचा आहे.
यावर सगळ्या विचारवंतांनी या प्रकरणात भाग घ्यावा किंवा दलित संघटनांनी लढा द्यावा असे काही नाही.
'मेलेला माणूस केवळ दलित जातीचा होता म्हणून डोळे बंद करून त्याविरुद्ध लढावे की त्या प्रकरणाची कारणीमिमांसा काय आहे हे पाहून लढावे ' हे दलितांना आणि इतरही विचारवंतांना चांगलेच कळते.
प्रत्येक व्यक्तिगत मामल्यांत झालेल्या हत्येचा निषेध करत बसलं (जे करायला हवं कारण हे देशातल्या ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थिततेचे लक्षण असते) तर विचारवंतांना दररोज २५-३० मोर्चे काढत बसावं लागेल.
31 Jan 2016 - 5:19 pm | माहितगार
मी तेच म्हणतो तथाकथित विचारवंत मोर्चे काढण्यापलिकडे फारसे काही करताना दिसत नाहीत. कुणी नौकरीसाठी रिकमंडेशन मागितले की फटाककन सगळे राजकारणी देतातच तेव्हा नौकरी ही एका अर्थाने व्यक्तीगत समस्याच असते ना ? अगदी व्यक्तिगत समस्यांमध्ये मार्गदर्शन करणारी एखादी फळी असू शकते का आणि या बाबतीत आपले समाजकारणी आणि राजकारणी अयश्स्वी नाहीत का ?
1 Feb 2016 - 12:42 pm | खटासि खट
http://googleweblight.com/?lite_url=http://www.loksatta.com/lekha-news/r...
1 Feb 2016 - 12:53 pm | खटासि खट
वरची लिंक मूळ लेखाचे संक्षिप्त रूप आहे.
http://www.loksatta.com/lekha-news/rohith-vemula-suicide-issues-1195946/
या लिंक वय मूळ लेख उपलब्ध आहे.
1 Feb 2016 - 1:19 pm | माहितगार
हा आपला प्रतिसाद कुणासाठी आहे माहित नाही, मी लोकसत्तावर आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन वाचला त्याची ही पोच आणि धन्यवाद.
31 Jan 2016 - 5:11 pm | खटासि खट
लोंढेसाहेब
तुमची कलकल पाहून बोटं गहीवरली. हे पत्र रोहीत वेमुला जिवंत असताना लिहीलं असतं तर कुणी सांगावं वेगळंच काही चित्र असतं.
31 Jan 2016 - 6:30 pm | माहितगार
@ अविनाश लोंढे
आधी चर्चा, बातम्या आणि माहितीचे एवढे चर्वण झाले आहे की तुमचा लेख वाचण्या विलंब झाला, धागा लेखाच्या आधी इतर प्रतिसाद उपप्रतिसाद झाले आणि नंतर तुमचा लेख वाचला. लेख बहुतांश पोचला.
31 Jan 2016 - 7:08 pm | उदय८२
(संपादित)
याकुबच्या फाशीचा विरोध तुझ्या आवडत्या भाजप्यांपैकी कोणी कोणी केला होता बरं? आठवते का रे. मग तुझ्या मते ते सगळे देशद्रोही बर?
इतके दळभद्री आणि निर्लज्ज सरकार जगात कुठेही बनले नसेल. एक विद्यार्थी अमानुष जाचाला कंटाळून आत्महत्या करतो आणि सरकार आहे की त्याची चौकशी करण्याऐवजी "दलित आहे की नाही" यावर भाषणबाजी करत आहे.
लाज सुध्दा कोळून प्यायलेली लोक आहे. आणि त्यांना बिनडोक सपोर्ट करणारे गामासारखे विदेशात बसून छाती बडवणारी लोक.
31 Jan 2016 - 8:45 pm | माहितगार
याकुबच्या फाशीचा विरोध तुझ्या आवडत्या भाजप्यांपैकी कोणी कोणी केला होता बरं? आठवते का हे वाक्य कशा बद्दल आहे माहित नाही पण ससंदर्भ असेल तर रास्त टिकेचा भाग असू शकेल, बाकी टिकाही समजून घेता येईल; पण विचारांचा मुद्यांचा विरोध मुद्दे खोडून केला पाहिजे. गा.पैं.च्या बहुतांश मुद्यांचा मी मूळीच समर्थक नाही तरीही व्यक्तिगत टिकेने आपल्याच मुद्यांचे नुकसान होऊ शकते म्हणून व्यक्तिगत टिका टाळल्या पाहीजेत.
1 Feb 2016 - 10:50 am | उदय८२
गामा सारख्या लोकांसाठी प्रतिसाद आहे.
तुम्ही ताण घेऊ नका.
31 Jan 2016 - 8:49 pm | बोका-ए-आझम
रोहित वेमुला दलित आहे किंवा नाही हा प्रश्न आपण बाजूला ठेवू. इथे याआधी जो धागा या विषयावर निघाला होता,त्यात त्याचं दलित असणं हे ज्या प्रकारे highlight करण्यात आलं होतं त्यावरून आणि ज्याप्रकारे ही बातमी प्रसारमाध्यमांनी हाताळली त्यावरून हेच सिद्ध होतं की त्याच्या आत्महत्येला प्रसिद्धी मिळण्याचं कारण त्याचं तथाकथित दलित असणं होतं (इथे तथाकथित हा शब्द रोहित खरोखर दलित आहे की नाही असा वाद झाल्यामुळे वापरला आहे). त्याच्या आत्महत्येचं विरोधी पक्षांना भांडवल करायचं होतं. खरंतर कोणत्याही माणसाने परिस्थितीच्या रेट्यामुळे आत्महत्या करणं हे दुर्दैवी आहे मग त्याच्या जातीचा प्रश्न येतोच कुठे? बिगरदलिताने केलेली आत्महत्या ही कमी दर्जाची असते असं आपलं मत आहे काय?
प्रश्न जर सरकारच्या दळभद्री आणि निर्लज्ज वृत्तीचा असेल तर याआधीच्या सरकारच्या काळातही आत्महत्या झालेल्या आहेत.अगदी दलित आत्महत्याही. पण मीडियाने त्यांना एवढी प्रसिद्धी दिली नाही. हा दळभद्रीपणा कोणाचा? आधीचं सरकार आत्महत्या होऊ देत नव्हतं आणि आत्ताचं दलितविरोधी आहे असा निष्कर्ष तुम्ही काढलेला आहे आणि त्याच्या समर्थनासाठी लोकांवर व्यक्तिगत आरोप करत आहात. आणि सरकारने तो दलित नाही असं म्हटलेलं आहे. त्याची आत्महत्या नाकारलेली नाही आणि त्याने सिस्टिमकडून झालेल्या छळामुळे आत्महत्या केली हेही लोकांचं मतच आहे. अजून तसा निष्कर्ष न्यायालयात निघालेला नाही. पण तुमच्यासारखे लोक आणि प्रसारमाध्यमं आपलं मत मांडून मोकळे झालेले आहेत.
1 Feb 2016 - 10:59 am | उदय८२
आता तुम्ही मुद्दा उपस्थित केला आहे तर लिहितो.
या आधीच्या सरकारने सांगा बरे "तु दलित आहेस की नाही" यावर चविष्ट चर्चा पत्रकार परिषद घेऊन केली होती? खास तो दलित आहे की नाही हे शोधन्यासाठी आयबी चे अधिकारी नेमले होते? ज्याचा रिपोर्ट इंडियन जेम्सबाँड याच्याकडे खास पाठवला गेलेला? हे आधीच्या सर्व सरकारांमधे (वाजपेयींसकट) कुठे झाले होते कृपया स्पष्ट करावे.
राहिले प्रसिध्दी मिळण्याचा प्रश्न त्याला प्रसिध्दी दिली गेली भाजप्यांनी. कॉलेजमधले भांडण चव्हाट्यावर आणण्याचे काम तिथल्या खासदाराने केले जेव्हा एबीव्हिपी त्यांच्याकडे गेली होती. नंतर इराणीबाईने त्यात ४ -४ पत्र पाठवून नाक खुपसण्याचे काम केले. कोण देशभक्त आनि कोण देशद्रोही हे ठरवण्याचा ठेका काय भाजपाला दिला आहे का? ते आहे कोण हे ठरवणारे? रोहितच्या संघटनेत सर्व जातीची मुल असताना अचुक पणे विशिष्ट मुलांना कॉलेज मधून बाहेर काढले जाते का बरे?
त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन खोटी माहीती इराणीबाईने का बरे दिली?
तो दलित नाहीच आहे हे सतत या सरकारला का सांगावे लागत आहे. खर तर दलित असो या नसो सरकार करिता तर तो एक भारतीय नागरिक असला पाहिजे भले विरोधक मिडीया काहीही बोलो. पण सरकार सुध्दा मुद्दामून "दलित" नाहीच हा हेका का लावत आहे? कारण उत्तरप्रदेशात निवडणुका जवळ आल्या आहे म्हणून. म्हणजे हे दळभद्री सरकार निवडणुकित या प्रकरणाचा प्रभाव पडू नये म्हणून त्या भारतीय नागरिकाची ओळख सर्व बाजूने पुसण्याचा प्रयत्न करत आहे.
हे आधी कुठल्या सरकारमधे घडले होते जरा एक उदाहरण द्यावे.
1 Feb 2016 - 11:15 am | संदीप डांगे
पॉइण्ट आहे.
1 Feb 2016 - 11:46 am | बोका-ए-आझम
एकदा वाईट बघायचं म्हटलं की वाईटच दिसणार. सरकार तो दलित नाही असं सांगतंय कारण त्याच्या आत्महत्येच्या कारणांची ढाल पुढे करुन कसं हे सरकार दलितविरोधी आहे हे ठसवण्याचा प्रयत्न होतोय. जे करताहेत त्यांना दलितांचा फार मोठा पुळका आहे असं अजिबात नाही. त्यामुळे या सरकारला हे सांगायलाच पाहिजे की तो दलित नाहीये. वाट्टेल तो आरोप उद्या तुमच्यावर केला तर तुम्ही उत्तर द्याल की गप्प बसाल?
शिवाय आधीच्या सरकारने केलं नाही का त्याला मिडियाने अशी प्रसिद्धी दिली नाही? हाही मुद्दा आहेच. आणि जर दिली नाही तर त्यांचं आणि विरोधी पक्षांचं दलितप्रेम आत्ताच का उफाळून आलंय? उत्तर प्रदेशातल्या निवडणुका काय भाजप एकट्याच लढवणार आहे का? बाकीचे पक्ष काय फक्त मजा बघणार आहेत? बरं, उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांध्ये तेलंगणामधल्या एका विद्यार्थ्याने २०१६ मध्ये केलेल्या आत्महत्येने फरक पडणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं भारतीय राजकारणाबद्दलचं ज्ञान अपुरं आहे असं म्हणावं लागेल. तसा जर आपला देश असता तर आज कुठच्याकुठे पोचला असता.
कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही हे ठरवण्याचा हक्क भाजपाला दिलेला आहे का? नाही, पण मग तो काँग्रेसला किंवा इतर पक्षांना दिलेला आहे असं आपलं म्हणणं आहे का? जर एका राजकीय पक्षाला तो हक्क दिलेला नाही, तर मग कोणत्याच पक्षाला तो हक्क असता कामा नये.
इराणीबाईंनी नाक खुपसलं - रोहित हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातला विद्यार्थी होता. ते केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतं. राज्य शासनाच्या नव्हे. आणि तुम्ही भाजपाविरोधक असल्यामुळे तुम्हाला ते नाक खुपसणं वाटलं हे साहजिकच आहे पण इराणीबाई पत्रकार परिषदेत खोटं सांगताहेत हे तुम्हाला कसं माहित? तुम्हाला खरं काय आहे हे माहित आहे का? जर माहित आहे तर ते इतके दिवस उघड का केलं नाही तुम्ही?
शिवाय सरकारला दळभद्री हा शब्द वापरून तुम्ही तुमच्या मनातला गरिबांविषयी असलेला तिरस्कार आणि घृणा दाखवून देताय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, बरोबर?
कसं आहे, आरडाओरडा केल्याने लक्ष वेधून घेता येतं हो, पण प्रश्न सुटत नाहीत. आणि जेव्हा लोकांच्या ते लक्षात येतं तेव्हा त्यांच्यासमोर ख-या कारणामुळे आरडाओरडा केला तरी मग त्यांना फरक पडत नाही. लांडगा आला रे आला ही गोष्ट माहित असेलच तुम्हाला.
1 Feb 2016 - 5:16 pm | उदय८२
एकदा वाईट बघायचं म्हटलं की वाईटच दिसणार. सरकार तो दलित नाही असं सांगतंय कारण त्याच्या आत्महत्येच्या कारणांची ढाल पुढे करुन कसं हे सरकार दलितविरोधी आहे हे ठसवण्याचा प्रयत्न होतोय. जे करताहेत त्यांना दलितांचा फार मोठा पुळका आहे असं अजिबात नाही. त्यामुळे या सरकारला हे सांगायलाच पाहिजे की तो दलित नाहीये. वाट्टेल तो आरोप उद्या तुमच्यावर केला तर तुम्ही उत्तर द्याल की गप्प बसाल?
>>>
काय सांगता ठसवण्याचा प्रयत्न होतो. ऐकावे ते नवलच आहे. त्या मुलांना सरकारतर्फे देशद्रोही नक्षलवादी वगैरे ठसवण्याचा प्रयत्न होत होता ते पुण्याचे काम होते का? मग हे सरकार दलित विरोधी नाही असा तुमचा सुर कसा काय लागत आहे जरा स्पष्टीकरण देता का? म्हणजे सरकारने खोटेनाटे केले तर पुण्य आणि विरोधकांनी सत्य सांगितले तर खोटे. असे प्रकरण आहे का ?
शिवाय आधीच्या सरकारने केलं नाही का त्याला मिडियाने अशी प्रसिद्धी दिली नाही? हाही मुद्दा आहेच. आणि जर दिली नाही तर त्यांचं आणि विरोधी पक्षांचं दलितप्रेम आत्ताच का उफाळून आलंय? उत्तर प्रदेशातल्या निवडणुका काय भाजप एकट्याच लढवणार आहे का? बाकीचे पक्ष काय फक्त मजा बघणार आहेत? बरं, उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांध्ये तेलंगणामधल्या एका विद्यार्थ्याने २०१६ मध्ये केलेल्या आत्महत्येने फरक पडणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं भारतीय राजकारणाबद्दलचं ज्ञान अपुरं आहे असं म्हणावं लागेल. तसा जर आपला देश असता तर आज कुठच्याकुठे पोचला असता.>>>>>>>>>>>>>>>>
बर बाबा आमचे ज्ञान काडीचे अजिबात फरक पडणार नाही मग भाजपा का छाती बडवत तो दलित नाहीच आहे म्हणत आहे. जर निवडणुकिमधे काहीही फरक पडणार नाही. ;) आहे कि नाही गंमत म्हणजे फरक पडतोय म्हणून भाजप दलित विरोधी नाही हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतय तर ते बरोबर त्याचे ज्ञान पुरेपुर आणि आम्ही ही तेच सांगतोय तर आमचे ज्ञान अपुर? असा विरोधाभास कसा तुम्ही म्हणू शकतात? वर तुम्हीच लिहिले आहे ना.
कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही हे ठरवण्याचा हक्क भाजपाला दिलेला आहे का? नाही, पण मग तो काँग्रेसला किंवा इतर पक्षांना दिलेला आहे असं आपलं म्हणणं आहे का? जर एका राजकीय पक्षाला तो हक्क दिलेला नाही, तर मग कोणत्याच पक्षाला तो हक्क असता कामा नये.>>>>>>>>>
अब आया उंट पहाड के निचे.. मला सांगा गेल्या १० वर्षात काँग्रेस सरकार बद्दल बरेच काही इथे सोशल मिडीयावर खरडले गेले. कार्टून वगैरे खिल्ली उडवली गेली. किती काँग्रेसच्या सपोर्टस ने तुम्हाला देशद्रोही पाकिस्तानात जावा असे बोलले? एक नाव सांगा मी आपणास बक्षिस म्हणून जाहीररित्या भाजपात प्रवेश करेन. बोला आहे मंजूर
मग जर काँग्रेस या अजुन कुठल्याच पार्टीने कधीच कुणाला म्हणटले नाही तर या भाजप्यांना कोणी अधिकार दिला?
याचा अर्थ हे सुरु कोणी केले.. भाजपाने विरोध करणार्यांना देशद्रोही बोलने पाकिस्तानात पाठवून देण्याची भाषा भाजप्यांचीच होती. आणि आहे. काँग्रेसने कधी निवडणुकिमधे "आम्ही हरलो तर पाकिस्तानात नेपाळमधे फटाके वाजतील" असे जाहीर सभेत बोलले आहे? जी गोष्ट फक्त भाजपा आणि भाजपाच निर्लज्जपणे करतो त्या गोष्टी इतर कुठल्याही पक्षावर लावू नका. इतर पक्षांना थोडीफार लाज आहे.
इराणीबाईंनी नाक खुपसलं - रोहित हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातला विद्यार्थी होता. ते केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतं. राज्य शासनाच्या नव्हे. आणि तुम्ही भाजपाविरोधक असल्यामुळे तुम्हाला ते नाक खुपसणं वाटलं हे साहजिकच आहे पण इराणीबाई पत्रकार परिषदेत खोटं सांगताहेत हे तुम्हाला कसं माहित? तुम्हाला खरं काय आहे हे माहित आहे का? जर माहित आहे तर ते इतके दिवस उघड का केलं नाही तुम्ही?>>>>>>>
आझम भाऊ तुमच्या घरी टिव्ही आहे का हो? असल्यास बातम्या बघतात का हो? बघत असल्यास झीन्युज बघतात का हो?
बघत असाल तर तत्काळ असले लांगुलचालन करणारे चॅनल बघणे बंद करा आणि दुरदर्शन लावा. इराणीच्या खोटेपणाच्या विरोधात युनिवर्सिटीच्या शिक्षकांनी राजिनामा देऊ केलेला ही बातमी बघितली नाही? नसल्यास गुगल करा.
शिवाय सरकारला दळभद्री हा शब्द वापरून तुम्ही तुमच्या मनातला गरिबांविषयी असलेला तिरस्कार आणि घृणा दाखवून देताय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, बरोबर?>>>>>>>
अहो आझम भाऊ कितीदा सांगू आधी शब्दांचे अर्थ समजुन घ्या. ते गामा नावाचा प्रकार आहे ते सुध्दा असे प्रश्न करत नाही. प्लिजच. दळभद्रीचा अर्थ गुगलून या.
कसं आहे, आरडाओरडा केल्याने लक्ष वेधून घेता येतं हो, पण प्रश्न सुटत नाहीत. आणि जेव्हा लोकांच्या ते लक्षात येतं तेव्हा त्यांच्यासमोर ख-या कारणामुळे आरडाओरडा केला तरी मग त्यांना फरक पडत नाही. लांडगा आला रे आला ही गोष्ट माहित असेलच तुम्हाला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अगदी अगदी. पेट्रोलच्या बाबतीत असेच झाले जनतेचे. भाजपा आधी बरेच रान माजवत होती आता सत्तेत आल्यावर पेट्रोलचे भाव कमी होऊन सुध्दा फायदा जनतेला नाहीच उलट अधिभार वाढवत आहे.
एक दिवस जगात क्रुड ऑईल पाण्याच्या भावात मिळेल आणि मोदी सरकारचा अधिभार वाढून भारतात पेट्रोल ८० रुपयाने विकले जात असेल.
2 Feb 2016 - 12:31 am | बोका-ए-आझम
मस्त विनोदी प्रतिसाद आहे. काविळीचा पिवळा रंग अगदी दिसतोय सगळीकडे. एकेका मुद्द्याचा आढावा घेतो.
१.विद्यार्थ्यांना नक्षलवादी म्हणून ठरवण्याचा प्रयत्न होत होता -
या विद्यार्थ्यांचे नक्षलवादी चळवळीशी संबंध नाहीत हे त्यांनी तुमच्यासमोर शपथेवर कबूल केलंय, बरोबर? आणि तुमचा शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य because Uday is an honorable man!
२. नक्षलवादी संघटनांवर बंदी आहे आणि त्यांच्या सदस्यांना तुरुंगवास होऊ शकतो. पण हे विद्यार्थी अजूनही बाहेर आहेत. पण तरीही त्यांच्यावर सरकारने नक्षलवादी असल्याचा खोटा आरोप ठेवला आहे आणि ही बातमी खरीच असणार कारण उदयजी असं म्हणताहेत आणि Uday is an honorable man.
३. भाजप वर अनेक आरोप केले गेले आहेत - दलितविरोधी असल्याचा आरोप सर्वात नवा आणि तो खराच असणार कारण उदयजींच्या मते भाजप दलितविरोधी आहे आणि Uday is an honorable man!
४. भाजपला आपल्या संरक्षणार्थ आणि आपल्यावर होत असलेले दलितविरोधाचे आरोप फेटाळून लावण्याचा काहीही अधिकार नाही कारण उदयजी तसं म्हणतात आणि Uday is an honorable man!
५. रोहित वेमुलाची आई दलित होती असं आज अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष श्री.पुनिया म्हणाले. ते पुढे असंही म्हणाले की त्याचे वडील मुलांच्या जन्मानंतर परागंदा झाले आणि आईने सगळ्या मुलांचा संभाळ केला - त्यामुळे मुलांना आईच्या जातीनुसार दलित जातीत प्रवेश मिळतो. असा कायदा नाहीये पण उदयजी म्हणतात की रोहित वेमुला दलित आहे आणि सरकारचं म्हणणं की तो दलित नाहीये हे चुकीचं आहे. सरकारने त्याची आत्महत्या नाकारलेली नाही, फक्त तो दलित नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे हे सरकार दलितविरोधी आहे. काँग्रेसचे शेवटचे दलित अध्यक्ष सीताराम केसरी यांना सोनिया गांधींविरुद्ध उभं राहायची हिंमत केली म्हणून राजकीयदृष्ट्या संपविण्यात आलं आणि त्यानंतर जवळपास २० वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी दलित व्यक्ती आलेली नाही. पण काँग्रेस तरीही दलितविरोधी नाही कारण उदयजींचं तसं मत आहे आणि Uday is an honorable man!
६. इराणीबाईंच्या खोटेपणाच्या विरोधात हैदराबाद विद्यापिठातले प्राध्यापक राजीनामा द्यायला निघाले, प्रत्यक्षात दिला कुणीच नाही कारण सरकारी नोकरी, लठ्ठ पगार आणि इतर सुविधा कुणालाही रोहित वेमुलापेक्षा जास्त महत्वाच्या होत्या. आता तसंही ७वा वेतन आयोग येतो आहेच. पण हे प्राध्यापक राजीनामा द्यायला निघाले हे इराणीबाई खोटं बोलत असल्याचं निदर्शक आहे असं उदयजींचं मत आहे. त्यांच्या दिव्यदृष्टीला या सगळ्या प्राध्यापकांचं राजा हरिश्चंद्राशी असलेलं नातं दिसलेलं आहे. मग त्यातल्या एकाही प्राध्यापकाला ते वैयक्तिकरीत्या ओळखत नसले म्हणून काय झालं? उदयजींनी म्हटल्यावर सगळे प्राध्यापक एकजात श्रीमान सत्यवादी कारण Uday is an honorable man!
७. झी न्यूज ही भाजपचं लांगुलचालन करत असून सरकारी मालकीची दूरदर्शन ही वाहिनी एकदम विश्वासार्ह असल्याचं उदयजी सांगतात आणि ते तसंच असलं पाहिजे कारण Uday is an honorable man!
८. काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सरकारच्या विरोधात कुणी काही बोलल्यावर पाकिस्तानात जा असं म्हटलं नाही - कारण मग आख्ख्या देशाला कदाचित पाकिस्तानात पाठवायला लागलं असतं. पण उदयजींच्या मते भाजप पाठीराख्यांनी सरकारच्या विरोधकांना असं बोलायला नको होतं - आम्ही एक असं बोललेला काँग्रेस पाठीराखा दाखवून दिल्यावर उदयजी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपला ते हवे आहेत की नाही हा मुद्दाच इथे येत नाही कारण Uday is an honorable man.
९. एक दिवस जगात क्रूड आॅईल पाण्याच्या भावात मिळेल - उदयजींना सौदी अरेबिया किंवा कुवेत म्हणजे जग वाटत असावं आणि तेच खरं आहे कारण Uday is an honorable man!
१०. दळभद्री या शब्दाला होकारार्थी अर्थ देण्यात यावा असा आदेश (कोण रे तो फतवा म्हणतोय) उदयजींनी काढलेला आहे आणि सरकारच्या बाबतीत हा शब्द वापरण्यात यावा असंही त्यांचं म्हणणं आहे. आधीच्या सरकारने दलितांचं आयुष्य म्हणजे मुलायम रेशमी गादीसारखं झुळझुळीत आणि शिफाॅनच्या साडीसारखं सुळसुळीत केलं होतं. या सरकारने ते काटेरी बनवलेलं आहे अाणि एका माणसाच्या, जो मारहाणीच्या एका प्रकरणामुळे विद्यापीठातून निलंबित झाला होता आणि ज्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणाने केली हे अजून सिद्ध झालेलं नाही, त्याच्या आत्महत्येवरुन असा निष्कर्ष काढलेला आहे, जो खराच आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तसंच असलं पाहिजे काण Uday is an honorable man!
११. आम्ही २०१६ मध्ये तेलंगणात झालेल्या एका आत्महत्येमुळे २०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये फरक पडणार नाही असं म्हटलं होतं पण उदयजींनी भाजपला फरक पडणार नाही असं सोयीस्कर समजून घेतलेलं आहे. असा समजूतदारपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे कारण Uday us an honorable man!
उदयजी, आपला पिवळा चष्मा आणि गुढग्याची वाटी यांच्यासाठी स्मिथ्सोनियन इन्स्टिट्यूट आणि ब्रिटिश म्युझियम इथे जागा आरक्षित केलेली आहे. आपली हरकत नसावी अशी अपेक्षा आहे, कारण शेवटी Uday is an honorable man!
2 Feb 2016 - 1:45 pm | उदय८२
अरेरे माझे उत्तर फारच झोंबले वाटते
भक्तांना खरी उत्तरे फार झोंंबतात हे माहीत होते. इथे प्रात्यक्षिक ही दिसून आले
राहिले चष्मा आणि वाटी हे आपल्या पत्त्यावर पाठवून देतो जिथे ठेवायची तिथे ठेवा. आपले ठेवण्यासारखे काहीच नसेल म्हणून इतरांचे मागत आहात आम्ही आपणास निराश करणार नाही. ;)
बाकी बोका - ए -(भाजपाचे) आझम अगदी शोभून दिसतात
1 Feb 2016 - 5:17 pm | संदीप डांगे
खूप गोंधळ आहे हो बोकाभाऊ, जेव्हा दोन्ही पार्ट्यांचं म्हणणं खरं वाटायला लागतं तेव्हा कुणाच्याच म्हणण्यात तथ्य नाही असं वाटतं, हे सर्व पद्धतशीर राजकारण आहे. चमडीखेचा, चमडीबचाव हाच खेळ सुरु आहे.
मरणारा मेला कोणत्याही कारणाने. टाळूवरचे लोणी खाणारे आले धावत भांडायला.
1 Feb 2016 - 5:25 pm | उदय८२
जेव्हा युपीएचे सरकार होते तेव्हा एका मुद्द्यावर "राजकारण करू नका" अशी विनंती काँग्रेस पक्षाने विरोधकांना केली होती त्याव्वर आताचे विद्यामान विद्वान "स्वच्छ" प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या पक्षाचे पराभव झालेले अर्थमंत्री अरूणजी जेटली यांनी अतिशय योग्य वाक्य बोलले होते ते ही पत्रकार परिषदमधे,
"राजकिय पक्ष राजकारण नाही करणार तर काय करणार, तुम्ही सत्ताधारी आहात आम्ही विरोधक आमचे काम विरोध करण्याचे राजकारण करण्याचे आहे. संसद चालवण्याची जवाबदारी सत्ताधार्यांची असते. विरोधकांची नाही"
आता विरोधक त्यांच्याच म्हणण्यानुसार जर वागत असेल तर आता भाषण देता देता मधेच कोणी का रडत आहे ? कळत नाही ;)
1 Feb 2016 - 5:40 pm | संदीप डांगे
जेव्हा भक्त लोक संसद चालवू देत नाही म्हणून काँग्रेसला देशद्रोही म्हणतात तेव्हा हेच विधान आठवतं!
1 Feb 2016 - 6:09 pm | शलभ
मला मागचं आता आठवत नाहिये पण मागचे २-३ अधिवेशन तरी क्षुल्लक कारणं होती संसद चालवू न देण्याची.
1 Feb 2016 - 6:25 pm | संदीप डांगे
कुठलंही कारण असो क्षुल्लक वा महत्त्वाचे, संसद चालवू न देणे कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही. मग ते भाजप असो वा काँग्रेस. गोंधळ घालून देशाचा पैसा व वेळ वाया जातो. मुद्दे नसले की संसद बंद पाडण्याचे प्रकार केले जातात. इथे फक्त भाजप आता आपल्याच भूतपुर्व भूमिकेचा काँग्रेसी अवतार सहन करु शकत नाही. काँगेसला काही म्हणावे अशी परिस्थितीही नाही.
1 Feb 2016 - 10:13 pm | माहितगार
+१
1 Feb 2016 - 5:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
डांगे ब्वा +१०००,
आमचे स्पष्ट मत आहे की बीजेपी ही काँग्रेस पार्ट टु आहे किंवा एकच नाण्याच्या २ बाजू आहेत,
तरीही साला, देश तो ही भारतासारखा चालवायचे जिगर ह्या दोनच राष्ट्रिय पक्षांकड़े आहे असे आम्हाला वाटते!.
1 Feb 2016 - 5:35 pm | संदीप डांगे
अगदी अगदी. :-)
2 Feb 2016 - 7:41 pm | बोका-ए-आझम
भारतासारख्या खंडप्राय देशात एकच एक ideology कोणत्याच पक्षाची असू शकत नाही. अमेरिकेत डेमोक्रॅट्सनी बरेच उजवीकडे जाणारे निर्णय घेतलेले आहेत आणि रिपब्लिकन्सनीही डाव्या बाजूचे निर्णय घेतलेले आहेत. पण जर हे दोन पक्ष बलिष्ठ असतील तर मग बापू म्हणताहेत तशी परिस्थिती येऊ शकते. नाहीतर एक राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रांतिक पक्षांचं coalition हाच सर्वसामान्य पर्याय दिसतो. एकाच पक्षाचं दीर्घकाळ सरकार असणं हा पायंडा धोकादायक आणि कोणाच्याही डोक्यात सत्तेची मस्ती जायला कारणीभूत ठरतोच.
2 Feb 2016 - 7:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
Power corrupts and absolute power corrupts absolutely
राज्यशास्त्र विषयातले आवडते वचन!!
1 Feb 2016 - 2:03 pm | नाखु
सर, इथले विचारवंत सोईस्कर मुद्द्यांना बगल देतात हे मी नुकतेच अनुभवले आहे
पुण्यातील बातमी
यावर कुठल्याही दांडकेधारींनी चर्चा केली नाही का आवाज उठवला नाही. मेलेला मुलगा गरीब घरचा आणि रोहित सारखा बातमी मुल्य अस्लेला नव्हता जर मिपाकरांनाच अनुल्लेखावा वाटला तर इतरांच काय?
या बोटचेपेपणामुळे लिंक दिलेल्या बातमीतील मुलाला नक्की न्याय मिळणार नाही याबाबत मला स्देह नाही. सगळे आरोपी निर्दोष सुटतील हे नक्की.
भोंगळ निधर्मीवाद डोक्यात जाणारा
नाखु (अ) विचारवंत
2 Feb 2016 - 3:59 am | चैतन्य ईन्या
एकच बाजुला अता महत्व आहे भावु. ह्यालाच पुरोगामि म्हण्तात
31 Jan 2016 - 9:25 pm | माहितगार
स्क्रोल.इन वर अजाझ अश्रफ नावाच्या व्यक्तीने दहा मुद्दे मांडले आहेत. इतर लोक या विषयाकडे कसे बघताहेत याचा अंदाजा यावा. यातील कोणते मुद्दे तुम्हाला कितपत पटतात कोणते पटत नाहीत आणि का ?
या निमीत्ताने मन मोकळेपणाने चर्चा करण्याचे आवाहन.
31 Jan 2016 - 9:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
ही एक बातमी आली आहे
रोहित वेमुला बरोबर का चुक हा विषय इथे नाहिये, विषय पोलिसांनी आंदोलकांवर फ़ोर्स वापरायच्या बद्दल असू शकतो पण तो ही बाजूला ठेऊयात
पोलिसांसोबत आरएसएस कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलकांस मारहाण केली असे नमूद केलेले आहे ह्यात ह्याचे सत्यापन होऊ शकेल काय? सत्य असल्यास तो हक्क त्यांना कोणी दिला??
31 Jan 2016 - 10:12 pm | बोका-ए-आझम
बातमीची भाषा वाचलीत तर RSS goons वगैरे शब्द वापरलेले आहेत. दुसरी गोष्ट - मारहाण करणारे RSS चे होते कशावरून? उलट गळ्यात भगवं उपरण्यासारखं घातलेल्या एकाला मारहाण होताना दिसते आहे. तो RSS चा नाही आणि बाकीचे RSS चे आहेत असं कशावरून? शिवाय Logical Indian ही साईट नेहमीच RSS विरोधी भाष्य करत असते. त्यांची भाषा आणि तथाकथित डाव्या विचारवंतांची भाषा यात काहीच फरक सापडणार नाही तुम्हाला. In other words, ज्या साइटवर हे आलेलं आहे, ते त्यांच्या संघविरोधाबद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्याचमुळे विश्वासार्ह नाहीत. एखाद्या neutral वाहिनीने (कुठे आहेत आजकाल अशा वाहिन्या)असं छापलं किंवा दिलं असतं तर एकवेळ ठीक होतं. पण Logical Indian?
31 Jan 2016 - 10:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
मला लॉजिकल इंडियन च्या संघविरोधा बद्दल कल्पना नाही म्हणुन मी "सत्यापन होऊ शकेल का?" असे विचारले आहे पुढील प्रश्न जर सत्यापन झाले तरच आहे हे ही जोड़तो, लॉजिकल इंडियन पेज हे यूजर कंट्रीब्यूशन बेस्ड आहे असे माझे निरिक्षण सांगते बोक्या भाऊ , अन ह्यावर दोन्ही बाजूचे लेख असतात असे वाटते कारण मी लॉजिकल इंडियन वर सरकार चे अन पर्यायाने बीजेपीचे कोडकौतुक करणारे लेख पण वाचले आहेत ज्यात रेलवे रस्ते बांधणीची गती वाढवणे ह्या बद्दल प्रभु गडकरी वगैरे मंडळीची तारीफ करणारे लेख सुद्धा अंतर्भूत आहेत.
बाकी तुम्ही मांडलेले प्रश्न हे विरुद्ध दिशेने सुद्धा विचारले जाऊ शकतात म्हणा पण तुर्तास तुम्ही म्हणता आहात त्यात तथ्य असल्यामुळे आपण ही बातमी जर कुठे मेनस्ट्रीम मीडिया मधे आली तर बघायला थांबुया कसे? कसंय बोक्या भाऊ जगात एब्सॉल्यूट काहीच नाही किंवा सर्टेन सुद्धा मग ते डावे असो वा आरएसएस परफेक्शन कुठेच नाहिये, अजुन मला एक सांगा समजा केशव कुंज बाहेर मारहाण करणाऱ्या पोरांत जर आरएसएसची पोरं असली तरी ती काय कायम आरएसएस च्या गणवेशात राहणार का? किंवा अश्या प्रसंगी तो घालुन पॉलिटिकल ब्लंडर करतील का? तेच माप जर विरोधकांना सुद्धा लावले तर त्यांची सुद्धा मापे निघणारच अर्थातच!ह्यात दुमत नाही! अर्थात तुमच्याशी चर्चा केली जाऊ शकते ह्या आशेने अन विश्वासाने मुद्दे मांडतो आहे! I hope its kept a discussion and debate with all mannerism in interest of our friendship which is entirely my personal asset!! :)
1 Feb 2016 - 1:04 am | बोका-ए-आझम
अर्थात बापू. पण जे लिहिलंय त्यावरून तरी हे neutral वाटत नाहीये. उदाहरणार्थ तुम्हीच तुमच्या प्रतिसादात वापरलेला कार्यकर्ते हा शब्द आणि या write up मध्ये वापरलेला goons हा शब्द. आक्षेपार्ह वागणूक त्या एका पोलिसाची आहे, ज्यात तो त्या भगवं उपरणं/गमछा घातलेल्या मुलाला मारतोय. मग एक दुसरा असं कोणतंही चिन्ह नसलेला एक जण येऊन त्याला मारायला सुरुवात करतो. तेव्हा हा पोलिस त्यातून बाजूला होतो.
शिवाय - जर RSS goons असं म्हटलंय तर त्यांची नावं का नाहीयेत? जर ते RSS चे आहेत आणि goons म्हणजे गुंड आहेत हे माहित आहे (कारण लेखात तसा स्पष्ट उल्लेख आहे)तर त्यांची नावं तर लेखात यायला पाहिजेत. उलट मी तर म्हणतो यायलाच पाहिजेत. जर हा लेख एखाद्या पत्रकाराने लिहिला असता तर त्याने किमान नावं जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता. त्यांच्या अभावामुळे हा संपूर्ण लेख biased वाटतोय.
1 Feb 2016 - 12:03 am | माहितगार
@ सोन्याबापु
हे एक फोटोवृत्त आढळले. सत्ते सोबत हवशे नवशे गवशे येतात चौकशी होई पर्यंत साध्या वेशातील व्यक्ती कोण हे सांगणे कठीण. भाजपाकडे दुसर्याफळी पासून अतीउत्साहाला आवर घालू शकणार्यांची कमतरता आहे का माहित नाही. एकी कडे दलितांशी जुळवून घेण्याची भाजपाला निवडणूकांच्या राजकारणात प्रचंड गरज आहे, विरोधक असे प्रसंग शोधत असणार त्यांना टिकेसाठी असे आयते प्रसंग पुन्हा पुन्हा उपलब्ध करून देणे म्हणजे स्वतःच्या राजकीय पायावर दगड पाडून घेणे आहे. त्यात पुन्हा राज्यसभेत बहुमत नाही त्यामुळे विरोधक प्रत्येक बारीक सारीक गोष्टींच्या चौकशाही करून घेणार. नसत्या समर्थकांना आवरणे कठीण होत असलेले बिचारे मोदी !
1 Feb 2016 - 1:04 am | कपिलमुनी
मेगाबायटी प्रतिसाद टायपणांऱ्याचा मला अफाट कौतुक वाटता
1 Feb 2016 - 11:02 am | गॅरी शोमन
कोणाचीही हत्या होणे गैर आहे. आत्महत्या करावी लागणे हे ही गैरच. कॉग्रेस काही दलितांची तारणहार आणि भाजप शत्रु असे नाही. माझे एक नातेवाईक हैद्राबाद ला रहातात. ते म्हणाले की स्थानिक जनतेत ह्या घटनेविषयी दु:ख असले तरी आक्रोश नाही. कारण ह्या घटना दुर्दैवी असल्या तरी अधुन मधुन घडतात ज्यात वैयक्तीक हेवे दावे जास्त असतात.
राहुल गांधी आणि केझरीवाल आले म्हणजे काही स्थिती रसातळाला गेली असे नाही. हे संधी साधु आहेत. आपली पोळी भाजत आहेत.
काँग्रेस जर दलितांची कैवारी असेल तर सुशील कुमार शिंदे सिनीयर असुन ( अनेक वर्षे महाराष्ट्रात कॅबीनेट दर्जाचे मंत्रीपद अर्थ, महसुल आणि गृह ) भुषविले असुन मुख्यमंत्री म्हणुन अनेक काळ डावलले गेले ना ?
1 Feb 2016 - 11:57 am | माहितगार
भारतातील एक तृतीयांश राज्यातील राज्यांचे मुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि एक तृतीयांश गव्हर्नर पदे दलितांसाठी २५ वर्षे देण्याची अट टाकावी कोणते राजकारणी आणि राजकीय पक्ष किती खोलात आहेत ते आपसूक कळेल.
1 Feb 2016 - 12:07 pm | गॅरी शोमन
माहितगार,
भाजपने एके काळी आपला अध्यक्ष जो मुळचाच दलित आहे असा निवडला होता. बंगारु लक्ष्मण अस त्यांचे नाव आहे. दुरदैवाने स्टीईंग ऑपरेशमधे लाच घेताना सापडल्याने त्यांना हे पद आणि पक्षही गमवावा लागला होता.
या शिवाय ही सन्माननीय सदस्यांची यादी.
http://bjpscmorcha.blogspot.in/2011/07/list-of-members-national-executiv...
काँग्रेसने गांधी घराणे सोडुन कधी अध्यक्ष निवडला आहे का ?
1 Feb 2016 - 12:19 pm | माहितगार
हम्म गूड आयडीया सर्वच भारतीय राजकीय पक्षांनी दर दहा वर्षात तीन वर्षेतरी दलित अध्यक्ष निवडावा आणि १/३ राज्यातील राज्यस्तराचे अध्यक्षपद दलित नेत्याकडे देण्याचे २५ वर्षेतरी करावे.
बिहार मध्ये शो साठी दलित मुख्यमंत्री आणला आणि सोईचे नाही पाहून काढून टाकला तो सोईचा नाही तर बिहार मध्ये अजून दलित मुख्यमंत्रिपदावर बसवण्यासाठी उपलब्ध नव्हते का काय ? किंवा अगदी एखादा मुस्लीम मुख्यमंत्री द्यायचा पण त्याने खुर्च्या स्वतःच्या आणि स्वकुटूंबीयांपाशी राखता येत नाहीत हि मोठी अडचण असते.
1 Feb 2016 - 5:28 pm | उदय८२
बिहार मध्ये शो साठी दलित मुख्यमंत्री आणला आणि सोईचे नाही पाहून काढून टाकला >>>
सोईचा नाही तर त्याला भाजपाने फितवले आणि त्याने रंग बदलले म्हणून काढून टाकला. आणि नितिशकुमार ने कामच इतके केले होते की त्याला या "जातपातिची" गरजच नव्हती. त्याने काढले म्हणून "विकास विकास फक्त विकास" म्हणणार्यांनी लगेच बरे घेतले. ;)
1 Feb 2016 - 10:31 pm | माहितगार
उदयराव भाजपा आणि भाजपेतर हा विचार डोक्यात ठेऊन आम्ही मांडणी करत नाही; स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची उभ्या भारतातील सर्व राजकीय पक्षांची सर्व राज्य सरकारे घ्या किती मुख्यमंत्री, किती अर्थमंत्री, किती गृहमंत्री, किती कालावधीसाठी दलित समाजातून निवडले गेले याचा आलेख मांंडल्यावर काय चित्र दिसते सांगा.
महाराष्ट्राच्या बाबतीत किती साखर कारखान्यांचे अध्यक्ष संचालक दलित आहेत ? किती जिल्हा सहकारी बँकाचे अध्यक्ष दलित राहीले आहेत याचा आलेख मांडावा.
दलितांना राजकारणात स्थान देण्यात हयगय करण्याबद्दल मी भाजपाचेही कौतुक करत नाही, काँग्रेसचे करत नाही, कम्युनीस्टांचे करत नाही, जनता पक्षातून फुटलेल्या विवीध गटांचेही करत नाही, त्या प्रमाणे नितीशकुमार असोत अथवा लालू प्रसाद यादवही टीकेस तेवढेच पात्र का असू नयेत ? जिथपर्यंत नितीशकुमारांची गोष्ट आहे जर त्यांच्या पक्षातील एक दलित भाजपाने फितवला, त्यांच्या पक्षात दुसरे कुणीही दलित व्यक्ती जागा भरून काढण्यासाठी नव्हती किंवा कसे ? समजा त्यांच्या पक्षात नसेल बिहार मध्ये स्वतःच्या पक्षाचा राजकारणात नसलेला पण दलित आणि हुशार असलेला एखादा माणूस आणता आला नसता काय ? लालू प्रसादांना स्वतःची बायको मुख्यमंत्री बनवता येते अनेक नातेवाईक मंत्री पदावर बसवता येतात जेवढे त्यांचे नातेवाईक मंत्रिमंडळात आहेत तेवढे दलित मंत्रि त्यांनी मंत्रिमंडळात ठेवले होते/आहेत का ? हा संशोधनाचा विषय नसावा का ?
1 Feb 2016 - 10:42 pm | माहितगार
प्रश्न काम किती केले याचा नाही, दलितांना इतर समाजाच्या बरोबरीने स्थान देण्याचा आहे. बिहार मध्ये अथवा इतर कोणत्याही राज्यात राजकारणातही द्लितांना मंत्रिपदांवर महत्वपूर्ण स्थान असावयास हवे, सर्व पक्षीय राजकीय पक्षांमध्ये दलितांना बरोबरीचे सामाजिक आणि राजकीय स्थान प्राप्त झालेले असेल तर दलितांची आरक्षणाची गरज कमी व्हावयास हवी ती तशी झालेली नाही म्हणजे समाजात त्यांना अद्याप बरोबरीचे स्थान नाही आणि समाजात बरोबरीचे स्थान अद्याप मिळाले नसेल तर राजकारणात मंत्रिपदांमध्ये दलितांना बरोबरीने आणि महत्वपूर्ण स्थान मिळावयास नको किंवा कसे ?
1 Feb 2016 - 4:55 pm | उदय८२
काँग्रेसने गांधी घराणे सोडुन कधी अध्यक्ष निवडला आहे का ? >>
जशी इतर माहिती गुगल केली तशी काँग्रेसची पण करून बघावे . उत्तर मिळतील
2 Feb 2016 - 1:00 am | बोका-ए-आझम
की विकिपिडियाचं पेज उघडतं आणि विकिपिडियावर कोणीही सोम्यागोम्या किंवा ८१-८२ जाऊन माहिती बदलू शकतो हो साहेब. गूगलशिवाय इतर माहितीचे स्त्रोत माहित नसतील - पुस्तकं वगैरे, तर सांगा. संकोच करु नका. मोठे व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
2 Feb 2016 - 1:49 pm | उदय८२
अहो मी कधी बोललो का तुम्ही विकिपिडीयावर जाऊन माहीती बदलतात ?
गुगल शिवाय माहीतीचे स्त्रोत हवे असल्यास काँग्रेसने माहीतीचा अधिकार पास करून दिला आहे. त्याचा वापर करून बघा. मोदी सरकार असे ही आरटीआयमधे माहीती देण्यास जगप्रसिध्द आहे. तुम्हाला ही दिले जाईल.
2 Feb 2016 - 7:16 pm | बोका-ए-आझम
मोठे तर डायनासाॅर्स पण होते हो. तुमचं फक्त आतडं मोठं आहे हे समजून येतंच आहे प्रतिसादांवरुन!
2 Feb 2016 - 7:50 pm | माहितगार
@ बोका-ए-आझम प्रतिसादास व्यक्तिगत स्वरुप का येत आहे ?
@ उदय८२ काँग्रेसमध्ये दलित अध्यक्ष होऊन गेले यात तथ्य असावे, -१) ती नावे माझ्या ओठावर आहेत, तुम्हा दोघांची चर्चा कोठे जाते आहे हे बघतो आहे; आपण जर काँग्रेस आणि दलितांचे समर्थक असाल आपल्याला माहित असेल तर संदर्भ दुव्यासहीत देऊन का टाकत नाही - २) काँग्रेसने दलितांना अध्यक्षपद दिले तो कालावधी काँग्रेसच्या १३० वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत दिड टक्क्याच्या पुढे जाणार नाही - ३) काँग्रेसने अध्यक्ष पद दलितांना दिले आता लोक्सभेतील विरोधीपक्षनेतेपद दिले आहे पण त्या सर्व कालावधीत खरी सूत्रे नेहरु-गांधी घराण्याकडे राहीली आहेत - ४) काँग्रेस एक दलितांना सहभागी आणि समान सामाजिक आणि राजकीय दर्जा देण्या बाबत आग्रही असेल तर - काँग्रेसकडून इतर राजकीय पक्षांपेक्षा अधिक अपेक्षा असणे सहाजिक असावे- काँग्रेस कडून दलितांनी रिमोटकंट्रोल शिवायच्या पंतप्रधान पदाची अपेक्षा ठेवावयास आणि काँग्रेसने या पुर्वीच ती न मागता पुर्ण करावयास नको होती का ?
शिवाय खालील मुद्दे मी आधीच्या प्रतिसादातून नमुद केले आहेतच.
स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची उभ्या भारतातील सर्व राजकीय पक्षांची सर्व राज्य सरकारे घ्या किती मुख्यमंत्री, किती अर्थमंत्री, किती गृहमंत्री, किती कालावधीसाठी दलित समाजातून निवडले गेले याचा आलेख मांंडल्यावर काय चित्र दिसते सांगा.
महाराष्ट्राच्या बाबतीत किती साखर कारखान्यांचे अध्यक्ष संचालक दलित आहेत ? किती जिल्हा सहकारी बँकाचे अध्यक्ष दलित राहीले आहेत याचा आलेख मांडावा.
3 Feb 2016 - 3:06 pm | बोका-ए-आझम
येस. आम्हा दोघांतली चर्चा दुर्दैवाने वैयक्तिक पातळीवर गेली. अर्थात सुरुवात उदयजींनी केली होती. पण तो मुद्दा नाहीये. असं केल्याने परिस्थितीचं गांभीर्य नष्ट होतं. क्षमस्व!
2 Feb 2016 - 9:07 pm | नुस्त्या उचापती
अंदमान व निकोबार बेटांचे क्षेत्रफळ किती आहे ?
त्यावर जास्तीत जास्त किती लोक राहू शकतील ?
पिण्याचे पाणी , वीज , रस्ते या सुविधांची तेथे काय परिस्थिती आहे ?
कोणास माहिती असल्यास कळवावे .
ता .क. - मिपावर नवीन असल्याने फारशी माहिती नाही .
2 Feb 2016 - 10:16 pm | माहितगार
@ नुस्त्या उचापती, आपला माझ्या खालील मुद्द्यांवरचा विनोद असेल तर तो एक चांगला प्रयत्न म्हणून स्विकारतो. आपण रोहीत वेमुला विषयक मागच्या धागा चर्चेत सहभागी झाला आहात म्हणजे एवढे पण नवे नक्कीच नाही आहात. आपला विनोद माझ्या खालील मुद्द्यांचे कितपत निरसन करतो या बाबत साशंक आहे
..... २) काँग्रेसने दलितांना अध्यक्षपद दिले तो कालावधी काँग्रेसच्या १३० वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत दिड टक्क्याच्या पुढे जाणार नाही - ३) काँग्रेसने अध्यक्ष पद दलितांना दिले आता लोक्सभेतील विरोधीपक्षनेतेपद दिले आहे पण त्या सर्व कालावधीत खरी सूत्रे नेहरु-गांधी घराण्याकडे राहीली आहेत - ४) काँग्रेस एक दलितांना सहभागी आणि समान सामाजिक आणि राजकीय दर्जा देण्या बाबत आग्रही असेल तर - काँग्रेसकडून इतर राजकीय पक्षांपेक्षा अधिक अपेक्षा असणे सहाजिक असावे- काँग्रेस कडून दलितांनी रिमोटकंट्रोल शिवायच्या पंतप्रधान पदाची अपेक्षा ठेवावयास आणि काँग्रेसने या पुर्वीच ती न मागता पुर्ण करावयास नको होती का ?
शिवाय खालील मुद्दे मी आधीच्या प्रतिसादातून नमुद केले आहेतच.
स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची उभ्या भारतातील सर्व राजकीय पक्षांची सर्व राज्य सरकारे घ्या किती मुख्यमंत्री, किती अर्थमंत्री, किती गृहमंत्री, किती कालावधीसाठी दलित समाजातून निवडले गेले याचा आलेख मांंडल्यावर काय चित्र दिसते सांगा.
महाराष्ट्राच्या बाबतीत किती साखर कारखान्यांचे अध्यक्ष संचालक दलित आहेत ? किती जिल्हा सहकारी बँकाचे अध्यक्ष दलित राहीले आहेत याचा आलेख मांडावा.
2 Feb 2016 - 11:08 pm | नुस्त्या उचापती
माहितगार साहेब , आपला गैरसमज झालेला दिसतोय.
माझी प्रतिक्रिया तुमच्यासाठी नव्हती .
मला माहित नसलेली माहिती मिळवण्यासाठीची ती चौकशी
आहे .बरेच धागे शोधले पण माझ्या प्रश्नांना मांडण्यासाठी
जागा सापडत नव्हती . हा धागा बरा वाटला म्हणून इथे
प्रश्न टाकले .
बाकी तुमच्यासारख्यांना आडवं लावून कसं चालेल.
आम्हालाही इथे दिवस (आणि रात्री ) काढायच्यात.
_ आपला नुस्त्या .
2 Feb 2016 - 11:18 pm | माहितगार
;)
=)) सॉरी एवढा मागे लागतो का हो मी ?
कॉलींगी भटकंतीप्रेमी मिसळाअवकर्स आपले नवे मित्र नु.उ.ंना अंदमान व निकोबारची माहिती आणि अंदमान व निकोबारबद्दल धागे असल्यास धागा आणि विभाग दर्शन करवा बरे जरा.
2 Feb 2016 - 11:25 pm | viraj thale
ho pan tyach vidyapithamadhey ya adhi 10 mullani atmhatya kelelya congress chya kalamadhe.
3 Feb 2016 - 10:04 am | माहितगार
ठाले काका एक तर मराठीत टाईपाकी जरा आणि आपल्या माहितीसाठी मागच्याच धागा लेखचर्चेत हा मुद्दा चघळून झाला आहे मिसळपाव वर.
3 Feb 2016 - 3:23 am | गामा पैलवान
लोकहो,
याकूब मेमनची फाशी आणि रोहित वेमुलाची आत्महत्या या दोन घटनांतून व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न मनात उभे राहिले आहेत. दोन्ही प्रकरणांत ढोंगी पुरोगाम्यांकडून व्यवस्थेला दोष देण्यात आला आहे.
याकूबची फाशी रीतसर खटला चालवून दिली गेली होती. त्याकरिता त्याला बचावाचे सर्व मार्ग धुंडाळण्याची मुभा होती. फार काय रात्री अडीच वाजता सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ बसलं होतं. एव्हढ्या काटेकोरपणे प्रक्रिया राबवूनही ढोंगी पुरोगामी व्यवस्थेला दोष देत आहेत. याचाच अर्थ ढोंपुंना शासकीय व्यवस्था वेठीस धरायची सवय लागली आहे.
रोहित वेमुलाच्या बाबतीत बंदारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांनी आपापल्या पदांची कर्तव्ये बजावली तरी ढोंपु कल्लोळ करताहेत. एकंदरीत चालू लोकशाही व्यवस्था वेठीस धरता आली पाहिजे अन्यथा ती विसर्जित केली पाहिजे हे त्यांचे लक्ष्य आहे.
नक्षल आणि माओवाद्यांचेही नेमके हेच लक्ष्य आहे. त्यांना शासकीय यंत्रणा उलथून टाकायची आहे. ढोंपु नक्षल्यांचे हस्तक आहेत एव्हढंच सांगण्यासाठी हा संदेश टाकला आहे.
आ.न.,
-गा.पै.
3 Feb 2016 - 10:59 am | तिमा
सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते की आपला समाज, कुठल्याही घटनेकडे १०० टक्के निरपेक्षपणे पाहूच शकत नाही.
कुणाला काँग्रेसची तर कुणाला भाजपाची, कम्युनिस्टांची कावीळ झालेली असते. प्रत्येक व्यक्ति घडलेल्या घटनेकडे, कुठल्यातरी चष्म्यातूनच पहात असते. शिवाय, प्रसारमाध्यमे जे सांगतात तेच अंतिम सत्य, अशी कित्येकांची भाबडी समजूत असते.असे हे चर्वितचर्वण अनंतकाळ चालू शकते. पण होते काय की, तेवढ्यांत दुसरी एखादी घटना घडते आणि जुनी घटना विसरली जाते.
3 Feb 2016 - 11:20 am | माहितगार
@ तिमा निषक्ष माणूस कुणाचाच नसतो सर्वांच्याच टिकेचा लक्ष होतो -जावे त्यांच्या वंशा असे असते-, मी कोणताही चष्मा टाळून सर्वांवर सारख्याच प्रमाणात (बर्याचदा कठोर) टिका करत असतो तरीही नको असलेले मुद्दे दिसले की माझ्यावरही पक्षपाताचा आरोप होतो त्यापेक्षा कधी कधी चष्मा लावलेले लोक सुखी असतात असे वाटते किमान त्यांना त्यांच्या त्यांच्या गटाचे लोक येऊन समर्थन करतात चष्मा न लावणार्याचे दुर्दैवाने दुसरा चष्मा न लावणाराही समर्थन करत नाही. या धाग्यावर बरेच प्रतिसाद माझे आहेत आपण 'सर्व' प्रतिसादांना एकाच मापाने तोलत तर नाही आहात ना असे वाटून जरासा खेद वाटला.