सोबत

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
29 Jan 2016 - 5:36 pm

[शतशब्द कथांबद्दल एक धागा दिसला. आपणही प्रयत्न करावा असं वाटलं. अर्थात ते मला जमलं नाही पण त्या प्रयत्नात ही कथा जमेल तितकी छोटी ठेवली आहे. अधिक काट-छाट करणे ठीक वाटले नाही , तेव्हा ३३४ (मायक्रोसॉप्फ्ट वर्डनुसार) शब्दांची ही कथा खास मिपाकरांसाठी]

रात्री बाराच्या सुमारास विमानतळावरुन नीता बाहेर आली. राजेश नक्की येणारच याची तिला खात्री होतीच त्यामुळे तिने पर्स मधून फोन बाहेर काढला नाही.
नऊ वाजता "फ्लाईट उशिराने आहे" हे सांगायला तिने त्याला फोन केला होता तेव्हा त्याच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता , शिवाय त्याचं डोकंही दुखत होतं. आपल्या प्रिय नवर्‍याला आपण त्रास देत आहोत असं तिला वाटून गेलं. पण तिचाही नाईलाज होता. मागील खेपेस टॅक्सीने आली तेव्हा टॅक्सी अचानक बंद पडली होती. नेमकी त्या भागात मोबाईलला रेंज नव्हती. त्या निर्जन जागी , ड्रायव्हरच्या मनात भलतंच काही तर नाही ना या भितीने तिच्या जिवाचा थरकाप उडाला होता . सुदैवाने तसं काही नव्हत , पाच-सात मिनटांच्या प्रयत्नानंतर ड्रायव्हरने गाडी पुन्हा सुरु केली आणि दिलगिरी व्यक्त करत तिला सुखरुप घरी पोहोचवलं होतं. पण ती पाच-सात मिनटे आठवली तर आताही तिच्या अंगावर काटा यायचा.
राजेश समोर आला. खूपच थकलेला आणि दडपणाखाली वाटत होता.
"नीता, आपली गाडी बिघडली आहे, टॅक्सीने जावं लागेल"
"हं.." .. नीता बॅग खेचू लागली. राजेशनं पुढे होत तिच्या हातातली बॅग घेतली नाही याचं तिला आश्चर्य वाटलं.
टॅक्सी दिसली.
"माझं डोक खूपच दुखतय. तूच बोल ड्रायव्हरशी , माझ्यात बिलकूल त्राण नाही"
नीताला काहीसं विचित्र वाटलं तरी तिनं मान डोलावली.
टॅक्सीत ती काही बोलू लागली तसं त्याने तिला गप्प राहण्यास खुणावलं
" पंधरा दिवसानी बायको माहेरुन परततेय तर आनंद नाही झाला वाटतं ?"
त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं. त्याची दया येत ती गप्प बसली.
टॅक्सी घराजवळ पोहोचली. ड्रायव्हरने डिकीतून बॅग काढून दिली. ती बॅग हातात घेते तोवर राजेश घरात निघून गेलेला होता.
"आज काय असा विचित्र वागतोय हा" असं मनाशी म्हणत ती घराकडे बॅग ओढू लागली
आत येताच स्नेहाने ओक्साबोक्शी रडतच नीताला मिठी मारली. राजेशची लाडकी मावस बहीण स्नेहा आणि तिचा नवरा सुधीर जवळच रहायचे.
"ताई.." सुधीरने बोलायचा प्रयत्न केला पण त्याला हूंदका आवरता आला नाही.
नीताला काहीच कळेना आणि या दोघांना असंच सोडून राजेश खोलीत निघून गेला याचंही आश्चर्य वाटलं.
"काय झालंय दादा ? तुम्ही दोघं का रडताय? आणि सगळे कुठे आहेत?" नीताने विचारलं
हुंदका आवरत सुधीर बोलू लागला "तुम्हाला एयरपोर्ट वर घ्यायला जात असताना राजेशचा अ‍ॅक्सिडेंट झाला पण हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंतच ..... काका आणि मावशी हॉस्पिटलमध्ये गेलेयत "

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

छानच सांगितलीत! आवडली गोष्ट!!

मराठी कथालेखक's picture

29 Jan 2016 - 5:48 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

29 Jan 2016 - 5:50 pm | पिलीयन रायडर

मेल्यानंतरही परत यायचंच होतं तर किमान प्रेमानी तरी बोलायचं.. नाक मुरडणारी स्मायली!

मराठी कथालेखक's picture

29 Jan 2016 - 5:51 pm | मराठी कथालेखक

पहिल्यांदाच मेल्यामुळे दडपण आलं होतं बिचार्‍यावर

असं होय! मला वाटलं त्याला माहितच नैये..ते एम नाइट शामलन च्या पिच्चरसारखं!

उगा काहितरीच's picture

29 Jan 2016 - 5:58 pm | उगा काहितरीच

असे प्रयोग झालेत ना याअगोदर मिपावरच ?

मराठी कथालेखक's picture

30 Jan 2016 - 10:15 am | मराठी कथालेखक

कसला प्रयोग ?

पूर्ण कथाभर जिवंत माणूस अन शेवटच्या ओळीत त्याला आत्मा करायचे प्रयोग हो.
बरं असतं. इनफायनाईट पॉसिबिलीटीज मिळतात. लेखकाला आणि आत्म्याला पण.

जगप्रवासी's picture

30 Jan 2016 - 12:16 pm | जगप्रवासी

छान आहे कथा

जव्हेरगंज's picture

30 Jan 2016 - 6:42 pm | जव्हेरगंज

m

एक एकटा एकटाच's picture

1 Feb 2016 - 2:53 pm | एक एकटा एकटाच

चांगली आहे.
पण ही कथा शब्दांच्या आकडेमोडीत बांधली नसती तर अजुन उत्तम झाली असती.

पुढील लिखाणास शुभेच्छा

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2016 - 3:05 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2016 - 3:24 pm | मराठी कथालेखक

पुढील लिखाणास शुभेच्छा

आधीच्या काही लेखणाने ( , ) काहीशी खळबळ माजली होती Smiley