पुणे मुंबई पुणे

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
6 Jan 2016 - 6:05 pm

पुण्याचा एक खेडवळ म्हातारा रात्री उशीरा कसाबसा सीएसटीला उतरला. प्रवासानं दमलेला, कपडेही मळलेले. फलाटावर उतरताच त्यानं कपडे हातानं नीट केले. मुंडासं डोक्यावर घट्ट बसवलं आणि आ करून इकडेतिकडे पाहात, हातातली पिशवी सावरत तो चालू लागला.
मुंबईत मुरलेल्या टीसीच्या चाणाक्ष नजरेनं त्याला बरोबर हेरलं, आणि जवळ येताच हात आडवा करून त्या खेडुताला रोखलं.
तिकीट दिखाओ'... टीसी म्हणाला आणि म्हातारा बावचळला. खिसे चाचपून झाले, पिशवीही उलटीपालथी केली. तिकीट सापडलंच नाही.
टीसी खुश झाला.
निकालो पैसे. फाईन भरना पडेगा'... टीसी म्हणाला आणि म्हातारा रडकुंडीला आला.
'बाबा रे, पैसे नही है माझ्याकडे'... तो गयावया करू लागला.
'तो फिर चलो अंदर'... टीसीने खेडुत म्हाताऱ्याला बखोटीला धरले आणि केबिनमागच्या खोलीत ढकलून दरवाजा बाहेरून बंद केला.
काही वेळ गेला.
म्हाताऱ्यानं सदरा काढून बाजूच्या खुंटीला लावला. डोक्यावरचा फेटा अलगद उचलून तसाच गुंडाळत पिशवीत ठेवला, आणि धोतर अंथरून त्यानं सोबतची चटणी भाकरीची पुरचुंडी सोडली.
निवांत जेवण झाल्यावर बाटलीतलं पाणी पिऊन म्हातारा आडवा झाला. काही वेळातच तो घोरू लागला.
... सकाळ झाली. बाहेर गर्दी सुरू झाली होती. म्हातारा उठला. धोतर नेसला. खुंटीवरचा सदरा अंगावर चढवला. तेवढ्यात कालच्याच त्या टीसीनं दरवाजा उघडला.
'चलो'... टीसीनं म्हाताऱ्याला फर्मावलं. पुन्हा म्हातारा कावराबावरा झाला.
'कुटं जाने का?' त्यानं गबाळ्या चेहऱ्यानं टीसीला विचारलं.
कोर्ट मे'.. टीसी म्हणाला.
कायकूं कोर्टमे?' म्हाताऱ्यानं एव्हाना रूप बदललं होतं.
तिकीट नही था तुम्हारे पास. अभी कोरट सजा सुनवायोगा' टीसी हसत म्हणाला, आणि म्हाताऱ्यानं सदऱ्याच्या खिशातून तिकीट काढून टीसीपुढे धरलं!
आता टीसीनं आ वासला होता.
मग म्हाताऱ्यानं डोईवरचं भलंमोठं मुंडासं अलगद वर उचललं, आणि उलटं करून टीसीसमोर धरलं.
आत हजाराच्या नोटांची बंडलं नीट रचून लावली होती.
भैया, मुंबई मे मेरा नातेवाईक काल स्टेशनपर आनेवाला था. पन त्यो आला नही. मेरेकू उसका पत्ता मालूं नव्हता. ही जोखीम घ्यून रातीच्याला कुठं भायेर पडायचं मजी लई धोका था. बरं झालं, तुझ्यामुळं मी सुरक्षित राहिलो...'
पुणेकर खेडुतानं खिशातून शंभराची नोट काढून टीसीच्या हातात कोंबली.
टीसी गांगरलेलाच होता.
’घे बाबा.. खुशीसे दे रहा हू'... पुणेकर खेडूत हसत म्हणाला आणि फेटा डोक्यावर घट्ट बसवून बाहेर पडला.

... पुणेकर रॉक्स, मुंबैकर शॉक्स!

मुक्तकसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

ह्या एका ओळीसाठी इतकी बाष्कळ कथा का रचावी माणसानी? कैक ठिगळं आणि भोकं आहेत कथेमधे. पण असोच.

अजया's picture

6 Jan 2016 - 7:43 pm | अजया

अनुमोदन!

भारी...पुणेकर असतातच चतुर!!

पैसा's picture

6 Jan 2016 - 7:15 pm | पैसा

:)

याच्यावर एक सिनेमा काढा. सतीश राजवाडे नैतर स्टीव्हन स्पीलबर्ग नक्की दिग्दर्शित करेल. मुंबई-पुणे-मुंबई २ पेक्षा नक्की बरा निघेल.

जेम्स कॅमेरॉनला डावलल्याबद्दल निषेध..!

कचकाऊन निषेध.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jan 2016 - 12:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

अल्फ्रेड हिचकॉक हवाच :D

उगा काहितरीच's picture

6 Jan 2016 - 9:18 pm | उगा काहितरीच

१)पुण्यात मुंडासं बांधून अन् खेडवळ लोक कधीपासून रहायला लागलेत ?
२)रात्री पासून सकाळपर्यंत एकच टिसी कसाकाय ?
३) सकाळी टिसीला पैसे दाखवायची काय गरज ?
४) सकाळी नातेवाईकाचा पत्ता कसकाय मिळ्या मग ?

मला १ नाय समजत पुणे नावाची फक्त १ शिटीच आहे का तसल्याच नावाचा एखादा जिल्हा पन आहे?
कारण आमचे लोक जिल्ह्यातल्या पार टोकाव आसलेल्या वाडीत जरी राहात आसले तरी ते सातारकरच आसतात. तुमच्याकडं मात्र नदीच्या पलीकडचा पिंपरीचिंचवडकर सुद्धा पुणेकर नसतो.
का ह्यालाच पुणेरी बाणा म्हणतात?

मृत्युन्जय's picture

7 Jan 2016 - 11:22 am | मृत्युन्जय

नदीच्या पलीकडचा पिंपरीचिंचवडकर सुद्धा पुणेकर नसतो.

आपलं पुण्याबद्दलचे अज्ञान अगाढ आहे हे तर दिसतेच आहे. पण वरील वाक्यात ते प्रकर्षाने उघड झाले. पिंचि खुप लांब राहिले नदीच्या पल्याड इंचभर पुढे पुणेच काय पण उरलेले विश्व तरी आहे की नाही याची अस्सल पुणेकराला शंका असते. मुंबैकरांना आम्ही परग्रहवासीयच समजतो (अर्थात पुणेकरांपेक्षा मागास हे ओघानेच आले)

बोका-ए-आझम's picture

7 Jan 2016 - 1:07 pm | बोका-ए-आझम

सपे च्या बाहेर पुणं संपतंच. नदी तर लांब राहिली.

अभिजित - १'s picture

8 Jan 2016 - 1:18 pm | अभिजित - १

सपे ?? म्हणजे काय ?

आनंदराव's picture

7 Jan 2016 - 11:37 am | आनंदराव

अनुमोदन
अनुमोदन
अनुमोदन

देवा, चरणकमल कुठायत तुमचे,
अज्ञानी जीवाचा ऊद्धार करा.
आणि तेवढं ते जिल्हा म्हणुन पुणे लावनार्या आणि लायकी नसताना पुणेकर म्हणुन मिरवणार्या पापी प्राण्यांचा संहार करुन टाका.

आंबट गोड's picture

7 Jan 2016 - 11:46 am | आंबट गोड

खरेच बोअर कथा......उग्गाच आपलं काहीतरी पुणेकरांना डोक्यावर चढवायला!!

एक सामान्य मानव's picture

7 Jan 2016 - 12:22 pm | एक सामान्य मानव

मा़कड म्हणतय माझीच लाल असा प्रकार आहे हा (न्यूनगंडातून आलेला). ही गोष्ट शाळेत असताना ऐकली होती पण त्यात पुणे मुंबई वगैरे काही नव्हतं. आता कुठलीही चातुर्यकथा नायकाला पुणेकर म्हणून खपवा. हुषार कावळा, टोपवाला आणि माकड पासून सुरुवात होउदे. म्हणजे पुण्याचा कावळा मुंबईला येतो व तिथल्या कावळ्य्यांना पाणी काढून देतो इ.

सप्तरंगी's picture

7 Jan 2016 - 2:22 pm | सप्तरंगी

अशीच गोष्ट मी पूर्वी वाचली / ऐकली होती, साचा हाच , फक्त त्यात मुंबई -पुणे ऐवजी एक खेड्यातला माणूस शहरात येतो असे होते.

कलंत्री's picture

7 Jan 2016 - 5:30 pm | कलंत्री

एक गमंत म्हणून वाचताना मजा आली. प्रतिक्रिया इतक्या तिखट का आल्या हे मात्र समजले नाही.

दिनेश५७'s picture

8 Jan 2016 - 10:00 am | दिनेश५७

प्रतिक्रिया इतक्या तिखट का आल्या हे मात्र समजले नाही.

नितिन नितिन's picture

8 Jan 2016 - 10:42 am | नितिन नितिन

टिसी मुम्बै चा होता का ?

फेट्यात हजाराच्या नोटा ठेवणे कितपत प्रॅक्टिकल आहे कुणी जाणकार प्रकाश टाकू शकेल काय?

पैसा's picture

8 Jan 2016 - 11:19 am | पैसा

अशीच एक कथा बँकांमधे प्रसिद्ध आहे. एक माणूस दहा लाखाचे दागिने घेऊन बँकेत येतो आणि त्या दागिन्यांचे तारण ठेवून एक हजाराचे कर्ज मागतो. मॅनेजर त्याला भरपूर कर्ज घे म्हणतो, तो अजिबात ऐकत नाही.

एक महिन्यानंतर माणूस परत येतो. कर्जाचे एक हजार रुपये आणि व्याजाचे दहा रुपये भरून टाकतो. दागिने ताब्यात घेतो. मॅनेजर विचारतो महिनाभर कुठे होतास, हा म्हणतो कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मग एक हजाराचे कर्ज कशाला घेतलेस? तो सांगतो, "ते दागिने मला महिनाभर सुरक्षित ठेवायचे होते. त्यासाठी लॉकर भाड्याने घेतला असता तर पाच हजार रुपये भाडे भरावे लागले असते. त्याऐवजी वीस रुपयात माझे काम झाले!"

पण बँकाही आता शहाण्या झाल्यात. व्याज घेतातच. प्लस जिन्नस सुरक्षित ठेवण्याचे चार्जेस वेगळे वसूल करतात. शिवाय, लोन टू वॅल्यु रेशोही बघून घेतात. व्याज ठिक आहे. ते मिळेल. पण वस्तूच चोरीला गेली तर जी भरपाई द्यायला लागेल तिचं काय? बँक सरळ नाही म्हणते लोनला अशावेळी. हो की नाही?

संदीप डांगे's picture

8 Jan 2016 - 1:09 pm | संदीप डांगे

चांगली माहिती....