प्रतिसाद....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जे न देखे रवी...
2 Jan 2016 - 11:33 am

मूळ प्रेरणा (http://misalpav.com/node/34317)

दरेक धाग्याला प्रतिसाद असतो.
प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो.

प्रतिसाद सुखद असतो किवा दु:खद असतो.
दु:खद प्रतिसाद आपल्या लिखाणाच्या उर्मीवर काळी छाया पसरवतो
सुखद प्रतिसाद लिखाणाला प्रेरणा देतो.

मलाच दु:खद प्रतिसाद का म्हणून विचारू नये.
दु:खद प्रतिसाद दुसऱ्याला का नाही? म्हणून खंतावू नये.

कोणता प्रतिसाद मिळेल हे आपल्या लिखाणावर अवलंबून असते.
मित्रानो, प्रत्येक प्रतिसाद घेत जावे.
प्रत्येक प्रतिसाद शिकत जावे.

दु:खद प्रतिसादाने खचू नका.
गहन विचारवंतांचा आदर्श ठेवा.
ते ही न जमल्यास, नानांचा हितोपदेश लक्षांत ठेवा.
धागे आणि प्रतिसाद, हे मिपाचे चक्र आहे.
प्रतिसादांचे अनुभव घेवून जा.

डिस्क्लेमर =====> बरेच दिवसांत आम्ही धागा न टाकल्याने, आम्ही आमचा लेखन कंडू शमवत आहोत.

शांतरसवावर

प्रतिक्रिया

जेपी's picture

2 Jan 2016 - 12:03 pm | जेपी

मी पयला..

मुक्त विहारि's picture

2 Jan 2016 - 12:29 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

तुमच्या प्रतिसादाची उत्तरे खालील प्रमाणे....

१. काय केलेत पहिले येवून?

२. "मी पहिला" ह्या प्रतिसादाला बॅन करण्यात यावे.

३. असे प्रतिसाद देवून मिपाची बँड-विड्थ वाया घालवू नये.

४. आजकाल तुम्हाला फावला वेळ बराच मिळतो का?

५. "मी पहिला", "मी दुसरा", असे प्रतिसाद लिहिण्यापेक्षा काही तरी भरीव काम केलेत तर उत्तम.

जेपी's picture

2 Jan 2016 - 12:43 pm | जेपी

1)कविता वाचली.
2) मर्जी संमची ..
3)मर्जी मालकांची..
4)आजच टैम भेटला..
5)भरीव मंजे हजारी प्रतिसादासारखा धागा का ??

(पळण्याच्या तयारीत)जेपी

मुक्त विहारि's picture

2 Jan 2016 - 1:21 pm | मुक्त विहारि

जेथे तू तेथे मी.

लातूर आणि नाशिक साक्षी आहेत.

साक्षी (हि कोण?) सोबत टक्या आणी बॅटमॅन च पुनरागमन झाल कर बहार येईल !!

प्रचंड सहमत.

मिपाचे व्यसन एकदा लागले की सोडवत नाही.

आणि संपादक मंडळींवर माझा विश्र्वास आहे.

नाखु's picture

4 Jan 2016 - 11:52 am | नाखु

मुवींवर आणि अर्थात मुवींचे बाबा (महाराजां)वरही.

प्रतिसाद मात्र नाखु

मुक्त विहारि's picture

4 Jan 2016 - 7:55 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

नीलमोहर's picture

2 Jan 2016 - 1:01 pm | नीलमोहर

विडंबन धागा होता म्हणून थोडी गंमत केली इतकेच, तरीही माझ्या बाजूने तुमच्या प्रश्नांची उत्तरे,

१. कविता वाचली. नंतर मोट्ठा प्रतिसाद देऊ म्हणून आत्ता फक्त येण्याची नोंद केली.
२. काहीच हरकत नाही.
३. मिपाची बँड-विड्थ वाया जाण्यासाठीच असावी बहुधा.
४. मिळतो कधी बॉस कृपेने.
५. भरीव काम करण्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा मिपाच्या स्वगृहावर हेडर खालीच आहे, पण आमचं
बॅड लक नेहमीप्रमाणे खराब असल्याने तोही (बॅनर) दिसेनासा झालाय.

अशा गंमतीचा आम्हाला त्रास होत नाही.....

अंगात थोडी टवाळगिरी असल्याशिवाय "मिपा" सदस्यत्व घेवू नये, असे आमचे बाबा महाराज म्हणतात, ते काही उघीच न्हवे...

नीलमोहर's picture

2 Jan 2016 - 12:19 pm | नीलमोहर

सेकंड..

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2016 - 9:14 pm | चौथा कोनाडा

मस्त रचना, मुवि !
प्रतिसाद या विषयावरचं विडंबन आवडलं
विडंबन कसे म्हणावं ?
विडंबन म्हटलं की विनोद अन टवाळकीचा वास येतो

मी पयला म्हणत धाग्यावर मज्जा सुरू झालीय, आता धम्माल येणारच !

मुक्त विहारि's picture

3 Jan 2016 - 8:06 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

टका असता तर आता पर्यंत शंभर झाले असते..