संपादक मंडळ

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
29 Dec 2015 - 12:09 pm

नमस्कार,

गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे.

आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

१) डॉ. सुहास म्हात्रे

२) गवि

३) गणपा

यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल.

धन्यवाद.
- नीलकांत

प्रतिक्रिया

नाखु's picture

31 Dec 2015 - 10:57 am | नाखु

जेपी प्रस्तावाला मनापासून सहमती

आणि

संपादकांना शुभेच्छा !!!

संपादक झाल्यावर नवे काही लिहायचेच नाही अशी "हुच्च" परंपरा मोडीत निघावी ही या "दत्त" गुरुंकडे प्रार्थना..

वा मात्र नाखु

आणि

संपादकांना शुभेच्छा !!!

मोगा's picture

29 Dec 2015 - 3:39 pm | मोगा

छान

जागु's picture

29 Dec 2015 - 3:42 pm | जागु

अभिनंदन सगळ्यांचे.

बाबा योगिराज's picture

29 Dec 2015 - 3:44 pm | बाबा योगिराज

तिघांचे ही अभिनंदन.

अनुप ढेरे's picture

29 Dec 2015 - 3:47 pm | अनुप ढेरे

संपादकांची गस्त घालायची डुटी वाटून घेतलेली असते का? का कोणीही कधीही गस्तं घालतो?

उगा काहितरीच's picture

29 Dec 2015 - 3:48 pm | उगा काहितरीच

अभिनंदन व शुभेच्छा !

बोका-ए-आझम's picture

29 Dec 2015 - 3:49 pm | बोका-ए-आझम

.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Dec 2015 - 3:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे अभिनंदन!

पिशी अबोली's picture

29 Dec 2015 - 3:59 pm | पिशी अबोली

अभिनंदन आणि शुभेच्छा!

मन's picture

29 Dec 2015 - 4:02 pm | मन

त्रयीचे अभिनंदन.
बादवे, मला संपादक व्हायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Dec 2015 - 4:37 pm | बिपिन कार्यकर्ते

शुभ बोल रे मन्या, तर म्हणे मला संपादक करा!

आनंदराव's picture

29 Dec 2015 - 4:07 pm | आनंदराव

हार्दिक अभिनंदन
तसेच पुढील वाट्मारीस... स्वारी स्वारी वाट्चालीस शुभेछा
क्रुपया, हलके घ्या

एस's picture

29 Dec 2015 - 4:15 pm | एस

यात अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही, कारण मिपाचे संपादकपद हे काटेरी मुकुटासारखे आहे. दीर्घ काळ ही जबाबदारी यांनी व माजी संपादकांनी तेवढ्याच जबाबदारीने पेलली. पुन्हा हा रोल तुम्ही करायची तयारी दाखवलीत त्याबद्दल मनःपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा!

एक मिपाकर म्हणून तुमच्यासोबत सदैव असूच.

सुधांशुनूलकर's picture

29 Dec 2015 - 4:34 pm | सुधांशुनूलकर

तिघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!

नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन !

स्पा's picture

29 Dec 2015 - 4:46 pm | स्पा

बर्र

प्रीत-मोहर's picture

29 Dec 2015 - 4:49 pm | प्रीत-मोहर

नव्या संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

विश्वव्यापी's picture

29 Dec 2015 - 4:55 pm | विश्वव्यापी

तिघांनाही शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!

जव्हेरगंज's picture

29 Dec 2015 - 5:16 pm | जव्हेरगंज

w

गामा पैलवान's picture

29 Dec 2015 - 5:24 pm | गामा पैलवान

नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा. वर या पदास काटेरी मुकूट असं म्हंटलंय. खरंतर ते काटेरी सिंहासन आहे. फरक उघड आहे ! ;-)
-गा.पै.

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 6:03 pm | अभ्या..

येशू ख्रिस्त आणि भीष्माचार्यातला फरक का? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपा गवि आणि डॉक्टर एक्का यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
आपलं मिपाला फुल सपोर्ट राहील. आपणही आम्हाला सदस्य म्हणून फुल सहकार्य कराल अशी अपेक्षा. :)

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

29 Dec 2015 - 6:58 pm | सस्नेह

नूतन संमंच्या (जुन्याच) संपादकांना हार्दिक शुभेच्छा !

एक एकटा एकटाच's picture

29 Dec 2015 - 8:23 pm | एक एकटा एकटाच

अभिनंदन

श्रीरंग_जोशी's picture

29 Dec 2015 - 10:26 pm | श्रीरंग_जोशी

नव्या डाव्यासाठी संपादक त्रिमुर्तींना शुभेच्छा!!

डावे असतातच फाटाफुटीसाठी.
त्यात आता नवे डावे जुने डावे काय? हे पुतीनवादी वाटते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> डाव्यासाठी संपादक त्रिमुर्तींना
डावे विचारांचे संपादक मलाही आवडतात. ;)
(पळा, लागायची आमच्या प्रतिसादाला कात्री)

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

29 Dec 2015 - 10:42 pm | श्रीरंग_जोशी

डावासाठी असे लिहायचे होते. इनिंग हा शब्द लिहिणार होतो पण इंग्रजीऐवजी मराठी प्रतिशव्द वापरायला गेलो अन घोळ झाला... :-( .

क्षमा असावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालायचच. जराशी गंमत. क्षमा कशाला. :(
लिहा आता एखादा उजव्या विचाराचा लेख.

-दिलीप बिरुटे

मितभाषी's picture

29 Dec 2015 - 10:42 pm | मितभाषी

सर्व संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

सौन्दर्य's picture

29 Dec 2015 - 10:51 pm | सौन्दर्य

नवीन संपादक मंडळाचे स्वागत आणि अभिनंदन. मिपाचा उत्तरोत्तर असाच विकास व्हावा ही शुभकामना.

चतुरंग's picture

29 Dec 2015 - 11:03 pm | चतुरंग

एक्का (इस्पिकचा), दुर्री (गवि), तिर्री (गणपा) यांना शुभेच्छा आणि त्यांचा कार्यकाल उत्तम जावो अशा सदिच्छा! :)

-(गुलाम)रंगा

तराजु साभांळायच्या जबाबदारि साठि सर्वांना शुभेछा :)

मला वाटतं "संपादन" बटण सर्व लेख/प्रतिसादांस सुरू केल्यास सुज्ञ मिसळपाव सभासदांस संपादकांची गरज भासणार नाही.लेखन चुका/आगाऊपणा झाल्यास ते स्वत:च दुरुस्त करतील.मागचे लेख उघडूनही त्यातील व्याकरण/टाइपो सुधारून टाकता येतील.
एक तात्त्विक गरज म्हणून संपादक मंडळ असावे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 11:01 am | कैलासवासी सोन्याबापु

+१/२,

कारण लेखन हे साचा तयार करुन विषयाचा अभ्यास करुन केले गेले असते, त्यात ह्यूमन एरर चा चांस बराच असतो अन लेखकाला/लेखिकेला बरेचवेळी "अरेच्चा अजुन हा मुद्दा घातला असता तर जास्त उठावदार लेखन झाले असते" असे वाटू शकते, तस्मात् लेखांस स्वसंपादन सुविधा दिल्यास बरे पडेल,

पण,

प्रतिक्रिया ह्या उस्फुर्त असतात (बॅटु,वल्लीजी,डॉक्टर, बोकोबा, डांगेसाहेब असे काही सन्माननीय अपवाद सोडता) बरेचवेळी नेमकी मंडळी काड़ी टाकायला म्हणुन दोनोळी प्रतिक्रिया टंकतात (अन ती सक्सेस सुद्धा होते) म्हणुन "जो उस्फुर्तपणे जे बोलला त्याची जबाबदारी तीच" ह्या तत्वानुसार प्रतिक्रिया विभागाला संपादन हक्क देणे म्हणजे सावळा गोंधळ होईल असे भासते, शिवाय अतिशय आक्षेपार्ह किंवा वैयक्तिक असले काही प्रतिक्रियेस्वरुप आल्यास संपादक मंडळ त्याची नीट काळजी घेतात हे सर्वश्रुत आहेच. तीच सिस्टम बरी वाटते

माफ़ करा अधिकार नसताना आगाऊ सल्ले देतोय

(मिपा भक्त) बाप्या

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 10:53 am | कैलासवासी सोन्याबापु

संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन अन मनःपूर्वक शुभेच्छा! :)

#ह्या तत्वानुसार प्रतिक्रिया विभागाला संपादन हक्क देणे म्हणजे सावळा गोंधळ होईल असे भासते, शिवाय अतिशय------"

केवळ स्वप्रकाशन करू शकतो म्हणून काहीही लिहायचं नाही हे 'लेखक' होऊ इच्छिणाय्रांनी संयम पाळायवाच हवा.दोन अथवा दोनशे ओळींचे लेखन असो.लेखन चौर्य /राजकीय चिखलफेक हे करायचं नाही हे कोणास समजले नाही तरच लक्ष घालावे लागेल.उगाचच जागता पहारा कशाला?शिवाय कॅापीराइटचं उल्लंघन वगैरे जबाबदारी लिहिणाय्रांवरच आहे.एखादा लेख कोणी खोडला तर जाऊ दे काय मोठेसे नुकसान होणार या क्षणभंगूर डिजिटल विश्वात?दुसरा कोणी लिहिलंच.
आता मी थांबतो.

नया है वह's picture

30 Dec 2015 - 12:30 pm | नया है वह

पुढिल वाटचालीस शुभेच्छा

सूड's picture

30 Dec 2015 - 2:51 pm | सूड

एक नंबर !! अभिनंदन आणि धन्यवाद. :)

वगिश's picture

30 Dec 2015 - 4:26 pm | वगिश

अभिनंदन

कौशी's picture

30 Dec 2015 - 4:35 pm | कौशी

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

सर्व संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

जिन्क्स's picture

31 Dec 2015 - 11:41 am | जिन्क्स

बॅटमॅन ह्या आयडी वर प्रतिबंध का घालण्यात आले? एखाद्या सदस्यावर प्रतिबंध घातले की ते इतर सदस्यांना कारणा सहीत कळवणे हे संपादक मंडळाची जबाबदारी आहे असं नाही वाटत का?

नीलकांत's picture

31 Dec 2015 - 12:17 pm | नीलकांत

नमस्कार,
मूळात मिपा चालवण्याची प्रेरणा अशी आहे की मराठी लोकांनी एकत्रीत यावं आणि मराठीत व्यक्त व्हावं. त्यासाठी लागणारं व्यासपीठ मिपा आहे. आता मिपा जसजसं मोठं होत गेलं तसतशी येथे काहीतरी व्यवस्थापन असावं असा विचार आला. मग ते कसं असावं? व्यवस्थापनात किती स्तर असावेत? ते कसे असावेत असे अनेक प्रश्न पडले व ते मिपाकरांनी आपल्यापरीने सोडवले आहेत. हे सर्वोत्तम आहे असा मिपाचा दावा कधीच नव्हता तर हे आमच्या परीने आम्ही उत्तम करतो आहोत ही भूमीका आहे. त्यामुळे मर्यादांचे भान आहे व सूचना व तक्रारांचे स्वागतही आहे.
वर तुम्ही जे म्हणताय त्याबाबत नकारात्मक भूमीकेमागे एक संदर्भ आहे. काय आहे की हे पहिल्यांदा घडत नाहीये की कुणा एका सदस्याला नाईलाजाने बंदी घातली आहे. एखाद्या सदस्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा घेत आहे किंवा त्याच्या एका विशिष्ट वागण्याने किंवा एखादी भूमिका लावून धरण्याने मिपावरील वातावरण बदलतंय हे लक्षात आल्यावर व्यवस्थापनाद्वारे बहुतांशवेळा त्या सदस्याशी संवाद साधल्या जातो त्यांना व्यवस्थापनाची भूमीका समजावून सांगीतल्या जाते. कित्येकवेळा प्रतिसाद सकारात्मक असतो तर काही वेळा असहकार्याचा सुध्दा असतो. अश्या वेळी शेवटचा उपाय म्हणजे त्या सदस्यावर बंदी घालणे. बंदी ही कारवाई असते मात्र ती अंतीम आहे असा सुध्दा व्यवस्थापनाचा आग्रह नाही. कारण लोकांनी एकत्र यावे ही मूळ प्रेरणा आहे ती विसरता येत नाही. आणि बंदी म्हणजे कुणाला तरी एकत्र येण्यापासून थांबवणेच आहे. पण कुणा एकाच्या चुकीच्या वागण्याने वातावरण बिघडत असेल तर असा निर्णय घ्यावा लागतो. मागे अशी घोषणा केल्यावर त्या सदस्यांने असा आक्षेप घेतला होता की अशी घोषणा करणे योग्य नाही. त्यामुळे उगाच विषय वाढतो. आधीच कारवाई हा वाढीव विषय आहे, त्याची पुढे घोषणा व त्याचे आक्षेप आणि निराकरण हे सगळे नकारात्मक आणि विसंवाद वाढवणारे आहे.

कारवाई पुर्वी संवाद साधला जातो - याचा अर्थ आहे की मिपावरील वातावरण तुम्ही बिघडवताय.
कारवाई केली जाते - याचा अर्थ असा आहे की तुम्ही सध्या जसे वागता तसे वागू नये अशी अपेक्षा आहे.
तुमच्यावरील कारवाई परत घेतली आहे - याचा अर्थ असा आहे की तूमची केवळ एखादी भूमीका व्यवस्थापनाला चुकीची वाटते. तो आग्रह तूम्ही सोडून द्यावा अशी अपेक्षा आहे. बाकी तुमचे स्वागत आहे.

धन्यवाद.

जेपी's picture

31 Dec 2015 - 12:24 pm | जेपी

3

मितान's picture

31 Dec 2015 - 12:33 pm | मितान

उत्तम !!!!
नव्या संपादकांचे अभिनंदन :)

पिवळा डांबिस's picture

31 Dec 2015 - 1:21 pm | पिवळा डांबिस

तीनही संपादकांचे अभिनंदन!
आणि हा निर्णय घेतल्याबद्दल नीलकान्ताला विशेष शाबासकी!!!

पिवळा डांबिस's picture

31 Dec 2015 - 1:43 pm | पिवळा डांबिस

बाकी त्या गणपाला कामाला जुंपला हे लई ब्येष्ट केलं.
शिंचं गेली कितीक वर्षं कुठं दडून बसलं होतं देव जाणे!!!!
:)

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Dec 2015 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते

बरेच द्वाड दडून बसलेत.

(बाकी, सध्या तुम्ही कुठे असता? ;) )