संपादक मंडळ

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
29 Dec 2015 - 12:09 pm

नमस्कार,

गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे.

आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

१) डॉ. सुहास म्हात्रे

२) गवि

३) गणपा

यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल.

धन्यवाद.
- नीलकांत

प्रतिक्रिया

गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे अभिनंदन!

- (मिपाकर) सोकाजी

स्वगतः ओह्हो सोक्या, तरीच प्रॉडॉ सध्या सुटलेत प्रतिसादांमधून, नॉर्मल मिपाकर म्हणून ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>स्वगतः ओह्हो सोक्या, तरीच प्रॉडॉ सध्या सुटलेत प्रतिसादांमधून, नॉर्मल मिपाकर म्हणून ;)

लै दिवस झाले सामान्य मिपाकर म्हणून इंजॉय करताच येत नव्हतं. चला आता दंगा मौजमजेला मी मोकळा. ;)

-दिलीप बिरुटे
(सामान्य आणि कट्टर मिपाकर)

गवि, गणपा आणि डॉ. एक्काजी यांचे अभिनंदन!

मी-सौरभ's picture

30 Dec 2015 - 5:17 pm | मी-सौरभ

त्रिमुर्ती ना शुभेच्छा!!
अभिनंदन तर मिपाकरांचे की त्यांना एवढे मातब्बर संपादक मिळालेत.

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 12:17 pm | अभ्या..

तिघांचे अभिनंदन

नि३सोलपुरकर's picture

29 Dec 2015 - 12:18 pm | नि३सोलपुरकर

नूतन संपादक त्रयीचे अभिनंदन !.

पैलवान's picture

29 Dec 2015 - 12:19 pm | पैलवान

म्हणजे गणपाभौंची चिकन डिश अजून ३ महिने तरी नाही बघायला मिळणार.

पियुशा's picture

29 Dec 2015 - 4:58 pm | पियुशा

त्रिवार अभिनंदन :)

अमृत's picture

29 Dec 2015 - 12:20 pm | अमृत

अभिनंदन व शुभेछा!

पैसा's picture

29 Dec 2015 - 12:22 pm | पैसा

तिघांनाही शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!

प्रचेतस's picture

29 Dec 2015 - 12:23 pm | प्रचेतस

तीन्ही संपादकांचे अभिनंदन.

सनईचौघडा's picture

29 Dec 2015 - 12:30 pm | सनईचौघडा

अभिनंदन

संजय पाटिल's picture

29 Dec 2015 - 12:31 pm | संजय पाटिल

डॉ. सुहास म्हात्रे, गणपा व गवि यांचे अभिनंदन!!!

नीलमोहर's picture

29 Dec 2015 - 12:31 pm | नीलमोहर

नव संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..

थ्री मस्केटियर्सचे अभिनंदन!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2015 - 12:35 pm | अत्रुप्त आत्मा

शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन.

पिलीयन रायडर's picture

29 Dec 2015 - 12:36 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन आणि ऑल द बेस्ट!

किसन शिंदे's picture

29 Dec 2015 - 12:38 pm | किसन शिंदे

गवि, गणपा आणि एक्का काकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 12:38 pm | शान्तिप्रिय

गवि गणपा आणि सुहास म्हात्रे यान्चे अभिनन्दन.
नीलकांत, आपण नि:स्वार्थ पणे हा मराठीचा ज्ञानयज्ञ चालू ठेवला आहे. मनापासून आभार.
मी बरीच वर्षे मिपा चा केवळ प्रेक्षक होतो
आता लिखाणही सुरु केल्यामुळे आधीच सुन्दर असलेले माझे आयुष्य आणखी सुन्दर झाले आहे.

प्रदीप साळुंखे's picture

29 Dec 2015 - 12:45 pm | प्रदीप साळुंखे

.

पद्मावति's picture

29 Dec 2015 - 12:52 pm | पद्मावति

नवीन संपादकांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

सुहास झेले's picture

29 Dec 2015 - 12:53 pm | सुहास झेले

अभिनंदन आणि शुभेच्छा :) :)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Dec 2015 - 1:01 pm | बिपिन कार्यकर्ते

तिन्ही संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

सन्दीप's picture

29 Dec 2015 - 1:04 pm | सन्दीप

संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

दिपक.कुवेत's picture

29 Dec 2015 - 1:06 pm | दिपक.कुवेत

हार्दिक अभिनंदन आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 1:22 pm | अभ्या..

विजेते?????
कधी होती स्पर्धा?
;-)

दिपक.कुवेत's picture

29 Dec 2015 - 3:31 pm | दिपक.कुवेत

होती रे

राजाभाउ's picture

29 Dec 2015 - 1:16 pm | राजाभाउ

संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

कपिलमुनी's picture

29 Dec 2015 - 1:31 pm | कपिलमुनी

महिला मंडळाला आरक्षण नै यंदा !
बादवे , मिपाचा संमं आणि अनाहिताचा संमं वेगळा असता का ?
( विचारणार नव्हतो , पण दिल है के मानता नही !)

नीलकांत's picture

29 Dec 2015 - 2:03 pm | नीलकांत

हे दोनही वेगळे संपादक मंडळ आहेत. येथे मिपा आणि अनाहिता मध्ये अनाहिताचे संपादक मंडळ काम करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2015 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुख्य मिपा आणि ते हे आपलं नाव काय त्याचं त्याचे संपादक वेगळे केले ही चांगली गोष्ट झाली.

-दिलीप बिरुटे
(आनंदीत)

प्रसाद१९७१'s picture

29 Dec 2015 - 1:53 pm | प्रसाद१९७१

नविन संपादकांना शुभेच्छा

यशोधरा's picture

29 Dec 2015 - 2:01 pm | यशोधरा

नव संपादकांचे अभिनंदन!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Dec 2015 - 2:05 pm | निनाद मुक्काम प...

सर्व संपादकांचे अभिनंदन
अवांतर
च्यायला बोंबा
वाडा काही पूर्ण होत नाही यंदा सुद्धा

प्राची अश्विनी's picture

29 Dec 2015 - 2:06 pm | प्राची अश्विनी

नवीन सं मं चे अभिनंदन!

नंदन's picture

29 Dec 2015 - 2:11 pm | नंदन

रसिकतेने जग हिंडलेल्या, निरनिराळ्या चवीढवींचे अनुभव मिपावर सातत्याने पेश करणार्‍या ह्या मातबर त्रयीचे हार्दिक अभिनंदन!

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Dec 2015 - 2:19 pm | बिपिन कार्यकर्ते

नेमके!

ऋषिकेश's picture

30 Dec 2015 - 5:05 pm | ऋषिकेश

+१
अभिनंदन आहेच! सोबत हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भरपूर शुभेच्छा!

नव्या संपादक मंडळींची नावे वाचून मिपाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. :)

सर्वसाक्षी's picture

29 Dec 2015 - 2:29 pm | सर्वसाक्षी

स्वागत आणि अभिनंदन!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Dec 2015 - 2:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नव्या संपादकांचे हाबिणंदन रच्याकने नव्या संपादक मंडळाचं रॅगिंग करावं काय? डिलेम्मा =))!!!!

जातवेद's picture

29 Dec 2015 - 2:36 pm | जातवेद

अभिनंदन आणि शुभेच्छा!

जेपी's picture

29 Dec 2015 - 2:54 pm | जेपी

:-)

मित्रहो's picture

29 Dec 2015 - 3:01 pm | मित्रहो

नवीन संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

नव्या संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

चिंतामणी's picture

29 Dec 2015 - 3:26 pm | चिंतामणी

गणपा कडुन नविन नविन पाकृ येतील अशी आशा आहे आणि फोटो डकवण्यास मदत होइल ही सुद्धा भाबडी आशा आहे.

सर्व संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

जेपी's picture

29 Dec 2015 - 3:35 pm | जेपी

एक सूचनावजाविनंती-

अता टवाळ कार्टा आणी बॅटमॅन यांच्यावरील प्रतिबंधही काढण्यात यावा..
धन्यवाद.

नीलमोहर's picture

29 Dec 2015 - 3:51 pm | नीलमोहर

टवाळ कार्टा, बॅटमॅन, प्यारे१ यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा,
मालक कृपेने हे लौकरच व्हावे,
आमेन !

मार्कस ऑरेलियस's picture

29 Dec 2015 - 11:32 pm | मार्कस ऑरेलियस

+२

मी-सौरभ's picture

30 Dec 2015 - 5:15 pm | मी-सौरभ

सुबह का भुला... बेसिस वर घ्या जमवून मंडळि.