अरे या ना रे

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
1 Dec 2015 - 10:24 pm

अरे या ना रे
कि जीव गेला
कि जग गेलं, झोपा रे
अरे या ना रे
की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे

ना सांज ना सकाळ,
सगळा अंधारच अंधार
आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे

मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा
मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा

ना अंधरुन ना रजाई
ना उतरण ना चढाई
आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे

जळतच गेली जळत जळत गेली
दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी
नाही विझली नाही विझली
हवेनेही नाही विझली ही जिंदगी

एक फुंकर मारली
सगळा धूर ऊडून गेला
तो श्वास होता, एक ध्यास होता
जो घेऊन गेला, सत्यानाश होता
मायेच्या काळजाचा एक नाद होता

अरे या ना रे

============================

सौजन्य: https://m.youtube.com/watch?v=tugB6k0KHlE&itct=CBoQpDAYACITCJHt0q6Mu8kCF...

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

नीलमोहर's picture

1 Dec 2015 - 11:05 pm | नीलमोहर

आओ ना
के जां गई जहां गया
सो जाओ

आओ ना
के थक गई है जिंदगी
सो जाओ

न शाम न सवेरा
अंधेरा ही अंधेरा
है रुहों का बसेरा
सो जाओ

(गाणं पूर्ण पाठ आहे, आत्ता मोबाइलवर आहे म्हणून नाहीतर पूर्ण टाईप केलं असतं,
हे आपलं फेव्हरेट आहे बॉस )

जव्हेरगंज's picture

1 Dec 2015 - 11:22 pm | जव्हेरगंज

सिनेमात हे गाणं म्हणजे परमोच्च बिंदू आहे. हे गाणं जेव्हा सुरु झालं तेव्हा डोळे विस्फारुन नुसता बघतच राहिलेलो. अफाट ! चित्रपट ही तुफान होता!.

नीलमोहर's picture

2 Dec 2015 - 12:03 am | नीलमोहर

गाण्याच्या सुरुवातीला कुदळीचा आवाज आहे - अंगावर काटा येतो ते ऐकतांना बघतांना..
हे गाणं जेवढं संथ तेवढंच याचं रॉक व्हर्जन दंगा, त्यातील गिटार, बीट्स अफलातून !!
इरफानच्या एंट्रीला असलेलं दमदार म्युझिक, गुलों मेँ रंग भरे, बिस्मिल, जेहलम.. एकसे एक गाणी..
तब्बू केके शाहिद, त्याच्या वडिलांच कॅरेक्टर, डबल सलमान सगळ्यांचं काम अप्रतिम.

चित्रपटाची सिनेमैटोग्राफी सुपर्ब. ते बर्फाळ बैकग्राउंड ज्यामुळे पूर्ण चित्रपटभर एक गूढ उदासी भरून राहते.
शेवटची फायटिंग तर बेकार.. सिनेमा संपल्यावर डोकं सुन्न होतं.. पूर्ण बधीर.
सिनेमा अफाट अचाट होता, सलाम विशाल भारद्वाज..

जळत आहे, जळत आहे
दिव्यासारखी ही जिंदगानी
नाही विझत, विझत नाही
हवेने विझत नाही ही जिंदगानी

एका फुंकरीने ते झाले
सगळा धूर झाला, उडून गेला
तो जो श्वासांचा एक फास होता,
निघून गेली जी टोचण होती,
उरातली ती वेदना गेली
बेचैनी गेली, आजार गेले
आता तरी ये, माझ्या प्रिया, झोप ना रे

हवा होते हवेत विरले
राहिले ते रितेपण एक
कधी होते कधी नाही
राहिला मालक तो एक

जे होते आरंभापासून होते
सारे त्याच्या कृपेने होते
जगी जे मोठे काम होते
कपाळी लिहून ठेवले होते
जे होऊन गेले जे घडून गेले
निष्कारण इथे राहणे नको आता, चल ना रे
थोडा धीर धर, एक थडगं निवड, घरी ये रे

अरे या ना रे
कि जीव गेला
कि जग गेलं, झोपा रे
अरे या ना रे
की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे

** हिंदी/उर्दू चे मराठी रूपांतर करतांना तंतोतंत शब्द मिळणं फार कठिण, अर्थ बरेच बदलतात,
उर्दू डिक्शनरी समोर ठेऊन केलं पण अवघड काम आहे हे. __/\__ गुलझार साहेब

* धागा हायजॅक केल्याबद्दल क्षमस्व :)

पिलीयन रायडर's picture

3 Dec 2015 - 4:01 pm | पिलीयन रायडर

अरे आओ ना.. ची गोष्टच वेगळी!! हैदर मध्ये हे गाणं अप्रतिम वाटतं..!

त्यात जे "के" जान गई.. मध्ये जो "के" वापरला आहे तो मराठीत नुसता "की" वापरुन आणता येईल का ते माहित नाही..
अगदी शब्दशः अनुवाद केलाच पाहिजे असं नाहीये ना..

गुलझार साहेबांच्या कवितेला हात लावणं तसंही फार फार अवघड काम!

पालीचा खंडोबा १'s picture

4 Dec 2015 - 3:12 pm | पालीचा खंडोबा १

सुरेख