एल्गार स्वरांचा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
1 Dec 2015 - 2:47 pm

पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा
स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा

पाखरे अशी येतात कुठून येथे
साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा

काल पर्यंत होते सारे षंढ इथे
आज होतो एल्गार स्वरांचा

जगतानाच त्यांनी जाळले मला इथे
मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा

#जिप्सी

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

1 Dec 2015 - 6:20 pm | चांदणे संदीप

जबरदस्त!

(का कोण जाणे आधी कुठेतरीवाचल्यासारखी वाटते आहे!)
Sandy

महासंग्राम's picture

2 Dec 2015 - 11:52 am | महासंग्राम

नाही हो …. फक्त माझ्या फेबु आहे पोस्ट केलेली…

पैसा's picture

1 Dec 2015 - 7:02 pm | पैसा

चांगली आहे.

काल पर्यंत होते सारे षंढ इथे
आज होतो एल्गार स्वरांचा

याचे जरा स्पष्टीकरण कराल का? नीट कळले नाही.

जव्हेरगंज's picture

1 Dec 2015 - 8:40 pm | जव्हेरगंज

+१
एल्गार स्वरांचा? ही काय भानगड आहे?

महासंग्राम's picture

2 Dec 2015 - 11:59 am | महासंग्राम

मराठीत "एल्गार" ह्या शब्दाचा अर्थ "जोराचा हल्ला" असा होतो. मी इथे आधी सारे गप्प होते पण आज सगळेच बोलायला लागले आहेत असा घेतला आहे….
( संदर्भ : सध्याची लोकांची देशातल्या विविध विषयांवर चाललेली चर्चा . आमिर, असहिष्णुता, राष्ट्रगीत इत्यादी ).

काही चुकलं असेल तर वडिलकीचा सल्ला देवून सुधारणा सांगावी.

(अत्यंत सहिष्णू) मंदार