ती धावली ...... (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
29 Nov 2015 - 8:27 am

पेर्ना

प्रसंग कुठलाही असो ,दूध उतू जाण्याचा, ट्रेन वा बस पकडण्याचा , कुत्रा मागे लागण्याचा किंवा व्यायामाचा. जेव्हा बायका (विशेषत: वजनदार बायका .) धावतात तेव्हा तो देखावा अगदी हृदयंगम वगैरे असतो यावर कुणाचे दुमत नसावे.
( गज़लेचे वजन शेवटच्या शेरात असल्याने प्रेरणेत नसूनही तो घुसडला आहे, त्या बद्दल संदीपजींची माफी)

"टनाची" होती बंदी, ती धावली
कुणा वाटे न का संधी? ती धावली....

ढग एक नाराज झाला होता
त्याचीच होती रुंदी, ती धावली....

श्वान धराया धावला जेव्हा
भयकारी मग आक्रंदी, ती धावली....

गर्जना काही ऐकल्या मैत्रिणींच्या
मनानी पडली तटबंदी, ती धावली....

डळमळले भूमंडळ कुणी काही म्हणेना का
माझी प्रिय बासुंदी ,ती धावली....

vidambanविडंबन

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

29 Nov 2015 - 9:05 am | DEADPOOL

हे मस्त आहे!

चांदणे संदीप's picture

29 Nov 2015 - 10:36 am | चांदणे संदीप

कसली ही मस्त बासुंदी!
भारीच! आवडली!

संदीप डांगे's picture

29 Nov 2015 - 11:09 am | संदीप डांगे

मस्तंय... मस्तंय... ;-)

टवाळ कार्टा's picture

29 Nov 2015 - 12:41 pm | टवाळ कार्टा

खिक्क

जेनी...'s picture

29 Nov 2015 - 12:50 pm | जेनी...

अंह्ह ! जमलं नै ...

संदीप डांगे's picture

29 Nov 2015 - 12:56 pm | संदीप डांगे

शेवटचा शेर असा बदलता आला तर बघा:

तळमळे भू, तीला साहवेना,
जेव्हा माझी बासुंदि ती धावली.

तुमच्या म्हाकाव्यात माझी ठीगळं बरं का.. ;-)

दमामि's picture

29 Nov 2015 - 12:59 pm | दमामि

हो, आता जरा हल्कं वाटतय.;)

निनाव's picture

4 Dec 2015 - 4:28 pm | निनाव

हा हा.. छाने

बिन्नी's picture

5 Dec 2015 - 5:24 pm | बिन्नी

चांगला प्रयत्न

जिल्बीला चांगलं म्हणणाऱ्या सर्वांना धन्यवाद!=)