असे कधी घडत नसते!

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी...
5 Nov 2015 - 6:37 am

तुम्ही लिफ्ट दिलेली व्यक्ति
तुमचा गळा आवळू लागते
श्वास कोंडतो
डोळेबाहेर येतात
शरीर सुटण्यासाठी धडपडू लागते
त्याचा चेहरा क्रूर होतो
अन् पकड़ घट्ट होवू लागते
त्याला ढ़कलण्यास पुढे
केलेल्या हातास
पण काहीही न सापडते
अधिकच घाबरता मग तुम्ही
जगण्याची आशा मालवू लागते
इतक्यात तुम्हाला अचानक
कशी कोण जाणे जाग येते
दचकून उठता मान चाचपडता
काही नाही! तुम्हास बरे वाटते
दुस-या दिवशी मात्र दिवसभर
मान तुमची दुखत असते
खरेच का सांगा आता बरे
'असे कधी घडत नसते?'
झपाटलेल्या(?) वळणापाशी येताच
तुमची चाल मंदावू लागते
कितीही नास्तिक वा धीट असलात
तरी
हलकेसे भय तुम्हास वाटू लागते
श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो
शरीर थोडेसे घामेजू लागते
वळण ते पार होताच मात्र
तुमची स्थिती पूर्वपदावर येते
कधी तरी घरी पोहचता
घर जणू तुम्हाला आलिंगन देते
फुललेले चेहरे, उतू चाललेला हर्ष
तुम्हास ते खटकू लागते
तुमच्या आगे मागे फिरणा-या त्यांची
तुम्हाला चिड येऊ लागते
कधीतरी होते सारे असह्य
तुमच्या तोंडून किन्काळी फुटते
माणसे, घर सारे... काहीच नाही!
जणू विरून गेले! तुम्हाला जाणवते
'ते' वळण अजुनही न सरले
अन हेही कळून येते
अजुन देखिल तुम्ही म्हणु शकता?
"असे कधी घडत नसते!"

मुक्त कविताभयानकkathaa

प्रतिक्रिया

रातराणी's picture

5 Nov 2015 - 12:55 pm | रातराणी

डेंजर!