लॉटरी-२

सायकलस्वार's picture
सायकलस्वार in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 6:43 pm

लॉटरी

'तिकडे प्रिन्सेस बारच्या मागे एक लॉज आहे. तिथे तासावर रूम मिळते'
अमोल आणि प्रितेश दोघेही उडाले.
'भडव्या उगाच खेचतोयस का आमची'
'खेचत नाही. पुढचं ऐक' असे म्हणून समीरने पुढचा सर्व प्रसंग डिटेलवार सांगितला.

.
.
.
त्याने काहीही सांगायचे बाकी ठेवले नाही. ते दोघे मग तिथून बारकडे गेले. तिथे खरोखरच एक लॉज होता. समीरने पैसे भरले आणि काउंटरवरच्या माणसाने त्याच्या हातात किल्ली दिली. तिने सरळ रूमकडे चालायला सुरवात केली आणि समीर तिच्या मागून गेला. त्यानंतरची स्टोरी समीरने अगदी ग्राफिक डिटेल्समध्ये ऐकवली. चांगलीच तयारीची होती ती. तिने समीरला पाहिजे होतं ते सगळं केलं, इतकंच नाही तर पुढाकार घेतला. समीर तिथून बाहेर पडला तो हवेत तरंगतच.
'मग तिने तुझ्याकडे पैसे मागितले असणार'
'नाही रे एकही पैसा घेतला नाही'
'तो क्या तेरा खूबसुरत थोबडा देखके पिघल गयी थी वो? साले आयनेमे शकल देखी है क्या?'
'देखी है. रोज देखता हूं' समीर गर्वानेच म्हणाला. प्रितेश निरूत्तर झाला. समीर हॅण्डसम होता यात वादच नव्हता. उंचापुरा, वेल-बिल्ट. वर गोरा रंग. चॉकलेट हिरोचा चेहरा. सगळा किस्सा खराही असू शकत होता. पण प्रितेशचा अजून विश्वास बसत नव्हता.
'अरे असतात रे काहीकाही पोरी' अमोल त्याला म्हणाला.
'फिरभी... ये साला फेक रहा है. मै बोलता हूं तेरेको'
'साल्या तू सगळं बंडल मारत नाहीयेस ना'
समीरने इकडेतिकडे पाहिले. 'मला वाटलेलंच तुम्ही असं म्हणणार. तुला फोटो दाखवला तर काय म्हणशील?'
'तुझ्याकडे तिचा फोटो आहे?'
'मी तिचा एक चोरून स्नॅप घेतलाय. बघायचाय?'
उत्तराची वाट न बघता समीरने त्याचा मोबाईल काढला आणि एक फोटो उघडून त्यांच्यासमोर धरला. एक विशी-बाविशीतली मुलगी बेडवर बसून कपडे चढवत होती. अमोलचे डोळे विस्फारले. प्रितेशने तर त्याच्या हातातून मोबाईल खेचूनच घेतला आणि तो भारल्यासारखा बघत राहिला. समीरचा चेहरा विजयी वीरासारखा चमकत होता.
'मजा आहे रे साल्या तुझी!' अमोलला आपल्या आवाजातला हेवा लपवता आला नाही. त्याने प्रितेशकडे पाहिले. तो अजूनही टक लावून फोटोकडे बघत होता.
'नाव काय होतं तिचं?'
'अबे तेरेको नाम से मतलब है या आम से' प्रितेश फोनवरून नजर न उचलताच म्हणाला.
'सोनम नाव सांगितलं तिने. खरं की खोटं माहीत नाही.'
अमोलने प्रितेशकडे पाहिले. तो अगदी तल्लीन होऊन फोटो न्याहाळत होता.
'अबे लेकिन तू क्युं इतना घूरके देख रहा है? वो क्या फोनमेसे बाहर आनेवाली है?' अमोल म्हणाला आणि खो खो हसला.
अचानक प्रितेशचा चेहरा बदलला.
'हम्म...'
'यार लगता है इसे पहले कही देखा है'
'तेरी कोई चचेरी बहेन तो नही?' अमोल म्हणाला आणि तो आणि समीर दोघेही खिदळले.
'पण काय रे साल्या कशावरून हे खरं आहे? हा फोटो असाच कुठुनतरी उचलून आणला असशील'
'शप्पथ खरं सांगतोय. आता पुढचं ऐक'

कथा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 6:48 pm | टवाळ कार्टा

नींद में सें आंख कब खुली भाई तेरी =))

सायकलस्वार's picture

3 Nov 2015 - 6:54 pm | सायकलस्वार

कार्टा माझाच डायलॉग माझ्यावर मारतो ;)

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 7:16 pm | टवाळ कार्टा

इद्दर सब्बीच्च सलीम फेकूके फ्यान लोगां होना :)

दमामि's picture

3 Nov 2015 - 6:49 pm | दमामि

वाचतोय,
कथेमध्ये फोटो दिला असता तरी चालले असते.;)

पक्षी's picture

17 Mar 2016 - 1:33 pm | पक्षी

अगदी अगदी

हेमन्त वाघे's picture

18 Nov 2015 - 5:43 pm | हेमन्त वाघे

पुढचा भाग केंव्हा ?/

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 7:31 pm | भाऊंचे भाऊ

तिने समीरला पाहिजे होतं ते सगळं केलं, इतकंच नाही तर पुढाकार घेतला.

म्हणजे नक्कि काय हे समजायला इथे काय आम्ही स्वतःला समिरच्या जागी कल्पायच का ?

हेमन्त वाघे's picture

30 Jan 2016 - 10:46 pm | हेमन्त वाघे

पुढचा भाग केंव्हा ? पुढचा भाग केंव्हा ?पुढचा भाग केंव्हा ?पुढचा भाग केंव्हा ?

सायकलस्वार's picture

1 Feb 2016 - 7:45 am | सायकलस्वार

येणार येणार! तोपर्यंत हे वाचा.

शित्रेउमेश's picture

16 Mar 2016 - 9:29 am | शित्रेउमेश

पुढचा भाग केंव्हा??? लवकर येवु देत....