आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…
सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…
चला तर मग !
प्रतिक्रिया
3 Nov 2015 - 3:50 pm | इरसाल
स्टॉक लिमीटेड आहे.
3 Nov 2015 - 6:25 pm | _मनश्री_
प्रभाकर पेठकर
मार्गी
डॉ . सुबोध खरे
मोदक
सानिका स्वप्निल
गणपा
पैसा
3 Nov 2015 - 7:06 pm | प्रचेतस
ज्यांना भेटलोय ते बहुतेक सर्वच आयडी जवळचे झालेत.
न भेटलेल्या आयडींपैकी ज्यांना भेटायची खूप इच्छा आहे असे आयडी-
चिगो - अतिशय निगर्वी, ह्याच्याबरोबर मेघालयातील किस्से ऐकायची खूप इच्छा आहे.
आतिवास - विविध अनुभवांचं प्रचंड विश्व
एस - भेटून फोटोग्राफी, पर्यावरण, ट्रेकिंग अशा विविध गप्पा मारायच्यात फ़क्त. पण हे स्वत:बद्दल कायम मुग्धच असतात.
राही - ह्यांचही अनुभवविश्व प्रचंड समृद्ध. कोणत्याही विषयावरील माहितीचा कोष.
अवतार - प्रतिसाद अतिशय मोजके पण विलक्षण संतुलित आणि नेमके.
ह्या पाच जणांना भेटायची खूप इच्छा आहे.
3 Nov 2015 - 7:09 pm | अभ्या..
ह्यामध्ये पामर या आयडिला ऍड करावे असे वाटते. की तुझाच आयडी आहे.
3 Nov 2015 - 7:12 pm | प्रचेतस
माझा नै तो आयडी. अतिशय मोजकेच प्रतिसाद आहेत त्यांचे.
4 Nov 2015 - 12:08 am | एस
एक दिवस भेटू. भुलेश्वराला जाऊ कॅमेरे घेऊन. पण आत्तातरी नाही जमणार. :-)
तुम्ही व चौरांसोबत कॅमेराकट्टा, कंजूसरावांसोबत बोन्साय कार्यशाळा, सुधांशूनूलकर आणि भटक्या खेडवाला यांच्याबरोबर आंबोलीला मॅक्रो फोटोग्राफी, यशोताई व मार्गीसाहेबांबरोबर लद्दाख फेरी, चिगोंसोबत मेघालयातील लिव्हिंग रूट्स ब्रिज पाहणे, रामदास यांच्यासोबत दक्षिण मुंबईत पायी कट्टा करणे, स्नेहाताईंकडे कोल्हापूरला तांबडा-पांढरा रस्सा हाशहुश्श करत हाणणे, प्रीमोंबरोबर जुन्या गोव्यातील संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहत फिरणे, आदूबाळांबरोबर सवाईला जाणे, नगरीनिरंजनांबरोबर सुदर्शन रंगमंचाला प्रायोगिक नाट्यचळवळीबद्दल चर्चा करणे, विक्षिप्त अदिती आणि परा यांच्यासोबत बसणे, झालंच तर पैतायला अर्धा कप चहा नक्की पाजतो असं तोंडभरून आश्वासन देऊन तिच्या बागेतले काजू पिशवीत टाकून घेऊन येणे वगैरे वगैरे बरीच मोठी बकेट लिस्ट आहे...;-)
4 Nov 2015 - 6:48 am | प्रचेतस
अगदी नक्कीच. :)
4 Nov 2015 - 7:11 am | प्रीत-मोहर
एस इन्शागणपती नक्की फिरवु गोवा. ते करताना तुमच्या क्यामेराला प्रत्यक्श काम करताना पाहता येईल. ही एक खुप दिवसांची इच्छा अाहे.(क्यामेरा घेतल्यापासुन)
4 Nov 2015 - 12:07 pm | अभ्या..
बॅट्या तुझे इन्शा गणपती लैच फेमस झालेय रे नेटवर.
4 Nov 2015 - 11:42 am | यशोधरा
Im in for Laddakh pheri anytime!! Ambolimadhe pan mi yenaar!! Aamachya kokanaat yenaar tumhi mag mi nako asa kasa
4 Nov 2015 - 1:59 pm | पैसा
काजू आपलेच आसात! येताना तेवढा अर्धा कोप च्या पार्सल करून आणा म्हणजे झाले. नुसते आश्वासन नको. पुण्यातला च्या म्हणून म्युझियमात ठेवीन तो.
4 Nov 2015 - 4:06 pm | एस
ख्यिक!
अलबत! अलबत! इन्शापुणे!
4 Nov 2015 - 4:13 pm | सूड
नाजाल्यार काजूंच घेवन येवा!! केळकर मुजियमांत ठेवतंव आमी गोंयचे म्हणान!! =))
3 Nov 2015 - 7:44 pm | तर्री
येथे जे आवडणारे आ.डी आले आहेत त्या सगळ्यांशी सहमत. शिवाय यांचे ही स्मरण - क्रिकेटर जे पी मोर्गन , आयायटी वाले युयुत्सु ,तुम्हाला कोण क्ष्क्ष वाल्या शुचीतै , व्यासंगी राजघराण , गंगाधर म्हाम्ब्रे मुटे , सुधीर काळे काश्मिरकर इत्यादी !
ओम शांती !
3 Nov 2015 - 11:29 pm | मी-सौरभ
हे आय डी मला त्यांच्या नावातल्या नविन पणा साठी आवडले. आपण कसा साधा सुधा आय डी घेतलाय असं पण वाटून जाते
१. तिराशिंगराव माणूसघाणे
२. बोका ए आझम
३ मा पं
४. प रा
५ टारज़न
६ गगनविहारी
७ चतुरंग
अजुन खुप आहेत.
4 Nov 2015 - 9:45 am | समीरसूर
माझ्या आवडीचे आयडी बरेच आहेत. आत्ता लगेच आठवणारे देतो...
गवि - मुद्देसूद आणि मनोरंजक तरीही माहितीपूर्ण लेखन
स्नेहांकिता - गोष्ट रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी
माधुरी विनायक - ठाम, प्रामाणिक, साधे तरीही हृदयाला भिडणारे सशक्त लेखन
पैसा - स्पष्ट आणि तरीही कुणाला न दुखावणारे लेखन
अतिवास - कृती अजोड, लेखन अजोड
चिगो - अनुभवसंपन्न कसदार लेखन
सोन्याबापू - चित्र उभे करणारे दृश्यलेखन
जव्हेरगंज - दमदार कथा. (शुद्धलेखन जरा तपासून पाहिले आणि बाज बदलत ठेवला तर वाचनानंद द्विगुणित होईल हे नक्की)
इस्पिकचा एक्का - प्रवासवर्णन उच्च दर्जाचे
श्रीरंग जोशी - संदर्भनवाज. अतिशय मनमोकळे लेखन. इतरांना सतत प्रोत्साहन देत राहण्याची कला. यांना देखील भेटलेलो आहे. फंटासटिक व्यक्तिमत्व!
मुवि - दिल को जीत लेनेवाला लिखते हैं...
माईसाहेब - यांचे प्रतिसाद खरोखर वाचनीय असतात. टायमिंग अचूक आणि चिमटा काढणे करावे ते याच आयडीने. पण तरीही मार्मिक भाष्य अगदी मोजक्या शब्दात करून जातात.
धमाल मुलगा - यांना भेटलेलो आहे. जबरदस्त माणूस.
परा - क्या लिखता ही ये बंदा. पता नही फिलहाल कहां हैं...आ जाओ भाई, फिर से छा जाओ...
अजून बरेच आहेत. खरं म्हणजे सगळेच मिपाकर एकमेवाद्वितीय आहेत. आणि मला सगळेच आवडतात. वाद झाले असतील कधी-मधी पण ते माझ्याकडून तेवढ्यापुरतेच होते. इतकी टाळकी एकत्र आल्यावर वाद होणारच; पण मनात कुणाच्या काही नसावे असे वाटते. मिपा रॉक्स!
अजून बरेच जण राहून गेले असतील. त्यांची सगळ्यांची माफी मागतो.
8 Nov 2015 - 5:13 pm | भंकस बाबा
मी मिपावर नविनच आहे,तरिही आवडणार्या आईडी बद्दल बोलायचा मोह टाळू शकत नाही. श्रीरंग जोशी व् गैरी ट्रूमैन . हे दोघेही मुद्देसुद लिहिण्यात बाप माणूस आहेत. उद्या कधी यांनी खोटी माहिती जरी मुद्दे मांडून टाकली तरी मला ती खरी वाटेल
8 Nov 2015 - 8:07 pm | विवेक ठाकूर
अत्यंत आवडता आयडी! कुणाला आणि केंव्हाही बिन्धास्त मदत करण्याची तयारी (मागे एका सदस्येच्या वडिलांचे ८५,००० रुपये ऑन लाईन खरेदीत गेले होते तेंव्हा संक्षींनी ओपन चायलेंज देऊन पैसे परत मिळवून देईन असं सांगितलं होतं). संक्षींच्या लेखनातून जगण्याची नवी दिशा मिळायची. हा माणूस अत्यंत स्वच्छंद जगत असणार. वादविवादात तर त्यांच्या इतका मुद्देसूद माणूस दुर्मिळ. साहित्य आणि काव्य यावर सुद्धा संक्षींची सुरेख कमांड होती. अत्यंत वाचनीय लिहीणारा लेखक म्हणून संक्षींची कायम आठवण येते.
5 Dec 2015 - 11:07 pm | पिलीयन रायडर
णमस्कार सर!
हे तुमचं आत्मचरित्र का?
5 Dec 2015 - 11:16 pm | स्रुजा
ठ्ठो !!! किती ती भक्ती..
6 Dec 2015 - 4:24 pm | बॅटमॅन
संक्षी, नमस्कार हो. ते ३१ जुलैची भ्रामक कामे संपली की काय? =))
6 Dec 2015 - 11:35 pm | प्रसाद गोडबोले
नमस्कार संक्षी सर ,
नवीन आय डी approve झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन :)
9 Nov 2015 - 10:48 am | गणामास्तर
अजून कुणीच डॉ.श्रीराम दिवटेंची आठवण कशी काय नाही काढली ब्वॉ ?
आम्हाला तर फार आवडायचा तो आयडी ;)
9 Nov 2015 - 6:49 pm | प्रसाद गोडबोले
मला संजय क्षीरसागर आणि निराकार गाढव हे दोन आयडी फार्फार आवडायचे !
आयडी डीलीट केल्यावर किमान त्यांचे लेखन तरी वाचमात्र अवस्थेत ठेवावे अशी काहीतरी सोय असली पाहिजे राव !
9 Nov 2015 - 6:51 pm | मोदक
http://www.misalpav.com/user/18002/Authored
9 Nov 2015 - 6:54 pm | प्रसाद गोडबोले
अरे वा !!
लेखन अजुन उपलब्ध आहे की ! मागे एकदा शोधले होते तर सापडलेच नव्हते ... चला आता जरा हेवनमध्ये चक्कर टाकुन येतो !
निराकार गाढवाच्या लेखनाची लिन्क शोधतो अता :)
10 Nov 2015 - 5:50 pm | विवेक ठाकूर
स्त्री आयडी घेऊन इथे वावरणार्या पुरुष आयडी विरुद्ध, संक्षीनी जबरदस्त आवाज उठवला होता. शेवटी त्या आयडीला पुरुष आयडी घ्यावा लागला. एकदा मुद्दा योग्य आहे म्हटल्यावर त्यांनी कसलीच पर्वा केली नाही.
5 Dec 2015 - 11:18 pm | स्रुजा
होय हो ! त्या सखाराम गटणे सारखे तुमचे २ आदर्श दिसतायेत, ग्रेस आणि संक्षी. पुन्हा आवाज उठवा बघु . मुद्दा अजुन ही योग्य च आहे. अतिशय अर्थपूर्ण भावांजली होईल तुमच्या आदर्श आयडी ला .
10 Nov 2015 - 1:14 pm | सागरकदम
मला सध्या तरी कोणताच आयडी आवडत नाहे
पण इथे बरेच आहे जे माझ्याशी भांडतात व नंतर मी आवडू लागतो
10 Nov 2015 - 1:27 pm | टवाळ कार्टा
10 Nov 2015 - 11:55 pm | आदूबाळ
इ तो कहीं सुना सुनाय लागत बा. उस पातेले की गूंज!
23 Nov 2015 - 3:23 pm | सूड
पातेल्याची फक्त खडबड किंवा खडखडाट असतो, गुंज कसली !! =))
11 Nov 2015 - 12:18 am | सागरकदम
काय माहित नाहे बा
असेल आमचा भक्त
11 Nov 2015 - 10:51 am | टवाळ कार्टा
म्हाग्रुंनंतर तूच्च
11 Nov 2015 - 10:58 am | सागरकदम
मी तांच्या आधी
12 Nov 2015 - 9:29 pm | जव्हेरगंज
३००
12 Nov 2015 - 10:37 pm | सागरकदम
@जव्हेरगंज
23 Nov 2015 - 2:35 pm | दशानन
मी जरा नवीनच आहे संभाळून घ्या मित्रो हो ;)
23 Nov 2015 - 2:42 pm | पैसा
मिपावर स्वागत! =))
23 Nov 2015 - 3:20 pm | दशानन
असे कसे हो तुम्ही मिपाकर :P
23 Nov 2015 - 3:28 pm | पैसा
फ्लेक्ष लावू का वडाप बोलावू, रीतीप्रमाणे! =))
23 Nov 2015 - 3:15 pm | एस
हे जे कोणी मित्रो हो असतील त्यांनी ह्या माजी संना संभाळून घेणे रे.
23 Nov 2015 - 2:41 pm | खटासि खट
राकु उर्फ तुंबलेले खोत.
6 Dec 2015 - 4:01 am | जेनी...
धाग्याला माझ्याकुन एक पूस्प्गुच ....
6 Dec 2015 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
वड्डकम् बॅक जेनीबै ! बर्याच दिवसांनी दिसलात :)
6 Dec 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा
बालिके..तुला कोणता आय.डी. आवडतो?