गुरूपालट दिनांक २१ नोव्हेंबर २००७

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
20 Nov 2007 - 2:28 pm

लोकहो,

कार्तिक शुध्द एकादशी रोजी म्हणजेच बुधवार दिनांक २१ नोव्हेंबर २००७ रोजी, उत्तररात्री २९ वाजून ०३ मिनीटांनी म्हणजेच गुरूवारी पहाटे ०५ वाजून ०३ मिनीटांनी गुरू वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करतो आहे.

ह्या गुरूभ्रमणाचा पुण्यकाल गुरूवारी पहाटे ०३-१२ पासून ते सकाळी ०६-५४ पर्यंत आहे.

ज्या लोकांची धनु रास आहे, त्यांच्या राशीत गुरू येत आहे. म्हणजेच त्यांच्या जन्मस्थ चंद्रावरून गोचर गुरूचे भ्रमण होणार आहे. शुभ आणि बलवान चंद्र असलेल्या धनुराशीच्या लोकांना जीवनात येत्या वर्षभरात अत्यंत शुभ अनुभव येतील.

कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे. त्यांच्यासाठी हे भ्रमण शुभ नाही.

धनु, तुला, कर्क आणि मीन राशींना हा गुरू अनुक्रमे १-३-६-१० वा येत आहे. त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादी गोष्ट करावी म्हणजे पीडेचा परिहार होईल.

सध्या कर्क, सिंह आणि कन्या ह्या तीन राशींना शनीची साडेसाती सुरू आहे. त्यापैकी कर्केला आता गुरू सहावा होईल. म्हणजेच गेल्या वर्षभरात कर्क व्यक्तिंना साडेसाडीच्या काळात जो गुरूचा आधार आणि दिलासा होता, तो साडेसातीच्या ह्यापुढील टप्प्यात असणार नाही. सावध रहा.

सिंहेला गुरू पाचवा येतोय. या लोकांना साडेसातीचा पुढील वर्षभराचा काळ सुसह्य होईल. गुरूची नवमदृष्टी तुमच्या राशीवर पडते आहे. शुभघटना घडतील. शारीरिक व्याधी ज्यांचा गेल्या १५ जुलैपासून त्रास सुरू होता तो त्रास कमी होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. विवाहेच्छूक व्यक्तिंचे विवाह ठरतील. संततीसंबंधी शुभघटना अनुभवाल. व्यापार, व्यवसाय, नोकरीत बढती यासंबंधी जी कामे अडकून पडली होती त्यात अनुकूल बदल होतील.

कन्येला साडेसातीचे चटके नुकतेच बसायला लागले आहेत. अजून त्याची तीव्रता अनुभवायला मिळालेली नाही. ती आता अनुभवायला येईल. बर्‍याच गोष्टीत आयत्यावेळेस "खो" बसेल. तुम्ही ज्यांना "आपले" समजता ते खरोखरच "तुमचे" आहेत का नाहीत ते आत्ता कळेल. आप्तेष्ठांकडून विश्वासघात होईल. कुटुंबात कलह होतील आणि त्यात ज्यांना तुम्ही तुमचे "खास" नातेवाईक समजता, असे लोक तुमच्या विरोधकांना अनुकूल अशी भूमिका घेतील. त्याचा मनस्ताप तुम्हाला होईल.

गुरूची पीडा कमी होण्यासाठी वर उल्लेख केलेल्या पुण्यकालात आणि पुढे गुरू धनेत असेपर्यंत जप, दान, पूजा यापैकी किमान एखादे तरी कृत्य करावे. गुरूच्या पौराणिक मंत्राचा जप करावा.

जपमंत्र - देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम्। बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥

॥ शुभं भवतु ॥

आपला,
(दशग्रंथी) धोंडोपंत

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

माझी दुनिया's picture

20 Nov 2007 - 2:53 pm | माझी दुनिया

कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे. त्यांच्यासाठी हे भ्रमण शुभ नाही.

म्हणजे नेमके काय होईल ते सांगा हो, पंत

धोंडोपंत's picture

20 Nov 2007 - 8:45 pm | धोंडोपंत

श्रेया ताई,

४-८-१२ वा गुरू त्या स्थानाने दर्शवलेल्या कारकत्वात न्यूनता आणतो. त्यामुळे तो शुभ नाही. जसा अकरावा गुरू हा प्रचंड लाभ देतो तसा बारावा गुरू प्रमाणाबाहेर अनावश्यक खर्च माथी मारतो. चौथा गुरू घरदार आणि मातेच्या संबंधी अशुभ फले देतो तर आठवा गुरू मृत्यूसम पीडा देतो.

याचा अर्थ प्रत्येकाला सारखी फळे मिळतील असा होत नाही. वैयक्तिक कुंडलीत लग्नराशीनुसार त्यात बदल होणारच. पण ढोबळपणे ४-८-१२ व्या गुरूची फळे ही अशुभच मिळतील.

आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

माझी दुनिया's picture

21 Nov 2007 - 12:36 pm | माझी दुनिया

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पंत. काही शंका आहेत त्या विरोपाद्वारे आपल्या व्यक्तिगत पत्त्यावर विचारल्या आहेत. त्यांचे निराकरण झाल्यास आनंद वाटेल. तसेच आपल्या जीमेल आयडीवर मी जीटॉक द्वारे आमंत्रण पाठवले आहे. कृपया त्याचा स्वीकार व्हावा; जेणेकरून समक्ष चर्चा करता येईल.

ऋषिकेश's picture

22 Nov 2007 - 1:32 am | ऋषिकेश

>> आठवा गुरू मृत्यूसम पीडा देतो
बापरे.. वाचून उगाच भिती वाटाली.. असो बघुया काय होतय ते :)

धोंडोपंत गुरुजी,

कुंभ राशीवाल्यांनी काय घोडे मारले आहे हो?
जरा आम्हाला पण सांगा की हे गुरुभ्रमण आम्हाला कसे जाणार आहे?

एका दिवाळी अंकात वाचले होते की कुंभ राशीला हे भ्रमण शुभ असेन

मी पण माझी दुनिया यांच्याशी सहमत आहे.
शुभ असो वा अशुभ म्हणजे नेमके काय होणार हे जरा सविस्तर पणे दिले तर लई उपकार होतील

त्याचे असे आहे की आपण ह्या ग्रहगोलांच्या हातातले बाहुले... तुमच्यासारख्या दशग्रंथी अधिकारी पुरुषाने भविष्य सांगितले तर आम्हा पामरांना दगडास ठेच लागण्याआधी दगड पाहता येईल आणि लक्ष्मी समोर येत असेल तर तिच्या स्वागताची तयारी करता येईल एवढेच

धोंडोपंतराव, म्या तर तुमचा मोठा फॅन आहे. मागे माझ्या एका अडचणीत तुमचा बहुमोल सल्ला बराच कामास आला होता.
असो...

माझ्या कुंभ राशीसकट सर्वच राशींवर कृपा करावी आणि सर्वांचे सविस्तर भविष्य द्यावे ही नम्र विनंती
(गुरुभ्रमणाचा फायदा घेण्यास उत्सुक असलेला) सागर

धोंडोपंत's picture

20 Nov 2007 - 8:47 pm | धोंडोपंत

सागरराव,

कुंभेला फळे चांगलीच आहेत. पुढील अकरा महीने गुरूबळ चांगले आहे.

आपला,
(अकरावा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

पंत

एकदम दिलखुश बातमी दिलीत तुम्ही....
मन एकदम तणावमुक्त झाले....
आता येते ११ महिने गुरुबळामुळे आमचे आयुष्य आनंदाने भरुन जाऊ दे ही ईश्वराकडे प्रार्थना

धन्यवाद
(गुरुबळामुळे आनंदीत झालेला) सागर

यशोदेचा घनश्याम's picture

20 Nov 2007 - 3:46 pm | यशोदेचा घनश्याम

भविष्य बघताना, महादशा - अंतर्दशाचे परीणाम सांगताना, लग्नकुंडली पाहतात.
मग ह्या गोचरीच्या ग्रहांचे भ्रमण, जन्मराशीवरुन, आपल्यावर काय परीणाम करेल हे पाहणे योग्य की, लग्नराशीप्रमाणे?

आता माझी चंद्ररास मिथुन, लग्नरास व्रुश्चिक.
लग्नकुंड्लीप्रमाणे मला गुरु धनुत म्हणजे, २ रा - धनस्थानी येतो आहे.
चंद्रराशीप्रमाणे तो ७ वा येतो आहे.

परीणाम कशावरुन पहायचा?

(मला बर्याच महिन्यांपासून हा प्रश्न सतावत आहे) - यशोदेचा घनश्याम

धोंडोपंत's picture

20 Nov 2007 - 8:51 pm | धोंडोपंत

चांगला प्रश्न आहे. गोचर भ्रमणाचे फलादेश हे मुख्यत्वे ढोबळ स्वरूपाचे असतात. अकरावा गुरू म्हणजे सोन्याची खाण हे एक समीकरण आहे. प्रत्येक माणसाचे लग्न भिन्न असल्याने प्रत्येकाला सोन्याच्या खाणीतून सारखेच सोने मिळेल असे नाही.

गोचरभ्रमणाचे राशीवरून फलादेश हे जगातील एक बारांश लोकांसाठी सांगितलेले भविष्य आहे. त्यामुळे लग्नावरून फलादेश पाहणे हे जास्त सूक्ष्म आहे.

आपला,
(तौलनिक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

यशोदेचा घनश्याम's picture

21 Nov 2007 - 12:58 pm | यशोदेचा घनश्याम

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

आपल्या अनुदिनीला (http://dhondopant.blogspot.com) माझी सतत भेट असते, नवीन लेख वाचण्यासाठी.
मला माझ्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या कुंड्ल्या जमा करुन त्यांचा अभ्यास करण्याचा छंदच आहे.
तुमचे लेख खूप आवडतात.

(काही शंका विरोपाने विचारेन म्हणतो ! ) यशोदेचा घनश्याम .

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 3:53 pm | विसोबा खेचर

खूप चांगली माहिती दिलीस रे बाबा! असाच अधनंमधनं येत रहा आणि मिसळपाववर लिहीत रहा हीच तुला विनंती....

तुझा या शास्त्राचा अतिशय दांडगा अभ्यास आहे हे निर्विवाद!

असो, सध्या आम्हा मिथुनवाल्यांचं बरं चाललं आहे, ते तसंच बरं राहील ना तेवढं जरा बघ म्हणजे झालं! :)

गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :))

तुझा,
तात्या.

गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :))

तात्या ,

यावर आपले धोंडोपंत गुरुजी तरी काय करतील?
तुम्ही योग दिक्षा घ्यावी हे बरे... एखादा गुरु शोधा म्हणजे तुमची इच्छा पुरी होईल.

पण मला वैयक्तिक विचाराल तर तुम्ही का बरे तुमचे गुण सोडून भलते सलते बोलत आहात?
अचानक विरक्ती घेऊ नका तात्या... आणि तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टींची लालसा असणे हा तर मनुष्यस्वभाव आहे
त्यातून ब्रह्मर्षि विश्वामित्रही सुटले नाहीत. तर आपली काय कथा?
आम्ही तुमच्या ज्या गुणांवर फिदा आहोत त्यांना सोडू नका हो...

तुमच्या चाहत्यांवर दया करा...

(तात्याभक्त) सागर

गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :))
त्यातल्या त्यात गोडधोडाची/अतिखाद्यपानाची लालसा आरोग्याला अधिक अहितकारक. कारण स्वस्ताईमुळे जेवढी हाव तेवढी खादाडी करता येते - तिथे आत्मनियंत्रण जरुरीचे आहे.
बाकी लालसा असली म्हणून मिळेलच असे सांगता येत नाही. आत्मनियंत्रणाशिवायही बहुतेक लोकांना अतिरेक करता येत नाही ;-)

धोंडोपंत's picture

20 Nov 2007 - 8:56 pm | धोंडोपंत

तात्या,

गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :))

तुला हे म्हातारपणाचे डोहाळे का बरें लागले?

अरे, आत्ता कुठे मिथुनेची साडेसाती संपली आहे.

आत्ता मजा करायचे तुझे दिवस आणि लालसा कमी करायच्या गोष्टी करतोस?????

झकासपैकी दोन तीन पेग रिचव आणि एखादा मालकंस हाण पाहू

आपला,
(नशामग्न) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2007 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत,
आनंद वाटला, गुरूपालटाच्या निमित्ताने आपण येथे लेखन केले.
मीन राशींना हा गुरू अनुक्रमे १-३-६-१० वा येत आहे. त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादी गोष्ट करावी म्हणजे पीडेचा परिहार होईल.
पंत, केली ना आमची अडचण. जप, दान,पूजा यापैकी आम्ही कोणते निवडावे यावर आमच्या मनात द्विधा अवस्था आहे.  यातले सोपे पूजा वाटते.  स्नान झाल्यावर गणपतीला मनोभावे फूले वाहिली तर चालतील ना !  का काही श्लोक-अष्टकाचे पठण करावे लागेल, आणि कोणते स्त्रोत्र वाचू .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत's picture

23 Nov 2007 - 10:51 am | धोंडोपंत

प्राध्यापक साहेब,

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति !!

आपल्याला जे दैवत भावेल त्याची मनोभावे आराधना करावी हे सर्वात उत्तम. आपण म्हणता त्याप्रमाणे अवडंबर न माजवता केलेली उपासनाच फलदायी होते.

आमचे महाराज सांगतात, " दिवसभर पुजारी म्हणून देवासमोर उभे राहण्यापेक्षा एक क्षण भक्त म्हणून उभे रहा"........ क्या बात कही है !!

ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात हेच सांगितले आहे, नाही का?

देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी |
तेणे मुक्तिचारी | साधियेल्या ||

आपला,
(संतचरणरज) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

विसोबा खेचर's picture

23 Nov 2007 - 11:29 am | विसोबा खेचर

देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी |
तेणे मुक्तिचारी | साधियेल्या ||

अहो पण धोंडोपंत, ज्ञानेश्वरांचाच डंका पिटणारे काही जण देवाच्या ऐवजी भलत्याच्याच दारी (संकेतस्थळी!) पोष्टमन बनून जातात त्याचं काय? :)

आपला,
(ढोंगी!) तात्या.

धोंडोपंत's picture

23 Nov 2007 - 12:46 pm | धोंडोपंत

तात्या,

हे बाकी खरे हो ! आपला पोष्ट्या कुठे आणि कसा कडमडेल याचा काही भरवसां नाही.

आपला,
(सहमत) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

गारंबीचा बापू's picture

23 Nov 2007 - 1:15 pm | गारंबीचा बापू

अहो पंत,

तुम्ही अमेरिकेतल्या पोष्ट्याबद्दल बोलत आहात काय? "डाकिया डाक लाया"..... म्हणणारा?

तसे असल्यास त्याला पोष्ट्या गजानन म्हणतात.

महा उपद्व्यापी माणूस हा . आमचा अण्णा खोत परवडला पण हा पोष्ट्या गजानन नको.

बापू

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2007 - 3:43 pm | प्रकाश घाटपांडे

अहो आम्ही डिजीटल लायब्ररी अँण्ड इन्फोर्मेशन सायन्स तसेच
मिडीया लायब्ररी या विषयावर चांगले संगणक विद्या शिकवणारे गुरु शोधत आहोत पण पुण्यात ते भेटतच नाहीत. अनेक क्लास पालथे घातले. सगळे मॉड्युलर विद्या शिकवतात. त्येला बी लई पैशे लागत्यात. ल्वॉक म्हन्त्यात सोताच सोता शिका. पन सोताच सोता शिकण म्हणजे ट्रायल ऍण्ड एरर . इथे पुन्यात म्यानेजमेंट गुरु भेटत्यात पन कुनी खरा खरा ज्ञान देनारा गुरु भेटन का?
(लग्नी कुंभेचा गुरु, चतुर्थात वृषभेचा चंद्र अन नवमात तुळेचे शुक्र नेपच्चून युती निरयन कुंडलीत असलेला)
आम्हाला http://mr.upakram.org/tracker/582 इथे भेटा
प्रकाश घाटपांडे

मनिष's picture

21 Nov 2007 - 4:36 pm | मनिष

मुंबईचा गुरू चालेल का? ती तुम्हाला ऑनलाईन शिकवू शकेल.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2007 - 6:14 pm | प्रकाश घाटपांडे

म्हजी ई कोर्स वानी का? कि लई भानगड अस्तीया. जरा समजून सांगा. मानवी टच नस्तो पन त्येला. क्लास मदी कंपल्शन र्‍हातय. ई मोड मधे स्वयंशिस्त लागतीया. व्हर्च्युअल क्लासरुम च्या डीव्हीड्या आल्यात म्हने मंबईला? पेबलच्या ट्युटर सीडी हायेत पुन्यात. पन आम्हाला लागनार्‍या ईषय न्हाई ना. http://cec-ugc.org/ हित आम्ही केल्ता ई लायब्ररी वर चा . दर आठवड्यात ३ लेक्चर व्यास चॅनेलवर आन मंगळवारी इंटरॅक्टीव्ह सेशन ईएम आर सी मधे तो व्यास चॅनेल कधी दिसलाच नाही आम्हाला. टाटा स्काय वर बी नाई अन केबलवाल्याकड बी न्हाई.
प्रकाश घाटपांडे

मनिष's picture

21 Nov 2007 - 8:32 pm | मनिष

ती मुंबईला असते, म्हणून म्हटले. तुम्ही तिला शंका विचारू शकता मेलनी.

संदिप रमेश धुरी's picture

24 Nov 2007 - 10:58 pm | संदिप रमेश धुरी

नमस्कार धोंडोपंत,
मी मिसळ पाव वर प्रथमच येत आहे. मला तुमचा लेख आवडला.
ह्यात तुम्ही गुरुचे भ्रमण सांगितले आहे. तसेच सर्व राशिंवर होणारा परिणामही सांगितला आहे.
माझी रास व्रुश्चिक आहे आणि ह्या राशिवर होणार्‍या परिणामाबद्दल काहीही भाष्य नाही.
तरी मी विनंतीपुर्वक भाष्य करण्याची विनंती करीत आहे.

क्रुपाभिलाषी.....