असेच दिवस जात होते. माझी नोकरी छान चालू होती. मध्ये वरची पोस्टमिळणार होती पण मी नाही घेतली. अहो आता काय सांगू तुम्हाला? फिरतीवर जाव लागल असत मला. म्हणजे त्या बंगल्यापासून लांब. म्हणून मग नाही घेतली बढती. हिला बोललो नाही मात्र.
मुल मोठी झाली होती माझी. कस ते कळलच नाही. तशी माझी बायको व्यवहारी आणि हुशार. तिनेच वाढवलं मुलांना. मी आपला नावाला. कमावून आणायचं ते तिच्या हातात ठेवायचं आणि घरात रहायचं.... बस! एवढाच केल मी कायम. पण मला यात काही वावग वाटलच नाही.कारण तसा मी अबोल आणि एकटाच रहायला आवडणारा मनुष्य आहे न. गम्मत म्हणजे माझ्या लेकीच लग्न ठरल. ते सगळ ठरल्यावर मला माझ्या बायकोने सांगितल. अगदी आमंत्रण पर्त्रीका पण तयार झाल्या होत्या. आणि मला पत्ताच नव्हता. पण त्यात माझी काही तक्रारच नव्हती. मात्र माझ्या मनात एक कल्पना आली; मी आमंत्रण देण्याच्या निमित्ताने बंगल्याकडे वळलो.
चला या निमित्ताने इतकी वर्षे समोर असूनही कधी ओळख न झालेल्या त्या बंगल्याची आणि बंगल्याच्या मालकिणीची ओळख होईल अस वाटल होत. पण नेमक्या मालकिणबाई काही दिवसांसाठी बाहेर गावी गेल्या होत्या असे नोकराने गेटजवळच सांगितले. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच तो माझ्याशी बोलला. पण तेही फक्त माहिती देण्यापुरताच. एकुलता एक चान्स देखील संपला तो बंगला जवळून.... आतून पहाण्याचा. खूप वाईट वाटल मला.
लेकिच लग्न झाल आणि पुढे यथावकाश मुलाचही. मुलगा लग्ना नंतर गावात घर घेऊन राहायला गेला. हिला बोलावून घेतल. मी मात्र तिकड़च जीवन, तो कोलाहल ते आयुष्य आवडत नाही या सबबिवर इथेच राहिलो.
आता मी रिटायर झालो होतो. संपूर्ण दिवस माझाच होता. आता तर बायकोही नव्हती अडवायला. त्यामुळे रोज तो बंगला आणि त्याची काड़ी इतकाहि बदल न झालेली मालकिण यांच् निरिक्षण करायचा नादच लागला होता मला. माझा मुक्कमपोस्ट आमच्या घराची गॅलरी हाच झाला होता. वाया परत्वे मी टेकडीकडे जाणे मात्र सोडून दिले होते. कारण तिथून आल की हमखास मला ताप यायचा. तिथला वारा मला सोसत नव्हता. बर; तब्बेत बिघडली की हिला याव लागायचं. मग तिच्या तोंडाचा पट्टा सुरु व्हायचा. ते नकोस वाटायचं.
पण गेले २ दिवस मला मालकीणबाई कुठल्याच खिडकीत दिसल्या नाहीत. खूप आश्चर्य वाटलं. बंगल्याच्या जवळपास फिरून बघितल; पण काही पत्ता लागेना. मग विचार केला टेकडीवरून निरीक्षण कराव. काहीतरी समजेल. म्हणून मग गेलो टेकडीवर. पण कसलं काय! काही दिसलच नाही. उलट नेहेमीसारख वार सुटल आणि मला हाका एकू आल्या. पण गम्मत म्हणजे मला माझच नाव कोणीतरी घेत आहे अस वाटल. खूप हसू आल. मज्जा वाटली. कितीतारी वेळ मी अंदाज घेत होतो. पण स्पष्ट काही कळेना. मग मात्र उतरलो टेकडी आणि घरी आलो माझ्या. रात्री थोड़ बर वाटत नव्हतं मला आणि त्यात थंडीचे दिवस. सर्दी-खोकला. मग थोड़ा ताप आला.
त्यादिवशी अंगात चांगलीच कणकण होती म्हणून मी संध्याकाळ झाली तरी दिवे न लावता बेड रूम मधे झोपलो होतो. पण खालुन कोणीतरी हाक मारतं आहे असा भास झाला. नीट कान देऊन एकल.. कोणीतरी माझ नाव घेऊन 'चला.... या...' अस काहिस म्हणत होत. आश्चर्य म्हणजे टेकडीवर जशी हाक मी एकली होती तशीच हाक होती ती. म्हणून मग मी उठून गॅलरीतुन खाली बघितल तर समोरच्या बंगल्यातला नोकर! मला खूप आश्चर्य वाटल. ज्याच्याशी गेले अनेक वर्षे मी बोलायचा प्रयत्न करतो आहे, ज्याला मी रोज बघतो आहे तो आज चक्क मला हाक मारतो आहे.... आणि तेही माझ्या घराकडे येऊन? मी त्याला खुणेनेच काय म्हणून विचारल. आवाज बसला होता माझा. त्याने बंगल्याकडे बोट दाखवत ' चला.. आता तुम्ही.' अस काहिस म्हंटल्यासारख वाटल.
मनुष्य स्वभाव कसा असतो बघा. इतकं बर नसुनही बंगला बघायला मिळणार या आनंदात मी चपलाही न घालता उतरलो आणि तड़क बंगल्याकडे येऊन गेट उघडून आत शिरलो..........
........."अहो सकाळी आमचे 'हे' दुधाला जात होते तेव्हा त्यांना दिसल. काय झाल... कस झाल... कुणास ठाऊक? तुम्ही गेलात मुलाकडे राहायला आणि कधीही बघाव तेव्हा तुमचे 'हे' सारखे आपले गॅलरीत बसलेले असायचे. काल थोड़ बर नव्हतं अस ते ह्यांच्याजवळ बोलले होते संध्याकाळी. पण मग सकाळी यांच सहज लक्ष गेल तर तुमचे हे त्या पछाद्लेल्या बंगल्याच्या तुटक्या पोर्चच्या वरच्या भागातून अर्धवट वाकलेले दिसले. अगोदर ह्याना वाटल की कोणीतरी तिथे उभ आहे. म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल. उगाच कशाला! नाही का? पछाडलेला बंगला आहे म्हणतात तर आपण कशाला पडा. पण मग त्याना ओळखीच माणूस वाटल म्हणून त्यांनी हाक मारली...तर उत्तर नाही. मग मात्र काहीतरी गड़बड़ आहे हे लक्षात येऊन ताबड़तोप पोलिसात कळवल. एम्बुलेंस बोलावली. पोलिस आले तोपर्यंत आम्ही तुम्हाला कळवल.... तुमच्या मुलाचा नंबर मी घेतला होता म्हणून बर झाल.... पण तुम्ही यायच्या अगोदरच डॉक्टरांनी सांगितल ते गेले. खूप वाईट झाल हो. पण त्या पडक्या बंगल्याकडे का बघत बसायचे हो? आम्हाला कायम नवल वाटायच. पण तसे अगदीच अबोल होते. त्यामुळे ह्यांनी कधी विचारल नाही. कधी तुम्हाला तरी बोलले का?"
"नाही हो वाहिनी. आयुष्यभर संसार करूनही ते कधीही त्यात रमलेच नाहीत. हळुहळु आम्हाला पण त्यांच्या अलिप्तपणाची सवय झाली. जाऊ दे. आता गेलेल्या माणसाबद्दल काय बोलायच!"
...........बंगल्यात तर आलो पण मालकिण बाई नाही दिसल्या. तो नोकर सांगून गेला फ्लॅट सोडून मी या बंगल्यात शिफ्ट झालो तरी चालेल. उत्साहाने मी या पोर्चच्या गॅलरीतुन घराकडे बघितल तर ही दिसली.. कमाल आहे. मी न बोलावता ही कशी आली? बर... कधीची हाक मारतो आहे तर बघतही नाही. जाऊ दे झाल. मला इथे यायच होत... आलो... बस.......
-------------------------------------------------------
प्रतिक्रिया
5 Oct 2015 - 7:59 am | कविता१९७८
मस्त
5 Oct 2015 - 11:07 am | पद्मावति
मस्तं कथा. आवडली.
5 Oct 2015 - 12:29 pm | पदम
छान लेखन.
5 Oct 2015 - 1:11 pm | gogglya
पु ले प्र
5 Oct 2015 - 1:49 pm | के.पी.
छान झाली कथा.
5 Oct 2015 - 1:58 pm | अजया
अगदी अशीच कथा दिवाळी अंकात वाचलेली.तुम्ही अजून कोणत्या नावाने लिखाण करता का?
5 Oct 2015 - 7:26 pm | ज्योति अळवणी
मी याच नावाने लिहिते आणि अजुन तरी माझी कुठलीही कथा कुठेही आलेली नाही. तुम्हाला सर्वाना आवडली कथा हे वाचून बरे वाटले. तसा एक पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे...
5 Oct 2015 - 2:39 pm | दमामि
सुरेख कथा!!!
5 Oct 2015 - 3:13 pm | कविता१९७८
ओह मला ही कथा थोडीफार वाचल्यासारखी वाटली होती खरी बहुधा अलवनीताई दुसर्या नावाने लिखाण करीत असाव्या
5 Oct 2015 - 10:42 pm | एक एकटा एकटाच
मस्तच
चांगली बांधणी आहे कथेची
6 Oct 2015 - 9:06 am | अभय म्हात्रे
मस्तं कथा. आवडली.
6 Oct 2015 - 11:02 am | योगी९००
मस्त कथा आवडली...!!
मला माझीच एक शतशब्दकथा "वाट" या कथेवरून आठवली...
6 Oct 2015 - 2:27 pm | बाबा योगिराज
आवड्यास.
25 Feb 2016 - 4:03 pm | प्रतीक्षा होडे.
मस्त कथा आहे
3 Jan 2017 - 12:52 pm | टर्मीनेटर
मस्त... कथा...तो बंगला आणि त्याची काड़ी इतकाहि बदल न झालेली मालकिण ....सगळंच आवडलं...