म्हणता म्हणता ......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Oct 2015 - 8:28 am

काहीच नाही म्हणता म्हणता
चंद्राभवती पडले खळे,
खळेच पडले इतके सुंदर
चंद्र दिसेना त्यानंतर!

काहीच नाही म्हणता म्हणता
चाफ्याभवती पान उमटले
पानच इतके गर्भरेशमी,
फूल दिसेना त्यानंतर!

काहीच नाही म्हणता म्हणता
बागेभवती जडली माया
माया इतकी गर्दसावळी
बाग दिसेना त्यानंतर!

काहीच नाही, काहीच नाही
कशी म्हणू मी यानंतर?
तव श्वासांचे गान ऐकते
इथले तिथले मिळून अंतर!

कविता माझीभावकवितामुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 9:40 am | प्रचेतस

खूप सुंदर कविता.
लयबद्ध.

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 9:54 am | मांत्रिक

अप्रतिम.
सुंदर लय!

चांदणे संदीप's picture

2 Oct 2015 - 10:31 am | चांदणे संदीप

लयदारलय! :)

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Oct 2015 - 7:24 am | श्रीकृष्ण सामंत

मला कविता खूप आवडली

प्राची अश्विनी's picture

3 Oct 2015 - 7:48 am | प्राची अश्विनी

क्या बात!!!

chetanlakhs's picture

3 Oct 2015 - 7:57 am | chetanlakhs

शब्दरचना छान जमलीय
पण शेवटच्या 2 ओळींचा अर्थ लक्षात नाही आला. पहिल्या 3 कडव्यांमधे मांडलेला विचारांची माळ शेवटच्या कडव्यात तुटली असे वाटले

मदनबाण's picture

3 Oct 2015 - 9:04 am | मदनबाण

अप्रतिम.... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Once Again - 2011 :- Hang Massive

यशोधरा's picture

3 Oct 2015 - 7:48 pm | यशोधरा

आवडलं हे कडवं.

काहीच नाही, काहीच नाही
कशी म्हणू मी यानंतर?
तव श्वासांचे गान ऐकते
इथले तिथले मिळून अंतर!