त्याच असं झालं kvitaa लिहली आणि नावच सुचतं नव्हतं. मग तरी घाई घाईत तशीच चिकटवली. काही वेळाने बघितलं तर वेल्लाभट म्हणाले पहिल्याच कडव्यात यमक चुकलंय. अर्रर झालं एकदम! तस आम्ही निमित्त शोधतचं असतो हवापालट करून यायच! आता ही आयती संधी का सोडा म्हणून आम्ही सध्या "ताण" मुक्त होण्यासाठी "एक ब्रेक घेतलाच पाहिजे" या निष्कर्षाप्रत पोचलो आहे. तर ही जिलबी वाचून कुणालाही ताण आल्यास तुम्हीही घ्या एक ब्रेक. काय म्हणता पाल्हाळ वाचूनचं आला ताण. बर सॉरी बरं का. तरी आई सांगत असते माणसाने कसं नेमकं बोलावं. कधी जमेल काय माहिती! थांबाव आता नाहीतर जनांतल मनातलं मधे हाकलतील मला. ( नॉट दॅट इट इज बॅड... अर्रर ताण हो ताण) तर घ्या जिलबी गोड मानून. लोभ असू दया आमची मुक्ताफळं वाचल्यावरही.
त्याच काय झालं आज पहिल्याच कडव्यात यमक चुकलं
जमून आलेल्या बेतात मीठ जरा कमी पडलं
घाई झाली? लक्ष नव्हत? बेक्कार चीरफाड़ करून झाली.
आरोपी मीच!पोलीस मीच! आई म्हणते तुझी झोप नाही झाली?
ताणून द्यावी मस्त आता खरच आलाय शीण
इथे कसली झोप यायची? अनिवार्य आता गावी जाण!
हवापालट आता हवाच आहे थकलेल्या मनाला,
खूप काही सांगायचंय कुशीत शिरून आजीला
फडताळांत अजून आजी बघायचय ठेवते का पाव
चहात बुडवून खाताना विसरायची आहे प्रतिक्रियांची हाव
साध सरळ काम, व्यक्त कुठेतरी व्हायचं होतं
तेच करताना मग का बरं खोल काही रूतत होतं
आभासी जगात ह्या, ना कुणाशी ओळख ना मैत्री
आज बोलले म्हणून उद्या बोलतील याची नाही खात्री
अखंड बडबड करणार्या मला झेपत नाही इथली शांतता
आजी माझी बेस्ट आहे कळली नाही कविता तर विचारते भाकरी येतात का थापता?
काही म्हणा तुम्ही आज येतेय आजीची आठवण
हवापालटासाठी आता अनिवार्य आहे गावी जाण
नाहीच झालं येणं परत तर सांगाल ना माझी कहाणी
साधीसोपी आहे नाव तिच एक होती रातराणी
प्रतिक्रिया
24 Sep 2015 - 7:02 pm | जव्हेरगंज
वा वा वा!
आमचीबी परीरस्थिती काही येगळी नव्हती सुरवातिला!
आसलचं कायबी टंकायचु काण डिलीट करायचू.:)
24 Sep 2015 - 8:30 pm | निनाव
Mast...
24 Sep 2015 - 8:38 pm | सस्नेह
जिल्बी गोड आहे आजीच्या मायेची.
10 Oct 2015 - 11:52 am | अत्रुप्त आत्मा
स्नेहा ताई +++१११
24 Sep 2015 - 8:41 pm | मांत्रिक
होती वगैरे म्हणू नका हो!!! खराब वाटतं!!!
इतक्या सुंदर कविता लिहिता आणि होती काय म्हणता? आमाला नै आवडलं!!! बाकी जिल्बी छान आहे.
24 Sep 2015 - 8:51 pm | निनाव
Absolutely. Tumhi liha..bindhaast. Aapalya lokanchich forum aahe.
24 Sep 2015 - 11:14 pm | रातराणी
नाही हो जात :) उग्गीच आहे ते :)
25 Sep 2015 - 1:28 am | एस
अटेन्शन सीकिंग?
रच्याकने, तुमच्या इतर लेखनाचा दर्जा पाहता ही कविता जरा खटकली. स्पष्ट बोलतो, राग मानू नका. लेखिका 'रातराणी' म्हणजे आवर्जून वाचण्यासारखं काहीतरी असेल अशी नेहमीच अपेक्षा असते. :-)
24 Sep 2015 - 8:47 pm | विवेकपटाईत
कविता आवडली +
24 Sep 2015 - 11:15 pm | रातराणी
सर्वांचे धन्यवाद!
25 Sep 2015 - 12:05 am | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलीय
25 Sep 2015 - 11:52 am | पैसा
सगळ्यांच लेखकांचे काही लिखाण चांगले होते, काही फसते. दर वेळी लोक चान चान म्हणतील अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे. जेव्हा एखाद्या लिखाणाला पसंतीची पावती मिळते तेव्हा मजा वाटते ना? मग एखादे लिखाण कोणाला आवडले नाही तर ज्या प्रतिक्रिया येतील त्या सकारात्मक घेऊन अधिक चांगले लिहायची तयारी दाखवली पाहिजे. इथे लोक आपला वेळ खर्च करून बर्या वाईट प्रतिक्रिया देतात. त्यांचा मान राखा ही विनंती. माला वाटले तर लिहीन, मला वाटले तर संपादकांना अप्रकाशित करायला सांगेन हे कृपया टाळा असे काही लोकांना सांगायची वेळ आली आहे. तसे प्रयोग आपापल्या ब्लॉगवर जरूर करावेत. मिपा ही प्रयोगशाळा नव्हे, की प्रयोग फसला तर मी सामान गुंडाळून घरी निघून जाईन.
25 Sep 2015 - 12:01 pm | नीलमोहर
असं काही डोक्यात चालूंच असतं अधून-मधून,
नेहमी सगळं छान-सुंदर,गंभीर,आशयपूर्णच असायला पाहिजे असं नाही.
हेही मस्त आहे..
26 Sep 2015 - 12:00 am | रातराणी
.
6 Oct 2015 - 2:25 pm | मनीषा
साधीसोपी गोड कविता .
10 Oct 2015 - 11:23 am | माहीराज
सरळ साधी सोपी मांडणी ....छान आहे..आवडली
10 Oct 2015 - 12:28 pm | अजया
राणी पोचलो आहे असं लिहिते का?
-कन्फुज्ड दिवसराणी!
10 Oct 2015 - 12:39 pm | अभ्या..
आधीचे आम्ही हे आदराथी बहुवचन वाचा की. ;)
.
नुसते हर हर हायनेस सगळे. :)
10 Oct 2015 - 12:47 pm | रातराणी
_/\_ धन्यवाद!
10 Oct 2015 - 12:54 pm | अजया
आगे नही पिछे नाही मधेच स्वतःबद्दल आदर वाढलाय म्हणावे मग! आधीच्या वाक्यात आणि पुढे नाही दिसला.म्हणजे कमी होत गेला की काय!
परत कन्फुज्ड दिवसराणी उर्फ हर हर हायनेस;)
10 Oct 2015 - 1:45 pm | रातराणी
फारच बारीक वाचू र्हायले माय तू :)
झोपू दे न मले. सारखीच तरंगाय लागली माही कविता वर. आगेसे नो जिलबी फॉर यू.
10 Oct 2015 - 12:52 pm | रातराणी
येती कवा कवा हुक्की राणीसारखं बोलायची! फारच बॉ सोँशयी तुमी.
बाकी कोल्लपुराकड सम्द्याच बैका असंच बोलत्यात, मी आलो,मी गेलो.