लखलाभ!

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
13 Sep 2015 - 2:01 pm

तू ये वाचली आणि त्यातला आव्हानाचा टोन भयंकर आवडला. त्यात आज आमच्या राशीत जिलबी पाडू योग आलेला दिसत असल्याने आम्ही लगेच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. चू. भू. द्या. घ्या.

रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय,
आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका,
तुझा किनारा असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार!

पेन्सील वापरायची तुझी जुनी सवय,
कारण झालेल्या चुका खोडता येतात, बरोबर उत्तर लिहण्यासाठी
तुझी कोरी वही असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! खाडाखोडीने भरलेलं आयुष्याच पुस्तक लिहायला!

डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन येतोस,
निराशेच्या एका रात्री ती सगळी सगळी परत करतोस,
तुझं हे अंधाराला शरण जाणं असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! त्याच अंधारात माझ्या स्वप्नांचे कोवळे अंकुर पेरायला!

नदी होऊन मी भेटाव ही तुझी अपेक्षा,
तू तुझी वाट वाकडी करून नाहीच येणार माझ्याकडे.
तुझ्या ह्या अपेक्षा असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! बेधुंद होऊन पुन्हा पुन्हा याच शिखरावरून कोसळायला!

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

13 Sep 2015 - 2:09 pm | एक एकटा एकटाच

मस्तच

अप्रतिम

पद्मावति's picture

13 Sep 2015 - 2:19 pm | पद्मावति

केवळ अप्रतिम!

प्यारे१'s picture

13 Sep 2015 - 2:23 pm | प्यारे१

बहोत अच्छे.

सस्नेह's picture

13 Sep 2015 - 2:51 pm | सस्नेह

फारच सुंदर !
..मूळ स्त्रोतापेक्षाही उजवी.

दमामि's picture

13 Sep 2015 - 3:17 pm | दमामि

+11111

प्यारे१'s picture

13 Sep 2015 - 3:28 pm | प्यारे१

स्त्रोत? कुठंय स्त्रोत?

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2015 - 3:31 pm | प्राची अश्विनी

अतिशय सुंदर !

मांत्रिक's picture

13 Sep 2015 - 3:50 pm | मांत्रिक

सुंदर!
शेवटचं कडवं तर क्लासच्च!!!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2015 - 9:46 am | अत्रुप्त आत्मा

+१
आखिरत को सलाम!

प्रियाजी's picture

13 Sep 2015 - 5:52 pm | प्रियाजी

खूप छान.शेवटचं कडवं तर कळसच. वाचन खूण साठविली आहे.

सावत्या's picture

13 Sep 2015 - 6:34 pm | सावत्या

केवळ अप्रतिम!

नीलमोहर's picture

13 Sep 2015 - 7:53 pm | नीलमोहर

सुंदर !!

रातराणी's picture

13 Sep 2015 - 8:49 pm | रातराणी

धन्यवाद !

बहुगुणी's picture

13 Sep 2015 - 9:12 pm | बहुगुणी

याला म्हणतात खरा बंडखोरपणा! (बंडखोरपणा= revolt/ rebellion याअर्थी)

वाचनखूण साठवली आहे.

रेवती's picture

13 Sep 2015 - 9:26 pm | रेवती

सुंदर कविता.

मांत्रिक's picture

13 Sep 2015 - 10:13 pm | मांत्रिक

डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन येतोस,
निराशेच्या एका रात्री ती सगळी सगळी परत करतोस,
तुझं हे अंधाराला शरण जाणं असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! त्याच अंधारात माझ्या स्वप्नांचे कोवळे अंकुर पेरायला!
किती चपखल उदाहरण आहे! पुरुष असाच असतो, निराशेच्या छोट्याशा धक्क्यानेही स्वप्ने बदलणारा! आणि स्त्री!!! मनाची खमकी!!! तुटलेल्या स्वप्नांतून देखील एक सुंदर शिवणकाम निर्माण करणारी!!! सलाम तुमच्या लेखणीला!!!

एस's picture

13 Sep 2015 - 10:52 pm | एस

आवेश छान पकडलाय.

नाखु's picture

14 Sep 2015 - 9:11 am | नाखु

अशी आव्हाने पेलणारे असतील तरच आव्हान देण्यात अर्थ आहे !
अन्यथा आव्हानच काय "आवाहन" ही व्यर्थ आहे !

अभामिपाजिल्बीबुवासंघ्संचालीत्यमकजमक्जुळवणी संघ

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2015 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त आवेशात लिहिली आहे

कविता वाचुन अशीच एक बंडखोर मैत्रीण आठवली.

एवढी वर्ष झाली अजूनही ती तशीच आहे.

पैजारबुवा,

रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय,
आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका,
तुझा किनारा असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार!

अहाहाहा
आवडले, भिडले, भावले, पटले.
सुरेख.

तुडतुडी's picture

14 Sep 2015 - 5:28 pm | तुडतुडी

झक्कास

वेल्लाभट's picture

15 Sep 2015 - 12:13 pm | वेल्लाभट

क्लास!
केवळ क्लास !!

वाह!

मदनबाण's picture

15 Sep 2015 - 2:24 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne

रातराणी's picture

17 Sep 2015 - 5:19 am | रातराणी

सर्वांचे आभार _/\_

धनावडे's picture

3 Dec 2016 - 4:09 am | धनावडे

लय भारी