फांसे

हेरंब's picture
हेरंब in जे न देखे रवी...
30 Aug 2008 - 6:40 am

सापशिडीच्या खेळात
'९८' च्या सापाला चुकवायचं आहे
कवड्यांच्या खेळात
'तीन पाय कुत्रं' टाळायचं आहे
'पांच, तीन दोन' मध्ये
कुणाचेतरी हात ओढायचे आहेत
'नाठेठोम' मध्ये
अजुन, सगळ्या जोड्या जिंकायच्या आहेत
कॅरम मध्ये
कधीतरी, क्वीनचे 'कव्हर' घ्यायचे आहे
आयुष्याच्या 'ल्युडोत'
अजून सहाचे 'दान' पडायचे आहे !

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

धनंजय's picture

30 Aug 2008 - 4:26 pm | धनंजय

पहिल्या दोन ओळींमध्ये सोंगटी अगदी ध्येयापाशी पोचत-पोचत आलेली आहे, आणि शेवटच्या दोन ओळींमध्ये सोंगटी सुरुवातीच्या घरातून बाहेरही पडायची आहे.

कवितेतील जागा आणि रुपके असलेल्या खेळांतील सोंगटीची जागा विरुद्ध आहे - बांधणीमुळे कल्पना रंजक झाली आहे.