"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.."
पर्स मधील मोबाईल खणाणला.
तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले.
बंदुकीची नळी सरळ करत तिनं माझ्यावर रोखली.
धडाम्...
मी जागीच कोसळलो.
थरथरत्या हातातली बंदुक गळून पडली.
घाईघाईने ती निघाली.
मोबाईलबरोबर बंदुकही पर्समध्ये टाकायला विसरली नाही.
पिटुकल्या स्कुटीवर बसुन वाड्याकडे निघाली.
वाड्याजवळ येताच धुंद हसली.
करकरत दरवाजा उघडला.
धावतच वरच्या मजल्यावर आली.
एकटाच होतो.
मी निलाजरेपणानं बेधुंद प्रणयाची मागणी केली.
ती त्याच्यासाठीच आली होती.
शृंगारल्या डोळ्यांनी ती लाजुन चुर झाली.
तेवढ्यात,
"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.."
पर्स मधील मोबाईल खणाणला.
तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले.
प्रतिक्रिया
9 Sep 2015 - 12:45 pm | gogglya
थोडा गोंधळ उडला आहे. कृपया सविस्तर खुलासा मिळू शकेल का?
9 Sep 2015 - 12:56 pm | द-बाहुबली
अहो ती प्रेमवेडी आहे. प्रेमासोबत गेमही करते.
9 Sep 2015 - 2:06 pm | खटपट्या
धडामकरुन गोळी कोणाला मारली?
कोसळला कोण?
आणि मग वरच्या मजल्यावर कोण होता?
नळीवाली बंदूक पर्समधे कशी राहीली? पर्स कीती मोठी होती?
9 Sep 2015 - 2:13 pm | जव्हेरगंज
त्या शशक च्या नादात कथा नीट उतारता आली नाही.
स्व:त भोवती गोल गोल फिरणारी कथा टाकायचा प्रयत्न होता.
'वर्तुळ' शीर्षक पाहीजे होते.
दिलगीर आहोत.
9 Sep 2015 - 2:23 pm | मी-सौरभ
सा. सं. ना विनंती करुन बघा..
9 Sep 2015 - 2:36 pm | अन्या दातार
बदल केला आहे. :)
9 Sep 2015 - 2:53 pm | जव्हेरगंज
धन्यवाद,
तेवढं ते 'सकाळ - त्यांच्या नजरेतुन' या धाग्यामध्ये पण वाढ करायची आहे.
काय ते धागा वाचल्यास लक्षात येईल.
आभार.