पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
9 Aug 2015 - 12:49 pm
गाभा: 

राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.

मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्‍या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.

लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.

आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.

आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्‍यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Aug 2015 - 1:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ज्या गोष्टींवर बंदी असते त्या गोष्टी हटकुन करायला जाणं हा मनुष्यस्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे. मुळात पॉर्न पहाणं किंवा नं पहाणं हा ज्याचा त्याचा किंवा वैयक्तिक प्रश्ण आहे किंवा त्याच्या/ तिच्या विवेकबुद्धीचा प्रश्ण आहे. तिथे सरकारने हस्तक्षेप करणं पुर्णपणे चुकीचं आहे. जोपर्यंत ती व्यक्ती सार्वजनिक जागी ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत इतरांनी ह्या गोष्टीला आक्षेप घेणं चुकीचं आहे.

जर का सरकार पॉर्नवर बंदी घालणार असेल तर हिंदी पिक्चरमधल्या आयटम साँग्ज वर बंदी घालणार आहे का? कारण वीतभर (त्यापेक्षा कमीसुद्धा असल्याची उदाहरणं आहेत) कपडे जेमतेम घालणारी आयटम साँग्ज आहेतचं की. चित्रपटामधले सेक्स सिन्स बंद करणार आहे का सेन्सॉर बोर्ड?

जर का पॉर्न बघुन लोकांची मती भ्रष्ट होत असेल तर टीव्हीवरचे सो कॉल्ड फॅमिली ड्रामे बघुन काय सुधारणा होते ह्यावर कोणी सरकारचा प्रतिनिधी बोलताना दिसत नाही. जर का पॉर्न बघुन लोकं बलात्कारी होतं असतील तर ह्या सिरियल्स बघुन खुनी, दरोडेखोर, सतत दुसर्‍याचा तिरस्कार करणारी, छोट्या छोट्या गोष्टींवरुन खुन पाडणारी बनायला हवी होती एव्हाना.

नंतर सविस्तर प्रतिसाद लिहितो विदा गोळा करुन.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2015 - 1:45 pm | मुक्त विहारि

एकदम पर्फेक्ट.....

वाक्या-वाक्याशी सहमत.

पोर्न कायदेशेीर पणे लोकांणा पाहु द्याव्या. त्यसाटठेी सरकारकडे रेीतसर अर्ज द्यावा त्या बरोबर आपल्या वयाचा पुरावा ई. द्यावा. एकदा परवानगेी मिळालेी केी मग त्याला पेशल इंतरनेट जोडनेी द्यावेी.

हे बघण्याचे भरपूर पैसे घ्यावे. आपोआपच त्यावर नियंत्रण येईल.

द-बाहुबली's picture

13 Aug 2015 - 5:37 pm | द-बाहुबली

पोर्न कायदेशेीर पणे लोकांणा पाहु द्याव्या.

ही:

त्यसाटठेी सरकारकडे रेीतसर अर्ज द्यावा त्या बरोबर आपल्या वयाचा पुरावा ई. द्यावा.

ही:ही:

एकदा परवानगेी मिळालेी केी मग त्याला पेशल इंतरनेट जोडनेी द्यावेी.

खिक्क..

हे बघण्याचे भरपूर पैसे घ्यावे. आपोआपच त्यावर नियंत्रण येईल.

तर काय. आज पर्यंत कोणी तॉरंट वापारलेच नाय ना...

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 12:21 pm | विशाल कुलकर्णी

एकदम सहमत आहे.

निमिष सोनार's picture

13 Aug 2015 - 2:27 pm | निमिष सोनार

खालील वाक्य १००% सत्य:
जर का पॉर्न बघुन लोकांची मती भ्रष्ट होत असेल तर टीव्हीवरचे सो कॉल्ड फॅमिली ड्रामे बघुन काय सुधारणा होते ह्यावर कोणी सरकारचा प्रतिनिधी बोलताना दिसत नाही. जर का पॉर्न बघुन लोकं बलात्कारी होतं असतील तर ह्या सिरियल्स बघुन खुनी, दरोडेखोर, सतत दुसर्‍याचा तिरस्कार करणारी, छोट्या छोट्या गोष्टींवरुन खुन पाडणारी बनायला हवी होती एव्हाना.

पैसा's picture

9 Aug 2015 - 2:17 pm | पैसा

याबद्दल बरीच चर्चा वाचते आहे. लेखाच्या आशयाशी बर्‍यापैकी सहमत आहे. कोणत्याही बाबतीत सरकारकडून बंदी येणे हे आमच्यासारख्या तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला कधीही आवडणारे नसते. मात्र काही गोष्टीत स्वयंशिस्त आवश्यक आहे.

मी लहान असताना आंतरजाल हा प्रकार अस्तित्त्वात नव्हता. त्यामुळे साईट्सचा प्रश्नच नव्हता. तर आजूबाजूला इतकी चांगली पुस्तके उपलब्ध असायची की अशा पुस्तकांबद्दल कधी ऐकलेही नव्हते. लैंगिक शिक्षण अधिकृत नव्हते. पण गावात रहात असल्याने निसर्गात चालू असलेले सगळे सहज दिसत होते आणि कोणालाच त्याबद्दल काही वाटत नव्हते. मात्र पोर्न वाचून पाहून

अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.

याबद्दल जरा शंका आहे. यासाठी व्यवस्थित आणि त्या विषयातील अधिकारी व्यक्तीकडून होणारे शिक्षण आवश्यक आहे. नाहीतर पोर्न पाहणार्‍या मुलांमधे बालंकांचे लैंगिक शोषण, समलिंगी संबंध हेच फक्त नैसर्गिक आहे, कॉमन आहे असे गैरसमज प्रसृत होण्याची शक्यता जास्त वाटते.

एखादा प्रौढ माणूस स्वतः असे पोर्न पाहत असेल, त्याच्या १० ते १७ वयातल्या मुलांनी असे पोर्न पाहणे वाचणे त्याला कितपत आवडेल? आपला ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना पकडला गेला तर आपली काय रिअ‍ॅक्शन असेल?

शिवाय, प्रौढ माणसे आपल्या मर्जीने काय ते पाहतील, वाचतील हे ठीकच वाटते. मात्र एखाद्या साईटवर जाणारे मूल १८ वर्षावरचे आहे हे कसे आणि कोण सुनिश्चित करणार?

साईट्स बंद केल्या असे ऐकते. मग त्या पिवळ्या पुस्तकांचे काय? ते बंद होणे शक्य आहे का? कोणी समजा आपल्या मित्र मैत्रिणींचे चित्रण करून फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर खाजगी वितरण केले तर त्याला कसा आळा घालणार?

शृंगार हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे आणि ते नाकारल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. सूचकता आणि बीभत्सता यात प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार निवड करील. मात्र पोर्नवर सरकारने बंदी घालणे हा सगळे आलबेल होण्यासाठी उपाय आहे असे मला वाटत नाही. आपल्या अर्धवट वयातल्या मुलांनी पोर्नपासून दूर रहावे असे वाटत असेल तर स्वयंशिस्त आणि मुलांशी संवाद या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

गवि's picture

11 Aug 2015 - 1:38 pm | गवि

बारीकसा मुद्दा:

आपला ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना पकडला गेला तर आपली काय रिअ‍ॅक्शन असेल?

यावरुन पालकांची मानसिकताही दिसते नीट पाहिल्यास. पोरांच्या मनात गंड निर्माण होऊ नयेत असं वाटत असेल तर ही एकंदरीत "पकडल्या"ची भावना काढून टाकली पाहिजे. संभाषणात पोराला ह.मै. करताना "पकडला" की करताना "सापडला" असे उल्लेख अनेकदा ऐकलेत. अशावेळी बाप आणि पोरगं यात अजिबात दरी नसणंच चांगलं. हे सर्व स्वाभाविक आहे असं समजूनच त्याविषयी बोललं पाहिजे.

११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना दिसला तर..
११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघतोय असं समजलं तर..

अशा रितीने विचारांची दिशा असावी असं व्यक्तिगत मत.. बाकी मुद्दे योग्यच आहेत.

तळटीपः पकडला गेला म्हणजे सायबर कॅफेत पोलीसांकडून पकडला गेला असा अर्थ असेल तर वरील प्रतिसाद बाद समजावा.

पैसा's picture

11 Aug 2015 - 1:51 pm | पैसा

हे ठीक वाटतंय. १००% वेळा आपल मूल चोरून असं काही करतंय हे समजलं तर कोणाला आवडणार नाही. मात्र ते समजल्यानंतर आपली जी रिअ‍ॅक्शन असेल त्यावर बरंच काही अवलंबून असेल.

बाळ सप्रे's picture

11 Aug 2015 - 3:10 pm | बाळ सप्रे

हेच म्हणतो !!

सुधीर's picture

12 Aug 2015 - 2:19 pm | सुधीर

"तंत्रज्ञानातील बदलांमुळे लहान मुलांना सहज उपलब्ध होऊ लागलं आहे" पालकांची ही भीती रास्त आहे. पण आपलं मुल कुठल्या वयात आहे? त्याला कुठल्या तांत्रिक सुविधा पुरवाव्यात. त्यावर पॅरंटल कंट्रोल कसा असावा? ही जबाबदारी तर पालकांचीच आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञानही हळूहळू विकसित होत जाईल. "पण एका वयानंतर" खास करून कार्ट (मुलगा) असेल आणि त्यात संगत असेल तर हमखास पॉर्न पाहण्याची उर्मी जागू शकते. आमच्या काळात मचाक हे माध्यम होत. नंतर रंगित मासिक आली. आणि आता तंत्रज्ञानामुळे चित्रफिती. म्हणजे समस्या अगदीच नवीन नाही. मध्यंतरी बिपी नावाचा मराठी चित्रपट आला होता, पाहिला नाही, पण तसे प्रसंग कसे हाताळावेत हे पालकांनीही समजून घ्यावे.

बाकी पहावं, पाहू नये, नैतिक-अनैतिक हा ज्याच्या त्याचा खाजगी प्रश्न आहे.

बाकी धुमशान चालू आहे या विषयावर. :) सगळेच प्रतिसाद नाही वाचले.

पॉर्न साईट बंद होणार का? (नाही). केल्याच तर चोरून पाहणे बंद होईल का? (नाही, कदाचित काही प्रमाणात कमी होईलही. मग सरकार घेतलेल्या निर्णयापासून मागे हटायला नाही पाहिजे होतं. असो).

पॉर्न पाहण्यामुळे बलात्कार करण्याची उर्मी बळावते का? त्यामुळे बलात्काराला प्रेरणा मिळते का? (नेमकं उत्तर ठामपणे सांगता यायचे नाही. आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचा तसा काही फरक पडणार नाही. कारण पॉर्न पूर्ण बंद करणं शक्य नाही.)

पॉर्न साईटी रेग्युलेट व्हायला हव्यात का? (होय, निदान मला तरी तसे वाटते. बिभित्स, चाईल्ड पोर्नोग्राफी आणि चोरून काढलेल्या क्लिप्स साईट यावर मालकांचं मॉडरेशन हवं. काही प्रमाणात युट्युब करू शकते तर हे अशक्य नाही. त्यासंबंधी कायदे हवेत असेही वाटते. देशांतर्गत करारही असावेत खास करूर जेव्हा सर्व्हार्स देशाबाहेर असतात)

बाकी, मेन स्ट्रीम सिनेमाच्या अश्लीलते विषयी काय? नेमकं कशाला अश्लील म्हणावं? सॉफ्ट पॉर्न आणि अश्लील यात नेमका फरक काय? कथानकाची गरज म्हणून बलात्काराचे, शृंगाराचे शॉट्स कधी दाखवलेच गेलेच नाहीत काय? 'बेसिक इन्स्टीक्ट' ह्या विंग्रजी शिनुमाची सिडी आमच्या उमलण्याच्या काळात फेमस होती.

टवाळ कार्टा's picture

9 Aug 2015 - 2:21 pm | टवाळ कार्टा

आप्ल्याकडचे उपाय हे "ठिगळ लावणे" याच कॅटेगरीमध्ये बसतात

पुणेकर भामटा's picture

9 Aug 2015 - 2:30 pm | पुणेकर भामटा

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, आणि अतिरेकाला योग्य वेळी आवर घालणे महत्वाचे असते, आणि वैयक्तिक माझ्यामते या गोष्टींना आवर घालण्याची हीच योग्य वेळ आहे. कमीत कमी त्यातील विकृत आणि अनैसर्गिक प्रकार दाखवणारी संकेतस्थळे तर बंद करायलाच हवीत.

मध्यंतरी समर्पण या कथेवरून असाच गदारोळ उडला होता त्यावरील कोणाचीतरी प्रतिक्रिया येथेही डकवतो. "कशाला विकृत म्हणायचे आणि कशाला अनैसर्गिक" हे कोण ठरवणार. याचे प्रमाण कोणते? म्हणजे हे ४०% विकृत आहे. ते ७०% अनैसर्गिक असे काही असेल का ?

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2015 - 10:58 am | टवाळ कार्टा

४०% + ७०% = ११०%

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2015 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यातले १०% टक्के "विकृत्+अनैसर्गिक" असं पकडा, बरोबर हिशेब लागेल.

हिशेबीतज्ञ : आमच्याकडे सर्व प्रकारचे हिशेब हव्या त्या सर्वमान्य प्रणालींत बसवून मिळतील. वैयक्तीक प्रणाली असल्यास अधिक आकार द्यावा लागेल.

अजया's picture

9 Aug 2015 - 3:06 pm | अजया

लेखाच्या आशयाशी सहमत.
याच विषयावरील एक चर्चा एका ग्रुपवर वाचण्यात आली होती.त्यात एका मित्राने इरावतीबाई कर्वेंचे याविषयावरचे विचार उधृत केले होते.ते देण्याचा मोह आवरत नाहीये.
लेखिका इरावती कर्वे बाई त्यांच्या काळातील पिवळ्या कव्हर च्या पुस्तकांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या कि वाचून किंवा चित्रे बघून माणसाला मिळणारे सुख जास्त हवे हवे वाटते …कारण त्यात शारीरिक मेहनत नसते …. मनात विचार आले कि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करायला लागते … जोडीदार,त्याचा मूड, जागा, वेळ आणि स्वतःची इच्छा सगळ्यांची जुळवाजुळव करताना बऱ्याचदा इच्छेची तीव्रता कमी होते आणि त्यानंतरदेखील प्रत्यक्षात अनुभव घेताना; जागेची योग्यता, त्या वेळेची आल्हादकारकता, संपूर्ण वातावरणाचा परिणाम, जोडीदाराचा मुखश्वासगंध, आणि होणारे शारीरिक श्रम यामुळे अनुभव कल्पनेच्या तोडीस तोड असेल याची खात्री नसते…

याउलट जेंव्हा शरीरभोगांची वर्णने पुस्तकात येतात, चित्रात दिसतात किंवा चित्रपटात पाहायला मिळतात तेंव्हा हे जागेचे, वेळेचे, वातावरणाचे, घामाचे, गंधाचे आणि श्रमाचे परिणाम भोगावे लागत नाही आणि मेंदूला मात्र सर्व समाधान मिळते …. संपूर्ण शरीरा ऐवजी केवळ डोळे आणि मेंदू हे दोनच अवयव बाकी सर्व अवयवांचे काम करतात …. गंध आणि स्पर्श देखील केवळ कल्पनेने अनुभवला जातो …. म्हणून पिवळी पुस्तके आणि कामुक चित्रपट बहुतेकांना खासगीत तरी आवडतातच ….

ज्या गोष्टींमुळे मेंदूला श्रमाशिवाय मिळणारी गम्मत हवी हवीशी वाटते त्याच गोष्टींच्या अभावाने मग मेंदूला मिळणारे दृष्टीसुख कमी वाटू लागते …. मिळणाऱ्या झिणझिण्या कमी होऊ लागतात, अनुभवांची तीव्रता जाणवेनाशी होते … मग सुरु होते केवळ शब्दातून किंवा चित्रातून किंवा कलाकारांकडून मेंदूला पटकन उद्दीपित करू शकेल बोथटलेल्या जाणीवांना धक्का देऊ शकेल, अश्या कलाकृतीची अपेक्षा …मग कला कुठे संपते आणि क्रौर्य कुठे सुरु होते हे कळण्याचा मार्ग नसतो …

सभ्य समाजात समाजघटकांना होणाऱ्या सर्वच नाही तरी शक्य तितक्या भावनांचे विरेचन होणे आवश्यक असते. यात एक विरोधाभासी गम्मत अशी कि विरेचनाची साधने नसल्यामुळे किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे दोन्ही वेळेस समाजात बुभूक्षितपणाच वाढीला लागतो …

म्हणून सरकारचे आणि नागरिकांचे काम केवळ साधनांच्या नियंत्रणाचे नसून समाजाला जाणवणाऱ्या भावना आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीशी सांधून घ्यायला शिकवणे हे देखील असते … त्यामुळेच आपल्या भावनांबद्दल अपराधी वाटण्या ऐवजी किंवा त्यासाठी नैतिक-अनैतिक किंवा कायदेशीर - बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याऐवजी समाज अधिक जबाबदार होऊ शकेल …
(श्रेय: आनंद मोरे यांचे फेसबुक पेज)

पॉर्न बंदी वगैरे माहीत नाही.. पण पौगंडावस्थेतल्या "मुलग्यां"च्या वडिलांनी मुलाशी मोकळेपणाने बोलल्यास यातील बर्‍याच आक्षेपांना उत्तर मिळेल असे वाटते.. लहान वयातील मुलांना लैंगिक शिक्षण असे पॉर्न पाहून मिळू नये असे वाटते.
दोन्ही टोके वाईटच.

दुसरे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करताना इतर काही गोष्टींकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. त्यातील पहिली आहे पॉर्नचे लागणारे व्यसन. व्यसन या शब्दावर काहींचा आक्षेप असू शकतो, पण दारूप्रमाणे पॉर्नचे देखील व्यसन लागू शकते. आणि एव्हढेच नव्हदेखीलितर व्यसनांप्रमाणे त्या व्यसनाचा परिणाम देखील संसारावर होऊ शकतो. किंवा सॅडिस्ट पॉर्न बघून तश्या फँटसी जर एखाद्याच्या तयार झाल्या तर त्याचा त्याच्या जोडीदाराला मर्यादेपलिकडे त्रास देखील होऊ शकतो, ज्याची परिणीती संसार तुटण्यात होईल..

परंतु जसे दारूबंदी हा उपाय नव्हे तसाच पॉर्नबंदी हा देखील उपाय नव्हे असे माझेदेखील मत आहे. पण पॉर्नचा पुरस्कार करताना त्याच्या साईड एफेक्टकडे देखील लक्ष दिले पाहिजे, विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे अजूनही विवाहसंस्था प्रबळपाहिजेया समस्यांवर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, पण त्यासाठी सरसकट पॉर्न बंदी म्हणजे आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे.

जाता जाता
१. ते सर्व्हे (३० टक्के महिला पॉर्न बघतात) वगैरे सगळे थोतांड आहे असे माझे मत आहे.
२. आज पॉर्न आले म्हणजे नैतिकता बुडली वगैरे काही नाही. नैतिकता तिथेच आहे, साधने फक्त बदललीत. पूर्वी लोक तमाशाला जायचे, आता XXXला जातात इतकेच. आतली भावना तीच आहे, आविष्कार बदललाय.

-- (देवपूजेला लागलेला) आनंदा. (ह. घ्या)

मालोजीराव's picture

10 Aug 2015 - 5:05 pm | मालोजीराव

अरेरे…तमाशा आणि XXX ची तुलना, गेली शेकडो वर्षे आम्ही अश्लीलतेच्या डोहात डुंबत होतो,याचा थेट साक्षात्कार झाला.

अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी) पाहिल्यामुळे होणारे काही तोटे असे आहेत
या चित्रफितीत काम करणारे स्त्री किंवा पुरुष सुंदर गोरे आणि तारुण्याने मुसमुसणारे असतात. यामुळे ते पाहून उद्दीपित होणार्या माणसाना किंवा स्त्रियांना स्वतःच्या शरीराचा न्यूनगंड वाटू लागतो. आपले शरीर क्षुद्र आहे अशी भावना वाढीस लागते. यामुळेच सर्व पुरुषांना आपले लिंग आकाराने फारच लहान आहे असा "साक्षात्कार" होतो.या फितींमध्ये लिंगाचा आकार ६ इंचापेक्षा मोठाच असल्याने बहुसंख्य(९०%+) पुरुषांना आपल्या "आकाराबद्दल" शंका निर्माण होतेच. एकदा हा कली डोक्यात घुसला कि त्याला सोपा उतारा नाहीच. आपण आपल्या बायकोचे "समाधान" करू शकणार नाही हा भयगंड डोक्यात बसतो. मग लिंग वृद्धीसाठी विविध उपचार सुरु होतात. आपल्या स्पॅम फोल्डर मध्ये आपल्याला अशा अनेक जाहिराती सापडतील.आणि मग यामुळे बंगाली बाबा, इंद्रजाल जादुगार इ बाबांच्या नादाला माणसे लागतात आणि स्वतःला नागवून घेतात.
हीच परिस्थिती स्त्रियांची आहे. आपले स्तन फारच लहान आहेत किंवा ते ओघळलेले आहेत तेंव्हा आपल्या शरीराची जोडीदाराला किळस येईल अशा भीती पोटी त्या कानकोंड्या होताना आढळतात. अश्लील चित्रफितीत असणार्या स्त्रिया भरदार आणि उठावदार स्तनाच्या असतात. शिवाय कंबर बारीक, बांधा कमनीय असा असतो. तेथे घेतलेले नात आणि नट्या घेतानाची पात्रता पातळीच अशी असल्याने त्यात भाग घेणारा प्रत्येक तरुण तरुणी असे असतातच अशा दुर्दैवाने स्त्रियांना बाहेर जाऊन याचे निराकरण करण्याचा कोणताच उपाय नसल्याने त्यांच्या समस्येवर नीट उपाय नसतो. मग त्या आपल्या लग्न झालेल्या मैत्रिणीकडे उपायासंबंधी विचारणा करतात. बहुतांशी मैत्रिणीने दिलेल्या सल्ल्याचा फारसा फायदा होत नाही. कारण पहिल्या रात्री आपण काहीच करायचे नाही जे काही करायचे ते पुरुष च करणार या सल्ल्यामुळे त्या संबंधातील सुखाच्या अनुभवाला पारख्या होतात.
कोणत्याही मासिकात लैंगिक तज्ञांना विचारलेल्या प्रश्नांपैकी ५० % प्रश्न या संबंधातच असतात हे आपल्याला आढळून येईल.
याचा अर्थ असा मुळीच नाही कि पॉर्नोग्राफीवर सरसकट बंदी घालावी. कारण अश्लीलतेची व्याख्याच मुळी स्थळ काळ सापेक्ष आहे. आणि सरकारने त्यात न पडणे हे च उत्तम.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Aug 2015 - 9:03 pm | निनाद मुक्काम प...

पोर्न बद्दल अनेक मान्यवर बोलत असतांना त ते ९० च्या काळातील पोर्न बद्दल वर्णने लिहीतात
आजच्या काळात वेब केम ते होम मेड ते रिवेंज ह्या सदराखाली सामान्य माणसाच्या कामुक क्रीडा त्यांच्या कळत नकळत चित्रित केल्या जातात त्याला जगभरातून मोठी मान्यता आहे ,आमच्या पंचतारांकित दुनियेत हॉटेलात वर्षभरातील २०० हून जास्त दिवस हॉटेलात राहून बहुराष्ट्रीय कंपन्यांना अजून श्रीमंत बनवणारे कर्तबगार मान्यवर संध्याकाळी घरी फोन करून झाले की एकतर स्वतः वेश्यालयात जातात किंवा रूम वर बोलावणे होते एका फोन वर
आणि रोज रोज असे करण्यापेक्षा मग मध्यममार्ग म्हणून हॉटेल काही पेड पोर्न वाहिन्या त्यांच्या टीव्ही वर दाखवतात त्या पाहून समाधान मानले जाते , बाकीच्या वाहिन्या फ्री असल्या तरी ह्या वाहिन्यांना भरपूर दाम मोजावा लागतो जो बिलात दिसून येतो ,
सांगण्याचे तात्पर्य एवढेच की पोर्न चा आवाका मोठा आहे आणि कामुक संस्थळं पोर्न ची वर्गवारीत विभागणी करतात ,
अनेकदा आम्हाला रूम मध्ये जाऊन एखाद्या व्यक्तीस पेड पोर्न वाहिन्या कश्या चालू करायच्या ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे लागायचे त्यांना नक्की काय पहायचे आहे त्यानुसार कोणत्या वाहिन्या साईट पहाव्यात ह्या बद्दल मार्गदर्शन करावे लागायचे , लंडन मध्ये हे मार्गदर्शन मी हिंदी व मराठी इंग्रजी तून अनेकांना केले आहे . त्यांच्या चेहऱ्यावर अजीजी कधी ओशाळलेले तर कधी निर्ढावलेले भाव पाहायला मिळायचे , पैसा करियर ह्यात आयुष्याचा वेळ जातो
माणसाच्या नैसर्गिक गरजा सहजरीत्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग जे इतर मार्ग शोधावे लागतात त्यात पोर्न हा सोपा सरळ मार्ग आहे
ते सहजरीत्या समजत सर्वांना उपलब्ध असतील तर लैंगिक शिक्षण मिळालेला प्रौढ त्याचा आपल्या आयुष्यात योग्य व संतुलित वापर कर शकतो असा माझा स्वानुभव आहे
पोर्न हे बहुतांशी गोर्या लोकांची मक्तेदारी असली तरी जगातील कोणत्याही देशाचे नाव व पोर्न असे गुगल काकांना विचारले तर ते खंडीभर साईट पुरवतील.
अगदी भारतीय पोर्न मध्ये मराठी सिंधी पंजाबी गुजराती अशी वर्गवारी सुद्धा सापडते
शोधा म्हणजे सापडले
इच्छा तेथे मार्ग

असे न्यूनगंड तर ह्रितिक जॉन ची बॉडी किंवा कतरिना दीपिकाची फिगर पाहूनही होऊ शकतात. मग पोर्न आणि सिनेमा यात फरक काय ?

सुबोध खरे's picture

11 Aug 2015 - 11:46 am | सुबोध खरे

ह्रितिक जॉन ची बॉडी किंवा कतरिना दीपिकाची कमनीयता आपल्याला व्यायामशाळेत बरेच कष्ट करून थोड्याफार प्रमाणात साध्य करता येईल( ज्याची तयारी फारच कमी लोकांची असते) परंतु त्यांच्या सारखा चेहरा करण्यासाठी ५-६ वेळेस प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. रंग मात्र सहजासहजी बदलता येणार नाही. आजकालचे बहुसंख्य किंवा सर्वच नट किंवा नट्या यांचे शरीर शल्यकौशल्याने ताशीव रेखीव (SCULPTED) केलेलेच आहे.
पॉर्न मध्ये दाखवतात तशी लिंगाची लांबी आपल्याला मिळवता येणार नाही. अर्थात त्यातही आजकाल इम्प्लांट वापरण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे.
यात फरक एवढाच आहे वरील लोक उजेडात कामे करतात आणी खालील लोक "उजेड पडेल" असे काम करतात. आणी त्या दोघातील रेषा फार धूसर आणी अस्पष्ट आहे.

चिगो's picture

11 Aug 2015 - 11:28 am | चिगो

उत्तम प्रतिसाद, डॉक्टरसाहेब..

द-बाहुबली's picture

9 Aug 2015 - 4:22 pm | द-बाहुबली

वर डॉक्टर खरे साहेबांनी चांगला व प्रभोधनात्मक प्रतिसाद लिहला आहेच... पण सरकारने अर्थातच तो हेतु ठेउन बंदी घातली नसावी असा कयास आहे. बंदीमागे सरकारचा रोख काय आहे हेच मुळात स्पष्ट होउ दिलेले नाही ही सायलेंट मुव होती. आणी लोकांनी ते अभिव्यक्तीवरील आक्रमण मानले ज्याचा निरोध हवाच परंतु...

...लोकांना कामसुख/मनोरंजन मिळाले नाही आणी ते पिसाळले असा ही एक अँगल या बंदीविरोधाला लागु आहे की नाही यावरही विशेश्ग्यांची मते जवळुन तपासणे आवश्यक आहे. नाही का ?
यावर नक्किच काथ्याकुट हवा. गोष्टी रोचक वळ्ण घेत आहेत मित्रजनांनो...

विवेकपटाईत's picture

9 Aug 2015 - 4:23 pm | विवेकपटाईत

बंदी घालणे योग्य नाही, पण पोर्न साईटस वर नजर ठेवण्याचे आणि गरज पडल्यास काही साईटस बंद करणे इत्यादी कार्य सरकार कडून अपेक्षित. मर्यादाचे पालन करणे प्रत्येक साईटला हि गरजेचे आहे, विकृत स्वरुपात पोर्न दाखविणे उचित नाही.

सुबोध खरे's picture

10 Aug 2015 - 9:27 am | सुबोध खरे

विकृत स्वरुपात पॉर्न (बलात्कार किंवा लहान बालकांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर संभोग सारखे ज्यात त्या दुसर्या पक्षाच्या समती विरुद्ध संभोग केला असेल) यावर बंदी असावी याचे कारण या गोष्टी जगमान्य आहेत असा तरुण संवेदनशील मनांचा गैरसमज होण्याची शक्यता असते किंवा बलात्कार करण्यात गैर काही नाही असे वाटू शकते.

तुषार काळभोर's picture

10 Aug 2015 - 1:38 pm | तुषार काळभोर

याच्याशी १०१^१०१ वेळा सहमत.
'पॉर्नवर सरसकट बंदी'पेक्षा, अशा पॉर्नवर बंदी हवी ज्यामुळे विकृत गैरसमज पसरायला हातभार लागेल.

गवि's picture

10 Aug 2015 - 5:23 pm | गवि

खरेसाहेबांशी सहमत.

गेल्या काही वर्षांमधे झालेल्या दिल्ली बलात्कार प्रकरण आणि त्याच्या मागोमाग लगेचच झालेलं बालिकेवर बलात्काराचं प्रकरण या दोन्हीमधे वेगवेगळे विकृत प्रयोग केले गेले होते. त्या मुलीच्या आणि दुसर्‍या केसमधेही लहान बालिकेच्या शरीरात वस्तू घुसवल्या गेल्या होत्या. हे सर्व विकृत पॉर्न बघूनच सुचत असल्याचं रीझनेबली म्हणता येतं. बातमीतील आठवणीनुसार किमान एकानेतरी अशा फिल्म पाहून हे केल्याची कबुली दिली आहे.

कितीही कमी लोक इतके विकृत असले तरी एकसुद्धा केस या प्रकारच्या क्रूरता चित्रित करणार्‍या फिल्म्सच्या विरोधात जाणे रास्त वाटते. यासाठी एखाद्या रेग्युलेटर यंत्रणेने रीतसर फिल्म्स पाहून सध्याच्या रेटिंगखेरीज रीतसर प्रौढ+ ++ अशी काही रेटिंग देऊन या फिल्म्स बाहेर येतील असं पहावं. त्यामुळे कंटेंट आधी व्हेरिफाय झालेला असेल आणि क्रूरता दाखवणारे चित्रपट नेमके बॅन करता येतील.

चिगो's picture

11 Aug 2015 - 11:31 am | चिगो

गविंशी आणि डॉ. खरेंशी सहमत..

निमिष सोनार's picture

13 Aug 2015 - 2:42 pm | निमिष सोनार

मान्य! अगदी मान्य!

उगा काहितरीच's picture

10 Aug 2015 - 9:31 am | उगा काहितरीच

प्रतिसाद वाचतोय...

पिलीयन रायडर's picture

10 Aug 2015 - 9:53 am | पिलीयन रायडर

बंदी घालुन लोक पहायचे थांबणारेत असं तर नाही. पण पोर्‍न पाहुन नक्की "फायदे" काय होतात? मजा येत असेल.. तेवढया पुरतं "भारी" वाटत असेल.

पण पोर्न मध्ये जे काही दाखवतात त्यातलं काहिही सामान्य माणसाच्या आयुष्यात खरंच कधी घडतं का? अचानक अनोळखी बायका गळ्यात पडुन डायरेक्ट स्वाधीनच होतात का? की २-४ जणी एकदम येतात? सगळ्या सुबक आणि गोर्‍यापानच असतात का?

मुळात जे होतच नाही ते जर वयात येणार्‍या मुलांनी बघितलं तर (त्यातही अत्यंत अनेसर्गिक / विकृत संभोग) नक्की त्यातुन काय साध्य होइल?

माझ्यामते पोर्नच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त असावेत.

यु ट्युबवर एक छान व्हिडीओ आहे. "This guy stopped watching porn" असं काहीतरी टायटल आहे.

चौकटराजा's picture

10 Aug 2015 - 10:35 am | चौकटराजा

दुसर्‍याला कोणत्याही प्रकारचा क्लेश देत नसेल तर या जगात वि़कृत काहीच नाही. एखाद्याच्या आत्महत्येने दुसर्‍यास जेवढा क्लेश होतो त्यापेक्षा खून केल्याने अधिक गंभीर क्लेश होतो म्हणून खुनाच्या गुन्ह्यापेक्षा आत्महत्येचा गुन्हा सौम्य मानला गेला आहे. तसेच लैंगिक गुन्हे व पोर्न यांचे आहे. नवरसात बिभत्स हाही एक रस मानला गेलेला आहे. अपघात झालेला " पहायला" थांबणे ,पूर पहायला नदीवर जाणे, उंचावरून पोटात गोळा येईपर्यंत खोल दरीकडे पहाणे, भुतांचे चित्रपटाचा " आनंद लुटणे हे सामान्यपणे निखळ आनंदाचे उद्योग नाहीत तरीही त्यात मानवी मनाला रस वाटतो. 'मॅन वर्सस वाईल्ड' यात काही
प्रसंग असे असतात की मांसाहारी माणसालाही किळस यावी तरीही तो कार्यक्रम जगभर लोकप्रिय आहे. मुलांनी पोर्न पहावे की नाही याचा समाजाने निर्णय घेऊन पावले जरूर उचलली पाहिजेत पण त्याने जन्मात काधीच काही असे पाहू नये असा
आग्रह धरायचा झाला तर फक्त ताई भाउ ची नाटके पहाणे समाजाच्या हातात राहील. सारासार विवेक माणसाला येण्यासाठी काही वर्षांचा जीवनानुभव माणसाला घ्यावा लागतो त्याचा आपण नैसर्गिक रित्या प्रौढ होणे म्हणतो. अशा कालमर्यादेत मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स जसे दिले जात नाही तसेच पोर्न चा ठाव ठिकाणा त्याला लागता कामा नये.

सारासार माहीतीपूर्ण प्रतीसाद!

आणि निकोप चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद.

पक्षीय जोडे बाहेर ठेऊन केलेला(अलिकडचा) एक्मेव धागा असे म्हणावे लागते आहे. वरील मान्य्वरांनी व्यक्त केलेली मते आणि व्यावसायीक अनुभवांची जोड देऊन केलेले विवेचन विचारप्रवृत्त आहेच.

मुलांशी विश्वासार्ह संबध+मोकळीक असतील तर नक्कीच अश्या बाह्य प्रलोभनांना आळा बसेल. पण बंदी हा सर्वसमावेशक उपाय नक्की नाही.

गुटख्यावर बंदी आहे तरी लोक (२०-५० रू खर्च करून खात आहेतच) बंदीने "खायला" आणखी एक कुरण मिळेल इतकेच काय ते! कारण पोर्न ची साधी सरळ अशी "सामाज मान्य" व्याख्या नाहीच. आणि यावर कप्तानाने दिलेली निरीक्षणे इतकी चपखल आहेत की फार लिहायला शिल्लक ठेवलेच नाही.

चांगल्या चर्चेने आनंदीत नाखु.

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2015 - 12:32 pm | प्रसाद गोडबोले

२०-५० रू खर्च करून खात आहेतच

२५-५० ? कुठे मिळतो ? सातार्‍यात तर आर.एम.डी ८० - १०० रुपायाने विकला जात होता बंदी आली तेव्हा ! आता माहीत नाही .
आता सगळे विमल +पानमसला असे मावा मिख्चर खातात !!

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2015 - 4:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

पोर्न असो की की दारू की गुटका... त्यांच्यावरची बंदी त्याच्या निर्मात्यांनीच काळाबाजार करून अनेक पटींनी जास्त पैसा कमावायला घालून घेतली आहे असा संशय येण्याजोगी परिस्थिती आहे !

तुडतुडी's picture

10 Aug 2015 - 1:04 pm | तुडतुडी

बंदी योग्यच आहे .

स्वतामध्ये जसा न्यूनगंड निर्माण होतो तसा स्वतःच्या जोडीदाराबद्दल , बायकोबद्दल/ नवऱ्याबद्दल सुधा निर्माण होतो . म्हणजे स्त्रीचं शरीर असं असतं . आपल्या बायकोचं नाहीये (स्त्रियांच्या बाबतीत पुरुषाचं शरीर असं असतं . आपल्या नवर्याचं नाहीये ). मग अश्या शरीराच्या शोधात व्यभिचार वाढतो . नवरा पोर्न बघून किळसवाण्या गोष्टी करायला सांगतो , कामधंद्यात लक्ष देत नाही , विकृत झालाय अश्या गोष्टींमुळे अनेक घटस्फोट झालेयत आणि होतायेत .

..लोकांना कामसुख/मनोरंजन मिळाले नाही आणी ते पिसाळले >>>

हा अत्यंत बिनबुडाचा युक्तिवाद आहे . पॉर्न साईट्स नवत्या तेव्हा किती लोक पिसाळत होते ? मोबाईल नवते तेव्हा लोकांचं एवढं अडत नवतं पण आता मोबाईल शिवाय पान हलत नाही . तसंच . आणि पॉर्न मुळे कामसुख/मनोरंजन मिळत नसून विकृत समाधान मिळतं . पुढच्या पिढीला विकृत बनवायचय का आपल्याला ?

द्रौपदीने पाच पुरुषांसोबत लग्न केले होते. आणि अर्जुन जिथे जाइल तेथे दिवे लाऊन यायचा (सुभद्रा उलूपी चित्रांगदा वगैरे). राधा आणि कृष्णाने रासलीलांमध्ये कपड्यांची अदलाबदली केल्याच्या गोष्टी आहेत. या गोष्टींचे आजच्या युगात अनुकरण केल्यास समाजाचा तोटा आहे. यावरही बंदी हवी का ?…

कपिलमुनी's picture

11 Aug 2015 - 2:39 pm | कपिलमुनी

त्यावेळी असलेली राधा आणि कृष्णाची वयं सांगा !

कहर's picture

11 Aug 2015 - 2:57 pm | कहर

नक्की कल्पना नाही पण आंतरजालावरील माहिती नुसार राधा कृष्णापेक्षा १० वर्षे मोठी असावी. म्हणजे दोघांना एकमेकांचे कपडे बसले तेव्हा कृष्णाचे वय कमीत कमी १५ (दहावी मधल्या नुकत्याच पौगंडावस्थेच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात )आणि राधेचे २५ (ज्वानीच्या पूर्ण बहरात ) एवढे असावे

>>> आंतरजालावरील माहिती नुसार
>>> कृष्णाचे वय कमीत कमी १५ (दहावी मधल्या नुकत्याच पौगंडावस्थेच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात )आणि राधेचे २५ (ज्वानीच्या पूर्ण बहरात )

ब्वार्र!
और कुछ?

कुछ नही. बाकी सब ठीक है. ==))

नशीब जोर से बोलो म्हणालो नाही. :)

एक बाजू म्हणून लोकसत्तामधला हा लेख मस्त आहे. दुर्दैवाने त्यातली आकडेवारी गंडलेली आहे. त्यांच्या मते भारतातील ३०% महिला पॉर्न पाहतात.. यापेक्षा आणखी मोठा विनोद कोणताच नाही. खरी आकडेवारी अशी आहे की भारतात पॉर्न पाहणार्‍यांमध्ये ३०% महिला आहेत. विंग्रजीमधून मराठीत भाषांतर करताना घोळ झालाय. असो.

अजून काही गोष्टी मी मागच्या प्रतिसादात नमूद करायला विसरलो..
पॉर्न पाहून किती लोकांचे "समाधान" होते? समाधान पॉर्न मुळे होत नाही, पॉर्नमुळे फक्त उद्दीपन होते. समाधानासाठी माणसाला वेगळे मार्ग शोधावे लागतात.
अजून एक म्हणजे निर्भयावरच्या अत्याचारात पॉर्नचा वाटा किती हा पण एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे? इथे किती जणांना असे वाटते की निर्भयावरील अमानवी अत्याचारांमध्ये सॅडिस्ट पॉर्नचा अजिबात वाटा नाही? हे पॉर्नवरील बंदीचे समर्थन नाही, पण पॉर्न आणि लैंगिक अत्याचारांचा काही संबंध नाही असे म्हणणार्‍यांनी याचा देखील विचार करावा. तसेच लैंगिक अत्याचारांत सहभाग असणार्‍यांमध्ये किती टक्के जण पॉर्न बघतात हा देखील एक अभ्यासाचा विषय व्हावा.

अवांतर -
मिपावर माझ्या माहितीत प्रथमच प्रत्येक जण या लेखावर स्वतंत्र प्रतिक्रिया देतोय.. दुसर्‍याच्या प्रतिक्रेयाला उत्तर फार कमी जण देत आहेत :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2015 - 1:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मिपावर माझ्या माहितीत प्रथमच प्रत्येक जण या लेखावर स्वतंत्र प्रतिक्रिया देतोय.

स्वतंत्र मत आलंच पाहिजे. नेमकं कोणाला काय म्हणायचं आहे ते तरी कळतं. बाकी, पॉर्नमुळे उद्दीपन होते याच्याशी सहमत आहे. बर्‍याचदा कामसुखाचा संबंध मानवीमनाशी आहे, डॉक्टरमंडळी त्याचा खुलासा करतीलच. माझ्या एका डॉक्टर मित्राने एका रुग्णाला असं काही वाचायला, बघायला सांगितल्याचं स्मरतं. आता ते का ? कशासाठी ते लिहित नाही पण असा काही फायदा होऊ शकतो ?

प्रश्न मला वाटतं पौगंडा अवस्थेतील मुलां मुलींच्या भावनिक कोंडमार्‍याचाही आहे, लैंगिक शिक्षण शाळा महाविद्यालयातून दिल्या जात आहे, तरीही सर्व प्रश्न सुटलेत असे वाटत नाही. अश्लिल साइट्सवर केवळ संभोगांच्या चित्रणापेक्षा मला भयानक वाटतं ते हे की छुप्या क्यामेर्‍याने अपलोड केलेले चित्र आणि व्हिडियोज हे सर्वात घातक प्रकार आहे, असे मला वाटते. बंदी यावी त्या अशा अपलोड केलेल्या चित्रणावर.

अजून एक मुद्दा एकीकडे लैंगिक शिक्षणाची माहिती नव्या पिढीला देत आहोत पण ती माहिती विवाहित स्त्री-पुरुषांना तरी किती असते. म्हणुनच मागे मिपावर मी 'त्या चार योनींची गोष्ट' या नाटकावर लिहिता लिहिता राहीलो. एकीकडे नाटकातून तुम्ही स्त्री-पुरुषांची मागणी काय आहे, याविषयावर प्रबोधन करत आहात आणि एकीकडे माहितीचे सोर्स थांबवत आहात असेही वाटते, याही मुद्द्यांचा विचार व्हावा.

अश्लिलता ही मनात असते.... असो, बाकी नंतर लिहितोच.

-दिलीप बिरुटे

शब्दानुज's picture

10 Aug 2015 - 10:44 pm | शब्दानुज

असे शिक्षण खरेच दिले जाते यावर तुमचा विश्वास आहे ? दहावी ( फार फार तर ३-४ पाने)वगळता याचा उल्लेख कधीही झालेला नाही.
त्यामुळे तो मुद्दा स्पष्ट कराल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2015 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाविद्यालयात जसे की अकरावी कला शाखेच्या वर्गातील मुलांच्या अभ्यासक्रमांमधील समाज शास्त्र या पुस्तकात विवाह संस्थेबद्दल माहिती आहे. प्रत्येक समाजामधे विवाहाची प्रथा या ना त्या स्वरुपात दिसते. कामवासनेची तृप्ती ही सर्वच प्राण्यांची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी मानव समाजात विवाहाची प्रथा उदयास आली. लैंगिंक गरजेच्या तृप्तीसाठी विवाहविषयक नियम तयार केले गेले तरी त्याच्याकडे केवळ लैंगिक संबंधाच्या दृष्टीने पाहुन चालणार नाही. मग विवाहाचा हेतु काय तर १) लैंगिंक गरजांची पूर्ती करणे. २) प्रजोत्पादन. ३) इ. ४) इ.इ. .....

आता विद्यार्थ्यांना मानवी प्रजनन संस्थेतील अवयवांची ओळख करुन देऊन, विवाह, लैंगिक गरजांची पूर्ती हा विषय समजावून सांगितला पाहिजे, सांगितला जातो तसेच लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती व्हावी म्हणुन अनेकदा व्याख्यानंही आयोजित केली जातात. या अर्थाने महाविद्यालयात लैंगिक शिक्षण असे मी म्हणत आहे.

-दिलीप बिरुटे

चिगो's picture

11 Aug 2015 - 11:42 am | चिगो

अश्लिल साइट्सवर केवळ संभोगांच्या चित्रणापेक्षा मला भयानक वाटतं ते हे की छुप्या क्यामेर्‍याने अपलोड केलेले चित्र आणि व्हिडियोज हे सर्वात घातक प्रकार आहे, असे मला वाटते. बंदी यावी त्या अशा अपलोड केलेल्या चित्रणावर.

१००% सहमत.. जिथे 'अश्लील साहित्य आणि चित्रण' हा राजीखुशीचा मामला आहे, तो व्यवसाय आहे तिथे ठीक.. पण हे 'छुपे' चित्रण सरळसरळ 'राईट टू प्रायव्हसी'चे उल्लंघन असते आणि त्यातून एखाद्या स्त्री वा पुरुषाला बदनामीस सामोरं जावं लागू शकते.
(कालच 'दृष्यम' बघितलेला) चिगो..

पण पण पण.. अमुक व्हिडीओ हा छुपा, इच्छेविरुद्ध गुप्तपणे काढलेला आहे आणि तमुक व्हिडीओ राजीखुशीने काढलेला आहे हे ठरवणं कठीण नाही वाटत? . केवळ कॅमेरा लपवल्याप्रमाणे त्याचा अँगल आहे किंवा फ्लिममधली व्यक्ती अनभिज्ञपणे वावरतेय असं बघून भासत असेल तर ते छुपं असं ठरवणार का? कोण ठरवणार? म्हणजे कोण्या एका सेंट्रल ऑथॉरिटीने सर्व कंटेंट स्कॅन करणं आलंच ना? की प्रत्येक गोष्ट कोणीतरी पोलीस कंप्लेंट करण्यावर अवलंबून ठेवायची?

जर कंटेंट स्कॅन केल्याशिवाय नैसर्गिक, अनैसर्गिक, क्रूर, बालकयुक्त, प्राणीयुक्त वगैरे कॅटेगरी कळणारच नसेल (कळणार नाहीच) तर मग एका कोणत्यातरी ऑथॉरिटीकडून स्कॅन करुन घेतलेल्या आणि रेटिंग दर्शनी भागात लिहिलेल्या फिल्म्सच कायदेशीर आणि बाकी सर्वकाही बेकायदेशीर (बघण्यास गैर आणि शिक्षेस पात्र) असं ठरवलं तर ही विभागणी सरळसोपी होणार नाही का?

त्याद्वारे अशा छुप्या, नकळत काढलेल्या क्लिप्स कोणाला कायदेशीररित्या रिलीज करायच्या असतील तर त्याचा कंटेंट स्कॅन तरी होईल. त्यात संशयास्पद आढळल्यास जबाबदारीनिश्चिती तरी होईल.

या प्रकारे नियमित करुन घेण्याने प्रौढ कंटेंट उपलब्धही राहील आणि नेमकं नको ते बाजूला करता येईल. हे बाजूला केलेलं कोणी पाहिलंच तर त्याला प्रत्येक वेळी पकडता येईल असं नव्हेच, पण निदान त्याला राजरोस बेकायदेशीर ठरवता येईल. आणि आत्ता आहे त्यापेक्षा बरीच नियमित स्थिती होईल.

सव्यसाची's picture

10 Aug 2015 - 1:24 pm | सव्यसाची

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालायामध्ये दिलेले उत्तर:
http://www.ndtv.com/india-news/cant-be-present-in-everyones-bedroom-centre-to-supreme-court-on-banning-porn-sites-1205677?pfrom=home-lateststories

On a petition asking for a ban on porn sites, the government today told the Supreme Court that while child pornography must be banned, "we cannot be present in everyone's bedroom."

Attorney General Mukul Rohtagi said that a larger debate was required in the society or in Parliament on banning porn.

"However we cannot become a totalitarian state," the government's top lawyer said.

जरा विस्तारून सांगितलेत तर बरे होईल.. व्हिडिओ बघता येत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2015 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रफितीत काय म्हटलेलं आहे ते लिहून मग दुवा दिला पाहिजे असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

10 Aug 2015 - 9:07 pm | पिलीयन रायडर

मी दुसरा व्हिडीओ पाहिलाय. त्याबद्दल थोडक्यात सांगते.

ह्या मनुष्याने पॉर्न का पाहु नये हे सांगितलं आहे. त्याचं लॉजिक असं की शेवटी जेव्हा तुम्ही पॉर्न पहाता तेव्हा डिमांड तयार करता. मग अजुन बायका मुलींचं ट्रॅफिकिंग केलं जातं. कुणाचंही स्वप्न पॉर्नस्टार बनणं नसतं. ह्या बायका ह्यात नाईलाजास्तवच असतात. पुढे ह्यांच काय होतं. शक्यतो दुर्दैवी मृत्युच. रोग लागुन, कुणीतरी मारलं म्हणुन किंवा आत्महत्या. अथवा "सोशल डेथ" - म्हणजे तुम्ही वेश्येकडे जाऊन येणार्‍यासोबत हॉटेलात जाल, पण वेश्ये सोबत नाही. तिच्यासाठी ही सोशल डेथ आहे.

जेव्हा पॉर्न बनवलं जातं तेव्हा त्यात काहीही इमोशन्स नसतात. कथा नसते, फोकस असतो "पेनिट्रेशन". ते कसं नीट दिसेल ह्यासाठी तशा हिशोबानेच कॅमेरा असतो. ते ब्लॉक होऊ नये म्हणून पुरुष स्त्रीला हात न लावता अवघडुन उभा असतो. ती पण अवघडुन पोझ घेऊन असते. प्रत्यक्षात असं होतं का? एखाद्याला हातही न लावता आपण संबंध ठेवतो का?

पॉर्नमधली अजुन एक गोष्ट म्हणजे (जनरली) पुरुषाचे स्त्रीवर केलेले "डोमिनेशन". पॉर्नपाहुन हीच भावना वाढीस लागते.

पॉर्न पाहुन कल्पनाशक्तीवर त्याचा परिणाम होणं हा एक मुद्दा त्याने मांडलाय. आपण २० मिनिटं जर एखादी फालतु गोष्ट पाहिली तरी आपल्या मनात त्याचे विचार यायला सुरवात होते. गरज नसताना आपण तशा कल्पना करु लागतो. मग जर पॉर्न बघत राहिलो तर तसेच विचार येणार नाहीत का?

मी हा व्हिडिओ पाहुन बरेच दिवस आले. काही मुद्दे सुटले असतो. पण बघण्यासारखा आहे हे नक्की.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

10 Aug 2015 - 4:53 pm | फुलथ्रॉटल जिनियस

इंडीयन जर्नल ऑफ सायकॉलॉजील मेडीसीन या प्रथितयश नियतकालिकात ,पोर्नोग्राफी आणि लैगिक गुन्हे यावर बेंगलोरस्थित संस्थेने केलेला स्टडी प्रसिद्ध झाला आहे.त्यांचे कन्क्लुजन असे आहे की पोर्नचा आणी लैगिक गुन्हांचा फारसा संबंध नाही.

http://www.ijpm.info/article.asp?issn=0253-7176;year=2014;volume=36;issu...

Conclusion: Results
presented needs to be interpreted with extreme care and
caution. Nevertheless, the results from this study suggest
that easy access to pornography did not have a significant
impact on rape rates and crime rate against women.

मुक्त विहारि's picture

10 Aug 2015 - 5:20 pm | मुक्त विहारि

कसे आहात?

आज जर वेळ असेल तर, http://misalpav.com/comment/reply/31763/712577, ह्या प्रतिसादात उल्लेख केलेला,

"शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील,"

असा उल्लेख आहे.

तर कृपया "शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले?" विषयी जरा सांगाल का?

आपलाच,
मुवि.

सर्वत्र "सरकारकडून बंदी" असा शब्द वापरला जातोय. ही शब्दरचना केवळ इंटरनेटवरच्या साईट्सविषयी योग्य ठरेल.

एरवी तश्यासुद्धा सरळसोट पॉ र्न म्हणता येईल अश्या चित्रफिती भारतात कायदेशीर नाहीच आहेत. समजा त्यांना सेन्सॉर बोर्डातर्फे विशिष्ट A+ किंवा तत्सम रेटिंग देऊन रीतसर बाजारात येऊ दिल्या आणि (जसं दारु लहान मुलांना विकण्यावर बंदी आहे तसं) काहीतरी करुन विक्री फक्त प्रौढांनाच केली गेली तर कदाचित जास्त रास्त पर्याय स्वीकारल्यासारखं होईल. कंटेंटही नियंत्रणात ठेवता येईल.

द-बाहुबली's picture

10 Aug 2015 - 10:16 pm | द-बाहुबली

A++ रेटींग देउनही काही उपयोग नाही कारण मुळातच कोणतेही रेंटीग प्रदर्शकाला लागु करता येउ शकते, दर्शकाला नाही.

दर्शकावर बंदी लागु करणे अक्षरशः अशक्य आहे. उदा. समजा एखाद्याने फेसबुकवर आक्षेप घेण्याजोगी कमेंट टाकली आणी मी ती वाचली तर गुन्हा अर्थातच कमेंट पोस्ट करणार्‍यावर दाखल होणे उचीत आहे ती वाचणार्‍यावर न्हवे....

...अगदी नेमके हेच तत्व पोर्न कंटेंटला लागु आहे. व कायदाही हेच सांगतो, ज्याने ते ठेवले आहे दोष त्याचा आहे. पहाणार्‍याचा नाही. वर गंमत अशी आहे की त्याने ते स्वतःच्या राखीव जागेत ठेवले आहे दुसर्‍याच्या नाही... म्हणजे झाली का बोंब ? (भलेही पहाणारा स्वतः क्लिक करुन तेथे जातो हा युक्तीवाद केला तरी.) याच कारणाने आज ११ वर्षाचं कार्टं त्याच्या मोबाइलमधे पोर्न क्लिप डाउनलोड करुन ठेवत असेल तर त्याला गुन्हा ठरवता येत नाही. तो फक्त दर्शक आहे प्रदर्शक न्हवे. अर्थत जर त्याने ती इतरांना सेंड केली नाही तरच, अर्थात त्याने सेंड केली तरी त्याची तक्रार कोण करणार ? तो त्यांनाच सेंड करणार ज्यांना ती हवी आहे... ज्यांना नकोय त्यांना सेंड केली की बुडाला फटके बसलेच समजा :)

असो, दर्शक जेव्हां एखादे मनोरंजन वारंवार बघतो तेंव्हा त्याला एकसुरी ठरवतो व त्याला तो कंटाळतो आणी त्यात वैवीध्य आणायचा प्रयत्न करतो. हा एकसुरीपणा अ‍ॅडीक्शनमुळे(वारंवारतेमुळे) निर्माण झाला असेल तर त्याविषयाबाबत जिवाच्या संवेदना हमखास बोथट झाल्या(होत गेलेल्या) असतात... अन एकदा कोणत्याही भावाप्रती/ विषयाप्रती संवेदना बोथट झाल्या की त्यात योग्य काय अन अयोग्य काय हे कसल्याच पातळीवर ठरवता येणे अशक्य बनुन जाते... तीथे स्विकृती अन विकृती कसलाच फरक नाही. म्हणून.. विक्रुतीला गिर्हाइक नाही असेही कधीच होणार नाही...

मग... काय करावे बरे ? यावर मिपाजनांचा काथ्याकुट हवाच.

पैसा's picture

10 Aug 2015 - 10:31 pm | पैसा

प्रतिसाद आवडला.

सव्यसाची's picture

10 Aug 2015 - 9:27 pm | सव्यसाची

जॉन ऑलिवर याचा लास्ट वीक टूनाईट हा शो कायमच आवडतो.
भारतात पोर्न साईटस वर बंदी घातली त्यासाठीचा दोन मिनिटाचा शो: https://www.youtube.com/watch?v=bepS_JMBcck

तसेच अमेरिकेमधील सेक्स एज्युकेशन बद्दलच त्याचा नेहमीचा एपिसोड: https://www.youtube.com/watch?v=L0jQz6jqQS0

मितान's picture

10 Aug 2015 - 10:31 pm | मितान

लेखाच्या नि खरेंच्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत.

>>>विकृत स्वरुपात पॉर्न (बलात्कार किंवा लहान बालकांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर संभोग सारखे ज्यात त्या दुसर्या पक्षाच्या समती विरुद्ध संभोग केला असेल) यावर बंदी असावी याचे कारण या गोष्टी जगमान्य आहेत असा तरुण संवेदनशील मनांचा गैरसमज होण्याची शक्यता असते किंवा बलात्कार करण्यात गैर काही नाही असे वाटू शकते. >>>
यासाठी +१००

मुलांनी या साइट्स बघण्या न बघण्यावर आपण पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम झालेल्या केसेस खूप मोठ्या संख्येनी पाहण्यात आहेत. अ‍ॅडिक्शन लेवलला पोहोचलेला एक तरुण मुलगा आत्महत्येच्या दारातून परत आलेला पाहिलाय. १२ वर्षाच्या मुलाने साइट्स बघून शाळेत केलेले प्रयोग पाहिलेत. न्यूनगंडाने पछाडलेल्या आणि त्यातून डिप्रेशन मध्ये गेलेल्या मुली पाहिल्यात. लग्नानंतर जोडप्याच्या भिन्न लैंगिक आकांक्षा मॅच न झाल्याने घटस्फोट पाहिलाय. वि़कृत संभोग बघून त्यानुसार अमानुष लैंगिक छळाला कंटाळून हे कोणाशी शेअर न करू शकलेली एक मुलगी आत्ता समोर आहे. या सगळ्यामध्ये पोर्नोग्राफी बघणे हा धागा समान होता. संभोगाबद्दलची धारणा तयार करण्यात या फिल्मस् चा मोठा प्रभाव होता. यापैकी कोणीही निरामय लैंगिक जीवन जगूच शकत नाही.

अश्लील आणि विकृत विडिओ क्लिप्स, फोटो, व्हाट्सप वर बघणे ढकलणे यातून सर्वच बाबतीतली संवेदनशीलता कमी व्हायलाच हातभर लागतोय असं मनापासून वाटतं. मेंदूचं कंडिशनिंग होताना नकळत वाईट गोष्टींबद्दलचा रेजिस्टन्स कधी कमी कमी होत जातो ते कळतही नाही. आपल्यापेक्षा लहान मुलांमध्ये याचा वेग प्रचंड जास्त आहे.

म्हणून माझ्या मते जोवर अशा गोष्टी निरामयतेने वापरण्याचा विवेक आपण रुजवत नाही तोवर यावर बंदी हवी. किमान या साइट्स पेड साइट्स असाव्या.

पैसा's picture

10 Aug 2015 - 10:33 pm | पैसा

प्रतिसाद आवडला. पेड साईट्स निदान मुलांपर्यंत आताच्या इतक्या मोठ्या प्रमाणात पोचू शकणार नाहीत.

या साईट्स पेड केल्या तर अक्खा पगार बारगर्ल वर उडवणाऱ्या सारखे आक्खा पगार पोर्न साईटवर उडवणारी पिढी अस्तित्वात यायला वेळ लागणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2015 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मानवी नीतिमत्तेच्या सीमारेखा या स्थल-कालाप्रमाणे बदलत राहिलेल्या आहेत... त्या सीमारेखा एकाच कालात अनेक स्थलांवर वेगवेगळ्या असू शकतात, असतात. शिवाय, एकाच काल-स्थालाच्या जोडीमध्येही या सीमारेखा ओलांडून अलिकडे-पलिकडे जाणारे बरेच बहिर्गामी (आउटलायर) मतप्रवाह असतातच. मानवी इतिहासात, या सीमारेखा कधीच आखीव-रेखीव नव्हत्या आणि (मानवी स्वभावातील विविधता पाहता) त्या तशा राहू शकतही नाहीत.

ज्या गटाचे मत सद्य वस्तूस्थितीत इतर सर्व गटांवर जेव्हा आणि जितक्या प्रमाणात मात करू शकते तेव्हा त्या गटाच्या मताप्रमाणे ही सीमारेखा बदलत राहते.

उदा: तीन चार दशकांपूर्वी, "कोणत्याही प्रकारच्या पोर्न वर बंदी" या विषयावर न्यायालयाने फारशी चर्चा न करता, खटला बंदीच्या बाजूने निकालात काढावा, असे मत दिले असते आणि बहुसंख्य लोकांना त्यामुळे मानवी अधिकारांवर घाला घातला गेला आहे असे वाटले नसते... हे जेवढे भारतात शक्य होते, तितकेच ते पाश्चिमात्य देशांतही शक्य होते* ! शिवाय, त्याकाळी तसा निर्णय न्यायालयाने दिला नसता तरच लोकांना धक्का बसला असता आणि (त्याचा आपल्या मतांवर कितपत विपरीत परिणाम होईल या विचाराने) राजकीय धुरीणांना घाम आला असता व त्यांनी मतदारांच्या नाराजीने आपल्यावर गंडांतर येऊ नये या दिशेने कायदे बदलण्याची तयारी सुरू केली असती !

थोडक्यात, मानवी नीतिमत्ता ही स्थल-कालसापेक्ष संकल्पना असते... किंवा दुसर्‍या शब्दांत "सतत बदलणारी अस्थायी (टेम्पररी) आणि स्वरूपविहीन (फॉर्मलेस) गोष्ट आहे"... पण अश्या अनेक संकल्पनांवर माणसे जीव टाकतात; आणि तिच्यासाठी जीव देतात व घेतात... हे बहुतेक लोकांना पटते आणि ज्यांना पटत नाही त्यातले बहुतेक (कुरबुरत का होईना पण) सहन करतात... ही वर्तणूक मानवप्राण्यातच दिसते, किंबहुना हीच गोष्ट मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळी करते !

यासंदर्भात, दुसरे सार्वकालीक मानवी सत्य हे आहे की, ज्या गोष्टींविरुद्ध कडक बंधने असतात त्याच गोष्टींचा फायदेशीर काळाबाजार होऊ शकतो ! याबाबत अधिक काही विषद करण्याची गरज नाही.

======

* : किंबहुना, धर्माच्या नावाखाली लैंगीक कारणांमुळे जेवढे "कायदेशीर" बळी पाश्च्यात्य देशांच्या इतिहासात गेलेले आहेत तेवढे बाकी सर्व जग मिळूनही गेलेले नसतील. परंतू, आजकाल आपण त्यांच्याकडून लैंगिक नीतिमत्तेचे धडे घेत असतो, हे उपरोधिक वाटले तरी सत्य आहे !

======

अवांतरः

विकीवर शोध घेतला तर हिंदीत रतिचित्रण (pornography) या विषयावर लेखन दिसले नाही. पण, मराठीत त्रोटक का होईना (जेमतेम अर्धे पान) माहिती आहे. म्हणजे "या विषयांत मराठी भाषिक हिंदी भाषिकांच्या पुढे आहेत" असे समजावे का ? :)

======

माहितगार's picture

11 Aug 2015 - 11:15 am | माहितगार

विकीवर शोध घेतला तर....

तुमच्या कॉमेंट नंतर हिंदी विकिवर शोध घेतला वेगळ्या शीर्षकाने तेथेही जवळपास मराठी विकिपीडिया एवढेच ज्ञानकोशीय लेखन झालेले आहे. कदाचित कोणता प्रदेश कोणत्या शोधात पुढे आहे हे पहाण्याचा अधिक चांगला मार्ग म्हणजे गूगल ट्रेंड्स असेल. विकिपीडिया इंग्रजी असो हिंदी अथवा मराठी लैंगिकता विषयक लेखपानांना वाचक मोठ्या प्रमाणावर भेटी देतात नाही असे नाही, तरीही प्रोपोर्शनेटली त्या प्रमाणात विकिपीडियांवर या विषयावरचे मजकुर उर्वरीत आंतरजालापेक्षा फारच कमी भरतो. बहुधा ज्ञानकोशीय परिघाच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या, कॉपीराइट, आणि ससंदर्भ लेखन करण्याच्या मर्यादा /अटींमुळे असेल अथवा ऑदरवाईजही मानवी जिज्ञासेला इतर माहिती आणि ज्ञानाचीही तेवढीच भूक असते म्हणून असेल विकिपीडियावरील लेखक मंडळी विकिपीडियावर अभिव्यक्ती स्वांतंत्र्यविषयक अडथळे/बंधन फारसे नसूनही लैंगिक विषयांवर इतर विषयांशी तुलना करता फार कमी लेखन करताना दिसतात. रादर कुणाला लैंगिक वाचनाची सवय कमी करून घेण्यासाठी लक्ष डायव्हर्ट करून घ्यायचे असेलतर विकिपीडियावर लेखन हा एक उत्तम रचनात्मक रामबाण उपाय ठरावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2015 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या प्रतिसादातले अवांतर इतके गंभीर नव्हते, ते एक थोड्याश्या विकीउत्खननानंतर केलेले विधान होते, म्हणुनच ते अवांतरात आणि स्माईलीसह टाकले होते ! :)

माहितगार's picture

11 Aug 2015 - 1:24 pm | माहितगार

तुमचे बरोबर आहे मला विकि जाहिरातीची आयती संधी मिळाली आणि मी ती साधली एवढेच :)

विकास's picture

11 Aug 2015 - 12:00 am | विकास

सर्व प्रथम, पॉर्न म्हणून नाही तर सरकारने एकंदरीतच नैतिकतेचा आव आणून पोलिसी (moral policing) करू नये. त्या अर्थाने असल्या वाईटसाईट :) म्हणत बंदी घालू नये असे म्हणेन. पण मग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाँब कसे करावेत, गोळ्या कशा माराव्यात, अमली पदार्थ कसे सेवावेत असल्या साईट्सना पण लागू करायचे का? हा एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण तुर्तास विचार करायला लावायला म्हणून प्रश्न विचारतोय इतकेच. नक्की मर्यादा कुठे आणि कशी असावी?

पॉर्न पहाणे चांगले आहे का वाईट हा माझ्या लेखी मुद्दा नाही. ज्याला जे आवडते ते इतरांना त्रास न देता आणि प्रस्थापित कायदा न मोडता करता येत असले तर करता यावे. "मला पॉर्न बघणे आवडते" अथवा "मला पॉर्न बघणे आवडत नाही" - यातील कुठलेही वाक्य म्हणणारी व्यक्ती जो पर्यंत स्वतःपुरतेच बोलत आहे आणि दुसर्‍याला (आपल्यासारखे नाही म्हणून) तुच्छ लेखत नाही तो पर्यंत सगळे उत्तम आहे. उगाच इतरांना काय आवडते अथवा काय आणि का आवडायला पाहीजे ह्यावर मते मांडणे म्हणजे सरकारने नव्हे तर पब्लीकनेच इतरांच्या खाजगी बेडरूम्स मधे प्रवेश करण्यासारखे वाटते. असो.

आता सरकारने पॉर्नवर बंदी आणली असे कुठेही आधी देखील म्हणले नव्हते. आता तर त्यांनी भुमिका अतिशय स्पष्ट केली आहे. त्यासंदर्भात दोन गोष्टी वाटतातः जर व्यवस्थित संवाद साधला नाही तर गैरसमज वाढतील. तसेच जर काही निर्णय घेयचाच असेल तर तो स्पष्टपणे घ्यावा आणि चर्चा होउंन द्यावी... पण असल्या अराजकीय गोष्टीसंदर्भात संवाद न घडवून जेंव्हा काहीतरी (दुसरा शब्द सुचत नसल्यामुळे) पुचाट निर्णय घेतले जातात तेंव्हा सरकार आणि सरकारातील निर्णयशक्ती असलेले हे मुद्दामून तर (वेडा बनके पेढा) करत नसावेत न असे वाटते. या प्रकरणात तमाम स्वयंघोषित तथाकथीत लिबरल थयथय नाचायला लागले. त्यात त्यांचे आणि त्यांना कव्हर करणार्‍या माध्यमांचे लक्ष इतरत्र हलवण्याचा तर हेतू नसावा ना? असल्यास आणि त्याला जर हे बळी पडले असले तर पडूंदेत झालं. ;)

दुसरा मुद्दा वर एक दोन ठिकाणी प्रतिसादांमधे आलेला आहे. मला वाटते वर एक टेडएक्सचा दुवा पण आहे. सर्वाचा मतितार्थ या चित्रिकरणात वापरल्या जाणार्‍या (विशेष करून) स्त्रिया. त्यांच्यावर कसे अत्याचार केले जातात अथवा कसे पळवून आणून या कामाला लावले जाते या संदर्भात त्यात चर्चा आहे. वादापुरते आणि सांख्यिकीच्या तत्वाने असे म्हणूयात की किमान काही स्वेच्छेने येत असतील. पण तसे १००% जाउंदेत पण बहुतांशी म्हणणे पण धार्ष्ट्याचे ठरेल. म्हणजे एकीकडे त्या स्त्रीयांना कसे फसवले या कडे दुर्लक्ष करत पॉर्न बघण्याचे समर्थन करायचे, आणि दुसरीकडे निर्भयाच्या नावाने मेणबत्त्या लावत नक्राश्रू ढाळायचे...

माझं म्हणणं आहे, त्यापेक्षा जर कुणाला हौसच असेल तर या विषयातील पुस्तके - कथाकादंबर्‍या वाचाव्यात. त्या निमित्ताने कुणाचा गैरवापर केलेला पहावा लागणार नाही, कल्पनाशक्ती वाढेल आणि स्क्रिन टाईम कमी होऊन वाचायची आवड लागेल, सवय होईल. ;) कधी ना कधी त्या सवयीचा योग्य उपयोग देखील होईल. (वैधानिक इशारा: हा परीच्छेद उपरोध आहे. सल्ला म्हणून घेऊ नये!)

तसंही बंदी घालण्यात, व ति उठवण्यात सरकारी धुरीणांनी फार काहि बुद्धी खर्च केली असं वाटत नाहि.
मुळात या सामाजीक प्रश्नाला समाजानेच उत्तर शोधुन अगदी शेवटी कायद्याचं अस्तर लावणं ठीक होतं. पण इथे मडकं भट्टीत नीट भाजलच नाहि, तर त्यात पाणि भरण्यावर अंकुश ठेवुन काय फायदा.

बाकि या सर्व प्रकरणात (सो कॉल्ड) पुरोगाम्यांनी परत आपली जी बौद्धीक दिवाळखोरी दाखवली त्याकरता त्यांचं अभिनंदन करायलाच हवं. या बंदी प्रकरणाचा थेट खजुराहो वगैरे शिल्पांशी संबंध जोडुन काय काय सर्कस चालली आहे.

संदीप डांगे's picture

11 Aug 2015 - 3:22 am | संदीप डांगे

खालील मुद्दे वरील काही प्रतिक्रियांमधेही आले असतीलच.

१. सरकारतर्फे केलेला स्टंट पाहता 'पोर्न साइट्सवरील बंदी' हा खप वाढवण्याचा एक प्रकार आहे.

२. पोर्नचे दुष्परिणाम फायद्यापेक्षा हजारो पटीने जास्त आहेत.

३. पोर्न 'फक्त आणि फक्त' खोट्या लैंगिक समस्या निर्माण करून त्यावर खोटे समाधान विकणार्‍या एका मोठ्या वर्तुळाचा भाग आहे.

४. पोर्न अतिव्यक्तिगत (कल्पनापातळीवर) मनोरंजनात्मक कार्य असेल तर विकृती ठरत नाही पण अभिव्यक्ती स्तरावर (दुसर्‍या व्यक्तीशी वागतांना) भयंकर विकृती ठरते. तसेच कोण कसे वागेल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही.

५. पोर्नचा मनावर होणारा अजाणता प्रभाव कल्पनेच्या (प्युअर फँटसी) च्या पातळीवर ठेवणे प्रत्येकाला शक्य होत नाही. बघितले ते करायची इच्छा होतेच होते. त्यातून भयंकर प्रसंग उभे राहू शकतात. व्यक्तिगत पातळीवर असंख्य लोकांना या समस्यांशी काहीही दोष नसतांना सामोरे जावे लागते.

६. 'अजिबात गरज नसतांना उत्पादन फुकट विकायचे, त्यातून जीवनावश्यक गरज बनेल अशी परिस्थिती बनवायची, त्याचा पुरवठा झाला नाही तर अराजक माजेल असे खोटे चित्र तयार करायचे. बंदी-विरोध-जाहिरात यातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायचे. भाव वाढवून अधिक नफा कमवायचा.' हेच सूत्र ऑनलाईन पोर्न इंडस्ट्रीबद्दल आहे.

समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य तद्दन भंपक आहे. कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्यावर बारमालक असोशिएशनच्या कुणा पदाधिकार्‍याचे हे एक वाक्य कायम डोक्यात गेलेले आहे. "अब ये लडकीयां इज्जत की रोटी कमा सकेगी".

अर्धवटराव's picture

11 Aug 2015 - 3:59 am | अर्धवटराव

पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्‍यांचे प्रमाण त्यात नाइलाजाने येणार्‍यांपेक्षा निश्चितच फार कमि असावं. शिवाय, एकदा त्यात पडल्यानंतर उत्तरायुष्याचे प्रश्न इतर व्यवसायीकांपेक्षा जास्त गंभीर असावेत.

संदीप डांगे's picture

11 Aug 2015 - 4:26 am | संदीप डांगे

पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्‍यांचे प्रमाण त्यात नाइलाजाने येणार्‍यांपेक्षा निश्चितच फार कमि असावं

अक्षरशः कुठल्याही व्यवसायाबद्दल खरे ठरेल असे हे वाक्य आहे पण लैंगिक व्यवसायांशी निगडीत व्यावसायिकांबद्दल नेहमीच वापरले जाते. हे विधान वेश्याव्यवसायाबद्दल बर्‍याच अंशी खरे असले तरी पोर्नव्यवसायाबद्दल कितपत योग्य आहे याची नक्की आकडेवारी आपल्या कुणालाच देता येणार नाही. पण ज्याप्रकारे पोर्नजगत आहे किंवा दिसते त्यावरून तरी परिस्थिती नेमकी उलट असल्याचे समजते. त्यांची देशांतर्गत नागरी परिस्थिती, त्यांचे इरॉटीका एक्झीबीशन्स, कलाकारांच्या स्वत:च्या पेड साइट्स, प्रमोशन्स आणि मार्केटींग, इत्यादी पाहता 'शादी बनाके ले गये और पोर्नमें धकेल दिया' असे म्हणणार्‍या लाजो किंवा सलमा फार क्वचितच असतील असे माझे मत आहे.

एकदा त्यात पडल्यानंतर उत्तरायुष्याचे प्रश्न इतर व्यवसायीकांपेक्षा जास्त गंभीर असावेत.
याची जाण असल्यामुळे कोणी स्वखुषीने यात येत नसेल असं म्हणायला वाव आहे का? कारण पुन्हा एकदा हे विधानही अनेक (प्रतिष्ठेच्या) व्यवसायांबद्दल तंतोतंत खरे ठरते तरी लोक तिथे स्वखुषीने जातात असे दिसते.

तसे बघितले तर पोर्नफिल्म तयार करणे, त्यात काम करणे यासारखे स्वस्त आणि मस्त काम लैंगिकतेशी निगडीत धंद्यांमधे शक्यतो मिळणार नाही. त्यामुळे त्या इतर व्यवसायापेक्षा इथे कमी धोका व जास्त पैसा आहे.

अर्धवटराव's picture

11 Aug 2015 - 6:24 am | अर्धवटराव

पॉर्न इंडस्ट्रीची इतर व्यवसायांशी तुलना करतो म्हटलं तर आजघडीला पॉर्न एक व्यवसाय म्हणुन क्वालीफायच होत नाहि...जरी त्याचं टर्नओव्हर इतर व्यवसायांच्या तोंडात मारेल इतकं असलं तरी. त्यामुळे इतर व्यवसायांशी त्याची तुलना साधक बाधकच करायला हवी. अनिश्चीतता, वर्क सॅटीस्फॅक्शन, यश आणि अनुभवाच्या बेरजेचं गणित इ. बाबी लक्षात घेता इतर व्यवसाय स्पायरल आहेत तर आजघडीला तरी पॉर्न टॅण्जण्ट आहे.

संदीप डांगे's picture

11 Aug 2015 - 6:46 am | संदीप डांगे

तांत्रिक व्याख्या थेट समजल्या नाहीत तरी आशयाशी सहमत आहे.

पण मी फक्त 'व्यवसाय प्रवेश: स्वखुषीने की नाइलाजाने' हा एवढाच निकष लावला आहे. आपली चर्चाही बहुधा त्या निकषावरच आधारित आहे.

बाकी एक व्यवसाय म्हणा किंवा आणि काही, कुणीतरी काहीतरी काम करतो त्याचे त्याला पैसे मिळतात एवढेच बघितले जाते. फक्त शोषणच होत असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. प्रत्येक व्यवसायाच्या आपल्या खाचाखोचा असतात हा भाग निराळा.

पोर्नमधे शोषण होतं व अक्खी इंडस्ट्री फक्त शोषणाधारित अर्थव्यवस्थेवर चालते असं दिसत नाही. जे वेश्याव्यवसायात प्रामुख्याने आढळून येतं. दोन्हीमधे मूलभूत फरक आहे.

समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य तद्दन भंपक आहे.

सनी लियॉनने म्हटल्याचं (म्हणजे पेपरात वाचल्याचं) आठवतंय, की तिने हा व्यवसाय स्वतःहून निवडला म्हणून.

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 5:48 pm | टवाळ कार्टा

ती ज्या पोझिशनला आहे तिथे पोचल्यावरसुध्धा तिने तिच्यावर जबरदस्तीने या व्यवसायात यावे लाग्ले असे म्हटलेले नाहीये

स्पंदना's picture

11 Aug 2015 - 5:08 am | स्पंदना

नक्की काय लिहावं हा एक मोठा प्रश्न आहे. उलट सुलट प्रतिक्रिया, ह्यावं अन त्यांव!!
यात एक मुद्दा विचार करण्याजोगा आहे, पण तोसुद्धा अर्धा आहे. पै ने विचारलय, तुमचा ११ वर्षाचा मुलगा पॉर्न पहाताना सापडला तर तुम्हाला काय वाटेल?
हाच प्रश्न मुलगी हा शब्द वापरुन लिहायची सुद्धा गरज वाटली नाही.
आता पॉर्न!
एकूण जी सगळी चर्चा चाललीय ती हार्ड कोअर पॉर्नबद्दल अस गृहीत धरु. कारण हे प्रकारच सॅडीस्टिक असतात. वर दिलेलेया एका प्रतिसादात लोकसत्ताचा लेख चांगला वाटला अस लिहीलं आहे. नक्की काय आवडल असावं त्या लेखात? बढाया? मी माझ्या घरात काय करतो/करते याचा सरकारशी संबंध नाही म्हणताना, निवांत त्याची पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी केलेली जाहीर वाच्यता? देव जाणे.
सेक्स एज्युकेशन्साठी पॉर्न ही तर अतिशय हास्यास्पद कल्पना आहे. स्वत:च्या अन भिन्न लिंगी व्यक्तीच्या शरीराबद्दलची स्पष्ट अन सुयोग्य शब्दात दिलेली माहिती म्हणजे सेक्स एज्युकेशन. अस करा अन तस करा हे सांगत नाहीत त्यात. जे काही माझ्या शरीराबाबत घडतय, ते नैसर्गिक आहे याचा अ‍ॅश्युअरन्स म्हणजे सेक्स एज्युकेशन, बरोबरीच्यांपेक्षा मी काही वेगळा/वेगळी नाही हा अ‍ॅश्यरन्स, अन भिन्न लिंगीयाच्या बद्दलची माहिती समजून घेतल्याने कमी होणारे औस्त्युक्य, या ३ गोष्टी सेक्स एज्युकेशन पुरवत. मग पुढे जाउन यात याचे नैसर्गिक्त्व, अन त्यद्वारे घडणारे प्रजनन. याचे दुष्परीणाम त्यातल्या मुक्त वावराने संभवणारे धोके न रोग हे स्गळ सेक्स एज्युकेशन मध्ये येत!! वाकड्या तिकड्या जिमनॅस्टिकला सुद्धा लाजवतील अश्या हाड मोडणार्‍या पोझेस नाहीत शिकवत यात. शिक्षण अन त्या मुळे येणारी समज, मनातल्या अधांतरी प्रश्नांची योग्य उत्तरे अन त्याद्वारे कमी होणारे न्युनत्व, एंक्झायटी. भिन्न लिंगीयांच्या शारीरिक बदलांची जाणिव अन पूर्ण माहिती मुळे उगा इकडे तिकडे डोकावण कमी होतं या शिक्षणाने. अर्थात हे झाले साधे सोपे विचार. उगा मिरवायला जाण्याजोग यात काही नाही, त्यामुळे ही बातमी होउ शकत नाही! ;)
मुळात वासना ही नैसर्गिक असते. जशी भूक, तहान, निद्रा! तशीच मैथुन ही भावना. पण झालय काय, तर एक निद्रा सोडली; तर बाकिच्या स्गळ्याच वासनांचे अतिरेकी लाड वाढलेत. भुकेसाठी बर्गर, तहानेसाठी कोक, अन मैथुनासाठी पॉर्न! सगळ अस झटपट!! अन त्याची अतिरेकी चटक. त्या लोकसत्तेच्या लेखात म्हणे पति-पत्नीला उद्दीपित करण्यासाठी पॉर्न मदतीचे ठरू शकते??????? प्रेम, जिव्हाळा, आकर्षण?????? ह्यांच तेरावं घालण्याचा प्रकार आहे हा चक्क!!
शारिरीक गरजांना नाकारणं जसं वाईट, तसच त्यांचा उदोउदो करणं सुद्धा वाईटच. कलासक्त मनाला कोणतीही गोष्ट सजवायला सांगाव लागत नाही, ते मन आपल्या आपण प्रत्येक गोष्टीत सुंदरतेचा प्रत्यय घडवत जाते. एकमेकाच्या सहवासाची ओढ, एकमेकाला पूर्ण सुख देण्याची आस, विश्वास याची कमतरता असणारी जोडपी (विवाहीत) मग अस पॉर्न मुळे उद्देपित व्हायची वाट पहात असावीत. असो.
बंदी घालून कोणतीच वाईट गोष्ट थांबत नाही, पण योग्य जाणीव जागृत करण्याने बराच फरक पडेल. त्यातल्या त्यात सॉफ्ट पॉर्न असायला हरकत नाही, वर कुणी म्हंटल्याप्रमाणे पेड साईटस असाव्यात, ज्यायोगे स्वकमाई शिवाय हे पहाण्याचे धाडस होणार नाही. अनैसर्गिक गोष्टी दाखवायच्या बंद कराव्यात. लहाण अजाण मुलांच्या अस्तित्वाला धोका येउ नये, लहाण मुला-मुलींकडे पहाण्याची नजर बदलू नये एव्हढच एक साध्य व्हावं अस वाटत, बाकी सगळं ज्याच्या त्याच्यापुरत वैयक्तीक!!

पैसा's picture

11 Aug 2015 - 10:55 am | पैसा

प्रतिसाद आवडला.

पै ने विचारलय, तुमचा ११ वर्षाचा मुलगा पॉर्न पहाताना सापडला तर तुम्हाला काय वाटेल?
हाच प्रश्न मुलगी हा शब्द वापरुन लिहायची सुद्धा गरज वाटली नाही.

नाही, मुली पोर्न बघत नाहीत वगैरे कोणताही दावा मी करत नाही. किती प्रमाणात बघतात यावर मतभेद असू शकतात. माझा भर "मुलगा" यावर नव्हता. तुमच्या घरातलं ११ वर्षांचं मूल यावर होता. मग तो मुलगा असो की मुलगी.

प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही पै तै स्विकारण्याचा आहे। ३ दिवसापूर्वी भावाने बहिणीला तिचे वागणे आवडत नाही म्हणून सरळ मारून टाकले। दोघेही कोवळ्या वयाची। म्हणजे घरातल्या स्त्री ने अस काही पाहील तर तुम्हाला काय वाटेल हा प्रश्न सुद्धा सहन होणार नाही अस मला म्हणायचे आहे।

पैसा's picture

11 Aug 2015 - 12:01 pm | पैसा

आलं लक्षात.

अजया's picture

11 Aug 2015 - 7:12 am | अजया

प्रतिसाद आवडला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Aug 2015 - 7:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता नीट मुद्देसुद लिहितो. भारतामधे पॉर्नबंदी म्हणा किंवा इतर बंदी का काम करत नाहीत?

पॉर्नबंदी घालणे आणि उठवणे ह्या एका गोष्टीला अनेक पैलु आहेत. कायदेशिर बाजु, व्यावसायिक बाजु, व्यक्तीसापेक्ष बाजु, आर्थिक हितसंबंध आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भारतीय लोकांची भिकार वृत्ती.

कायदेशिर बाजुंचा विचार करायचा झाला तर मुळामधे सरकारनी हा निर्णय का घेतला ह्याची कुठलीही कारणं दिलेली नाहित. सार्वजनिक ठिकाणी पॉर्न बघणं किंवा बघायला भाग पडणं हा गुन्हा "पब्लिक इंडिसेन्सी" खाली मोडत असावं. मिपावरच्या कायदे क्षेत्रामधील मंडळींनी ह्याविषयी लिहिणं योग्य ठरेल. ठराविक वयोमर्यादेखालच्या व्यक्तीने अ‍ॅडल्ट मटेरिअल हाताळणं (१८-) ह्याला बालगुन्हेगारीखाली जबाबदार धरलं जातं का? समजा एखादी व्यक्ती पकडली गेली तरी चिरीमिरी देउन सुटते. रेल्वे पोलिस मोबाईल्स ची तपासणी करतात अधुन मधुन. किती जणांवर खटले चालवुन शिक्षा झाल्या आहेत? हा अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेमधला दोष झाला.

व्यावसायिक बाजु म्हणाल तर ऑनलाईन पॉर्न वरती किती व्यवसाय आधारित असतील ह्याची काही कल्पना करु शकता? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, पॉर्न इंडस्ट्रीमधली मंडळी, ब्राउझरवर अ‍ॅडव्हर्टाईझ होणारी उत्पादनं ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली फक्त. एवढे सगळे लोकं हा "ईझी मनी" सहजासहजी सोडुन देतील असं वाटतं नाही. पॉर्नबंदी हटवण्यामागे ह्यामधल्या लॉबीचा दबाव असायची शक्यताही असु शकते. ह्यामधले इंटरनेट लॉबी वाले जे FUP (Fair Usage Policy) नंतर डेटा ला चार्ज असणारे आपले प्लान्स गाळामधे जातील ह्या भितीने कुठल्या थराला जातील ह्याचा भरवसा नाही. आर्थिक हितसंबंधांमधे हयच्या अजुन काही काळ्या बाजु मांडतोचं.

व्यक्तीसापेक्ष बाजु मी वरच्या मुद्द्यात मांडली आहेच. सद्विवेकबुद्धी, पर्सनल चॉईसेस वगैरे वगैरे. एका व्यक्तीचं आयुष्य जोपर्यंत ती दुसर्‍याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही तोपर्यंत नियंत्रणाखाली आणायचा नैतीक अधिकार कोणालाही नसावा.

आर्थिक हितसंबंध ही ह्या धंद्यामधली सगळ्यात काळी बाजु:

ह्या इंडस्ट्रीमधे गुंतवणुक कोणाची असते हो? :) ही लोकं स्वत:चे हितसंबंध जपायला काय करतात हे काय नव्याने सांगायला हवं का?
आजपर्यंत सरकारने बंदीचे अनेक निर्णय घेतले. प्रातिनिधिक उदाहरण म्हणुन गुटकाबंदीविषयी बोलु. काय झालं हो गुटकाबंदीनंतर? रुपया दोन रुपयाला मिळणार्‍या पुड्या सरळ सरळ दहा रुपयाला टपरी टपरीवर मिळायला लागल्या. महसुल/ एफ.डी.ए. ला हि गोष्ट माहित नसेल असं वाटतं? चिर्‍यामिर्‍या. पोती भरभरुन चिर्‍यामिर्‍या. ह्याला म्हणतात माफियाराज.

परवा पॉर्नबंदी घातली त्यावेळेला नॉर्थ इंडियन स्टेट्समधल्या "धंदे"वाल्यांनी काय करावं? एरवी १००-१५० रुपयाला विकली जाणार्‍या पॉर्न डीव्हीडीज काळ्याबाजार भावानी विकायला सुरुवात केली. ऑपॉर्च्युनिस्ट्स :P. (ref: सकाळमधली बातमी)

सगळ्यात शेवटी भिकार भारतीय मनोवृत्ती. कायदा केला रे केला की "बिन खड्ग बिना ढाल" वाल्यांचा आधीच चुकीचा असणारा "आदर्श" डोळ्यासमोर आणुन लग्गेचं सविनय कायदेभंग करायला जातील. अरे जिथे लोकांना सिग्नल पाळणं हा अपमान वाटतो तिथे साक्षात पॉर्नबंदी घातली तर पौरुषत्वावर घाला घातल्याचा आव आणुन तावातावाने वाद घालणारे ह्या दोन आठवड्यांमधे ढिगाने भेटले. ज्यादिवशी बंदी घातली गेली तेव्हापासुन ४८ तासांच्या आतमधे ह्या बंदीला प्रॉक्सी सर्व्हर्स वापरुन कसं मोडावं ह्याचे मेसेजेस फेसबुक म्हणा व्हॉट्स अ‍ॅप म्हणा सगळीकडे फिरत आहेत. कुठल्या वेबसायटी चालु आहेत ह्याची भली मोठी यादी पाठवली गेली. ह्या समाजप्रबोधनाचा परिणाम काय म्हणे तो? ज्या लोकांची पॉर्न डिक्शनरी १०=१२ वेबसायाटींपुर्ती मर्यादित होती त्यांना ८००-९०० वेबसायटींचा खजिना सापडला. सापडतील का तुम्हाला ह्यापेक्षा भिकार मनोवृत्तीची लोकं कुठं?

त्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहुन लोकांना "हैदोस" घालायची परवानगी असणं काय वाईट आहे? बंदी घाला नाहितर नका घालु लोकं ते बघणारचं.

मला पॉर्न बघायचं किंवा त्यावर बंदी घालणं अश्या दोन्ही गोष्टींचं समर्थन करायचं नाहिये. लाईफ शुड बी ऑलवेज बॅलन्स्ड विथ डार्क डिसिजन्स अँड फेअर डिसिजन्स. अदरवाईज लाईफ विल बी रिडंडंट अँड बोरिंग.

अस्वस्थामा's picture

11 Aug 2015 - 5:18 pm | अस्वस्थामा

मस्त हो चिमणराव.. :)

प्रतिसाद आवडलाय..

अति अवांतर : सा.सं.ची जबाबदारी आल्यापासून चिमणरावांच्या प्रतिसादांची लांबी वाढत चाललीय असे नमूद करतो (ते चांगलंच आहे तरी पण) त्याच बरोबर "लाईफ शुड बी ऑलवेज बॅलन्स्ड विथ डार्क डिसिजन्स अँड फेअर डिसिजन्स. अदरवाईज लाईफ विल बी रिडंडंट अँड बोरिंग" अशी देवनागरीतील इंग्रजी वचने पाहून आम्हास राहून राहून सरांची आठवण येतेय.. ;)

(स्स्सsssर !! अशी आर्त हाक कल्पावी आणि ह.घ्यावे)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Aug 2015 - 6:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ळोळ!!!

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Aug 2015 - 7:44 am | श्रीकृष्ण सामंत

"मनुष्यप्राणी,बोनोबो-एक माकडाची जात आणि डॉलफीन्स हे तीन प्राणी प्रजोत्पत्ति व्यतिरीक्त सेक्स करण्यात लय आनंद घेतात. नव्हेतर माणसाला मेंदुत अचाट कल्पनाशक्तीचं वरदान असल्याने विकृत कल्पनेतून तो प्रचंड आनंद घेऊ शकतो हे दाखवण्यातही तो आनंद घेत असतो."प्रो.देसाई मला म्हणाले.

बंदी असावी कि नाही यावर चर्चा आहेच आणि ती चालूच राहील .
माझ्या डोक्यात वेगळाच विषय आहे .

अतीच अवांतर होत असेल तर प्रतिसाद उडवून टाकावा
मुळात या सगळ्याची गरज लहान मुलांमध्ये का तयार होते ? त्यांना योग्य वयात योग्य ती माहिती दिली तर पोर्न बघणं टाळू शकतील का मुलं ? माझ्यामते हो . कारण बहुतेकदा वाढत्या वयातली उत्सुकता हे एकाच कारण असतं . नंतर त्याचं व्यसनात रूपांतर होतं . हो याचं हि व्यसन लागतं.

इथे बरेच पालक आहेत ज्यांनी मुलगी १२-१४ वर्षाची झाल्यावर तिला सध्या तिच्या शरीरात होत असलेल्या किंवा पुढे होणार असलेल्या बदलांबद्दल माहिती दिली असेल किंवा देणार असाल . पण जेव्हा हीच वेळ मुलांच्याबाबतीत येते तेव्हा "समजेल त्याचा तो " असं म्हणून टाळून दिली जाते . (असे लोक माहितीतले आहेत).

एका ओळखीच्या काकांनी मला त्यांच्या सिस्टम वर अडल्ट फ़िल्टर चालू करण्यासाठी बोलावलं होतं . का तर म्हणे त्यांचा सातवीतला मुलगा "काहीबाही" बघतोय . घरातले वडिलधारेच जेव्हा सरळ शब्द वापरून बोलू शकत नाहीत . तर ते मुलांना काय आणि कसं समजावणार ?

पैसा's picture

11 Aug 2015 - 10:58 am | पैसा

व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे बरेचजण या विषयात मुलांबद्दल विचार करत नाहीयेत.

अद्द्या's picture

11 Aug 2015 - 11:01 am | अद्द्या

"व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे"

ते फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतात . मग तिथे इतर valid (मराठी शब्द? ) कायमच गौण ठरत आलेले आहेत

>>>> व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे बरेचजण या विषयात मुलांबद्दल विचार करत नाहीयेत.

करवत नसेल!

कहर's picture

11 Aug 2015 - 11:03 am | कहर

सहमत
एखाद्या मुलाला घरीच चांगल्या तेलात केलेले वडे दिले आणि बाहेरचे तेल खराब असते हे त्याच्या मनावर योग्य वेळी बिंबवले तर बाहेरचे वडे खाण्याचा त्याच्या मोहावर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल. या उलट घरी एखादी गोष्ट ban आहे तर ती का ban आहे हि उत्सुकता आणि ती चोरून करण्याची इच्छा (एखादी गोष्ट चोरून करण्याची नशा वेगळीच असते मग ते चोरून लाडू खाणे असो व प्रेम करणे) यातून अशा गोष्ट फोफावतात (उद. एखाद्याच्या घरी शाकाहारी असतील तर बाहेर जाउन मांसाहार करण्याची सवय).

यावर मानसोपचार तज्ञ जाणकार अधिक माहिती पुरवतीलच

अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या मुद्दयाबाबत सहमत.माझ्या मुलाशी तो सातवीत गेल्यावर याबाबतीत त्याच्याशी बोलले होते.कदाचित माझ्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे मला त्याच्याशी बोलण्यात संकोच वगैरे वाटला नाही. त्यातच माझ्या घरात चोवीस तास वायफायमुळे नेट अॅक्सेस आहे.तेव्हा मुलाशी काय बघ काय नको हे मला दुष्परिणामांसकट बोलावेच लागले होते.त्याला पासवर्ड न सांगुन अविश्वास ठेवावासा वाटत नव्हता हेही खरं.अगदी याच्या उलट घटना माझ्या एका डाॅ मैत्रिणीच्या मूलाबाबत घडल्यावर मला आपण जे केले ते बरोबरच याची खात्री मुलाच्या बाबालाही पटवता आली!त्याला वाटतं मुलांना सांगावे लागत नाही.आपोआप कळतं सर्व!
तर याच मैत्रिणीच्या मुलाने सातवीत असताना एका वर्गातल्या मुलाच्या मोठ्या भावाने नेटवर लावलेला पाॅर्न व्हिडिओ पाहिला.नंतर मात्र आपण काहीतरी चुकीचं केलंय ,घाण पाहिलंय वाटून घुसमटायला लागला.त्यात त्याला सारखं हात धुण्याची सवय लागली.सारखं गप्प राहतो,हात धुतोय म्हणून चिंतित आईने जवळ घेऊन विचारल्यावर पोरगं रडायला लागलं.आणि सर्व सांगितलं.
त्यानंतर बरेच दिवस त्याचे काऊन्सेलिंग करावे लागले.हे सर्व माझ्या मुलाला मला सांगून त्याच्याशी यावर बोलता आले.
आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी मित्रता असेल तर मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.

आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी मित्रता असेल तर मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.

अगदी खरं .
पण जसा मी आधीच्या प्रतिसादात किस्सा सांगितला . बव्हंशी पालक सध्या याच विचारांचे आहेत . कि मुलांशी (इथे मुलगा मुलगी हा फरक नाही ) हे सगळं बोलणं म्हणजे काही तरी गंभीर गुन्हा करतोय, एक दोनदा तर योग्य माहिती देणाऱ्या पालकांना हेच लोक "तुम्ही मुलांना लहान वयात बिघडवताय " असं हि ऐकवताना पाहिलंय.

जर योग्य त्या वयात योग्य ती माहिती आणि खरी माहिती (त्याच्याशी निगडीत सगळ्या शारीरिक सामाजिक आणि वैज्ञानिक गोष्टींसहित जर सांगितली ) तर पोर्न काय किंवा इतर व्यसनं काय हि सगळीच टाळता येऊ शकतात . कमीत कमी तो किंवा ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूनी २१+ होत नाही तोपर्यंत तरी. त्यानंतर ते काय करतील तो त्यांच्या त्यांचा प्रश्न आहे.

स्पंदना's picture

11 Aug 2015 - 11:58 am | स्पंदना

+१ माझ्या मुलांची टीचर म्हणाली its better to know it from the person they trust, love and rely on instead of getting the wrong impression through Google. आश्चर्य वाटेल पण बऱ्याच श्रीलंकन आया objetion घेत होत्या या विषयावर।

सुबोध खरे's picture

11 Aug 2015 - 11:17 am | सुबोध खरे

पॉर्न चे फायदे --
वि. सु. - यात पॉर्नचे कुठलेही समर्थन नाही किंवा त्याच्याबद्दल कोणताही आकस नाही. हे त्याचे फक्त वस्तुनिष्ठ वर्णन आहे.
बहुसंख्य व्यक्तींच्या जोडीदाराची शरीरबोली आणी शरीरसौष्ठव हे त्यांना आकर्षित करेल किंवा काळानुसार आकर्षित करून ठेवेल असे राहत नाही (पुरुष नि स्त्रिया दोन्ही).काही काळानंतर आपल्या जोडीदाराच्या शरीराचे आकर्षण कमी झाले/ नाहीसे झाले तर त्या व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवणे हे जास्त जास्त कठीण होत जाते. मानवी मन हे अशावेळेस कल्पनारम्यतेचा( FANTASY) आधार घेत असते. आपल्या जोडीदारा ऐवजी दुसर्या तरुण नट किंवा नटी बरोबर आपण प्रणय करीत आहोत( यात संभोगच असेल असे नाही) अशा कल्पना विलासाचा आधार घेऊन प्रत्यक्ष प्रणय क्रीडा चालू राहू शकते. यावेळेस बायका नवर्याऐवजी दुसर्या तरुण आणी देखण्या पुरुषाची आणी नवरे बायको ऐवजी एखाद्या सुंदर नटीची कल्पना डोक्यात ठेवून शृंगार करत असतात. (सनातनी लोक याला मानसिक व्यभिचार म्हणू शकतील). परंतु हि परिस्थिती ९० % जोडप्यांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात कधीतरी घडतेच.अशा कल्पना विलासाचा मूलाधार अश्लील साहित्य असू शकते. आपली बायको कमनीय आहे किंवा आपला नवरा तारुण्याने मुसमुसलेला आहे आणी तो अर्धा तास "संबंध" ठेवू शकतो अशा तर्हेचा कल्पनाविलास या जोडप्याला एकत्र ठेवण्यास मदत करू शकतो. या कल्पनाविलासामुळे भावनिक/ मानसिक निचरा होण्यास मदत मिळते. सम्भोगासक्ती( मैथुन) हि आद्य प्रेरणा आहे तेंव्हा ती दडपणे हे अनैसर्गिक आहे अशावेळेस कोंडून ठेवलेल्या भावनांचा निचरा होण्यास बरेच लोक पॉर्नचा आधार घेतात हि वस्तुस्थिती आहे. त्याच्या समर्थनार्थ कोणी आमची "कामसूत्र संस्कृतीच" आहे याचा आधार घेतात.
बायको ढिगार्या सारखी पडलेली असते किंवा नवरा बटाट्याच्या पोत्यासारखा कळकट आहे ( हि प्रत्यक्ष रुग्णांनी केलेली वर्णने आहेत) असे असताना संबंध कसा ठेवणार असे प्रश्न रुग्णांकडून बर्याच वेळेस येतात. वंध्यत्वा वर उपचार करताना आपल्या शारीरिक संबंधांची वारंवारता किती आहे? हा एक नैसर्गिक प्रश्न येतोच. हि वारंवारता वाढवणे हे हि आवश्यक आहे. मग अशा वेळेस त्यांना उपाय सांगताना दोघांची शारीरिक आकर्षकता वाढवायचे उपाय सांगण्याबरोबर चावट आणी अश्लील( यात फरक श्रेणीचा आहे) साहित्य वाचणे/ पाहणे हेही सांगावे लागते. पुरुषांची परिस्थिती फारच वाईट असे.(कारण प्रत्यक्ष कार्य पुरुषाला करावे लागते. स्त्रिया थंडपणे पडून राहू शकतात)
बायको लठ्ठ असल्याने आकर्षणच वाटत नाही त्यातून ती कायम घामाने थबथबलेली असते त्यामुळे "इच्छा'च होत नाही आणी "इच्छा" झाली तरीही लिंग ताठरता येत नाही हि परिस्थिती फार वेळा आढळून येते . मुळात लठ्ठ पणामुळे स्त्रीला PCOS(POLYCYSTIC OVARY SYNDROME-- PCOS is the most common endocrine disorder among women between the ages of 18 and 44. It affects approximately 5% to 10% of this age group. It is one of the leading causes of poor fertility स्त्रोत विकी) हा आजार झाल्याने वंध्यत्व आलेले असता हा "अजून" असलेला प्रश्नही( लिंगशैथिल्य) सोडवावा लागतो. त्यातून ज्या दिवशी स्त्रीबीज तयार होईल( हे स्त्रीबीज २४-३६ तासच कार्यक्षम असते आणी यानंतर संबंध केला तर तो निरुपयोगी ठरतो) त्या विविक्षित दिवशी त्यांना संबंध ठेवा हे सांगावे लागते. यामुळे मुळात कठीण असलेला शरीर संबंध हा अजूनच कृत्रिम होतो. अशा वेळेस पुरूषाला उद्दीपित करण्यासाठी चावट आणी अश्लील साहित्याचा वापर करावा लागतो किंवा पुरुषाला कल्पनाविलासाचा( FANTASY) आधार घ्या हे सांगावे लागते. हे कितीही सोपे असले तरी आपली बायको ८७ किलो ची असताना तिला चवळीची शेंग "समजणे" किती कठीण आहे हे जो त्यातून गेलेला आहे त्यालाच विचारा.
गर्भाशयात शुक्राणू रोपण (INTRAUTERINE INSEMINATION) या क्रियेसाठी पुरुषाला वीर्य दान करावे लागते परंतु हस्तमैथुन करून वीर्य देणे हि गोष्ट अपरिचित वातावरणात सोपी नसलेली गोष्ट आहे. १९९४ साली आमच्या वंध्यत्व केंद्राला यासाठी दिलेली खोली जुनी इंग्रजांच्या काळातील होती (३० X २० फुट आणी तिचे छप्पर १८ फुट होते) अशा ठिकाणी तुम्ही कितीही पडदा लावा माणसाला लिंग ताठरता येणे फार कठीण होत असे. अशा वेळेस आम्ही सरकार कडून एक व्हिडियो प्लेयर शैक्षणिक अनुदानातून विकत घेतला आणी अशा उपचारातून यशस्वी झालेल्या पहिल्या माणसाला अश्लील साहित्यःच्या कॅसेट्स "भेट " देण्यास सुचवले.यानंतर अशा १२ कॅसेट आम्हाला भेट म्हणून मिळाल्या होत्या( या कॅसेट चोरीच्या भीतीने कुलुपबंद ठेवाव्या लागत असत). जे लोक त्यातून गेले होते त्या लोकांना त्याची गरज किती आहे ते व्यवस्थित समजलेले होते.
वि सू-- यात कोणत्याही वजनाच्या किंवा आकाराच्या अथवा रंगाच्या व्यक्तींचा अधिक्षेप करणे हा हेतू नसून प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचा उल्लेख आहे
मूळ मुद्दा सरकारने त्यात हात घालावा कि नाही हे मी वर दिलेल्या इतर प्रतिसादात माझे मत दिलेले आहेच त्याची द्विरुक्ती नको.

अफलातून इनसाईट .. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार..

अद्द्या's picture

11 Aug 2015 - 11:33 am | अद्द्या

+१००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2015 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

11 Aug 2015 - 12:49 pm | चौकटराजा

फार वर्षांपूर्वी एक नाटक आले होते. लेखक बहुदा सुरेश खरे. त्यात एका पुरूषाला काही लैंगिक समस्या असते . परस्त्रीच्या संबंधातून तो त्या समस्येवर मात करतो असा काहीसा प्रकार त्या नाट्कात होता. वरील कॅसेटचा प्रकार वाचून त्या संदर्भाची
आठवण झाली.

माझ्या निरिक्षणातून असे मी म्हणू शकतो की प्रौढ पुरूषाना असा चित्रपट पाहाण्याचा फायदा होत असतो. यात आपल्या लैंगिक
भागीदाराच्या मर्जीचा सवालच पैदा होत नाही. फक्त १८० ते २४० व्होल्टस चा विद्युत प्रवाह , चित्रफित व स्क्रीन या लहर
नसणार्‍या गोष्टीचे सहकार्य अपेक्षित असते. कदाचित असा फायदा स्त्रीयाना देखील होत असेल.ज्या देशात असे काही पहाण्याची
मुभा असते त्या देशातील नवराबायकोतील लैंगिक बाबतीतील धुस्फूस व बलात्काराच्या प्रकारांचे प्रमाण कमी असेल तर
वारांगनांप्रमाणे पोर्न ही देखील समाजाची गरज आहे असे म्हणावे लागेल. एक बाब १०० टक्के दिसून आली आहे की
चित्रपट समाजाचे प्रतिबिंब असतो समाज चित्रपट पाहून घडत नसतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Aug 2015 - 1:04 pm | निनाद मुक्काम प...

अफलातून प्रतिसाद

पैसा's picture

11 Aug 2015 - 1:07 pm | पैसा

डॉक्टरांचे सगळेच प्रतिसाद आवडले.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Aug 2015 - 12:21 am | श्रीकृष्ण सामंत

हे सेक्सॉलॉजी विषय घेऊन डॉक्टर झालेत का?
एक भाबडा प्रश्न

सुबोध खरे's picture

13 Aug 2015 - 10:35 am | सुबोध खरे

@श्रीकृष्ण सामंत
नाही साहेब
मी रेडियोलॉजी मध्ये एम डी केलं आहे परंतु लष्करात असताना ३ महिने मनोविकार शस्त्रात काम केलं आहे. त्यावेळेस आलेले अनुभव आणि त्यात काम केल्यामुळे मिळालेली दृष्टी यामुळे हा प्रश्न किमान ९० % घरात असतो आणि बर्याचदा तो प्रश्न न सोडवता प्रलंबित राहतो आणि त्यातून दुसर्याच मानसिक व्याधी उद्भवतात हि वस्तुस्थिती जाणवली. डॉक्टरी करताना नुसतेच डोळे उघडे ठेवले तरी असे बरेच प्रश्न समोर येतात आणि त्याचा जमेल तितका उपचार करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. एवढेच

NiluMP's picture

13 Aug 2015 - 5:29 pm | NiluMP

A post from FB

In India people want their children should not know anything about sex b4 marriage and expect they should be master in sex on 1st night after marriage.

कहर's picture

11 Aug 2015 - 11:28 am | कहर

अवांतर: तोंडावर कोणी कितीही इंजिनियर डॉक्टर होणार म्हणले तरी मनातून प्रत्येक तरुणाला याच इंडस्ट्री मध्ये करिअर करायची सुप्त इच्छा असते (काय आप्पा वरून साभार )

सुबोध खरे's picture

11 Aug 2015 - 11:36 am | सुबोध खरे

मुळीच नाही
केवळ चार वेळेस संभोग करायला मिळेल म्हणून कोणी यात पडेल असे नाही. त्यातून उघड्यावर असा संभोग करायला किती लोक तयार होतील?
तेवढे सोडा हो. रस्त्यावर नागवे जाण्याची किती लोकांची इच्छा होईल? आणी येथे प्रवेश मिळवण्यासाठी आपला चेहरा आणी शरीर यष्टी तशी असावी लागते. येरागबाळ्याचे काम नव्हे.
उघड्यावर शौचाला बसण्याचीच सर्वाना लाज वाटते तर संभोग करायला कसे कोण तयार होईल.
काहीच्या काही प्रतिसाद

नाखु's picture

11 Aug 2015 - 12:28 pm | नाखु

योग्य प्रतीवाद!

ज्यांनी "बो डेरेक"चा १० हा सिनेमा पाहीला असेल (सन १९७९ ला आलेला) त्यांना फक्त पडद्यावरची हिरवीण त्या कपड्यात पाहाय्ची होती किमान सोत्ताची बाईल त्या कपड्यात पाहाय्ची आज तरी तयारी असेल का !!!!

खरे खुरे उत्तर स्वतः शोधा मग बाकीचे आहेच गाव गप्पा!!

रस्त्यावर नागवे जाण्याची किती लोकांची इच्छा होईल

रस्त्यावर नाही जाता येणार पण जिथे नागडेच व्हावे लागते असे न्यूड बीच अस्तित्वात आहेतच की. आणि आश्चर्य म्हणजे प्रचंड गर्दी सुद्धा असते तेथे. तिथे नाही लोकांना लाज वाटत " When in Rome, Do as the Romans do" . शिवाय right to bare साठी खुद्द स्त्रियांचा लढा चालू आहे.

प्रत्येकाला वाटते देशाचे पंतप्रधान व्हावे पण होता येत नाही हि गोष्ट वेगळी अशा काहीश्या अर्थाने असावे.

मिपावरचे या विषया संबंधीचा एक धागा :-
http://www.misalpav.com/node/20247
बाकी, पॉर्न इंडस्ट्री मधील व्हिडीयो बद्धल चर्चा होते, पण त्यामागची लैंगिक उत्पिडन्,क्रौर्य तसेच ड्रग्स आणि विकॄती या बद्धल जास्त बोलले जात नाही ! मला आठवतय त्याप्रमाणे युएस पॉर्न इंडस्ट्रीने मागच्या रिसेशनच्यावेळी {२००९ } बेल आउट पॅकेज सुद्धा मागितले होते ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2015 - 12:53 pm | प्रसाद गोडबोले

एकुणच

१) बहुतांश लोकांन्नी नितांत सुंदर असे पोर्न चित्रपट पाहिलेले दिसत नाहीयेत !
२) पॉर्न हे केवळ पुरुषांसाठी बनवले जाते , केवळ पुरुषांन्नाच त्यातुन आनंद मिळतो . असे काही जणांचे मत दिसत आहे .
३) पॉर्न पाहुन लोकांना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष येतो ( हे बर्‍याचांशी खरे आहे , पण असा कॉम्प्लेक्ष येणारे लोक खर्‍या अर्थाने प्रौढ झालेलेच नसतात हे ही तितकेच खरे )
४)पॉर्न मधे इमोशन्स नसतात असे जे काही मत आहे ते ही काहीच्या काही आहे , इन्टिमेट रिलेशन मधील शृंगाराचे चित्रण न पाहिलेले लोकच असे काहीतरी विधान करु शकतात.
५)चाईल्ड पोर्नोग्राफी हा नक्कीच विकृत प्रकार आहे त्यावर १००% बंदी असायलाच हवी ! पण म्युच्युअल कन्सेंट ने केलेल्या पोर्न वर बंदी आणणे ही तर सरळ सरळ स्वमतंध दांभिकता आहे !
६) भारतात बहुतांशलोक प्रौढ होतच नाहीत , ०-१८ वयोगटातुन डायरेक्ट ६० + ह्या वयोगटात उडी मारतात त्यामुळेच ह्या असल्या पॉर्नबंदी सारख्या मुर्ख प्रकारांचे पीक येत आहे !
७) डिक्लेरेशन मधे म्हणल्या प्रमाणे We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.
लोकांच्या पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर गदा आणणारे सरकार जास्त काळ टिकुन राहु शकेल असे वाटत नाही . ( अर्थात सरकारने कालच पोर्न वर बंदी घालता येणार नाही असे क्लीयर केले आहे :) )

असो .

(संपादित)

द-बाहुबली's picture

11 Aug 2015 - 5:11 pm | द-बाहुबली

एकुणच

१) बहुतांश लोकांन्नी नितांत सुंदर असे पोर्न चित्रपट पाहिलेले दिसत नाहीयेत !

सयटीवर नितांत सुंदर पोर्न असतातच असे नाही. (मी पॉर्न स्टार्सबाबत बोलत नाहीये).

२) पॉर्न हे केवळ पुरुषांसाठी बनवले जाते , केवळ पुरुषांन्नाच त्यातुन आनंद मिळतो . असे काही जणांचे मत दिसत आहे .

जाउद्याना ? कधी तरी प्रतिसादाची गल्ली चुकते... नको तिथे प्रकाशीत होतो. वरील वाक्य त्याचे उत्तम उदाहरण आहे. ते वाक्य संपुर्ण मिपाकरांसाठी नक्किच नाही असे मझे ठाम मत आहे.

३) पॉर्न पाहुन लोकांना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष येतो ( हे बर्‍याचांशी खरे आहे , पण असा कॉम्प्लेक्ष येणारे लोक खर्‍या अर्थाने प्रौढ झालेलेच नसतात हे ही तितकेच खरे )

पॉर्न सोडा.. साधे प्रऊढांसाठीचे चित्रपटही (अगदी ए लिस्ट हिरोहिरवीन असलेले सुध्दा) कामक्रियेबाबत भलतेच गैरसमज अप्रौढ डोक्यात निर्माण करतात हे वास्तव आहे.

४)पॉर्न मधे इमोशन्स नसतात असे जे काही मत आहे ते ही काहीच्या काही आहे , इन्टिमेट रिलेशन मधील शृंगाराचे चित्रण न पाहिलेले लोकच असे काहीतरी विधान करु शकतात.

:) सहमत.

५)चाईल्ड पोर्नोग्राफी हा नक्कीच विकृत प्रकार आहे त्यावर १००% बंदी असायलाच हवी ! पण म्युच्युअल कन्सेंट ने केलेल्या पोर्न वर बंदी आणणे ही तर सरळ सरळ स्वमतंध दांभिकता आहे !

चाईल्ड पोर्नोग्राफी हे नुसते नाव वाचुन वा ऐकुनच शिसारी येते.

६) भारतात बहुतांशलोक प्रौढ होतच नाहीत , ०-१८ वयोगटातुन डायरेक्ट ६० + ह्या वयोगटात उडी मारतात त्यामुळेच ह्या असल्या पॉर्नबंदी सारख्या मुर्ख प्रकारांचे पीक येत आहे !

तरीही प्रॉब्लेम ० ते १८ वयोगट वालेच निर्माण करतात हे वास्तव आहे.

७) डिक्लेरेशन मधे म्हणल्या प्रमाणे We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.
लोकांच्या पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर गदा आणणारे सरकार जास्त काळ टिकुन राहु शकेल असे वाटत नाही . ( अर्थात सरकारने कालच पोर्न वर बंदी घालता येणार नाही असे क्लीयर केले आहे :) )

:)

असो .

नक्किच.

(संपादित)

जे ब्बात.

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 5:39 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११

ट्रेड मार्क's picture

12 Aug 2015 - 1:17 am | ट्रेड मार्क

हा प्रतिसाद आपण कुत्सितपणे (sarcastic) दिलाय का?

पॉर्नमध्ये पण वेगवेगळ्या पातळ्या असतात हे आपणास माहित नाही का? ज्या ८००-९०० sites वर बंदी घातली होती त्या विकृत किंवा लहान मुलांशी संबंधित चित्रफिती दाखवत म्हणून होती.

तसं पण hardcore पॉर्न बघून आनंद मिळणारे विकृतच म्हणायला पाहिजेत. बहुतांशी Hollywood चित्रपटांमध्ये soft पॉर्न असतं जे बघायला काही हरकत नसावी. कारण ज्या emotions बद्दल तुम्ही लिहिताय त्या अश्या चित्रपटांमध्ये असतात. मुख्य म्हणजे गोष्टीच्या संदर्भात एखादा असा scene आला तर फारसं काही विचित्र वाटत नाही. पण जे hardcore पॉर्न असतं त्यात म्हणजे बाकी काही नाही फक्त २/३/४ पुरुष व स्त्रिया समोरासमोर येतात आणि चालू होतात. कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय/ करतीये ह्याचा पत्ताच नसतो.

पण विकृतीतून आनंद मिळवणारे पण काही कमी लोक्स नाहीत. पण सगळ्यांची सगळी विकृती शामवलीच पाहिजे असं पण नाही ना?

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2015 - 1:50 pm | प्रसाद गोडबोले

नितांतसुंदर पॉर्न!!! हा प्रतिसाद आपण कुत्सितपणे (sarcastic) दिलाय का?

>>>

माझा प्रतिसाद कुत्सित पणे दिलेला नव्हता पण आता खवट प्रश्ण विचारतो : तुम्ही एकतरी नितांत सुंदर प्रणयाचे चित्रण असलेला नीलचित्रपट पाहिला आहे काय ?

हे घ्या लिस्ट :

धिस साईड ऑफ पॅराडाईज

सबमिशन ऑफ एम्मा मार्क्स

सन डे आफ्टर्नुन

स्पॅनिश गार्डन

अ डे टु रिमेम्बर

अ लव्ह स्टोरी

द गर्ल विथ अ टर्कॉईज फ्लॉवर

a

असो .

उगाच अभ्यास न करता विकृती विकृती म्हणुन दंगा करण्यात काय अर्थ आहे ? की आपणही #स्वमतांध_दांभिक आहात ?

ट्रेड मार्क's picture

12 Aug 2015 - 8:44 pm | ट्रेड मार्क

महाराज, तुमची परत गफलत होते आहे. इथे कोणीही इंग्रजी चित्रपटातल्या संभोग दृष्यांविषयी फारसं बोलत नाहीये. मुळात सगळे इंग्रजी चित्रपट पोर्नोग्राफिक असतात असा आपला (गैर) समज आहे का?

पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते. बाकी इतर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे नुसतेच २/४ लोक्स एकत्र होतात आणि सरळ सरळ संभोग चालू होतो. यात फक्त penetration ला महत्व असते आणि बाकी काही, म्हणजे चुंबन, मिठी, जोडीदाराच्या शरीराला (हाताने) स्पर्श करणे, संवाद ई ई काही होत नाही. थोडक्यात ज्याला foreplay म्हणतात तो नसतो आणि फक्त संभोग असतो.

आपण जे चित्रपट दिलेले आहेत त्यात हि प्रणय/ संभोग दृश्ये नक्कीच असतील पण विकृत संभोग दृश्ये नसतील. मला वाटतंय की मी समजवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कळलं ठीक नाही तर सोडून द्या.

==उगाच अभ्यास न करता विकृती विकृती म्हणुन दंगा करण्यात काय अर्थ आहे ? की आपणही #स्वमतांध_दांभिक आहात ?==
या वाक्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते

समुद्री चाचे (Budget : $ १०,००,०००) आणि समुद्री चाचे भाग २ : स्टेगनेटीचा बदला (Budget : $ ८०,००,०००)हे दोन नीलसिनेमे पहा. नट, नट्या, कॉमेडी, एक्शन (रोमान्स/प्रणय वेगळा सांगायला नको ) कथा, पार्श्वसंगीत, ग्राफिक्स असे एखाद्या Hollywood चित्रपटातील सर्व मसाला आहे
FYI

नितांत सुंदरतेचा चाहता
कहर

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 1:06 pm | प्रसाद गोडबोले

हेच

पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते.

ह्या विधानावरुन ट्रेडमार्क ह्यांच्या अपुर्‍या अभ्यासाची खात्री पटली !

असो.

पॉर्न आणि इरॉटिका ह्यातील फरक आम्ही व्यवस्थीत जाणतो , आम्हाला नितांत सुंदर 'पॉर्न'च म्हणायचे होते , वरील चित्रपट पाहुन ट्रेडमार्क ह्यांन्नी त्यांचे मत बनवावे .

आणि मुळ विषयाच्या संदर्भाने च आमचा प्रतिसाद होता : पॉर्नविषयीच्या स्वमतांध दांभिकते मुळेच अज्ञानी लोकांन्नी त्यावर बंदी आणली , जी की पुर्ण चुक आहे .

ट्रेड मार्क's picture

13 Aug 2015 - 10:25 pm | ट्रेड मार्क

तुमच्या या विषयातल्या अगाध ज्ञानाची आम्हाला खात्री पटलेली आहे.

पण इथे विषय मी जे विकृत पॉर्न समजतो अश्या चित्रपटांविषयी चालू आहे कारण ज्या सायटी बंद झाल्या होत्या त्यामध्ये विकृत संभोग दाखवलेले होते उदा. लहान मुलांबरोबर, प्राण्यांबरोबर व मानवी अनैसर्गिक संभोग ई ई.

तुम्ही वर उल्लेखलेले चित्रपट सुद्धा त्या सायटींवर असू शकतात पण ते चित्रपट बंदी आणण्यास कारण ठरलेले नाहीत. जाउदे मी काय तुम्हाला सांगणार या विषयात। तुम्ही तर सर्व जाणताच!

संदीप डांगे's picture

12 Aug 2015 - 9:06 pm | संदीप डांगे

तुमचा इरोटिका आणि पोर्न यात नक्की गोंधळ होत नाहीयेना?

मला दोन्ही मधला फरक नक्की माहिती आहे. प्रगो नी जी यादी दिलेली आहे तो Erotica प्रकारात मोडत असेल (मी दिलेल्या यादीतला एकही चित्रपट पहिलेला नाही त्यामुळे नक्की माहित नाही). पण ते ज्या प्रकारे वर्णन करत आहेत त्यावरून तरी मला वाटते की हे Erotica प्रकारातले आहेत.

या प्रकारचे चित्रपट (Erotica) बऱ्याच संस्थळांवर फुकट किंवा विकत मिळतात, ज्यामध्ये हलका फुलका प्रणय असतो, काहींमध्ये संभोग दृश्ये पण असू शकतात जी कलात्मकरीत्या दाखवलेली असतात. वयात आलेल्या मुलामुलींनी या प्रकारातले चित्रपट बघायला काही हरकत नसावी.

पण पॉर्न मध्ये प्रणय नसून फक्त संभोग असतो आणि तो पण अनैसर्गिक असू शकतो (जे X rating वर अवलंबून असते). आणि मला अजूनही असं वाटतंय की या धाग्यावर चर्चा चालली आहे ती आणि जी बंदी घातली होती ती पॉर्न प्रकारच्या चित्रपटांवर (videos वर) आहे.

चुभूद्याघ्या

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 12:34 am | संदीप डांगे

ट्रेड मार्क,

माझा प्रश्न तुम्हाला नसून प्रगोंना होता. तुमच्या प्रतिसादाखाली आला म्हणून गैरसमज झाला असावा.

तरीही तुम्ही जे लिहिलंय ते योग्यच आहे. पोर्न आणि इरोटीका ह्या अगदी दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. प्रगो जे वर्णन करतायत ते इरोटिकाचंच आहे. सुबोधजींनीही ज्या वैद्यकिय उपचारांसाठी पोर्नची मदत घेतात असे सांगितले आहे तेही बहुधा इरोटिकाच असलं पाहिजे.

पोर्नचं आवड/व्यसन ही विकृतीच म्हटली पाहिजे. पण इरोटिकाबद्दल तसं नाही.

असो. इंग्रजी सिनेमा म्हटला की त्यात सेक्सच असणार अशी धारणा असायची पूर्वी. तशीच सेक्स असलेली कोणतीही फिल्म म्हणजे पोर्नच अशीही बर्‍याच लोकांची संकल्पना असेल कदाचित. या चर्चेत आपण नक्की कशाचं समर्थन किंवा विरोध करतोय हे सर्व माननीय सदस्यांनी प्रथम निश्चित करावे.

(मागे एकदा एका चेपू मित्राने फारच मार्मिक प्रश्न विचारला होता. 'जर पोर्न फिल्मचा उपयोग फक्त ५-१० मिनिट असतो तर त्या तास-तासभराच्या का असतात?'. मला वाटतं या प्रश्नातच पोर्न ही विकृती का समजली पाहिजे याचे उत्तर आहे.)

कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय/ करतीये ह्याचा पत्ताच नसतो.

अमान्य कितीतरी प्रचंड कॉमेडी (मूळ हेतुसाहित ) मनोरंजन करणारे विडंबन (parody ) नीलचित्रपट उपलब्ध आहेत. कोण काय पहातो आणि कोणत्या नजरेने याच्यावर सुंदरता आणि अश्लीलता अवलंबून असते.

ट्रेड मार्क's picture

12 Aug 2015 - 8:56 pm | ट्रेड मार्क

आपण X, २X, ३X… ई ई बद्दल ऐकले आहे का? आपण ज्या type च्या चित्रपटांचा उल्लेख करताय ते X (१X) यात मोडणारे आहेत. कधी संधी मिळाली तर ३X किवा त्या पुढचे पण बघा म्हणजे फरक कळेल. थोडे जास्त स्पष्टीकरण वर दिलेले आहे.

अनैसर्गिक संभोग, मनुष्य बरोबर किंवा प्राण्यांबरोबर करायला/ बघायला आवडणारे पण बरेच आहेत. मग त्यांच्या नजरेतून ते सुंदरच बघत असतात. प्रश्न हा आहे की, कोवळ्या मुलांनी अश्या फिल्म्स बघितल्या तर त्यांना हे नैसर्गिक वाटू शकते, हे आपल्याला चालेल का?

जर अश्या सायटी, ज्यात अनैसर्गिक दाखवतात, अश्या बंद केल्या तर जनसामान्यांची काय हरकत असावी? बाकी अनैसर्गिक दाखवण्यासाठी पैसे देवून बघायची सोय ठेवावी. अती-आंबटशौकीनाना तशी सोय करून द्यावी. म्हणजे लहान मुलाना तरी फ्री access राहणार नाही.

३क्ष (क्ष क्ष क्ष ) विडंबन पण असतात राव (शोध म्हणजे सापडेल). उदा. करवत विडंबन (SAW Parody) पोर्न भाग सोडला तरी हसून हसून मुरकुंडी वळते. ब्याटमन क्ष क्ष क्ष, This isnt Xmen, This isnt Herculis इ इ अशी किती उदाहरणे देऊ.

म्हणून म्हणले सुंदरता पहायची नजर हवी

बॅटमॅन's picture

18 Aug 2015 - 5:50 pm | बॅटमॅन

ब्याटमन क्ष क्ष क्ष

आईंग? हे पाहिले पाहिजे.

एखादा गायक जेव्हा गात असतो तेव्हा काही लोक त्याच्या कलेचा आस्वाद घेतात हि सुंदरता आणि काही लोक तो कुठे चुकतोय का याकडे लक्ष ठेऊन असतात हि खरी विकृती (किंवा काही ठिकाणी अश्लीलता).
दादा कोंडकेंना विनोदाचा बादशाह म्हणून डोक्यावर घेणारा वर्ग आहे तसा कमरेखालचे द्वयर्थी विनोद करणारा म्हणून नाव ठेवणारा वर्ग आहेच कि
काही लोक शेणाला पाहून नाक मुरडतात घाण म्हणतात काही त्याच्या गोवऱ्या करून वापरतात काही त्याचे खत बनवून सुंदर बगीचे फुलवतात.
जिथे इतरांना संभोग दिसला तिथे वात्सायन ऋषीना शास्त्र दिसले. खजुराहो घडवणाऱ्याना शिल्प कलेची प्रेरणा दिसली. आपण कशात काय पहातो ते महत्वाचे
म्हणून दादा कोंडके यांचे वाक्य आहे "अश्लीलता पाहणाऱ्याच्या नजरेत असते"

मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही कलाकृती आहे का' हा नसून 'पॉर्नवर बंदी योग्य की अयोग्य' हा आहे.
..तसेही, पोर्न हे थंड शिळ्या कढीला इन्स्टंट ऊत आणण्याचे औजार आहे. उस्फूर्त शृंगाराला कढ 'आणण्याची' गरज नसते. न-वयात त्याचा वापर अनैसर्गिकच !

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 1:22 pm | प्रसाद गोडबोले

मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही कलाकृती आहे का' हा नसून 'पॉर्नवर बंदी योग्य की अयोग्य' हा आहे.

पॉर्न मध्ये नक्कीच काही अंशीतरी कलाकृती असुन सरसकट सर्वांवर बंदी आणणे अयोग्यच आहे . उस्फूर्त शृंगाराला कढ 'आणण्याची' गरज नसते. हे अगदी मान्यच आहे मात्र शृंगार ही सुध्दा एक कला आहे , जी प्रत्येकात उपजत असतेच , पण त्या कलेत प्रभुत्व मिळवायला बाहेरुन मार्गदर्शन मिळत असेल तर काय हरकत आहे ? कामसुत्राचा मुळ उद्देश तोच आहे , आणि आपण हेही लक्षात घेवु की कामसुत्र हा एकमेव ग्रंथ नसुन अन्य देशात अन्य भाषात अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत !
आता काळा सोबत माध्यमे बदलत गेली आणि पुस्तकांच्या जागी ऑडियो व्हिजुअल माध्यमे आली . तत्वाच्या लेव्हलला दोन्हीही सारखेच !
म्हणुनच
पॉर्नवर बंदी अयोग्यच आहे , अगदीच इच्छा असल्यास सरकारने अ‍ॅडल्ट फिल्म रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करावा आणि पॉर्न चित्रपटांचे व्यवस्थित सेन्सॉरिंग करुन मगच प्रदशनाला परवानगी द्यावी !

कहर's picture

13 Aug 2015 - 2:26 pm | कहर

अगदी सहमत. आमचे मुद्दे पोर्न वर बंदी योग्य कारण त्यात पाहण्यासारखे काही नाही असे म्हणणाऱ्यासाठी आहेत . बंदी अयोग्य आहे. कोण कोणत्या दृष्टीने काय पहाते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

सुबोध खरे's picture

14 Aug 2015 - 11:38 am | सुबोध खरे

पॉर्न वर संपूर्ण बंदी आणणे हे दारूबंदी केल्यासारखे आहे. १०० % खात्री कि ती( बंदी) अयशस्वी होईल. त्यातून भ्रष्टाचार आणि काळा बाजाराला आमंत्रण देण्यासाखे आहे. नैसर्गिक उर्मी कितीही दाबली तरी ती वर उसळते तेंव्हा त्याला शिष्ट संमत मार्ग दाखवणे हे आवश्यक आहे. पॉर्न हे अनावश्यकच आहे हा मुद्दा निस्संदिग्ध नाही. ज्याला कामसुख नियमित मिळते त्याने भुकेल्या माणसाच्या भुकेची थट्टा केल्यासारखे आहे.
माझा डॉक्टर मित्र सलग ६ महिने सियाचेन ला अतिउन्चीवर होता. सर्वसाधारणपणे तेथे ३ महिन्यांपेक्षा जास्त कोणाला ठेवत नाहीत. परंतु त्याच्या जागी येणारा दुसरा डॉक्टर बेस कॅम्प वर आजारी पडला( cardiac arrythmia-हृदयाचे ठोके अनियमित झाले) त्यामुळे त्याची जागा घेणारा दुसरा डॉक्टर येई पर्यंत त्याला तेथे राहणे भाग होते. अशा अतिउंच जागी वीज सुद्धा नाही. जवळच्या ५०० किमी मध्ये एकहि स्त्री नाही. सहा महिने कोणत्याही वयाच्या स्त्रीचे दर्शन सुद्धा नाही. अशा असामान्य परिस्थितीत त्याने सांगितले कि पर्वताची बाजूबाजूला असलेली बर्फाच्छादित शिखरे स्त्रीच्या स्तनांसारखी दिसू लागतात. अशा माणसाला तुम्ही काय तुकारामाची गाथा कि दासबोध वाचायला सांगणार? चावट पुस्तके आणि साहित्य हाच एक त्यांच्या भावनांचा निचरा होण्यासाठी उपाय आहे. मग तुम्ही त्याला अश्लील म्हणा अथवा नाही. सहा महिने तीच तीच पुस्तके पाहणे किंवा वाचणे हि गोष्ट सुद्धा कठीण असते. ( विक्रांत वर मैने प्यार किया आणि चालबाज या सिनेमांची शतकि प्रदर्शने झाली होती.होत्या त्याच व्हिडियो फिल्मस (तीस चाळीस होत्या) परत परत पहिल्या जात. महिनोन्महिने समुद्रावर राहिल्यावर काय करणार? तिथे निदान व्हिडियो तरी होता. काही महिन्यानी कोणीतरी "सावन के गीत" म्हणून पावसात भिजलेल्या नायिकांची गाणी असलेली कॅसेट ( काटे नाही कटते दिन ये रात, मंदाकीनीचे राम तेरी गंगा मैली मधील गाणे) आणली. ती तर रात्रंदिवस वापरून झिजून गेली असावी)
बरं अधिकारी वर्ग या गोष्टी सैनिकांशी बोलू शकत नाही . जेवढे "आदानप्रदान" होणार तेवढे त्यांच्या पातळीवरच.
तेंव्हा पॉर्न हे अनैसर्गिक आहे त्यावर संपूर्ण बंदी असावी हे बरोबर नाही.
म्हणून मी परत तेच म्हणतो अनैसर्गिक पॉर्न( बालकांबरोबर संभोग, बलात्कार,प्राण्यांबरोबर संभोग इ ज्यात दुसर्या व्यक्तीची संमती नाही) बाळगणे,पुढे पाठवणे किंवा त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करणे यावर बंदी घालणे आवश्यक आहे. हा गुन्हा असेल तर लोक अनैसर्गिक गोष्टी करू धजणार नाहीत.पण त्यासाठी नैसर्गिक गोष्टी उपलब्ध असणे हि तितकेच आवश्यक आहे.

मुळात मानवी भावना ९ रसांशी सतत निगडीत असतात.

१. हास्य रस

२. अद्भूत रस

३. शांत रस

४. रौद्र रस

५. वीर रस

६. करूणा रस

७. भयंकर रस

८. बीभत्स रस

आणि

९. श्रृंगार

आहारात जसे आपण सगळेच रस आलटून-पालटून वापरतो तसेच ह्या रसांचे पण आहे.

आहारात पण एखाद्याला गोड आवडते तर एखाद्याला तिखट, कुणाला आंबट-गोड.

तसेच ह्या नव-रसांच्या बाबतीत पण व्हायला हवे.विशेषतः "श्रृंगार-रसाच्या" बाबतीत.

कारण इतर ८ रसांपेक्षा, श्रृंगार रस जास्त प्रमाणात मनावर मोहिनी घालतो.

पण हा रस माणसांच्या जीनात प्रवेश करतो तोच मुळी पौंगडावस्थेत आणि तो पण अतिशय चुकीच्या मार्गांनी (सिनेमा, जाहीराती,निळे-पिवळे साहित्य आणि मित्र)

आधीच्या पिढीत इतक्या विपूल प्रमाणत हे साहित्य उपलब्ध न्हवते, पण आमच्या पिढीत १९८२-१९८३ नंतर रंगीत दूरदर्शन संच आले आणि गावोगावी व्हिडिओ पार्लर सुरु झाले. ३-४ रुपयात हिंदी सिनेमे बघण्यापेक्षा ५/- रुपयात निळे सिनेमे बघण्याचे प्रेक्षकांचे प्रमाण वाढले.

सुरुवातीला मुंबई-पुणे इतपतच मर्यादीत असलेले हे क्षेत्र पुढे गावो-गावी पसरले कारण,

१. कमी पैशात गुंतवणूक

२. हमखास येणारा प्रेक्षक वर्ग (कारण दर-वेळी नवे सिनेमे, रोज ६-७ शोज, कधी-कधी १५-१६...होय ही सत्य घटना आहे...ठाणे-मुलुंड भागात सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे शोज चालत असत.)

३. कमी टॅक्स.

४. प्रचंड नफा (एक लाखाचा परतावा, जास्तीत जास्त ५ ते ६ महिन्यात, पुढे फक्त टांकसाळ)

१९९२ नंतर भारतात इंटरनेटचा वापर बर्‍यापैकी वाढला आणि २००० नंतर तो अक्षरशः फोफावला.

युट्युब, टोरांट मुळे घरबसल्या हवा तो कार्यक्रम, आपल्याला हव्या त्या वेळेला, पहायला मिळाला लागला.चांगल्या बरोबर वाईट पण येते,(अणू उर्जे बरोबर अणू बाँब, डायनामाईट===> खडक फोडायला आणि शत्रू सैनिक मारायला) ह्या नियमानुसार, युट्युब आणि टोरांटच्या बरोबर निळ्या सिनेमांचे पण आगमन झाले.

आज १९८३च्या जमान्यात व्हिडिओ पार्लर मध्ये निळे सिनेमे बघणारा प्रेक्षक-वर्ग घरी पण तेच सिनेमे बघतो.

आता तुम्हीच सांगा घरोघरी बाप आणि मुलगा, निळे सिनेमे बघत असेल तर कायदा कितपत आळा घालणार?

आणि मुळात निळे सिनेमे का करायला लागतात?

खरे तर, ज्या देशात वात्सायनाने "काम-शास्त्र" हा उत्तम ग्रंथ लिहिला आणि ज्या देशांत "खजुराहो" सारख्या उत्तम शृंगारीक मुर्ती घडवल्या गेल्या, त्या देशातील समाज एका उत्तम नीती-चारित्र्याचा, घडायला हवा होता.

पण असे झाले नाही.

एकतर परकीय आक्रमण आणि त्यांनी केलेली स्त्रियांची विटंबना आणि त्यांनी स्त्रियांना दिलेली दुय्यम वागणूक.

स्त्रीला उपभोग्य वस्तू समजायचे, तिच्या मताला-भावनांना किंमत द्यायची नाही, हे समाजमनावर ठसवल्या गेले.अद्यापही भारतीय समाज ह्या समजातून १००% बाहेर पडलेला नाही.

आणि

दुसरे कारण म्हणजे,

पौगंडावस्थेत मुला-मुलांची होत असलेली शृंगार-रसाच्या बाबतीतील कुचंबणा.

वयात येतांना पुरुषांना जशी स्त्री शरीराची ओढ असते (शारीरीक लगट), तशीच स्त्रीयांना पण कुणीतरी त्यांच्या भावना समजून घेणारा, त्यांना मित्र म्हणून हवाच असतो.(भावनीक ओढ)

ज्या मुलांना स्त्री मैत्रीण मिळत नाही किंवा ज्यांची वासना जास्त असते, असे पुरुष साहजीकच वेश्यांकडे आणि ते पण नाहीच जमले तर निळे सिनेमे बघण्याकडे वळतात.

वेश्या व्यवसाय ही जशी अशा (श्रूंगार-रसाच्या अधिन झालेल्या) पुरुषांसाठी आवश्यक बाब आहे, तितकीच आवश्यकता अशा पुरुषांसाठी, ह्या निळ्या सिनेमांबाबत आहे.

आधी उल्लेख केल्या प्रमाणे, कुणाला कुठला रस जास्त आवडेल ते सांगता येत नाही.

खजुराहो आणि कामशास्त्राने, जर ह्या भारतीय समाजमानावर परीणाम होत नसेल, तर ह्या निळ्या-पिवळ्या साहित्याने पण नक्कीच होणार नाही.

उगाच निळ्या-पिवळ्या साहित्याला दोष देण्यापेक्षा, स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण, ह्या समाजाला देण्याची जास्त गरज आहे.

मला असा समाज बघायला आवडेल,

की जो.....

१. एकटी स्त्री दिसली तरी एखादी झुंड तिच्यामागे लागणार नाही. (कुवैतमधल्या फाइल नावाच्या उपनगरात, कंपनीच्या गाडीमधून स्वतः बघीतलेले द्रूष्य.(ह्या स्वानुभवर कथा टाकणार नाही.कट्ट्याला मात्र नक्कीच सांगीन.) कुवैत मध्ये निळ्या सिनेमांना बंदी आहे.इतकेच कशाला, सिनेमांमधील चुंबन द्रूष्याला पण बंदी आहे.)

२. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिला आर्थिक दृष्ट्या लुबाडणार नाही.

इथल्या द्रौपदीला वस्त्रे देण्याची वेळ, श्रीकृष्णावर परत येवू नये आणि घरोघरी रावण जन्माला येवू नये, ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.

इथल्या द्रौपदीला वस्त्रे देण्याची वेळ, श्रीकृष्णावर परत येवू नये आणि घरोघरी रावण जन्माला येवू नये, ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.

अगदी अगदी !!!
समाजमन सुदृढ असेल तर पोर्नचा पाचोळा वरच्यावर उडून जाईल !
.....तरीसुद्धा काही बंधने कायद्याने हवीतच, नाहीतर विकृती फैलावण्याला वेळ लागणार नाही.

नाखु's picture

11 Aug 2015 - 3:44 pm | नाखु

समाजमान्य संकेत(याची ढोबळ व्याख्या नसणे) ,योग्य वेळी नेमकी आणि शास्त्रशुद्ध माहीती तीही विश्वासार्ह व्यक्तीं कडून, (वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ) हा एक उपाय असू शकतो !

चर्चा योग्य मार्गक्रमण करीत आहे!!

जेपी's picture

11 Aug 2015 - 3:32 pm | जेपी

उत्तम चर्चा.

कपिलमुनी's picture

11 Aug 2015 - 4:09 pm | कपिलमुनी

१.पॉर्न बघताना किंवा लीगल ठरवताना त्यामध्ये काम करणार्‍यांच्यावर अन्याय होत आहे हा मुद्दा दुर्लक्षला जातोय . मागणी वाढेल तसा पुरवठा वाढेल आणि त्यामुळे शोषण वाढेल . अजूनही बरेच स्त्री पुरूष बळजबरीने हे काम करतात .

२.वाढत्या मागणीने छुप्या कॅमेराने केलेले शूटींगचे प्रमाण वाढते आहे आणि बदनामीमुळे अनेकजण आत्महत्या करत आहेत, लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.

पद्मावति's picture

12 Aug 2015 - 1:26 am | पद्मावति

उत्तम चर्चा आणि प्रतिसाद.
कपिलमुनि - १०० टक्के सहमत.

ट्रेड मार्क's picture

12 Aug 2015 - 1:57 am | ट्रेड मार्क

या व्यवसायात असणाऱ्यांची खालील प्रमाणे वर्गवारी करता येईल -

१. स्वेच्छेने येणारे - असे मुलं मुली / स्त्री पुरुष कि ज्यांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे. आई, वडील, भावंडं, पैसा ई ई सर्व पण तरीही काही तरी वेगळं करायचं किंवा अनुभव म्हणून यात भाग घेतात. उदा. लिओन बाई.
२. कुठल्या तरी व्यसनामुळे ओढले जाणारे - मादक द्रव्यांच्या आहारी गेल्यामुळे लागणाऱ्या जास्तीच्या पैश्यांची सोय करायला काही पण करायला तयार होतात असे.
३. फसवून ओढले गेलेले - लग्नाचं, नोकरीचं किंवा अजून कसलं आमिष दाखवून वा बलात्कार करून त्याचं चित्रीकरण करून धमकी ई ई
४. छुप्या चित्रीकरणाचे बळी - हॉटेल मध्ये किंवा अजून कुठे जोडप्याच्या खाजगी क्षणांचे केलेले चित्रण जालावर उपलब्ध करून देणे.
५. सिनेसृष्टीत यश न मिळालेले - हिरो किंवा हिरोइन होण्यासाठी घर सोडून येतात आणि मग सावज बनतात.
६. पैसे मिळवण्यासाठी मजबूरीने अथवा छानछोकीसाठी - या श्रेणीत पण बरेच लोक्स आहेत. कॉलेजात जाणार्या बर्याच मुली दुसर्या शहरात राहायला गेल्यावर वरच्या कमाईसाठी हा मार्ग स्वीकारतात. तर काहींना घरच्या परिस्थितीमुळे स्वीकारायला लागतो. इथे परदेशात तर कॉलेजच्या फीया
इतक्या आहेत की बर्याच मुली फक्त फी भरण्यासाठी असं काम करतात.

यात पहिल्या वर्गातले लोक्स सोडले तर बाकीच्यांचे आयुष्य उध्वस्तच होते. क्रमांक २ च्या लोकांसाठी सापळे तयार आहेतच. सतत वाढत्या मागणीमुळे तेवढाच पुरवठा पण करायला लागतो, मग क्रमांक ३ आणी ४ चे लोक्स वाढतात. ५ बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे.

राच्याकने - लिओन बाईना म्हणे ८ कोटींचं जाहीरातींच काम मिळालंय. ४ दिवस काम आणि ८ कोटी रुपये… नशीब काढलं हो पोरीने ;)

अविवाहित तरुणांच्या काम जीवनामध्ये पोर्न फार मोलाची भूमिका बजावते. किंबहुना वेश्यागमन आणि पोर्नच ( निलचित्रफिती आणि पिवळी पुस्तके) त्याला 'मोकळं ' होण्यासाठीचे पर्याय म्हणून उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत त्यावर बंदी घातल्याने 'मोकळं' होणं अजूनच जिकिरीच काम होईल. पर्यायाने मुली व स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. बंदीचे हे दुष्परिणाम आपण लक्षात घ्यायला हवेत.
तसेच ज्या पोर्न साहित्यात नैसर्गिक संभोग दाखवतात त्यात विकृती वाढेल असे काहीच नसते उलटपक्षी असे पोर्न हे तणाव नाशकाचं काम करतं.

आनन्दा's picture

12 Aug 2015 - 10:41 pm | आनन्दा

पॉर्न "बघून" कसे काय "मोकळे" होतात बुवा?

हे माहित नसणाऱ्यान्नी आयुष्यभर फक्त पोगो वाहिनी पहाण्यास हरकत नाही

ह घ्या

उदय८२'s picture

11 Aug 2015 - 10:49 pm | उदय८२

सरकारने घाईघाईत बंदी घातली आणि तितक्याच वेगात काढली. या दरम्यान कोणकोणत्या साईट्सवर बंदी आहे याची 825 नावांची लिस्ट वर्तमानपत्रांनी दिलेली.ज्यांना 10-15 साईट्सची नाव माहीत होती त्यांना आयती 825 नाव उपलब्ध करून दिली. मग फायदा कुणाचा झाला?

नाव आडनाव's picture

12 Aug 2015 - 10:01 am | नाव आडनाव

मग फायदा कुणाचा झाला?
इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स चा. खासकरून ३ जी, ४ जी वाले.

खजुराहो आणि कामशास्त्राने, जर ह्या भारतीय समाजमानावर परीणाम होत नसेल, तर ह्या निळ्या-पिवळ्या साहित्याने पण नक्कीच होणार नाही.>>>
खजुराहो आणि कामशास्त्राची आणि हल्लीच्या पोर्न ची तुलना करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते . 'कामशास्त्र'. नावातच शास्त्र आहे त्याच्या .
एवढा तणाव यायचं कारण काय ? दुसरे काही कामधंदे नाहीत का ? पोर्न कितीही बघितलं बघावसं वाटतं . सारखं सारखं तेच बघून जाणीवा बोथट होतात आणि मग अजून वेगळं , फांटसी ,हिंसक बघावसं वाटतं आणि मग ते करून सुधा बघावसं वाटतं त्यामुळे उलट अत्याचाराचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे .
आयला कुठं चाललाय भारतीय समाज ?काही लोक एकवेळच्या अन्न खाण्यासाठी मरतायेत .काही पैशे खाण्यासाठी . काही पोर्न मध्ये बुडून गेलेत . काही ह्या देशाला उध्वस्त कसं करता येईल ह्या प्रयत्नात आहेत . पुन्हा पारतंत्र्य आलं तर आश्चर्य वाटायला नको . लगे रहो . पुढच्या पिढीला आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करतो तेवढे सामाजिक , संस्कारी सुरक्षितता देण्यासाठी करत नाही .

टवाळ कार्टा's picture

12 Aug 2015 - 2:52 pm | टवाळ कार्टा

खिक्क...आप्ले ते कामशास्त्र...दुस्र्यांचे ते पोर्न

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 1:11 am | संदीप डांगे

थोडक्यात सांगतो. कामसूत्र हे विधिवत ड्रायव्हिंगचं मॅन्युअल आहे तर पोर्न हे रॅश, केअरलेस ड्रायव्हिंगचं.

टकाभाऊ, कामसूत्र हा सखोल विचार व अभ्यास करून एका विद्वान माणसाने लिहिलेला एक महान ग्रंथ आहे. त्याची बिनडोक पॉर्नफिल्मशी तुलना करू नका ही नम्र इनंती... ;-)

ज्या पद्धतीने योगातल्या जास्त महत्त्वाच्या बाबी सारून फक्त फुटकळ आसनांनाच योग म्हणून पाश्चिमात्यांनी डोक्यावर घेतलंय तद्वतच कामसूत्रातल्या फक्त आसनांनाच अतोनात महत्त्व दिलं गेलंय.

थॉर माणूस's picture

12 Aug 2015 - 4:54 pm | थॉर माणूस

कामशास्त्र की कामसूत्र?
जे काही असेल ते मुळात तुम्हीतरी नीट अभ्यासलं आहे का? उगा आपलं दिसला शास्त्र शब्द की झाली प्रागैतिहासीक संस्कृतीची जाज्वल्य अस्मिता जागी... खजुराहो मधली काही शिल्पे पहाल तर फेपरे येईल सो कॉल्ड संस्कृतीरक्षकांना. माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळा अभ्यासक्रम कव्हर केलाय त्या शिल्पांमधे. खजुराहोच का, इतर ठिकाणीसुद्धा अशी शिल्पे आहेत.

बाकी कामसूत्रामधेसुद्धा काही अशी सुत्रे आहेत जी आजच्या कायद्यात बसणार नाहीत. मग तुमच्या शास्त्रात बसतात म्हणून चालवायची का ती? एकापेक्षा अधिक लग्ने करणारे देव वगैरे मुद्यांकडे जायलाच नको इतक्यात...

वर म्हणालेत ते बरोबरच आहे, आपले ते शास्त्र दुसर्‍याचा तो थिल्लरपणा.

मुळात पॉर्नबंदी ही संस्कृतीरक्षणासाठी/पिढी वाचवण्यासाठी होती का यावरच मला शंका आहे. ८००+ साईटस बंद करायच्या वर स्वतःच त्यांची यादी प्रसिद्ध होऊ द्यायची, मग बंदीसाठी चाईल्ड पॉर्नोचं कारण द्यायचं (जे योग्य आहे. अशा साईट बंदच करायला हव्यात) आणि तरीही त्यातल्या ७००+ साईट दुसर्‍या दिवशी चालू करून द्यायच्या? नक्की कुणाचा फायदा झाला बरं या सगळ्यात?

उगाच गोंधळ उडवून द्यायचा आणि उडालेल्या धुरळ्यात हवा तो कार्यभाग साधून घ्यायचा विचार तर नव्हता यात?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Aug 2015 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा

संपूर्ण प्रतिसादाशी अगदी पुरेपुर सहमत.

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 12:48 am | संदीप डांगे

थॉर माणूस,

तुम्ही कामसूत्र वाचले असावे असा प्रतिसादावरून अंदाज बांधत आहे. येऊ द्या की एक झकास परिक्षण्/अभ्यास्/माहितीपर लेख.

असो.

तुडतुडी ताई/दादा जे म्हणतायत ते काय अगदीच चुकीचं नाही. खरं तर कामसूत्र आणि पोर्नफिल्म्स यांना एकाच तराजूत तोलणार्‍यांना ना कामसूत्र माहीत ना पॉर्न. अगदी हेक्टरच्या आविर्भावात म्हणावंसं वाटतं की यु नो नथिंग अबाउट कामसूत्र , यु नो नथिंग अबाउट पोर्न.

पण पण पण...

जर कामसूत्रावर भारतीयांना एवढाच अभिमान आहे तर किती भारतीय घरांमधे कामसूत्र आहे? किमान किती भारतीय संस्कृतीप्रेमी लोकांना कामसूत्रात नक्की काय आहे हे तरी माहित आहे? पोर्न ही विकृती आहेच पण संस्कृती असलेलं कामसूत्रही टाळण्याचाच का प्रघात आहे?

वरील प्रश्न तुडतुडी ताई/दादा यांना आहेत.

अर्धवटराव's picture

13 Aug 2015 - 1:17 am | अर्धवटराव

पोर्न ही विकृती आहेच पण संस्कृती असलेलं कामसूत्रही टाळण्याचाच का प्रघात आहे?

हा अगदी नेमका प्रश्न आहे. कामसूत्र टाळल्यामुळेच पॉर्न एक "प्रॉब्लेम" म्हणुन समोर येतं असं म्हटलं तरी चालेल. हे थोडंफार प्रत्येक बाबतीत खरं आहे. इमानदारीने भरपूर पैसा कसा कमवायचा याचं शिक्षण नाहि म्हणुन आर्थीक चोर्‍यामार्‍या, आहारशास्त्राचे नियम अगदी चवीष्ट पद्धतीने कसे पाळायचे हे कळत नसल्यामुळे जंकफूड आणि लठ्ठपणा, रिटायर्ड (वानप्रस्थ ;) ) जीवन स्वच्छंदतेने समाजोपयोगी कसं राबवायचं हे माहित नसल्यामुळे वृद्धांच्या पदरी पडणारा अनादर... हे सर्व एकाच पठडीतलं आहे.