पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.
मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.
लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.
आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.
आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अफलातून प्रतिसाद
+१
डॉक्टर
@श्रीकृष्ण सामंत
A post from FB
अवांतर
मुळीच नाही
डॉक
रस्त्यावर नागवे जाण्याची किती
मिपावरचे या विषया संबंधीचा एक
एकुणच
एकुणच
+११११११११११११११११११११११११११११
नितांतसुंदर पॉर्न!!!
नाही
गफलत
पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे
हेच
बरं ठीकेय
तुमचा इरोटिका आणि पोर्न यात
डांगे साहेब हा प्रतिसाद मला नसावा असं मला वाटतंय…
ट्रेड मार्क,
कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय
हा मात्र कहर आहे!
३क्ष (क्ष क्ष क्ष ) विडंबन पण
ब्याटमन क्ष क्ष क्ष
एखादा गायक जेव्हा गात असतो
मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही
मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही
अगदी सहमत
पॉर्न वर संपूर्ण बंदी आणणे हे
खरे तर ह्या विषयावर जितके लिहावे तितके कमीच.
इथल्या द्रौपदीला वस्त्रे
+१
उत्तम चर्चा.
पॉर्नमुळे होणारे शोषण
उत्तम चर्चा आणि प्रतिसाद.
अगदी खरंय …
अत्यंत रोचक व अवघड विषयावर चाललेली उत्तम चर्चा.
पॉर्न "बघून" कसे काय "मोकळे"
हे माहित नसणाऱ्यान्नी
बंदी
मग फायदा कुणाचा झाला?
खजुराहो आणि कामशास्त्राने, जर
खिक्क...आप्ले ते कामशास्त्र..
थोडक्यात सांगतो. कामसूत्र हे
कामशास्त्र की कामसूत्र?
संपूर्ण प्रतिसादाशी अगदी
थॉर माणूस,
पण पण पण...