पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
9 Aug 2015 - 12:49 pm
गाभा: 

राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.

मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्‍या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.

लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.

आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.

आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्‍यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 2:11 am | संदीप डांगे

अगदी नेमकं बोललात.

फक्त थोडं अजून अ‍ॅडवतो.

'कामसूत्र टाळल्यामुळेच पॉर्न पुढे येतंय' असंच अगदी नसून आज कुणी कामसूत्र पुढे आणले तरी त्यास खास महत्त्व मिळणार नाही. वर मी म्हटल्याप्रमाणे योगाची इतर महत्त्वाची सूत्रे टाळून फक्त आसनांवरच भर दिला जातोय तेच कामसूत्रासोबत झालंय. जे इंस्टंट, चटकदार व जास्त डोकं खाणारे नाही तेच आजच्या उपभोगप्रधान समाजाला हवंय. आणि असा उपभोगप्रधान समाजच भांडवलशाही व्यवस्थेला हवाय. निरंतर ग्रहण करणारा, अजिबात स्वतःचे विचार स्वतः न करणारा.

का कुणास ठावूक पण आजच्या काळात कोणतीही गोष्ट शांतपणे, विधिवत, पुरेपूर आनंद घेत उपभोगली जात नाहीये. त्याचा थेट, प्रत्यक्ष व अर्क असलेला ताबडतोब तहान भागवणारा भागच सतत उपभोगला जातोय. पार पहाटेपर्यंत रंगतदार मैफील सजवायची आज गरज वाटत नाही. ३ मिनिटांत एखादं कडवं गाऊन महागायक व्हा असाच काळ आहे.

साधे वेफर्स, कुरकुरे घ्या. केवळ आंबट-गोड चव आहे. बाकी काहीही नाही. फक्त मेंदूला इंस्टंट झटका देणारी केमिकल रीअ‍ॅक्शन आहे. पूर्ण समाधान, पोषण नाही. पंचवीस वर्षांआधी शाळेबाहेर पेरू चिंचा, बोरे, कैर्‍या, इ. मिळायच्या. ती अशी निसटून जाणारी आंबट-गोड चव पदरात पौष्टीकता भरभरुन टाकून जायची. आता पौष्टीकतेचं कुणालाच पडलेलं नसतं, फक्त ती चव ताबडतोब, सतत व थेट रेंगाळत राहिली पाहिजे बास.

मेंदूचा कीस पाडायला लावणारे बुद्धीबळासारखे खेळ जे मध्ययुगीन काळात अगदी साधारण होते त्याऐवजी कँडी-क्रश, सबवे सर्फर सारखे बिन्डोक गेम्स लाखो लोक तासन्तास खेळत असतात. अगदी वीस वर्षाआधीपर्यंत लोक चौकाचौकात सारिपाट खेळत असायचे. आज कँडीक्रशच्या गेमरीक्वेस्ट पाठवतात.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हेच होत आहे. हे आज बरं वाटत आहे. पण काही काळाने यातून फक्त क्रिया केल्याचं समाधान मिळतं, क्रियेतून समग्र समाधान मिळत नाही हे आणि जुनं मौल्यवान ज्ञान घालवून बसलोय हे लक्षात येईल तेव्हा जग फारच सैरभैर झालं असेल.

लोक म्हणतात, आजचं जग खूप फास्ट आहे. पण ते तसे का आहे, आहे ते खरंच योग्य आहे का याचा कुणीच विचार करत नाही.

काय आहे की जगात बिन्डोक लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. योग, पाकशास्त्र, कामशास्त्र, कला, संगीत, खेळ, इत्यादी जीवन समृद्धतेने जगण्यास आवश्यक अशा गोष्टी ज्या लोकांसाठी निर्माण केल्या होत्या त्यांची संख्या फारच कमी झाली आहे.

मनुष्याचा विशेष गुण म्हणजे मेंदू, तोच हळूहळू कार्यच्युत होत असल्याने सगळ्या समस्या डोकं वर काढत आहेत.

थॉर माणूस's picture

13 Aug 2015 - 10:02 am | थॉर माणूस

काही अंशी सहमत...
कामसूत्रातही लोकांना फक्त पोजिशन्स पहायच्या असतात. मुळात लोकांना त्या आधी आणि नंतरही काही असते हेच कळत नाही, कसे कळणार या बाबतीत एकूण शिक्षणाचा आणि ते घेण्याचा सगळा आनंदच आहे आपल्याकडे. आपल्याला सगळे आधीच माहिती आहे हे दाखवण्यातच धन्यता मानायची आणि मग टेंशन आले की रेल्वे स्टेशनवरच्या जाहीरातींमधले नंबर बघायचे असा प्रकार असतो. :D

पॉर्नच्या बाबतीतही काही वेगळे नाही. फार कमी लोक पूर्ण चित्रपट पहात असावेत. एकतर त्याला पैसे पडतात आणि दुसरं म्हणजे मग चित्रपटाला चुकून स्टोरी असली तरी त्यात लोकांना इंटरेस्ट नसावा. अशा डिमांडमुळेच हे सगळं आता विकृतते कडे झुकू लागलं असावं, डिमांड अँड सप्लाय रुल? सगळ्याच इंडस्ट्रीज मधे लागू होतोय की. ५ मिनीटाची गाणी ३ मिनीटांवर आली, ३ तासाचा चित्रपट २ तासांवर. त्यातल्या साडी, पंजाबी ड्रेस जाऊन पार बिकीनीज आल्या. टेस्ट पेक्षा टी२० प्रसिद्ध होतंय. आपल्याला सगळं इंस्टंट हवंय मग क्वालिटीत थोडा मार खाल्ला तरी चालेल.

थॉर माणूस's picture

13 Aug 2015 - 9:48 am | थॉर माणूस

मोठा अभ्यास वगैरे नाही पण कामसूत्राविषयी लोक इतक्या दबक्या आवाजात आणि तरी अभिमान बाळगत कसे काय बोलतात यातून एक जिज्ञासा निर्माण झाली म्हणून मग माहिती खणण्याचा प्रयत्न करत राहीलो इतकच (ज्याची योग्य माहिती शोधण्यात आणि इतरही खर्‍या शास्त्रीय माहितीपर्यंत पोहोचण्यात मदत झाली. नाहीतर आमच्या बाबतीत लैंगिक शिक्षणाच्या नावाने सगळा उजेडच होता). बाकी आमचा लेख लिहीण्याचा एकूण उत्साह पहाता 'मी लेख नक्की लिहेन, वाट पहा' इतकेच सांगू शकेन. :)

माझा मुद्दाही तोच आहे... पॉर्नला वाईट म्हणताय ना, ठिक आहे म्हणा बापूडे. पण उगाच माहिती नसताना आमचे अमुक शास्त्र कसे भारीच आहे वगैरे वल्गना कशाला आणखी? बरं भारी आहे तर उघडपणे बोलायला का जमत नाही हो? तिथे लगेच टॅबू वगैरे वाटायला सुरूवात. पार गोंधळलेला समाज आहे आपला, वर हे मान्य करायला पण त्रास होतो आपल्याला.

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 1:15 am | संदीप डांगे

कामशास्त्र की कामसूत्र?

>>https://en.wikipedia.org/wiki/Kamashastra

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Aug 2015 - 8:38 am | श्रीकृष्ण सामंत

अजून खूप गोष्टी भारताला पहायच्या आहेत.

"पॉर्नवर बंदी असावी की नसावी" हा जरी चर्चेचा मुळ विषय असला तरी अवांतर गोष्टी डोकावणारच.
सध्या हा पॉर्नचा प्रॉबलेम भारताला भेडसावत आहे आणि बंदी वगैरे प्रश्न डोकं वर काढत आहे. अशाच प्रश्नामधून अमेरिका अंदाजे ३०,३५ वर्षापूर्वी गेली आहे.अशाच चर्चा झाल्या आहेत.चर्चमधे पण हाच चर्चेचा विषय असायचा.

अमेरिका नेहमीच विकसीत होत राहिली आहे.आणि भारत त्यात गुरफटला जात आहे.(America evolves and India gets involved)
ग्लोबल ओपनींगमुळे हे जास्तच होत राहिलं आहे.नाहीपेक्षा मॉल कुठे होते?,escalator-सरकता जिना-कुठे होता?,पिझे कुठे होते,?सेलफोन कुठे होते?,वॉलमार्ट कुठे होतं?,बिएमडब्ल्यू,आवडी,लेक्सस गाड्या कुठे होत्या,? कंप्युटर्स कुठे होते?
आणि आता ज्यामुळे प्रचंड अडतंय ते इंटर्नेट कुठे होतं? ऑनलाईनमुळे तर सर्वच संपलं.

ऑनलाईनचा प्रश्न आला त्यामुळे पॉर्नचा प्रश्न आला आणि बंदीचा प्रश्न आला.
पण थांबा एव्हड्यावरच राहू नका.ह्याच्याच संबंधाने आणखी मोठे प्रश्न येऊं घातले आहेत.त्यावर नक्कीच बंदी येणार आहे.त्यावर नक्कीच चर्चा होणार आहे.

व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क गाजणार आहे.आणि वयात आलेल्या मुलांचा/मुलींचा प्रश्नं पुन्हा भेडसावणार आहेत.
आलं का लक्षात?
नाही ना?
कारण आपण भारतीय फक्त इन्व्हॉल्व्ह होणार आहो.अमेरिका पूर्वीच इव्हाल झालेली आहे.

कदाचीत पेडर रोड,मरीन ड्राईव्हला ह्याचा वापर अगोदरच चालू असेलही.पण हा प्रकार आम-आदमी पर्यंत अजून नक्कीच आलेला नसावा.

"सेक्स टूल्स."
"संभोग साधनं/खेळ"
अमेरिकेत याची केव्हाच दुकानं उघडली आहेत.डाऊन टाऊनमधे प्रकर्षाने दिसतात.पेनीस,व्हायब्रेटर्स,स्टीम्युलेटर्स वगैरे.सहज मिळतात.size as preferred
शिवाय,बाहुला विथ पेनीस,बाहुली विथ व्हजाईन ऍन्ड ब्रेस्ट, हे मिळतील किंवा मिळत असावेत? size as preferred
(निसर्गाने मेंदुला दिलेल्या अचाट कल्पकतेचा आणि देशाने दिलेल्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उपयोग करून सर्व प्रांतात अमेरिका evolve होत असताना हे शक्य झालंय)भारतात जर का एव्हडं स्वातंत्र्य असतं तर भारताकडे कल्पकतेला वाण नाही.पण तेव्हडं स्वातंत्र्य नाही ना!

आणि दहाएक वर्षांनी पुण्यातच,
"पितळे ह्यांचे,संभोग साधने आणि खेळांचे भव्य दुकान"
दुपारी बारा ते तीन दुकान बंद राहिल.आमच्या कुठेही शाखा नाहीत"
असा बोर्ड लागल्यास आश्चर्य वाटायला नको.मी तरी ते पहायला जीवंत नसणार हे निश्चीत.

जरा विनोद जास्तच झाला.पण ह्या विषयावर,कोणताही संकोच न ठेवता(अश्लिलता किंवा कसं),जाणकरानी लिहिलेले प्रतिसाद पाहून,संकोच न ठेवता मी ही लिहिण्याचं थोडं धाडस केलं.

ही खेळणी भारतात इंपोर्ट झाली तर काय करावं?
पहिली बंदी येईल.मग अमुकच टूल्सना परवानगी आहे असं जाहिर होईल.व्यक्तीस्वातंत्र्याचा बोलबाला झाल्यावर हायकोर्टला तसा निकाल द्यावाच लागेल आणि कालांतराने अमेरिकेत आता आहे तशी दुकानं,
पुण्य नगरीत,लॉ कॉलेज रोड्वर,टिळक रोड्वर,कर्वे रोडवर(माफ करा मला पुण्याच्या रस्त्याची तेव्हडी माहिती नाही.)प्रकर्षाने दिसतील.
आणि नंतर पुढे मिपावर चर्चाही होईल.

तुर्तास एव्हडं पुरे!

चिगो's picture

13 Aug 2015 - 1:33 pm | चिगो

ह्या वस्तुंची ऑनलाईन विक्री आता भारतातपण होते, एवढंच सांगु इच्छितो..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2015 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अश्लिल साइट्सवरील बंदी किती योग्य, अयोग्य चर्चेत मिपाकरांनी सकस चर्चा घडवून आणल्याबद्दल आभार. चर्चा घसरु दिली नाही, त्यासाठी आभार. अश्लिल साइट्सवरील सरकारने जवळ जवळ बंदी उठवलीच आहे. ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म' यावर न्यायालयात दहा साइट्सवर जरी बंदी घातली तरी नव्याने साइट्स येतच राहतील असेही सरकारी वकिलाने म्हटले आहे. सुनावनी सुरुच राहणार आहे असे दिसते.

अश्लिल साइट्स बंद केल्याच पाहिजेत असा काही चर्चेचा सुर दिसला नाही. विकृती निर्माण होऊ नये, लहान मुलांना अशा साइट् बघण्यापासून कसे थांबवता येईल याचे तंत्रज्ञान यायला हवे असेही मत दिसले. छुपे चित्रण भविष्यकाळात अधिक धोकादायक ठरतील असे वाटते.

अतिशय संयमाने उत्त्म चर्चेत सहभाग नोंद्वून उत्तम अशी मतं मांडली काही नवा विचार मांडला काही नवीन पैलुही चर्चेच्या निमित्ताने दिसले. सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

ऋतुराज चित्रे's picture

13 Aug 2015 - 11:21 am | ऋतुराज चित्रे

सदाहरित धागामध्ये मी अशा प्रकारचा प्रश्न विचारल होता.
http://www.misalpav.com/comment/706693#comment-706693

सेक्स टॉय / डॉल चे फायदे.

१) वेश्येकडे जाण्याचे प्रमाण घटेल.
२) एड्स सारख्या रोगांची भिती नसेल.
३) स्त्री व पुरुषाची सेक्स फँटासीची भुक पुर्ण होउ शकेल.

सरकारने सेक्स टॉय / डॉलच्या विक्रीला व बाळगायला परवानगी दिली पाहिजे.

तुडतुडी's picture

13 Aug 2015 - 11:56 am | तुडतुडी

जे काही असेल ते मुळात तुम्हीतरी नीट अभ्यासलं आहे का?>>
होय . मी अभ्यासल आहे . तुम्ही अभ्यासलं आहे का?
पोर्न ची एवढी जीव तोडून बाजू घेताना काम्शास्त्रा च्या नावाने ठणाणा करण्याचं कारण हेच दर्शवत कि तुमचा अभ्यास नाही . ना कामशास्त्राचा ना पोर्न चा . काम्शास्त्रात कुठं सांगितलंय कि गरज नसताना , केवळ मोकळं होण्यासाठी , थिल्लरपणा साठी काम्शास्त्राचा वापर करा म्हणून ? आपल्या जोडीदाराला पूर्ण तृप्त करण्यासाठी कामशास्त्राची रचना करण्यात आली आहे .ते हि योग्य वयात, योग्य वेळी . उगीच भडकपणा , किळसपणा , हिंसकपणा कामशास्त्रात कुठंही नाहीये .

संदीप डांगे च्या प्रतिसादांशी सहमत आहे .

थॉर माणूस's picture

13 Aug 2015 - 12:20 pm | थॉर माणूस

>>> मी अभ्यासल आहे . तुम्ही अभ्यासलं आहे का?
हेच... वर एका प्रतिसादाला उत्तर देताना ज्या लोकांचा उल्लेख केला ते. :)

>>>पोर्न ची एवढी जीव तोडून बाजू घेताना काम्शास्त्रा च्या नावाने ठणाणा करण्याचं कारण हेच दर्शवत कि तुमचा अभ्यास नाही .
माझ्या कुठल्या प्रतिसादात तुम्हाला पॉर्नची जीव तोडून बाजू घेतलेली दिसली ते दाखवा आणि मग असले आरोप करा. साधे प्रतिसादाचे रोख कळत नाहीत तुम्हाला, चर्चा काय होणार कप्पाळ. तरीही... कामशास्त्र हे फक्त शिक्षण देणारे एकुलते एक पुस्तक नाहीये, या शास्त्रात त्या काळात कामविषयक होत असलेल्या प्रकार आणि प्रयोगांचे उल्लेखही आहेत. ज्याचा परीणाम म्हणून मग सामुहिक कामप्रयोगाचे उल्लेखही येतात, त्याविषयी मी बोलत होतो. खजुराहोमधे काही थेट बिस्टॅलिटी विभागात बसणारी शिल्पे आहेत त्यांचा संदर्भ देत होतो. गधेगाळ सारख्या शिल्पांचा रेफरन्स कळला नाही तर ती सुद्धा बिभत्स शिल्पेच आहेत (शिव्याच आहेत तशाही त्या) हे खुणावत होतो. उगाच धाग्यावर अशा गोष्टींचा थेट उल्लेख कुणाला दुखावू नये म्हणून टाळतोय तर तुमच्या लक्षातच येत नाही राव.

माझे म्हणणे इतकेच होते की तुम्हाला वाटते म्हणून तुमची मते"च" बरोबर या प्रकारानेच आपले नुकसान होत आले आहे. या सगळ्या पॉर्न हवे की नको प्रकारात मधले माकड मलिदा खाऊन गेले "हा" माझा मुळ मुद्दा होता. आणि सेक्सविषयी "गोंधळलेला समाज आहे आपला, वर हे मान्य करायला पण त्रास होतो आपल्याला." हा माझा मुद्दा होता. पॉर्न बॅन असले काय नसले काय मला शष्प फरक पडत नाही. हेच कामसुत्रासाठी सुद्धा.

बाकी धागाकर्त्याने समारोप केला असल्याने विषय न वाढवता इथेच थांबतो. धन्यवाद.

चिगो's picture

14 Aug 2015 - 1:07 pm | चिगो

प्रतिसाद आवडला.. अस्मितांचे गळू ठणकतात हो कधी कधी.. जाऊ द्या..

जेवण करण हे शरीर जगवण्यासाठी आवश्यक आहे . योग्य आहार , योग्य व्यायाम हे तर फार चांगलं . पण म्हणून प्रमाणापेक्षा जास्त आहार , जास्त व्यायाम , जास्त विचार , किवा कुठलीही गोष्ट जास्त होत असेल तर त्याचे वाईट परिणाम होणारच . तसंच ह्या गोष्टीचं पण आहे . आवश्यकतेपेक्षा जास्त
एक्साइट होणं , नको ते बघणं , नको ते करणं हे शारीरिक, मानसिक , सामाजिक , अध्यात्मिक सगळ्याच दृष्टीने वाईट असतं .
तुम्ही रोज २ तास पोर्न बघत असाल तर दीड तासावर या . काही दिवसांनी १ तास . मग अर्धा . मग काही दिवस अजिबात बघू नका . तुमच्या लक्षात येईल
काही बिघडत नाही पोर्न नाही बघितलं तर . त्यापेक्षा कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी आहेत करण्यासारख्या .

स्वत:वर कंट्रोल असेल तर पोर्न बघून हि काही बिघडत नाही.

तुडतुडी's picture

13 Aug 2015 - 2:58 pm | तुडतुडी

पोर्न बघणं हेच स्वतःवर कंट्रोल नसण्याचं लक्षण आहे . ;-)
बिभ शिल्पेच आहेत>>>
हि बीभत्स शिल्पं कोरण्यामागचं कारण आज कोणाला माहित आहे का ? पोर्न बघण्याचा उद्देश आणि मंदिरांवर अशी शिल्प कोरण्याचा उद्देश ह्यात खूप मोठा फरक असावा . मंदिरांवर कशाला कोण शिल्पं कोरील हो असली त्यात काहीतरी वेगळा उद्देश असणार आहे . त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न कोणीही करत नाही . फक्त तसली शिल्पं आहेत एवढंच बघितलं जातं .

तुम्हाला वाटते म्हणून तुमची मते"च" बरोबर >>>
हे हे हे . मी फक्त माझं मत मांडल आहे . ते मला बरोबर वाटतं . इतरांना बरोबर वाटतं कि चूक ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही . पण
कोणाला बरोबर वाटलंच तर त्यातून फायदाच होणार आहे . तोटा नाही

अजया's picture

13 Aug 2015 - 3:58 pm | अजया

सादर ___/\___

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 6:22 pm | संदीप डांगे

कहर आणि प्रगो व त्यांच्याशी सहमत इतर माननीय सदस्य यांना:

तुम्ही जे नितांतसुंदर पोर्न म्हणताय ते नेमकं काय आहे हे मला तरी कळले नाही. कदाचित माझ्या बघण्यात व विचारात दोष आहे बहुधा.

पण पोर्नबद्दल चुकीचे समज पसरू नये म्हणून थोडे प्रत्यक्ष बोलतो. (सांसदीय भाषेत बसणार नाही पण विषय गंभीर आहे म्हणून...)

दोन्ही अ‍ॅडल्ट फिल्म असल्या तरी पोर्न आणि इरोटिका यात फरक आहे हे वर स्पष्ट केले आहेच. आता पुढे,

प्रचलित पोर्नफिल्म्समधे गुदा-मैथुन, मुखमैथुन, वीर्य-प्राशन, योनित-गुदेत हात व इतर वस्तू घालणे, स्त्री-पुरुषांचे लैंगिक अवयव बांधून फटके देणे, एकाच वेळेस गुदा आणि योनी यात दोन लिंग असणे, या व अशा अनेक अनैसर्गिक क्रिया संभोग म्हणून सादर केल्या जातात. यातल्या कुठल्याच क्रिया दोहोंपैकी कुणालाच नैसर्गिक आनंद देणार्‍या नसतात. त्या फक्त दृश्यात्मक मानसिक परिणाम साधण्यासाठी असतात. म्हणजे हे फक्त बघून उद्दिपीत होता येते. प्रत्यक्ष संभोगात यातून काम-आनंद मिळवणे अशक्य आहे.

मानवी मनाच्या उद्दिपनासाठी अशी प्रक्षोभक दृश्ये कल्पना-पातळीवर (प्युअर फँटसी) राहिली तरच ठिक आहे.पण असे चित्रण अजाणत्या वयात - अशा वयात ज्यामधे प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव येणे केवळ अशक्य गोष्ट असते - कुतूहल म्हणून बघितल्या जाणे एकूण संभोगक्रियेबद्दलची चुकीची मते बनवण्यास कारणीभूत ठरते. असे चित्रण वरचेवर योग्य मार्गदर्शनाशिवाय बघितल्या जाऊन मुलांमधे चुकीचे समज अधिक घट्ट होत जातात. उदाहरणार्थ, ह्या फिल्म्समधे अगदी वीस ते चाळीस मिनिटेपर्यंत पेनिट्रेशन चालू असते. प्रत्यक्षात असे होत नसते हे अनुभवाशिवाय कळायला काय मार्ग असतो? शिवाय एखाद्या मुलाने असं काही वयाच्या १८व्या वर्षापासून बघायला सुरुवात केली, साधारणपणे लग्नापर्यंत (म्हणजे आपल्याकडे २८-३० वर्षे वयापर्यंत) त्याच्यावर ह्याच गोष्टीचा मारा होत राहिला तर बायकोशी वागतांना तो कितीतरी अनैसर्गिक गोष्टींची मागणी करू शकतो. आपण फिल्ममधल्या हिरोसारखे तासभर टिकू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्याच्या मागचे शास्त्रीय कारण शोधण्याऐवजी आपल्यात काहीतरी कमी आहे असा न्यूनगंड घेऊन जगायला लागतो. मुख-मैथून वा गुदा-मैथुनासाठी पत्नी/प्रेयसी तयार होत नाही तेव्हा संबंधांमधे येणारे तणाव-गैरसमज, फिल्ममधे दाखवल्यासारख्या स्त्रिया प्रत्यक्षात वागत नसतात. हेही फार उशिरा लक्षात येते. विवाहपूर्व समुपदेशन ह्या घट्टे पडलेल्या मनावर परिणाम करू शकत नाही.

मुळात अशाप्रकारच्या चित्रणांमुळे संभोगाचा मूळ उद्देश व साध्य पार कुठच्या कुठे दूर पडतं आणि दाम्पत्य विविध मानसिक-शारिरीक तणावांना सामोरे जातं जे ते कुठेच बोलू शकत नाहीत.

पोर्नमधे दाखवतात तसं काही प्रत्यक्षात नसतं पण हे इथं बोलणं म्हणून ठिक आहे. बेडरूममधे ज्यांना सामोरे जावं लागतं त्यांच्या मानसिकतेला ते माहित असेलच असं नाही. कारण योग्य आणि अयोग्य याची कुठेच, कुणीच ओळख करून देत नाही. वडिलधार्‍यांनी सगळा अनुभव घेऊन शहाणे झाले असतात पण 'पाण्यात पडलं की पोहायला येतं' असं म्हणून मार्गदर्शन करायचे टाळतात. पण पोहणे म्हणजे बाँडपटात दाखवल्यासारखे एक श्वास घेऊन पाण्याखालीच १० मिनिटे राहणे असते असे एखाद्या मुलाला वाटत असेल तर तो मरेलच.

बर्‍याच जणांना योग्य ते सांगूनही पटत नाही. का तर फिल्ममधे दाखवतात ते खोटं कसं असेल असा भाबडा आणि मूर्ख विचार. बर्‍याच जणांना संभोग हा द्वी-मार्गी रस्ता आहे हेच कळत नाही. स्त्रिया आपल्या मनातल्या कल्पना वापरून पाहण्याचे फक्त साधन आहेत असंच त्यांना वाटतं. चावी फिरवली की गाडी सुरू होते तसे आपण हात लावला की मुली लगेच पेटून आपल्या पँटला हात घालतील अशा काय काय महान कल्पना असतात मुलांच्या. स्त्रिया ह्या फक्त उपभोग्य वस्तू आहेत असे यच्चयावत माध्यमांतून मांडले जात असतांना अशा विचारांवर अखेरचा खिळा मारण्याचे काम ह्या पोर्न-फिल्म करतात.

या सगळ्यांचे परिणाम भयानक आहेत कारण ते कुठेच दिसून येत नाहीत. उद्ध्वस्त होण्याची शेवटची पायरी गाठेपर्यंत लक्षात येत नाहीत. काही लोक अनुभवाने शहाणे होतात पण सुरुवातीलाच अनोळखी दाम्पत्यामधे तणाव निर्माण होणे दिर्घ-आयुष्यासाठी योग्य ठरत नाही.

आपल्याकडे टीनेज-सेक्स पाश्चात्यांच्या प्रमाणात होत नाही. बहुसंख्य लोक फार उशिरा लग्न करतात. वयात आल्यापासून ज्या कारणासाठी वयात आलोय त्याची फक्त स्वप्ने बघत मुले १० ते १८ वर्षे काढतात. या सर्व काळात कुणाशी वारंवार संभोग होण्याची व त्यातून काही शिकण्याची संधी फार क्वचित लोकांना मिळते.

मी दहावीत असतांना माझ्या वर्गातल्या काही मुलांनी घरी वीसीआर आणून ह्या फिल्म्स बघण्याचे उद्योग केले होते. त्यांची वर्गणी देण्याची ऐपत नसल्याने मी त्यात सामिल नव्हतो. पण त्या मुलांच्या एकूणच सर्व स्त्रियांकडे पाहण्याच्या झटकन बदलेल्या नजरा अजूनही लक्षात आहेत. असंच दृश्य बालक-पालक मधेही दाखवलंय जे अक्षरशः खरं आहे.

याच चुकीच्या कल्पनांचा कसा पगडा असतो हे एका उदाहरणावरून सांगतो. एडस व सुरक्षित शरिरसंबंध याबद्दल संशोधन व जनजागृती करणार्‍या एका निमसरकारी संस्थेचे अधिकारी जेजे मधे एका स्पर्धेच्या आयोजनासाठी आले होते. त्या पोस्टर स्पर्धेविषयी विस्तृत माहीती देत असतांना एक किस्सा त्यांनी सांगितला. अनेक लोक त्यांच्या कडे लैंगिक समस्या घेऊन येतात. त्यापैकी एकजण म्हणाला, की "डॉक्टरसाहेब, कायतरी औषध द्या भारीपैकी. अहो पाच मिनिटाच्या वर टिकत नाही मी" डॉक्टर त्याला शांतपणे म्हणाले, "घड्याळ आहे तुझ्याकडे. इथेच जरा पाच मिनिटे होइस्तोवर त्याकडे बघ शांतपणे. बघ ती पाच मिनिटे किती असतात ती मग अंदाज बांध की तू खरंच शिघ्रपतनाचा रूग्ण आहेस का."

वरील सर्व प्रतिसाद लग्न होऊन दोन-चार मुले झालेल्या लोकांबद्दल नाही. त्यांना गरजही नाही. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत योग्य वेळेत योग्य माहिती पोचणे आवश्यक आहे. मिसळपाव वाचणार्‍यांमधे अजून वर्जिन असलेली, नुकतीच वयात आलेली मुले-मुली असतील, तेही वाचत असतील. इथे कशाचेही समर्थन करतांना त्या कोवळ्या मनाचा विचार करणे आवश्यक आहे. सगळे अनुभव घेऊन जगाला शहाणपणा शिकवणे फारच सोपे असते. पण योग्य मार्गदर्शन करणे फार कठीण.

इथल्या जाणकार डॉक्टरांना जास्त खात्रीशीर आणि योग्य शास्त्रिय माहीती असेलच त्यामुळे त्यांना नम्र विनंती की त्यांनी याबाजूवर प्रकाश टाकणारे प्रतिसाद द्यावेत.

बाकी, प्रत्येकाची आवड काय असावी व काय पाहावे, पाहू नये हा मुद्दा माझ्यादृष्टीने कायमच कुठल्याही वादाच्या पलिकडे आहे.

ट्रेड मार्क's picture

13 Aug 2015 - 10:56 pm | ट्रेड मार्क

विस्तृतपणे लिहिल्याबद्दल आभारी आहे. मला पण लिहायच होतं , पण वेळेअभावी राहिलं . इथेच काही लोकांच्या पॉर्न बद्दलच्या समजुती वाचून स्तंभित झालो आणि करमणूक पण झाली. ८० दशकामध्ये कोवळी मुलं जशी सामान्य हिंदी चित्रपटांमधील प्रणय बघून, किंवा पूर्ण कपड्यातली (आजच्या मानकाप्रमाणे) ओलेती नायिका बघून काहीतरी भारी बघितलय अशी समजूत करून घ्यायची त्याची आठवण झाली (मी पण त्यातच होतो म्हणा). पण अजूनही काही लोक्स तसे आहेत हे बघून जग काही फार वाईट झालय असं वाटत नाही.

थोडक्यात विकृत पॉर्नवर बंदी असावी पण जे प्रणयरम्य किंवा नितांतसुंदर प्रणय असलेले चित्रपट असतात त्यावर बंदी नसावी, ते बघणे/ दाखवणे हे ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीवर सोडावे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 7:29 am | अत्रुप्त आत्मा

@मिसळपाव वाचणार्‍यांमधे अजून वर्जिन असलेली, नुकतीच वयात आलेली मुले-मुली असतील, तेही वाचत असतील. इथे कशाचेही समर्थन करतांना त्या कोवळ्या मनाचा विचार करणे आवश्यक आहे. सगळे अनुभव घेऊन जगाला शहाणपणा शिकवणे फारच सोपे असते. पण योग्य मार्गदर्शन करणे फार कठीण. >> ज्जे ब्बात!

काही वेळासाठी मानून चालू कि तुमचा प्रतिवाद अगदी योग्य आहे.

पण मग त्याच न्यायाने बरेच hollywood आणि bollywood सिनेमांवर सुद्धा बंदी आणावी लागेल.
उदाहरण घ्यायचे तर बाहुबलीचे घेऊ. कुटुंबासहित पहावा असा चित्रपट. त्यात नायक १०० फुटी धबधबा चढताना दाखवला आहे. (१०० वेळा खाली पडतो) पण शेवटी चढून जातो. तिकडे असलेल्या सुंदर युवतीला भेटायला. बर ती युवती त्यांच्या पहिल्या भेटीत रागावलेली असते पण तो तिला (कुठे कुठे नि कसे कसे) स्पर्श करतो आणि रागाची परनिती प्रेमात आणि प्रणयात होते (आजवर प्रथम दर्शनी प्रेम असायचे आता प्रथम दर्शनी प्रणय हि आहे)
धूम २ मध्ये ह्रितिक आंतरराष्ट्रीय चोर असतो(तरी एकदम कुल डूड जीवन सरणी जगत असतो) तरी शेवटी पोलिस (अभिषेक) त्याला सोडून देतो. कहो ना प्यार है मध्ये तो गरीब असतो पण गिटार वाजवून गाणे म्हणल्यावर श्रीमंतांच्या मुली त्याच्यासाठी मरायला आणि मारायला तयार होतात.
या व्यतिरिक्त कितीतरी चित्रपट चोरी करणारा लहान नायक (नावे पडल्यानंतर) एकदम मोठा श्रीमंत व्यक्ती बनलेला दाखवला आहे.

काही प्रत्यक्षात नसतं पण हे इथं बोलणं म्हणून ठिक आहे. बेडरूममधे ज्यांना सामोरे जावं लागतं त्यांच्या मानसिकतेला ते माहित असेलच असं नाही. कारण योग्य आणि अयोग्य याची कुठेच, कुणीच ओळख करून देत नाही. वडिलधार्‍यांनी सगळा अनुभव घेऊन शहाणे झाले असतात पण 'पाण्यात पडलं की पोहायला येतं' असं म्हणून मार्गदर्शन करायचे टाळतात. पण पोहणे म्हणजे बाँडपटात दाखवल्यासारखे एक श्वास घेऊन पाण्याखालीच १० मिनिटे राहणे असते असे एखाद्या मुलाला वाटत असेल तर तो मरेलच.

बर्‍याच जणांना योग्य ते सांगूनही पटत नाही. का तर फिल्ममधे दाखवतात ते खोटं कसं असेल असा भाबडा आणि मूर्ख विचार

.
कितीतरी उदाहरणे देत येतील. करीना ची झिरो फिगर किंवा जाक्लीन चे एब्स पाहून किंवा ह्रितिक जोन ची बोडी पाहून अनेकांना जोडीदार असा असावा असे वाटते त्यातूनही कौटुंबिक कलह होतात. नवऱ्याचे पोट सुटले म्हणून बायका रुसून बसतात.

आणि हे चित्रपट तर १८ व्या वर्षाच्या फार आधीपासून म्हणजे बोलायला हि येत नाही त्या वयापासून पाहिले जातात. यावर हि बंदी हवी का ?

अमेरिकेत child pornography वर बंदी आहे पण ज्याला ती पहायचीच आहे तो कोठून हि शोधून पाहतोच. कारण विकीपेडीया वर pornography genre मध्ये child pornography चा उल्लेख आहे. याचा अर्थ विकी पेडिया वर सुद्धा बंदी हवी. google वर how असे लिहिले कि "how to get pregnent" हा पहिला सल्ला येतो. त्यावर सुद्धा बंदी हवी. हो ना

हि बंदी म्हणजे पाय भाजतात म्हणून रबराचा रस्ता बनवा म्हणणाऱ्या राजकुमारच्या गोष्टी सारखे झाले. अरे त्यापेक्षा स्वताच्या पायात चप्पल घालणे जास्त सोपे नाही का. Child lock असते, Site prohibited करता येतात. वैयक्तिक अनेक मार्ग आहेत मुलांवर संस्कार घालायचेच असतील तर. आणि १८ व्या वर्षापर्यंत संस्कार घातले म्हणजे तो सुगुणी बाल होईल अशी काय गारंटी . कारण २५ व्या वर्ष नंतर दारू आणि सिगारेट चे व्यसन लागणारे जास्त असतात.

बाकी मी आधी आणि या आधीच्या अनेक प्रतिसादात म्हणले तसे. कशात काय पहायचे आणि कशावर लक्ष द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न …

चिगो's picture

14 Aug 2015 - 1:24 pm | चिगो

काही अंशी तुमच्या म्हणण्याशी सहमत.. म्हणजे चित्रपटात जे दाखवतात, ते अशक्य आहे हे मान्य, आणि ते तिथेच सोडायचं असतं हे पालकांनापण कळतं आणि ते मुलांनापण सांगतात तसं.. लैंगिक विषयांवर बोलतो का आपण खरंच? दुसरं म्हणजे पौगंडावस्थेत 'मर्दानगी'च्या काहीच्या काही कल्पना असतात मुलांच्या आणि त्या अश्या 'मुर्त'स्वरुपात चित्रीत झालेल्या पाहील्या की त्याचाच विचार सुरु होतो. मग जर त्या अजस्त्र फँटसीज पुर्ण झाल्या नाहीत (होणे शक्यही नसते म्हणा) की मग वर डांगेसाहेब आणि डॉ. खरे म्हणतात तसा न्युनगंड येऊ शकतो. कळतं पण वळत नाही हो लोकांना..

बाकी मी तर चित्रपट तारे-तारकांच्या शरीरसौष्ठवालापण त्यांची 'करीयर इन्वेस्टमेंट' मानतो, आणि त्यामुळेच त्यांच्याशी तुलना किंवा बरोबरी करण्याची प्रयत्न करणार्‍या युवक-युवतींना, ज्यांची जगण्याची धडपड/मार्ग सर्वसामान्य आहे, त्यांनी शहाणे व्हावे असंच म्हणेन..

सस्नेह's picture

14 Aug 2015 - 11:24 am | सस्नेह

अत्यंत मार्मिक आणि चपखल प्रतिसाद !
विकृती ही विकृतीच असते, तिची कलाकृती बनू शकत नाही. आणि तिला कलाकृती समजणारे विकृतच म्हटले पाहिजेत.
पॉर्नवर बंदी नाही, तरी कंट्रोल निश्चितच असला पाहिजे. नपेक्षा विकृती हीच संस्कृती म्हणून मिरवू लागेल आणि पीडितांच्या यातनांना पारावर राहणार नाही....

चिगो's picture

14 Aug 2015 - 1:11 pm | चिगो

सलाम स्विकारावा, डांगेसाहेब.. जबराट प्रतिसाद..

डांगेसाहेब, अत्यंत परफेक्ट विवेचन.

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2015 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही जे नितांतसुंदर पोर्न म्हणताय ते नेमकं काय आहे हे मला तरी कळले नाही. कदाचित माझ्या बघण्यात व विचारात दोष आहे बहुधा.

ओके . बहुतेक बघण्यात किंव्वा विचारात दोष नसुन आपण खरेच सुंदर चित्रपट पाहिलेले दिसत नाहीत असा एक अंदाज बांधत आहे . मी आधी दिलेल्या लिस्ट मधील काही चित्रपट पाहुन आपले मत कळवा .

आपं म्हणता तसे की पॉर्न आणि इरॉटिका ह्यात गोंधळ होत आहे आणि मीही हेच म्हणत आहे . मी कोठेही चाईल्ड पोर्नोग्राही अथवा वाईल्ड सेक्स ला समर्थन दिले नाहीये , ती विकृतीच आहे हे परत बोल्ड करत आहे .

प्रचलित पोर्नफिल्म्समधे गुदा-मैथुन, मुखमैथुन, वीर्य-प्राशन, योनित-गुदेत हात व इतर वस्तू घालणे, स्त्री-पुरुषांचे लैंगिक अवयव बांधून फटके देणे, एकाच वेळेस गुदा आणि योनी यात दोन लिंग असणे, या व अशा अनेक अनैसर्गिक क्रिया संभोग म्हणून सादर केल्या जातात. यातल्या कुठल्याच क्रिया दोहोंपैकी कुणालाच नैसर्गिक आनंद देणार्‍या नसतात. त्या फक्त दृश्यात्मक मानसिक परिणाम साधण्यासाठी असतात. म्हणजे हे फक्त बघून उद्दिपीत होता येते. प्रत्यक्ष संभोगात यातून काम-आनंद मिळवणे अशक्य आहे.

ह्याला १००% अनुमोदनच आहे , माझा मुद्दा इतकाच आहे की हे सारे वगळुनही नीलचित्रपट बनवता येतो , आणि त्याला नीलचित्रपटच म्हणतात , इरॉटिका नाही , आणि आपण तसा एक तरी चित्रपट पाहिला आहे का असा माझा प्रश्न आहे !

मिसळपाव वाचणार्‍यांमधे अजून वर्जिन असलेली, नुकतीच वयात आलेली मुले-मुली असतील, तेही वाचत असतील. इथे कशाचेही समर्थन करतांना त्या कोवळ्या मनाचा विचार करणे आवश्यक आहे. सगळे अनुभव घेऊन जगाला शहाणपणा शिकवणे फारच सोपे असते. पण योग्य मार्गदर्शन करणे फार कठीण.

कशाचेही नाही तर फक्त नितांत सुंदर अशा नीलचित्रपटांचे समर्थन करीत आहे . बालक पालक ह्या अनुभवतुन स्वतः गेलो असल्याने मला माहीत आहे की विचार कसे बदलतात ते ,आणि म्हणुनच उगाच चोरुनमारुन काहीतरी विकृत चित्रपट पहाण्या पेक्षा , प्रणयाचे उत्कृष्ठ चित्रण असणारे चित्रपट योग्य वयातील मुलांच्या हातात यावेत असे मला वाटते .

आणि म्हणुनच पॉर्न वर बंदी घालण्या पेक्षा त्यांचे योग्य रिस्त्या सेन्सॉरींग करुन ,केवळ नैसर्गिक आणि सुंदर चित्रणास प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नसावी .

स्त्रिया ह्या फक्त उपभोग्य वस्तू आहेत असे यच्चयावत माध्यमांतून मांडले जात असतांना अशा विचारांवर अखेरचा खिळा मारण्याचे काम ह्या पोर्न-फिल्म करतात.

ह्या वाक्यावर मात्र हसु आले , हे जनरलायझेशन खुपच जास्त झाले , प्रणय स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान आनंददायी असतो , प्रणयाचे निखळ चित्रण पहाणे दोघांनाही आनंददायीच असते , उपभोग्य वस्तु तर स्त्री आणि पुरुष दोघेही असतात !!

असो : सारांश इतकाच की बहुतेक ... बहुतेक .... आपण एकही सुंदर नीलचित्रपट पाहिला नसावा केवळ विकृत चित्रपट पाहिल्याने असे एकांगी मत बनले असावे असा माझा अंदाज आहे .

आणि जाता जाता ही कोणी तरी दिली आहे तीच उपमा : की पॉर्न बंदी ही दारु बंदी सारखी आहे - ज्यांन्नी देशी दारु पिवुन लोकं संसार उध्वस्त करताना , बायका पोरांन्ना मारताना , विषारी दारु पिवुन मरताना पाहिली आहेत ते दारु बंदीचे समर्थन करील मात्र ह्यांनी १८-२०-३० वर्ष जुनी सिंगल्माल्ट स्कॉच पिली आहे , ते त्याचा विरोध करतील ! ज्यांनी केवळ विकृत पॉर्न पाहिले आहे ते पॉर्नबंद्दीचे समर्थन करतील आणि ज्यांन्नी सुंदर पॉर्न पाहिले आहे पॉर्न बंदीचा विरोध करतील .

प्रश्न इतकाच आहे की

तुम्ही १८-२० वर्ष जुनी सिंगल्माल्ट स्कॉच पिली आहे का ?

कहर's picture

14 Aug 2015 - 2:51 pm | कहर

ज्यांनी केवळ विकृत पॉर्न पाहिले आहे ते पॉर्नबंद्दीचे समर्थन करतील आणि ज्यांन्नी सुंदर पॉर्न पाहिले आहे पॉर्न बंदीचा विरोध करतील .

१००% सहमत

ज्या सायटींवर विकृत चित्रण होते त्यांच्यावर बंदी होती. आता त्याच सायटींवर नितांतसुंदर पॉर्न पण असणारच आणि ओल्याबरोबर सुकं पण जळतं तसंच झालं असावं.

इतर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे नसावी, फक्त विकृत असेल तर बंदी असावी.

प्रश्नाचे उत्तर - कमी प्रमाणात आणि कधीतरी प्यायली तर दारू ठीक आहे. १८/२० वर्षे जुनी सिंगल माल्ट रोज एक खंबा प्यायली तर ते वाईटच आणि देशी कधीतरी प्यायली तरीही वाईटच.

सुबोध खरे's picture

14 Aug 2015 - 6:54 pm | सुबोध खरे

देशी आणी सिंगल माल्ट एकाच पातळीच्या( चांगल्या किंवा वाईट) आहेत. देशी दारू म्हणजे ४५% मद्यार्क (अल्कोहोल -उसाच्या मळीपासून काढलेला), बाकी पाणी आणी चवीला आणी स्वादासाठी नारिंगी किंवा लिंबाचा अर्क.लोकांनी विषारी हातभट्टी किंवा तत्सम दारू लोकांनी पिऊ नये म्हणून सरकारने लोकांना उपलब्ध केलेला स्वस्त पर्याय. सिंगल माल्ट केवळ विदेशी म्हणून चांगली हे चूक आहे.
हातभट्टी वाईटच. केंव्हा वरचे तिकीट कटेल सांगता येणार नाही.

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2015 - 7:03 pm | प्रसाद गोडबोले

देशी आणी सिंगल माल्ट एकाच पातळीच्या( चांगल्या किंवा वाईट) आहेत.

लोल ! हे म्हणजे बोट आणि तराफा सारखा असतो म्हणण्या सारखे झाले डॉक्टर !

मी तराफ्यावर होतो तेव्हा =))

कृ. हलके घ्यावे =))

सुबोध खरे's picture

14 Aug 2015 - 11:19 pm | सुबोध खरे

काय आहे प्र गो साहेब
मोलकरणीच्या नवर्याने प्यायली कि दारू होते आणि आपल्या जावयाने प्यायले कि ते ड्रिंक असते.
आपण तसे बरेच दांभिक आहोत.
पण यकृताला हे कळत नाही कि येणारे अल्कोहोल हे देशी दारूतून येते आहे कि सिंगल माल्ट मधून. पण भारतात मेला कि दारू ने लिव्हर खराब होऊन मेला आणि इंग्लंड फ्रांस मध्ये इथेनॉल इंड्यूसड लिव्हर डिसीज म्हणायचे.
असो. हलके घ्या बरं आणि इगो प्रॉब्लेम करू नका

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Aug 2015 - 8:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ळॉळ!!! हसुन हसुन ळोळलो!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2015 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे

खळ्ळ् खट्याक !

यकृताला हे कळत नाही कि येणारे अल्कोहोल हे देशी दारूतून येते आहे कि सिंगल माल्ट मधून.

माणसाच्या लिव्हरमध्ये ब्रेन नसतो त्यामुळे हे कन्फ्युजन होत असावे :) ;) =))

पिलीयन रायडर's picture

16 Aug 2015 - 5:06 am | पिलीयन रायडर

ठ्ठो!

रहावलंच नाही!!

प्यारे१'s picture

16 Aug 2015 - 4:26 pm | प्यारे१

___/\___

लै बॉल सोडून दिल्यावर शेवटी स्टेपडाऊन करुन हाणलाच. ;)
बॉलर ने नाराज न होता पुन्हा बोव्ल(असंच ना?) करावं.

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2015 - 5:45 pm | प्रसाद गोडबोले

काय आहे प्र गो साहेब
मोलकरणीच्या नवर्याने प्यायली कि दारू होते आणि आपल्या जावयाने प्यायले कि ते ड्रिंक असते.

पण तरीही तुम्ही उल्लेख करताना 'मी बोटीवर होतो तेव्हा' असाच उल्लेख करता , 'मी तराफ्यावर होतो तेव्हा ' असा उल्लेख करत नाही , तसेच पॉर्न चे आहे ... काही जण( पक्षी मोलकरणीचे नवरे) सरसकट विकृती म्हणतात तर काही जण ( पक्षी जावई ) मोजकी विकृती अन काही कलाकृती म्हणतात ...

आपण तसे बरेच दांभिक आहोत.

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ... हे तर सगळ्यांनाच माहीत आहे =))

पण यकृताला हे कळत नाही कि येणारे अल्कोहोल हे देशी दारूतून येते आहे कि सिंगल माल्ट मधून. पण भारतात मेला कि दारू ने लिव्हर खराब होऊन मेला आणि इंग्लंड फ्रांस मध्ये इथेनॉल इंड्यूसड लिव्हर डिसीज म्हणायचे.

समुद्राला कळत नाही की बुडणारा माणुस बोटीवरुन बुडत आहे की तराफ्यावरुन . तराफ्यावरुन पाण्यात पडुन मेला तर बुडुन मेला म्हणतात अन बोटीवरुन पडुन मेला तर बायॉन्सी डिव्हाईसेस / लाईफ जॅकेट इनॅव्हिबिलिटी म्हणायचे !!

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !!

असो. हलके घ्या बरं आणि इगो प्रॉब्लेम करू नका

इगो चा प्रश्नच नाही ... मी बोटी पाहिली असल्याने मला तराफा आणि बोटीतला फरक कळतो , तुम्ही मात्र सगळ्यालाच तराफा म्हणायचे अन त्यावर बंदी घालायची असे म्हणत आहात !!

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2015 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले

हे पहा :

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/govt-to-unban-all-porn-sit...

आधी ८५७ वेब साईट वर बंदी घातली होती , लोकांन्नी दिलेल्या दणक्या नंतर सुमारे ७०० वेबसाईट वरील बंदी उठवली गेली ! तुमच्या नितांतसुंदर पॉर्न वर बंदी आणलीच नव्हती हो. ह्या विधानावरुन परत एकदा अभ्यास कमी पडतोय हेच अधोरेखित होतय !!

प्रश्नाचे उत्तर - कमी प्रमाणात आणि कधीतरी प्यायली तर दारू ठीक आहे. १८/२० वर्षे जुनी सिंगल माल्ट रोज एक खंबा प्यायली तर ते वाईटच आणि देशी कधीतरी प्यायली तरीही वाईटच.

प्रश्ण काय ? ... उत्तर काय ? सिंगल माल्ट स्कॉच पिली आहे का तर म्हणे दारु वाईटच !
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ... सिंगल माल्ट स्कॉच पिली आहे की नाही ह्याचे हो का नाही मधे उत्तर द्या ना , नंतर ठरवु तुमच्या "दारु वाईटच" ह्या मताला किती किंमत द्यायची ते !!

तोच न्याय उलटा पण लावता येईल कि. गव्हाच्या पोत्यात खडे येतात तेव्हा आपण खडे बाजूला काढून गहू निवडावे. खडे असतात म्हणून गहू आणूच नयेत असे थोडीच करतो आपण

आणि ओल्याबरोबर सुके कसे जळेल राव सुक्याबरोबर ओले पण जळते

ट्रेड मार्क's picture

17 Aug 2015 - 6:50 am | ट्रेड मार्क

तुमच्या बुद्धीबाहेरचं आहे. तुम्ही तुमचं नितांतसुंदर **** बघत रहा, मज्जा करा. सिंगल malt प्या किंवा देशी… इथे आम्हाला काय फरक पडतोय! तुमची पॉर्न या विषयावर PHd का असेना, आम्हाला काय करायचय. बंदी नाहीये आता… त्यामुळे मोकळं रान आहे…

काही लोकांशी चर्चा करण्यात पण काही अर्थ नसतो, त्यामुळे चालुद्या.

बंदी उठली म्हणल्यावर तुम्हीही कधीतरी टेस्ट करा सेलेक्टीव पोर्न (अविकृत) . थंड व्हाल स्ट्रेस कमी होईल शांती मिळेल मनाला, विचार बदलतील आणि म्हणी चुकणार हि नाहीत.
( सदर प्रतिक्रिया पोर्न चे फायदे तोटे यात सदरात न धरावी हि विनंती)

(नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार) मज्जा करणारा, सिंगल माल्ट पिणारा,मोकळ्या रानातला

Dr. कहर

ट्रेड मार्क's picture

17 Aug 2015 - 5:59 pm | ट्रेड मार्क

तुम्ही मला का सांगताय मी काय करायचं ते? तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, बघा नाही तर भाग घ्या, ज्यानी तुम्ही शांत व्हाल ते करा. पण बाकीच्यांना कशाला उगाच सल्ले देताय? आणि वैयक्तिक टीका किंवा दुषणे देत जाऊ नका.

दुसरं म्हणजे, म्हण चुकलेली नहिये, मुद्दामच तशी लिहिलेय.

उगाच विषय सोडून मला चर्चा करण्यात स्वारस्य नाही आणि वैचारिक गोंधळ असणारयांबरोबर तर अजिबात नाही.

बघा नाही तर भाग घ्या, ज्यानी तुम्ही शांत व्हाल

हि वैयक्तिक टीका

वैयक्तिक टीका किंवा दुषणे देत जाऊ नका.

हे मत

वैचारिक गोंधळ

कोणाचा ?

संदीप डांगे's picture

16 Aug 2015 - 8:23 pm | संदीप डांगे

मी काय पाहिले किंवा नाही पाहिले या वैयक्तिक बाबीवर जर ही चर्चा येत असेल तर क्षमा करा, मला पुढे बोलायची काही आवश्यकता वाटत नाही.

माझे प्रतिसाद हे पोर्नसंबंधी प्रचलित समज-गैरसमज व दुष्परिणाम यावर आधारित आहेत. यात गेल्या पंधरा-वीस वर्षात पोर्न बघणार्‍या असंख्य लोकांचे-मित्रांचे, त्यांच्या आकलन-आचारांचे निरिक्षण आहे. तुम्ही जर असं म्हणाल की अमक्याने सिंगलमाल्ट प्यायलीच नाही, देशीच प्यायली तर त्याला दारू कशाला म्हणतात माहीतच नाही वैगेरे, तर चर्चा प्रचंड वेगाने भलतेच वळण घेत आहे. यावर उत्तर खरेसाहेबांनी दिले आहेच. तुमचे मानायचे तर बारडान्स चुकीचा आणि हाय-प्रोफाइल स्ट्रीप-क्लब हे कलेचे सुंदर आविष्कार. जसे पिटावाल्यांना रेसकोर्सवरची घोडदौड ही प्राण्यांवरचे अत्याचार आहेत असे वाटत नाही पण कुठल्या गावा-खेड्यात होणार्‍या बैलांच्या शर्यती ह्या मुक्या प्राण्यांवरचे भयंकर अत्याचार.

असो. माझ्यासाठी चर्चा संपली आहे.

संतुलित चर्चेसाठी सर्वांचे धन्यवाद.

प्यारे१'s picture

16 Aug 2015 - 9:08 pm | प्यारे१

ओ राहुल द्रविड़, ६ धावांसाठी का डाव घोषित करताय?
प्रा.डॉ. दिलीप 'सचिन' बिरुटेंचं द्विशतक होऊ दया की!

संदीप डांगे's picture

16 Aug 2015 - 9:12 pm | संदीप डांगे

;-)

दुसर्‍यांनापण खेळू द्या की. होईल द्विशतक. तुम्ही बिन्घोर र्‍हावा...

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2015 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

@ द्विशतक होऊ दया की! >> होणारच बघा आता!

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2015 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले

मी काय पाहिले किंवा नाही पाहिले या वैयक्तिक बाबीवर जर ही चर्चा येत असेल तर क्षमा करा, मला पुढे बोलायची काही आवश्यकता वाटत नाही.

माझे प्रतिसाद हे पोर्नसंबंधी प्रचलित समज-गैरसमज व दुष्परिणाम यावर आधारित आहेत.

हेच हेच !

प्रचलित समज गैरसमज योग्य असतीलच असे नव्हे ! पॉर्न दारु वगैरे गोष्टी ग्रे रीजन मधे येतात तेव्हा स्वतः परीक्षुन पाहिल्याशिवाय अशा गोष्टींविषयी , केवळ ऐकीव माहीतीवरुन , विधान करणे हे फारच हास्यास्पद आहे !

म्हणुनच माझ्या साईडनेही चर्चा संपवत आहे !

संदीप डांगे's picture

18 Aug 2015 - 7:33 pm | संदीप डांगे

स्वतः परीक्षुन पाहिल्याशिवाय अशा गोष्टींविषयी , केवळ ऐकीव माहीतीवरुन , विधान करणे हे फारच हास्यास्पद आहे !
खरंच हसायला आले या विधानावर! धन्यवाद!

चला तुम्हाला एक किस्सा सांगून अजून थोडं हसवतो.

होस्टेलमधे असतांना ज्युनीअर्स ना सिनीअर्स दारू/सिगरेट आणायला पाठवतात. पहिल्या वर्षीचा ज्युनीअरला हे काय पटत नाय. तो म्हणतो, मी काय दारू/सिगरेट पीत नाय, मी आणणार नाही. त्याला समजवतांना सिनीअर बोलतो अरे तुला कधी दारू/सिगरेटची जाहिरात करायला लागली तर पिवून पाहशीलच की नाही. तीची चव आणि दर्जा कळल्याशिवाय कसं कळेल तुला कशाची जाहिरात करायची ते...

यावर ज्युनीअर बोलला, दादा, मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हाला कधीही एड्स आणि गुप्तरोगांवरच्या जाहिराती करायची वेळ न येवो.

(यापुढे, प्रगोगुरुजी प्रत्येक बाबतीत मत देतांना त्या स्वत: उपभोगून, तपासूनच देतात हे लक्षात ठेवीन!)

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2015 - 7:38 pm | प्रसाद गोडबोले

आपण अर्धवट वाचन करता ह्याचा अजुन एक पुरावा : मुळ वाक्य असे आहे :

पॉर्न दारु वगैरे गोष्टी ग्रे रीजन मधे येतात तेव्हा स्वतः परीक्षुन पाहिल्याशिवाय अशा गोष्टींविषयी , केवळ ऐकीव माहीतीवरुन , विधान करणे हे फारच हास्यास्पद आहे !

तुम्हाला ग्रे रीजन लिहिलेले दिसले नाही काय ? तुमच्या लेखी गुप्तरोग एड्स हे ग्रे रीजन मधे येतात का ?

का उगाचच वादासाठी वाद घालताय ?

संदीप डांगे's picture

18 Aug 2015 - 8:54 pm | संदीप डांगे

एक मिनीट. विषयाला निरर्थक फाटे कुणी फोडलेत?

माझे सर्व प्रतिसाद आपणच नीट वाचून घ्यावे ही विनंती.

इथे प्रश्न कोणती दारू चांगली की वाईट हा नसून मुळात दारू प्यायची पद्धत चांगली की वाईट हा आहे. तुम्हीच पहिला प्रश्न न सोडवता थेट दुसर्‍या प्रश्नाला हात घालत आहात. देशी असो वा सिंगलमाल्ट, अयोग्य पद्धतीने (म्हणजेच विकृत) प्यायली तर त्रास होणारच.

ग्रे रीजन हा काय प्रकार आहे? तुम्ही दारूचे उदाहरण दिले (जे अतिशय चुकलेले आहे) तेच मांडतो. बघा पटतं काय.

एक चांगल्या सिंगल माल्टचा खंबा १२ हजार रुपयापासून सुरू होतो. देशी पिणार्‍यांचे पगारही एवढे नसतात. मग त्यांनी काय प्यायचीच नाही का? मग ते पितात दहा रुपयाला मिळणारा ग्लास आणि मरतात. तुम्ही त्यांना कितीही ओरडून सांगितले की सिंगल माल्ट हीच बेस्ट दारू आहे तरी ते ऐकणार नाहीत हो.

महाराष्ट्रातील त्याच गावांमधे स्त्रियांचे मतदान घेऊन दारूबंदी केली जाते जिथे दारूचे दुष्परिणाम जाणवतात. कोणती दारू विकली जाते ह्यावरून बंदी ठरत नाही. त्या गावात तुम्ही 'ब्रेड नाहीये तर केक खा' असं सांगून काय उपयोग?

माझे निरिक्षण देशी पिणार्‍यांवर होणारे दारूचे दुष्परिणाम यावर आधारित आहे. ते उघड डोळ्याने दिसतात व जाणवतात. त्यासाठी देशी वा सिंगल माल्ट मला पिवून बघायची काय गरज आहे? इथे आपण दर्जावर चर्चा करतोय की परिणामांवर?

किमान दारूत तरी किंमतीमुळे होणारे क्लासिफिकेशन (असले तरी कुठली दारू आहे त्यानुसार दुष्परिणाम बदलतात?) स्पष्ट दिसून येते. पोर्नमधे असे काही आहे का? हजार रुपयांची डीवीडी म्हणजे सुसंस्कृत आणि पन्नास रुपयांची म्हणजे विकृत?

गुप्तरोग आणि एड्स हेही ग्रे रिजनमधेच येतात की. 'सुरक्षित यौन संबंध' नाही केले तर हे भोग आहेतच हे सरकार ओरडून ओरडून सांगत तर आहेच कित्येक वर्षापासून. आता तासाला लाख रुपये घेणारी कॉलगर्ल ही गुप्तरोग आणि एड्स पासून तुम्ही सुरक्षित राहाल याची दक्षता घेते, ती दक्षता तासाला शंभर रुपये घेणारीकडून कशी अपेक्षित असेल? तसेच तासाला लाख रुपये घेणारी आहे म्हणून वेश्यागमन योग्य आहे का?

मुद्दा आहे दक्षता. ती नसेल तर दारू, सिगरेट, वेश्यागमन, जुगार, सगळंच वाईट. आणि मी दक्षतेच्या अभावांमुळे होणार्‍या दुष्परिणामांबद्दल बोलत आहे. त्यासाठी खरंच स्वतः अनुभव घ्यायची गरज आहे? इतरांचे अनुभव पुरेसे मार्गदर्शक ठरत नाहीत का?

प्रसाद गोडबोले's picture

19 Aug 2015 - 12:46 pm | प्रसाद गोडबोले

इथे आपण दर्जावर चर्चा करतोय की परिणामांवर?

मी तरी दर्जा वर बोलत आहे पहिल्या पासुन !

पॉर्न मधे नितांत सुंदर पॉर्न आणि विकृत पॉर्न असे दोन दर्जा आहेत त्यातील विकृत पॉर्न वर बंदी असावीच हे ठाम मत मीही आधी २-३ दा मांडले आहेच !

मात्र नितांत सुंदर दर्जाच्या पॉर्न वर बंदी आणणे , तेही स्वःतः काहीच पाहिलेले नसताना , हे सरळ सरळ स्वमतांधता आहे !

आणि परिणामांचेच बोलायचे झाले , ज्याने सिंगल्माल्ट दारुचा आनंद घेतला आहे तो त्यासाठी होणार्‍या परिणामांचा ट्रेड ऑफ करायला तयार असतो . होणार्‍या सर्व परिणामांची माहीती असुनही सिंगल्माल्ट दारु पिणे ( पक्षी नितांत सुंदर पॉर्न पहाणे ) हा व्यक्तिगत चॉईस आहे , अशा व्यक्तिगत पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस च्या अन एलियनेबल राईट वर गदा आणण्याचा अधिकार कोणत्याही देशाच्या सरकारलाच काय तर प्रत्यक्ष देवालाही नाही !!

असो .

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2015 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे, इतकी सगळी चर्चा झाली, पण त्याअगोदर (किंवा आतापर्यंतही) कोणी तरी, कमीत कमी खालील शब्दांच्या "सर्वमान्य व्याख्या" ठरवल्या / दिल्या आहेत का ?

१. इरोटिका
२. पोर्न
३. संभोगविकृती (अननॅचरल सेक्स)

यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनातल्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. या व्याख्या सुरुवातीलाच स्पष्ट केल्याशिवाय केलेल्या वादविवादात कोण नक्की कश्याबद्दल बोलत आहे हे कसे समजणार ?!

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 11:36 pm | संदीप डांगे

खरंय..

संत्री आणि मोसंबीत गोंधळ आहे असं दिसतंय, डॉक्टरसाहेब...

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 11:44 pm | प्यारे१

हल्ली प्रतिसाद लिहायला टंकनिका आहेत काय?
की आमच्या गविंकडच्या टंचनिकेला 'हायर' केलंय?

प्रबोधन खूप झालं असं वाटायला लागलं आहे.
- पॉर्ननकोपणडिस्कशनआवर संघटनेचा सचिव प्यारे

संदीप डांगे's picture

14 Aug 2015 - 12:34 am | संदीप डांगे

;-)

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Aug 2015 - 6:52 am | श्रीकृष्ण सामंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी अतिशय नाजूक विषयाला "तोंड फोडून" (मालवणी वाकप्रचार), अश्लिल विषयात जास्तीत जास्त शील ठेवून, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देतील ह्याचा, धोका पत्करून चर्चा घडवून आणली याबद्दल ते सर्वांच्या कौतूकास पात्र आहेत असं मला स्वतःला वाटतं.

एकूण सर्व प्रतिसाद वाचून जून्या माहितीची उजळणी झाली आणि नवीन माहिती काही तरी शिकवून गेली असं मला वाटलं.सर्वांनी प्रतिसाद उत्तम दिले आहेत.
त्यातल्यात्यात श्री.सुबोध खरे यांचे प्रतिसाद अतिशय उद्बोधक वाटले.हे वाखाणण्यासारखे आहे.
धागाकर्त्याने विषयाचा समारोप केला असल्याने,यापुढे मला या विषयावर
जास्त प्रतिसाद देणे नलगे.मात्र इतरांचे प्रतिसाद आल्यास जरूर वाचिन.

सामान्यनागरिक's picture

16 Aug 2015 - 5:12 pm | सामान्यनागरिक

डांगे यांनी एकदम योग्य विचार मांडले आहेत. खासकरून शेवटचा विचार ! एकुणच दृकश्राव्य माध्यमे एवढी वाढली आहेत की मेंदूचा वापर कमी होत चालला आहे । जे काही दूरचित्रवाणी , संगणक ,आणि भ्रमण कवनीच्या पडदयावर दिसतं ते तसंच गिळंकृत करण्याची सवय लागत चालली आहे.
पुढच्या पिढीत हे अजुनच वाढणार आहे कारण एकुणच शिक्षणाबिषयीचे धोरण . स्वतःचा विचार करणे,मांडणे हीच गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे

नमकिन's picture

16 Aug 2015 - 5:40 pm | नमकिन

परिपोर्न परिवारिक प्रहसन करु शकले जर हिरिरीचे समर्थक तर नक्कीच संपूर्ण समाज संभोगातून समाधीकडे पोहोचलाच म्हणून समजा. काय १-१ तारे चमकले, विचारु नका. मेक इन इंडिया सुरु झाले तर नक्कीच उत्कट शृंगारिक प्रणय सा-रा विश्वात तळपत राहिल याची खात्रीशीर चाचपणी व तज्ञ मंडळी शोधण्यासाठीच हे "बंदी" प्रकरण करण्यात आले आहे का असा वास येतोय.
पुढे पुरेपुर पोर्नापूर- कामातुरं न भयं न लज्जा!

200 गाठण्यासाठी 'हात'भार.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Aug 2015 - 9:12 am | अत्रुप्त आत्मा

वाह रे व्वा!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Aug 2015 - 9:13 am | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा व्वा! ;-)

२००
:-D