लेखनवैमूढ्य

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जे न देखे रवी...
19 Jun 2015 - 5:00 pm

पाडावया काव्य पुरे नव्याने
या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने
लिहू परी काय अहो कळेना
वाटे कळे पैं तरि ते वळेना

पाडोन जिल्बी हसु नेहमीचे
विडंबनप्रेमिचमूजनीचे
किंवा लिहू म्या दवणीय साचे
जे मुक्तपीठात भरे सदाचे

शब्दांचिया वा करु नाच साचा
जो चित्रकाव्यात दिसे तयाचा
किंवा लिहू चावटआंबटासी
हे लोक चेकाळति जैं तयासी

किंवा लिहावे उमटे मनीं जे
वाटे तसे आणिक पूर्ण ताजे
पैं हे नको, जैं करिता विचारी
का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

फ्री स्टाइलमांडणी

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

लै भारी रे शब्द खाटुका! :-D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jun 2015 - 5:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भारी रे.

बाकी ज्यानी कोणी दवणिय हा दयनिय शब्द बनवला ना त्याला एकदा भेटायला हवं.

यशोधरा's picture

19 Jun 2015 - 6:34 pm | यशोधरा

दयनीय का वं?
आन, त्याला न्हाय.

पैसा's picture

19 Jun 2015 - 7:18 pm | पैसा

दवणीय शब्दाच्या निर्मात्रीला तू आत्ताच भेटलास! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jun 2015 - 8:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण?

पैसा's picture

19 Jun 2015 - 8:12 pm | पैसा

माझ्या वरचा प्रतिसाद बघ. सोचो, समझो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jun 2015 - 8:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओहोहो...यशोध्रातै निर्मात्री आहेत का दवणीयच्या. =))

जरा एक सुनीत प्रकार येऊ द्या. पहिल्या आठ दहा ओळीत एक विचार आणि शेवटी दोन ओळीत कलाटणी.

आदूबाळ's picture

19 Jun 2015 - 8:08 pm | आदूबाळ

प्रयत्न करून बघतो:

एक विचार
एक विचार
एक विचार
एक विचार
एक विचार
एक विचार
एक विचार
एक विचार
कलाटणी
कलाटणी

एस's picture

20 Jun 2015 - 9:51 pm | एस

वृत्तात नाहीये. ;-)

सूड's picture

19 Jun 2015 - 5:41 pm | सूड

मस्त!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2015 - 5:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

ब्राव्हो ! मस्तं !!

अजया's picture

19 Jun 2015 - 5:58 pm | अजया

किंवा लिहावे उमटे मनीं जे
वाटे तसे आणिक पूर्ण ताजे

highly recommended!!

राही's picture

19 Jun 2015 - 6:03 pm | राही

शेवटचे कडवे विशेष आवडले. सच्चे वाटले, कारण पहिल्या तिनांतला विडंबनाचा सूर त्यात अजिबात नाही.
कविता हे आपल्या अत्यंत प्रामाणिक खाजगी भावनांचे प्रकटीकरण असते असे आमचे एक मित्र म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या कविता (ज्या बहुधा बर्‍या असाव्यात असे त्यांच्या इतर लेखनावरून वाटते,) अद्यापही प्रसिद्ध केलेल्या नाहीत.

+१
मलाही असंच वाटलेलं होतं...

अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस, सूड, डॉक्टरसाहेब, अजयातै आणि राहीतै: अनेक धन्यवाद!

कंजूस सरः कधी जमल्यास अवश्य प्रयत्न करतो.

राहीतै: येस, हे आहेच. तो एक पिरॅमिडच आहे.

मनात जे वाटते --> जे लिहिले जाते --> जे प्रसिद्ध केले जाते.

प्रत्येक स्टेजमध्ये ट्रान्समिशन लॉस आहे. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jun 2015 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कप्तान साहेब?? कप्तान साहेब....अरे त्यापेक्षा चार श्या घातल्या असत्यास तर गोड लागल्या असत्या...

लुलुलुलुलुलुलुलुल्लुल!!

राही's picture

19 Jun 2015 - 10:44 pm | राही

तारा ताणिलियावरी पिळुनिया खुंट्यास वाद्याचिया
त्यांच्यातून अहा ! ध्वनि उमटती ते गोड ऐकावया.
अस्वस्थता आणि सहकंप हे कलावंताच्या पाचवीलाच पुजलेले असतात.
बेचैनीविना निर्मितीची चैन-ऐश कशी करता येणार?
शिवाय, जे कागदावर उतरते, ते हिमनगाचे केवळ टोक असते. बाकी सगळा नऊ दशांश हिमनग हा मनात थिजलेला वा उकळत असतो.
असो. चुरचुरीत विनोद आणि विडंबनाच्या रांगेत हा मध्येच एक जागा चुकलेला थंड- डॅम्प प्रतिसाद.

बॅटमॅन's picture

19 Jun 2015 - 10:52 pm | बॅटमॅन

आहा! मस्त प्रतिसाद, एकदम नेमके लिहिले आहे. आवडले!

तिमा's picture

19 Jun 2015 - 6:30 pm | तिमा

भाषाप्रभु,
तुम्हाला काव्य करताना प्रथमच बघितलं. शेवटची ओळ एकदम चाबूक!

यशोधरा's picture

19 Jun 2015 - 6:35 pm | यशोधरा

भा हा री ही हाये!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा

घ्यावया तांब्या पुन्हा मनाने
या टुरटुय्रा देति दाद नव्याने
जाऊ परी काय वावरातं कळेना
तांब्या गळे तरि पाय तो वळेना

खटपट्या's picture

19 Jun 2015 - 8:36 pm | खटपट्या

क्या बात हे !!
हे आम्हाला कधी जमणार देव जाणे..

आतिवास's picture

19 Jun 2015 - 6:48 pm | आतिवास

आवडली.
शेवटचे कडवे खास!

बॅटमॅन's picture

19 Jun 2015 - 6:55 pm | बॅटमॅन

तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक धन्यवाद! :)

अत्रुप्तः-

संक्षिप्त प्रतिसादः ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

फुल व्हर्जन प्रतिसादः (तुमचाच प्रतिसाद वृत्तात नीट बसवतो थांबा.)

या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या
तैं टुर्टुर्‍या दाद देती नव्याने
पर्सात जाऊ? परि का कळेना
तांब्या गळे पैं पद ते वळेना

मेल्या तुझं काव्य शौचकाव्य नैये, बुवा आता त्याचं शौचिक विडंबन पाडतील. =))

बॅटमॅन's picture

19 Jun 2015 - 7:10 pm | बॅटमॅन

=))

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

@ मेल्या तुझं काव्य शौचकाव्य नैये, बुवा आता त्याचं शौचिक विडंबन पाडतील.>> :-D हा बं मेला हलकट कुजकट ! :-D
अरे ... वाढु दे की आमुचा सं प्रदाय
कशाला बोंबलतोस उगाच , आय आय आय! :P ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P

शौचिक विडंबनं पाडा हो सावकाश, वैजूवयनीना सासरी आणायचा कथानायकाचा विचार आहे की नै?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 9:30 pm | अत्रुप्त आत्मा

ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ :-\
दुत्त दुत्त!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jun 2015 - 9:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फक्त वैजुवहिनींना कसं आणणार? आता दोन नव्या जबाबदार्‍या पण आहेत. गुर्जी पुढचा भाग कधी?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

आं....................... चिमणराव दू दू दू :-/

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा

या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या
तैं टुर्टुर्या दाद देती नव्याने
पर्सात जाऊ? परि का कळेना
तांब्या गळे पैं पद ते वळेना>> :-D __/\__ :-D
साष टांग नमन रे खाटुका! :-D

समांतर:- मायला,या वृत्तांचि आता संथाच घातली पाहिजे. ;-)

पैसा's picture

19 Jun 2015 - 7:21 pm | पैसा

लै भारी!

हल्ली सगळ्यांना "आत वळावेसे" का वाटतेय ब्वा? बुवा पण हल्लीच "फिर भी दिल है हिंदुस्तानी" मोडमधे दिसले होते.

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2015 - 7:53 pm | टवाळ कार्टा

भारी...आणि गुर्जींचे तांब्याकाव्य सुध्धा जम्लेय

विशाल कुलकर्णी's picture

19 Jun 2015 - 7:58 pm | विशाल कुलकर्णी

दंडवत श्रेष्ठी ...

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 8:06 pm | श्रीरंग_जोशी

इस रचना में कुछ और बात है!!

खटपट्या's picture

19 Jun 2015 - 8:35 pm | खटपट्या

मुळ कविता अतीसुंदर.
आणि प्रतिसादात आलेल्या तांब्याकवितेने चार चांद लावलेत,

अनुप ढेरे's picture

19 Jun 2015 - 8:37 pm | अनुप ढेरे

कविता आवडली!

सतिश गावडे's picture

19 Jun 2015 - 9:34 pm | सतिश गावडे

छान लिहिलि आहे कविता. आवडलि.

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2015 - 9:42 pm | प्रीत-मोहर

छान लिहलेय! आवडले

बॅटमॅन's picture

19 Jun 2015 - 10:56 pm | बॅटमॅन

पैसा, टका, विशाल कुलकर्णी, रंगासेठ, खटपट्या, ढेरेशास्त्री, गावडे सर आणि प्रीतमोहरः अनेक धन्यवाद! :)

प्रचेतस's picture

19 Jun 2015 - 11:05 pm | प्रचेतस

सुरेखच रे. अतिशय लयबद्ध.
अत्रुप्त गुर्जींचे शौच विडंबनही आवडले.

पैं हे नको, जैं करिता विचारी
का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

या बात!

रातराणी's picture

20 Jun 2015 - 2:02 am | रातराणी

अगं बै! साहित्य संपादकांना दाखवतात का असं काही होत असल्यावर?

( कविता छान आहे. आवडली.)

नाखु's picture

20 Jun 2015 - 8:39 am | नाखु

बॅट्या मसताड.

सहित्यप्रसवोतुस्क जनाची व्यथा
मनेमने तोषली उमजुनी आपुली कथा
बॅट्या करे याही दालनी निर्दालन आक्र्मण
देवा ता कैसे साहित्य्च्र्वणाचे दळण

जो जे वाचील तो ते लाहो |
साचेल त्यासी सह"वास" साहो |

नाखुदा चोरोळीकर

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2015 - 10:16 am | ज्ञानोबाचे पैजार

पैं हे नको, जैं करिता विचारी
का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

आलासी नग्न तू,अन जाणार नग्न आहे,
मग...
नग्नतेच्या दर्शननाने, लज्जित का तू होत आहे,
पडला हा यक्ष प्रश्र्ण,प्रत्येक मानवास आहे,
नग्नता तनात नसते, विकृती दृष्टीत आहे

चोरुनी, लपवूनी, झाकोनी, ठेवीसी हे इश लेणे,
अच्छादने पांघरोनी, बुजगावणे हे मिरवणे,
आभास टिकवण्या साठी, अविरत स्वपीडन करणे,
या परीस सोपे आहे, जनांसमोरी नग्न वावरणे,

या अशा अवस्थे मध्ये, असत्याचे दडपण नाही,
प्रतिमा जपण्या करता, कोणताही हट्ट नाही,
व्यतीत होई जीवनसारे, निर्मळ आनंदाचे डोही,
पैजारबुवा देत आहे रे, आयुष्यभराची ग्वाही,

पैजारबुवा,

राही's picture

20 Jun 2015 - 11:27 am | राही

चोरुनी, लपवुनी, झाकोनी ठेवीसी हे ईश लेणे, छान.
खरोखर, प्रतिभा ही ईश्वरीच असते.
पण, 'गाता गळा अन् राबता मळा' किंवा 'वन् पर्सेंट इन्स्पिरेशन अँड नाइन्टिनाइन पर्सेंट पर्स्पि(स्पाय्)रेशन' हेही तितकेच खरे आहे. नुसता सुरेल गळा लाभून उपयोगाचे नाही. रियाझ आणि वळणही महत्त्वाचे.
प्रतिभा आहे आणि तिच्यावर परिश्रम घेतले जात नाहीत तर तो त्या प्रतिभादात्यावर अन्याय ठरेल.

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 11:32 am | मुक्त विहारि

तितकेच सुंदर प्रतिसाद...

विशेषतः अतृप्त, नाखू आणि पैजार बुवांचे.

प्यारे१'s picture

20 Jun 2015 - 12:48 pm | प्यारे१

बॅटमॅनला (आणि त्याबरोबर इतर कविजनांस) एक पार्टी लागू

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jun 2015 - 1:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

गाड्या बरोबर नळ्याची यात्रा

(मस्तानीच्या प्रतिक्षेतला) पैजारबुवा,

प्यारे१'s picture

20 Jun 2015 - 6:28 pm | प्यारे१

येताना स्वत:चं ओळखपत्र आणि मस्तानी घेऊन यावी. ;)
सीरियसली, बघू कसं जमतं ते. पुण्यात थांबलोय अजून 10 12 दिवस तरी नक्की आहे.

कवितानागेश's picture

20 Jun 2015 - 7:54 pm | कवितानागेश

मस्तच लिहिलय.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Jun 2015 - 10:15 pm | मंदार दिलीप जोशी

मस्त