कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
19 May 2015 - 1:51 pm

स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाचून त्याचं
क्रोधाग्नीने काळीज पेटून उठतंय फास्ट
समजूच शकत नाही तो, नराधमांची मानसिकता
म्हणतो सरकारने करावी, स्त्राटेजी कायद्याची कठोर जास्त
पर नही जानता वो, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
चरफडून मग तो म्हणतो, कारे महान कल्चरला बोल लावतो ?
तुला माहित्येका, बलात्कार भारतापेक्षा इंडियात होतात जास्त
तंग कमी कपडे जीन्स, उशिरापर्यंत बाहेर फिरणे हेची कारणे यामागील वास्ट
चुकीचे बोल तुझे की, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
त्याला म्हणालो, मग सांग तु हि कारणे, त्या कोवळ्या बालिकेला
बुरेखेधारी महिलेला, अतिवृद्ध ननला, चार भिंतीतील घूसमटीला…
तुझ्या भारतातल्या अहील्येला, घातले होते का ? तंग कपडे जीन्स त्यांनी
का नव्हत्या त्या सातच्याआत घरात ?
कोमातून सावरून तो उत्तरला, याला जबाबदार सरकार पोलिस
निषेध म्हणून परत 'बांगड्या भरा' अशीच त्याच्यामुखी बात
जसे की 'बांगड्या भरणे' हे न-कर्तुत्वाचे लक्षण आहे खास
खरंच रे दुनिया, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….

फ्री स्टाइलसंस्कृती

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 May 2015 - 7:57 pm | पैसा

नक्की कशाकशावर लिहायचं आहे?

कवितेचे शिर्षक, पिटर ड्रकर या जगप्रसिद्ध व्यवस्थापन-तज्ञाचे आहे. असो इथे मला असे मांडायचे होते, की कायदे कठोर करणे वैगरेसारख्या गोष्टी(कि ज्या आवश्यक आहेतच) या स्त्राटेजीज् आहेत, त्या पूर्णपणे प्रभावशाली होणार नाही, जो पर्यंत आपण सर्व, आपली (स्त्री विषयक) विचारसरणी बदलणार नाही. जसे की वाढत्या स्त्री लैंगिक गुन्ह्याविषयी लोक सरकारचा/पोलिसांचा 'बांगड्या भरा' असा निषेध करतो, परंतु 'बांगड्या भरणे' म्हणजे अगदी नालायकीचे लक्षण अश्या प्रकारचा मेसेज आपण देतो.
इंडियाज डॉटर या माहितीपटात बलात्कारी / त्याच्या बचावाच्या वकिलाने जी मुक्तफळे उधळली आहेत (ज्यामुळे त्यांची सोच/विचारपद्धती प्रेक्षकांना दिसते), कि जसे एवढ्या उशिरा 'ती' बाहेर काय करत होती ? म्हणजेच तिचं चारित्र्य चांगले नसणार(आपल्या संस्कृतीप्रमाणे), म्हणजेच आपल्याला बलात्कार करण्याचा एकप्रकारे समर्थन देत होता तो.

पैसा's picture

21 May 2015 - 1:15 pm | पैसा

आशय कळला होता , मात्र इंडिया भारत ७ च्या आत घरात ई. गोष्टी मुळे जे सांगायचं होतं त्यावरून वाचणाऱ्याचा फोकस दुसरीकडे जाण्याची शक्यता अधिक वाटली. विरामचिन्हे वापरली असती तर हा संवाद आहे हे लक्षात आले असते हइ माझे वैयक्तिक मत.

कवितेचे शिर्षक, पिटर ड्रकर या जगप्रसिद्ध व्यवस्थापन-तज्ञाचे आहे. असो इथे मला असे मांडायचे होते, की कायदे कठोर करणे वैगरेसारख्या गोष्टी(कि ज्या आवश्यक आहेतच) या स्त्राटेजीज् आहेत, त्या पूर्णपणे प्रभावशाली होणार नाही, जो पर्यंत आपण सर्व, आपली (स्त्री विषयक) विचारसरणी बदलणार नाही. जसे की वाढत्या स्त्री लैंगिक गुन्ह्याविषयी लोक सरकारचा/पोलिसांचा 'बांगड्या भरा' असा निषेध करतो, परंतु 'बांगड्या भरणे' म्हणजे अगदी नालायकीचे लक्षण अश्या प्रकारचा मेसेज आपण देतो.
इंडियाज डॉटर या माहितीपटात बलात्कारी / त्याच्या बचावाच्या वकिलाने जी मुक्तफळे उधळली आहेत (ज्यामुळे त्यांची सोच/विचारपद्धती प्रेक्षकांना दिसते), कि जसे एवढ्या उशिरा 'ती' बाहेर काय करत होती ? म्हणजेच तिचं चारित्र्य चांगले नसणार(आपल्या संस्कृतीप्रमाणे), म्हणजेच आपल्याला बलात्कार करण्याचा एकप्रकारे समर्थन देत होता तो.

एस's picture

19 May 2015 - 11:12 pm | एस

जबरदस्त ताशेरे ओढलेत समाजाच्या दुटप्पी आणि असंवेदनशील मनोवृत्तीवर!

यशोधरा's picture

20 May 2015 - 8:56 am | यशोधरा

हेच म्हणायचे आहे.

दमामि's picture

21 May 2015 - 7:34 am | दमामि

कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट
इट च्या ऐवजी इज करा मग बरोबर ध्यानात येइल

पगला गजोधर's picture

21 May 2015 - 11:26 am | पगला गजोधर

culture eats strategy for breakfast.

नाखु's picture

21 May 2015 - 11:40 am | नाखु

वाभाडे काढणे म्हणजे काय याचा ढळढळीत पुरावा तो हाच.

कशाचाही कसलाही संबध लावणार्‍या "पिंकारी/वकार यूनुस" यांच्या प्रतिक्रिया येतील काय? या शंकेत.

भोट नाखु

वेल्लाभट's picture

21 May 2015 - 2:20 pm | वेल्लाभट

कई कळलं नाही

ह्यावर एआयबी चा एक मस्त व्हिडिओ आहे.

पगला गजोधर's picture

21 May 2015 - 3:11 pm | पगला गजोधर

.