सैनिक हो! तुमच्या साठी....

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
18 Aug 2008 - 8:28 am

अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे.
गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला,
"आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति"
ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया.
मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली.
सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.
मुलगा म्हणाला,
"काका,मला लोकांच ऐकून घेण्यासाठी पैसे मिळतात.मी अमेरिकेत आल्यावर युद्धावरून परत आलेल्या सैनिकांच्या सुख दुःखाच्या परिस्थितीतून त्यांचा संभाळ करण्य़ाच्या आणि त्यांच्या सोयी पाहून त्यांना आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी योजना
पाहाण्याच्या संस्थेमधे कामाला लागलो होतो.ते व्हेटरनस हॉस्पिटल होतं.

ह्या सैनिकांकडून मला, मनुष्याला असंभवनीय परिस्थितीला तोंड देण्याच्या प्रयत्नाना सामोरं जाताना कसल्या कसल्या प्रसंगातून जावं लागतं,त्याचा त्यांनी पाहिलेला आखोंदेखा हाल त्यांच्याकडून ऐकायला मिळाला.
प्रत्यक्ष एकेकाने अतिगंभिर परिस्थितीत समोरासमोर हातापायी करून त्यातून सही सलामत सुटल्याबद्दलच्या त्यांच्या गोष्टी ऐकून घेण्याची पाळी माझ्या वर आली होती.
वैद्दयकीय विभागातल्या आणि तोफगोळ्या विभागातल्या सैनिकाना आलेल्या अनुभवातून समजलेल्या गोष्टी ऐकून, तसंच इथे आल्यावर जगू न शकलेल्या सैनिकाना त्यांच्याच आईवडलाना आपल्या मुलांच्या शेवटच्या क्रियेला प्रत्यक्ष हजर रहाण्याचे आलेले प्रसंग पाहून, आणि हे सर्व आश्चर्य वाटण्या इतके अनुभव पाहून, मनुष्याची आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची शक्ति आणि क्षमता किती टोकापर्यंत जावू शकते ह्याचा विचार मनात आल्यावर ह्या सर्वांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं.
हे सैनिक, जखमी झालेल्या परिस्थितीत असूनही, स्वतःला सावरून परत मानसिक धक्का घेवून कल्पने पलिकडचे प्रसंग सांभाळून पुढे मार्ग काटत जायचा त्यांचा निर्धार पाहून सतत एक प्रकारची स्फुर्ती माझ्या अंगात यायची.

इराकच्या लढाईतून परत आलेले सैनिक त्यांच्यावर होणाऱ्या असंभवनीय आय-ई-डीचे हल्ले,अदृश्यपणे होणारे बंदुकीच्या गोळ्यांचे वर्षाव कसे होत, याचं वर्णन करून सांगतात.
घरी परत आल्यावर त्यांना रस्त्यावर साधी गाडी चालवणं पण अशक्य होतं.जुन्या मित्रां बरोबर एका खोलीत राहायला जमत नाही.एक सैनिक तर सांगत होता की मानसिक सुन्नता आणि रागाची खून्नस, ह्यांच्या कचाट्यात अडकून घेतल्या सारखं
त्याला सतत वाटतं.

असल्या भयंकर आघातातून बाहेर पडून हया बऱ्याच अशा इराकहून परत आलेल्या सैनिकांची पुनरप्रस्थापीत होण्याची इर्षा आणि ज्याचा अंदाज ही नाही अशा मार्गाने जावून आपल्या आयुष्याला काही अर्थ यावा असं करण्याची त्यांची धडपड पाहून
त्यांचं आश्चर्य न वाटल्यास नवल म्हटलं पाहिजे.
उदाहरणार्थ,एक सैनिक होता त्याचा ह्या आजारावर जालीम इलाज म्हणजे आपल्या आजीच्या लहानश्या हॉटेलच्या धंद्दयामधे तिला मदत करण्याची त्याची इच्छा. ह्या मदतीच्या कारणाने त्याला आपल्या आजीशी भावनात्मक संबंध ठेवून सकाळी उठून
तिला मदत करण्याचं एक सुंदर कारण त्याला मिळत होतं.

हे कदाचीत साधसुधं कारण वाटत असेल पण प्रत्यक्षात लांबवत जाणारी ही ट्रिटमेंट तशी कठीणही असते आणि प्रत्येक इलाजाचा शेवट गोड होईल असं नाही.
काही काही दिवशी मी ज्यावेळी घरी जातो,त्यावेळेला माझं डोकं खूप दुखत असतं. कधी मी मनातून दुःखी होवून, माझ्यावरच मी रागवून अपसेट व्हायचो.ह्या दिवशी माझं मलाच संभाळावं लागायचं. आणि पुढचा मार्ग चालू ठेवावा लागायचा. ज्या
लोकांबरोबर मी त्यांना बरं करण्यासाठी आयुष्य घालवतो तेच लोक मला मी स्वतःला कसं संभाळून घ्यायचं तेच शिकवीत होते.त्या लोकांच्या निरनीराळ्या प्रकारच्या व्याधीवर असलेली यादी माझ्या डोक्यांत ठेवून ही यादी माझी मार्गदर्शिका म्हणून
वापरून पुनरप्रस्थापनेसाठी मनुष्य काही गोष्टी कसा आत्मसात करू शकतो ह्याची आठवण म्हणून मनात ठेवतो.

परंतु हे लोक माझ्या ह्या विचाराचं किती कौतुक करीत असतील देवजाणे.पण मी त्यांच्याशी संबंध ठेवून माझ्या भविष्यातल्या अडचणीना तोंड द्दयायला शक्ति मिळवण्याचा प्रयत्न करतो.
अशी ही आशा, मला एक चांगली देणगी म्हणून मिळाली आहे असं समजून मी अगदी अदबीने इच्छा करतो की ती आशा मी माझ्या जवळ दुसरी कोणतीही व्यक्ति बसेल तिच्या बरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न करीन."

माझ्या ह्या मित्राच्या सायकॉलॉजीस्ट मुलाचे विचार ऐकून माझ्या मनात आलं की कारगिल वरून असेच किती तरी सैनिक अशा तर्‍हेच्या व्याधी घेवून आले असतील परंतु असले सायकॉलॉजीस्ट आणि असले डॉक्टर त्यांना उपाय करायला मिळाले
असतील का?
आपल्याकडे सुद्धा अशा तर्‍हेच्या संस्था असतील का की जिथे ह्या सैनिकांची इतक्या निगेने काळजी घेतली जाते.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख