कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
27 Mar 2015 - 10:23 am

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.

जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

मुळात एखाद्याने कुणाचेही वैचारिक परावलंबित्व किंवा गुलामगिरी पत्करली तर तो निर्णयासाठी कुणावर तरी अवलंबून राहणारच आहे! त्यापेक्षा स्वतंत्र विचारशक्ती असणे केव्हाही चांगले!

पण स्वतंत्र विचारसरणीवाला मुलगा सुद्धा दांभिक विचारांचा बळी होण्यापासून सुटू शकलेला नाही. जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट आई वडिलांना न पटणारी केली तर हे दांभिक जग त्यात त्याच्या बायकोला बळीचा बकरा बनवते. याने नक्की बायकोचे ऐकून असे केले असे म्हटले जाते, भले त्याने त्या वेळेस बायकोचे ऐकले नसेल तरीही!

पण मुलाने जर आई वडिलांना योग्य वाटेल असा निर्णय घेतला तर त्या बाबत मात्र बायकोला जबाबदार धरत नाहीत. तेव्हा त्याने हा निर्णय स्वतः घेतला असे मानले जाते, मग त्याने त्या वेळेस बायकोचा सल्ला ऐकला असला तरी.

सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात.

मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते.

एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!!

"मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!

आहे ना विरोधाभास?

तुम्ही या लिस्ट मध्ये आणखी भर घालू शकता, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार!

समाजजीवनमानतंत्रराहणीविचार

प्रतिक्रिया

सतीश कुडतरकर's picture

27 Mar 2015 - 10:40 am | सतीश कुडतरकर

तुंम्ही बैल, बकरा असे म्हणालात. माझ्याकडून हे

घोडा, गाढव, डुक्कर

खेडूत's picture

27 Mar 2015 - 10:41 am | खेडूत

+१

असेच कण्हतो !

विशेष म्हणजे हे संकलन अजिबात वाटत नाही .

आधी वाटलेलं ''रा गा'' वरच लेख आला कि काय?

( बैल ) खेडूत

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2015 - 11:53 am | अत्रन्गि पाउस

पण मग 'बैल' म्हटल्यावर थोडी तरी अक्कल गृहीत धरलीये हे लक्षात आले
:D

योगी९००'s picture

27 Mar 2015 - 10:44 am | योगी९००

फारच frustate झालेले दिसतात...

यावरून एक जोक आठवला...
एक बाई वैतागुन म्हणते "आमचा मुलगा लग्नानंतर एकदम बदलला..बायकोच्या हातचे बाहूले बनला. सगळ्या तिच्या गोष्टी नंदीबैलासारख्या ऐकायला लागलाय. बायकोची आई आता त्याला सख्या आईपेक्षा जवळची झालीय. आम्ही म्हणजे आता त्याला नकोसे झालोयं"

मग थोड्यावेळाने तिच्या जावयाचा विषय निघाल्यावर मात्र तिच बाई कौतुकाने असे म्हणते" जावई माझा एकदम गुणी हो..माझ्या मुलीच्या शब्दाबाहेर अजिबात नाही. आणि मला तर आता इतका मान देतो की एकवेळ सख्या आईला विचारणार नाही पण माझा सल्ला घेतल्याशिवाय एक गोष्ट करणार नाही."

आता घ्या...

रुस्तम's picture

27 Mar 2015 - 1:17 pm | रुस्तम

:D

सुनील's picture

27 Mar 2015 - 10:48 am | सुनील

गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे काही फरक पडू शकेल काय? ;)

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा

<<माई मोड ऑन>>
आई म्हणतात आमचे हे म्हणजे शुध्ध नंदीबैल आहेत पण हे खरे तर आईंच्या ताटाखालचे मांजर आहेत
<<माई मोड ऑफ>>

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 11:47 am | टवाळ कार्टा

चायला माईंचा मोड गायबला

माई मोड आमचा © आहे म्हणुनच गायबला *wink*

नाखु's picture

30 Mar 2015 - 9:13 am | नाखु

मोडात मोड नानांच्या माईंचा मोड !
मोडात मोड नानांच्या माईंचा मोड !!
त्यातच प्रतीसाद द्यायची सगळ्यांना खोड !!
=======================
वरील प्रकारे आपणही २ चोरोळ्या टंकाव्यात.

अन्या दातार's picture

27 Mar 2015 - 11:57 am | अन्या दातार

आयुष्याचे असेच विविध अँगल्स तुम्ही तुमच्या एकेका लेखातून छान उलगडून दाखवताय सर. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 12:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडत्या लेखकाप्रतिचे तुझे उच्चार बघुन ड्वॉळे पाणावले. :P

निमिष सोनार's picture

27 Mar 2015 - 4:06 pm | निमिष सोनार

@= आहात !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 5:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद.

निमिष सोनार's picture

27 Mar 2015 - 4:10 pm | निमिष सोनार

*YES*

होबासराव's picture

27 Mar 2015 - 12:12 pm | होबासराव

अछा तर हा तुमचा प्रोब्लेम आहे म्हणुन ईतके फ्रस्ट्रेट झालाय्त का ? तुम्हि पुण्यात राहता.. तिथे व्यावसाईक समुपदेशक असतिल बघा, हव तर मि गुगलुन तुम्हाला त्यांचे डिटेल्स देतो. समुपदेशकाचि मदत घ्या, सगळ ठिक होइल.. वाटल्यास घरच्या थोरामोठ्यांचि मदत घ्या, आणि एक लक्षात असु द्या मि पा ला आपल्या सारख्या आधुनिक टॉलस्टॉय चि नितांत आवश्यकता आहे, तेव्हा लवकर बरे व्हा. तुर्तास इतकेच. काळजि घ्या.

निमिष सोनार's picture

27 Mar 2015 - 4:01 pm | निमिष सोनार

8-)

" पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही? "
http://www.misalpav.com/node/29763
प्रस्तुत लेखकाने २ वेगवेगळ्या लेखात परस्पर विरोधी मते मांडलेली आहेत, तरी आम्हास असे वाटते कि हे जिलबीकार (साहीत्यकार च्या धर्तिवर) डोक्यावर पडले असुन जर त्यानि "डोक्यावर पडण्याचे फायदे (स्वःता करीता) आणि तोटे समाजाकरीता" ह्या विषयावर होणार्‍या आगामि लामणगाव (बु) साहित्य संमेलनात आपले विचार मांडावे.

निमिष सोनार's picture

27 Mar 2015 - 4:05 pm | निमिष सोनार

"पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही?"
तसा प्रयत्न करत नाही म्हणूनच सून, मुलगी, मुलगा अशी जातीव्यवस्था आपण कौटुंबिक जीवनात पाडतो... सगळ्यांना सारखे मानत नाही. सुनेला परके मानतो. वगैरे. सुनेला "माणूस" म्हणून तरी कमीत कमी जोडण्याचा प्रयत्न होतो का?

&#039;पिंक&#039; पॅंथर्न's picture

27 Mar 2015 - 2:17 pm | 'पिंक' पॅंथर्न

अहो लग्न झालेला पुरुष ऑक्टोपस असतो.

ऑक्टोपस ला तीन ह्रदय असतात.
लग्न झालेला पुरुष बायकोवर, आई वर आणि स्वतःवर पण तीतकेच ह्रदयापासुन प्रेम करतो. पण ती तीन ह्रदय वेगवेगळी असल्यामुळे त्याची तारांबळ उडते.

अन्या दातार's picture

27 Mar 2015 - 4:40 pm | अन्या दातार

मला वाटले तिसरे हृदय मैत्रिणीवर म्हणताय ;)
लैच पोपट केलात. आधीच दगड/धोंडा का स्प्रिंग हे कळायच्या आत ही बैलाची पोस्ट वाचतोय. त्यात तुम्ही ऑक्टोपस आणलाय. एकंदरीत जे पिंडी ते ब्रह्मांडीच्या विरुद्ध "जे ब्रह्मांडी ते पिंडी" असा उलटा क्रम लागतोय वाटते.
मिपावर ब्रह्मज्ञान होते म्हणतात ते उगीच नाही कै. जळो मेले सरांच्या लेखनाला नावे ठेवणारे.
पिंक पँथर्न, उपयुक्त भर घातलीत लेखात.

आणि आठ पायांचे काय त्याच्या? *acute*

&#039;पिंक&#039; पॅंथर्न's picture

27 Mar 2015 - 5:35 pm | 'पिंक' पॅंथर्न

आणि ते आठ पाय तारेवरची कसरत करण्यासाठी नको का ?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2015 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

आई ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं! ह्रदय अगदी पिळ वटून आले.

स्वप्नज's picture

30 Mar 2015 - 7:09 am | स्वप्नज

हो ना. हृदय वटून गेले अगदी..

मदनबाण's picture

30 Mar 2015 - 7:49 am | मदनबाण

नारायण ! नारायण !
बिचारे नवरोबा ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }

आला ना राग बैल म्हटल्यावर!! आता कळलं ना ?

बॅटमॅन's picture

30 Mar 2015 - 5:28 pm | बॅटमॅन

बुलशिट? ;)

पॉइंट ब्लँक's picture

30 Mar 2015 - 4:39 pm | पॉइंट ब्लँक

मन घट्ट करा आणि आल आहे त्याला सामोरे जा ;)

हाडक्या's picture

30 Mar 2015 - 4:41 pm | हाडक्या

आधीच्या लेखांमुळे लोकांनी बरेच मुद्दे सिरिअसली घेतले नाहीत असं दिसतंय..

सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात.

मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते.

एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!!

"मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!

लेखकाचे स्वतःचे मत जरी इथे बाजूला ठेवले तरी ही खूप प्रकर्षाने जाणवणारी दुटप्पेपणाची बाब आहे. अनुभवी लोकांनी याबाबत मते मांडायला तशी काहीच हरकत नसावी.

(लेखक लेखनाबाबत गंभीर आहे असे गृहित धरुन प्रतिसाद आहे)

लेखन कोणाचे आहे हे पाहून आलेल्या प्रतिसादांबाबत, "काय" लिहिलेय यापेक्षा "कोणी" लिहिलेय, हे पाहून प्रतिसाद अजूनही दिले जातात तर.. :|

....पाहताय का? जरा विचार करून, मूळ विषयाला धरून प्रतिसाद द्या की रे मित्रांनो!!!कौटुंबिक विषयाला धरून प्रतिक्रिया द्या..जरा सिरीयस व्हा जीवनात !!

बॅटमॅन's picture

30 Mar 2015 - 5:28 pm | बॅटमॅन

जरा सिरीयस व्हा जीवनात !!

व्हाय सो सीरियस????

-जोकर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 6:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ही नीड्स स्माईल ऑन हिज फेस. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 6:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक हा प्रश्ण असल्यामुळे तुर्तास सिरियस होणं पुढे ढकलतो.

हाडक्या's picture

30 Mar 2015 - 6:44 pm | हाडक्या

सिरियस होतो. पण सॅम का ब्लॅक हा प्रश्ण

ब्लॅक व्हा.. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 6:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्लॅक झालं की मागे कै. लावायला लागतं ओ.

बाकी रेशिष्ट कॉमेंट =))

हाडक्या's picture

30 Mar 2015 - 7:26 pm | हाडक्या

हा हा हा...
तुमचीच द्वयार्थी अतिशिष्ट अन रेशिष्ट कमेंट.. ;)

बादवे, इतरे अज्ञ जणांसाठी, हे कै. ब्लॅक म्हंजे हे अन ह्यांची आडनाव व्युत्पत्ती इथे.

..कौटुंबिक राजकारणाच्या रणरणत्या उन्हात दिलास्याची थंडगार झुळुक आल्यासारखी वाटली...

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2015 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा

@ ..कौटुंबिक राजकारणाच्या रणरणत्या उन्हात
दिलास्याची थंडगार झुळुक आल्यासारखी
वाटली...>>> =)))))

वारलो ! =))

हाडक्या's picture

30 Mar 2015 - 6:46 pm | हाडक्या

तुमच्या लेखनाचा इतरांवर "असाही" परिणाम दिसतोय की काय बुवा.. :)))

(बादवे, मी पण लग्गेच वारलोय.. ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2015 - 7:22 pm | अत्रुप्त आत्मा

:)