अमेरिकेतील कोणत्याही क्षणी पिंक स्लीप / युरोपातील कायद्याच्या चौकटीत राहून बऱ्यापैकी पारदर्शक प्रक्रियेतून येणारे फायरिंग / जपान मध्ये 'शक्यतो नाहीच' असे फायरिंग (ऐकिव माहिती नुसार) इथे संबंधित देशात प्रदीर्घ नोकरी करणाऱ्यांनी प्रकाश टाकावा हि अपेक्षा (डेप्युटेशन वर गेलेल्यांना फार तपशील कळू शकत नाहीत ह्या गृहितकावर).....ह्यात आपण भारतात कुठे तरी मध्ये आहोत ...म्हणजे कायद्याचे संरक्षण असेल तर कामात कुचराई / कायद्याचे संरक्षण नसेल तर सत्ताधार्यांची मनमानी .. अर्थात ह्यात अनेक शक्यता /अपवाद वगैरे आहेतच ..
असो तर फायरिंग मधले अनुभव आठवतांना सगळ्यात सनसनाटी ठरावा असा हा अनुभव..ह्या अनुभवाला
राज ठाकरे जबाबदार होते :)
माझ्या कडे जवळपास ९० फ्रेशेर्स चे इंडक्शन नंतरचे को ओर्डीनेशन होते ...रोज सकाळी सगळ्यांची व्हर्च्युअल हजेरी ..कुणाचे काही तांत्रिक प्रॉब्लेम्स सोडवणे ..त्यांना प्रोजेक्ट वर tag करण्यासाठी प्रयत्न आदी ..
ह्यात एक दिवस लक्षात आले कि एक चिरंजीव डेली मिटींगमध्ये काहीश्या चढ्या सुरात जणू जाब विचारत आहेत अशा थाटात बोलू लागले (अजून किती दिवस प्रोजेक्ट नाही ? / हे काय चाललंय /अमुक माणूस काय करतोय ..कसली management चालू आहे वगैरे ) ...२ दिवस झाल्यावर आम्ही त्यांना सौम्य शब्दात समजावले तथापि परिणाम शून्य ..शेवटी समन्स ...गर्द निळी pant जांभळा शर्त वरचे बटन उघडे ..दाढीचे खुंट ..विस्कटलेले केस डोळ्यात आत्मविश्वास आणि मग्रुरी ह्यांच्या सीमारेषेवरचे भाव ... म्हटले हम्म
संवाद सुरु झाला ...कि कारे बाबा काय म्हणणे आहे ..म्हणाला कि तुमच्या (!) कम्पनीच्या पोलिसिज बेकार आहेत कुचकामी आहेत ...एक गोष्ट धड नाही ..वगैरे वगैरे ...
शेवटी म्हटले कि झाले काय? तर म्हणाला 'मै जहा भी गया राज किया हुं ...अपने बलबुते पे जिता हुं ...किसीसे डरता नाही ...और यहा आय हुं तो ठोक बजाके जीयुंगा'... नीट बघितले तर डोळ्यात वेडाबिडाची झाक नव्हती ..बर पुढे ?..."आपने कहा था .याहांपे मेल्स पे ध्यान दिया जाता है कोई ऐसी वैसी बात होती नाही ....
च्यामारी मला टोटल लागेना ..आणि हा हळू हळू सरकतच चालला ...किधर है वो HRD हेड ...मै सी इ ओ तक जाऊंगा ...
थोड्या वेळाने कळले ते असे कि तेव्हा राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरुद्ध एक मोहीम उघडली होती आणि कंपनीतल्या कंपनीत कुणीतरी त्याची खिल्ली उडवणारी मेल सर्क्युलेट केली ह्या महाशयांनी ती भलत्याच कुणाच्या अकौंट वर ती वाचली आणि हे सगळे कुणी थांबवले नाही त्यामुळे हा भडकला होता ... पुढे तर आप भी महाराष्ट्र के हो तो आपको तो इसमे कूच गलत दिखेगही नही .... आपके वो बॉस वो भी वैसेही .. अर्थात हे रेकॉर्ड वर येऊ शकले नाही ...पण मग एच आर ला लेखी रिपोर्ट दिला आणि रीतसर कारवाई चालू झाली
दरम्यान पुढे ह्याच्या ट्रेनिंग चा रिपोर्ट वाईट आला ७०% अस्सेस्मेंत मध्ये फेल ..शिकण्यात लक्ष देत नाही / इतरांना डीस्टर्ब करतो ...फालतू शंका विचारतो ... सहकार्यंशी क्षुल्लक कारणांवरून भांडतो...ट्रेनर लोकांना हुज्जत घालून त्रास देतो ...
शेवटी १ महिन्याच्या पी आय पी वर टाकला तर ज्याच्या हाता खाली दिला तो मला येऊन रोज कोपरापासून नमस्कार करून जायचा कि हे काय प्रकरण दिलंय माझ्याकडे ... सोडव मला म्हणून ...कसा बस एक महिना वाट बघून एच आर ने तडक कोर्या कागदावर राजीनामा हाती लिहून घेऊन तत्काळ रिलीज केले ...
रिलीज केल्या नंतर १ १.५ महिन्याने त्याचे आई वडील कंपनीत आले होते कि आम्ही त्याला समजवले आहे .. कृपा करून त्याला परत घ्या वगैरे ...पण काही उपयोग झाला नाही ...
जाता जाता शेवटचे : मझ्या मित्राच्या एका दुसर्या प्रोजेक्ट वर एका २-३ वर्ष अनुभवी (?) मुलीला नोन पेर्फ्रोमंस साठी नारळ दिला ..उर्वरित कार्यवाही साठी एका ऑफिस मधून हेडोफीस ला जायला सांगितले ... ती नंतर हेडोफीस ला गेली नाही ... एखाद्या गूढ कथे सारखी जी गायब ती गायबच ..सिस्टीम मध्ये ती रिज़ाइन्द पण अकौंट सेटल्ड नाही....तो प्रोजेक्ट मनेजर नंतर १ २ महिने बेचैन होता ...पुढे काय झाले देव जाणे ...
असो इत्यलम
प्रतिक्रिया
16 Feb 2015 - 5:11 pm | टवाळ कार्टा
अग्ग्गागा....च्यायला त्याला ज्याने आत घेतले त्याची पण चौकशी करायला हवी...इंटर्व्हु वगैरे काही प्रकार झाला होता की नाही :(
16 Feb 2015 - 7:23 pm | पिंगू
असाच एक किस्सा माझ्या जुन्या कंपनीत घडला होता. माझ्याच सपोर्ट टीममध्ये असलेला आणि उद्धट असणारा एक जण वडिलांच्या आजाराचे निमित्त करुन गावी गेला. त्याने मॅनेजर किंवा कुणालाही याबद्दल अवाक्षरसुद्धा कळवले नाही आणि मग काय मॅनेजरने फोन केला, तरी रिस्पॉन्स शून्य. तेव्हा एका महिन्यातच त्याला फायर केले गेले.
16 Feb 2015 - 7:36 pm | गणेशा
हो अशी माणसे काढुन टाकली पाहिजेत.
अवांतर (?) :
परंतु, मुसाफिर या अच्युत गोडबोलेंच्या आत्मचरीत्र पुस्तकात आलेला किस्सा आठवुन गेला, आणि माणसिक संतुलन ढळलेला त्यात क्लायंट कडे पाठवलेला माणुस पण त्याला भारतात आणुन योग्य न्याय देवुन दिलेली माणुसकी ही आठवली. आणि त्या नंतर कित्येक वर्षांनी त्या माणसाच्या मुलीला बक्षिस यांच्याच हातुन दिले गेले तेंव्हा तिचे बोलणे आठवले. आणि अशी माणसे ही असतात या आयटीत असे सहज वाटुन गेले.
16 Feb 2015 - 7:52 pm | अत्रन्गि पाउस
ज्याल मदतिचि गरज आहे ..त्याला मदत करता येते पण लबाडी / अप्रामाणिकपणा-बेईमानी / बेशिस्त हे हे सहन करणे .. म्हणजे अढीत नासका आंबा जपण्यासारखे असते ...
17 Feb 2015 - 9:04 am | चिकित्सक
सिंगापुर , जपान ला नेटिव लोक ११-१२ तास काम विनतकरार सहज करतात . मुळात तिथले जॉब मार्केट भारता सारख नाहीए म्हणून म्हणा किंवा स्किल सेट चा प्रॉब्लेम म्हणा पण तिथले लोक इकॅडल्या सारखे स्विच करत नाहीत . मात्र फाइरिंग ची तरहा वेगळी आहे .
अनुभव १ - मी ज्या प्रॉजेक्ट वर नालेज ट्रान्स्फर साठी सिंगापुर गेलो होतो , क्लाइंट नि आधी सांगितल होत कि आधीची टीम दुसर्या कोणत्या तरी प्रॉजेक्ट वर पाठवणार आहे त्या मुळे तुमच्या कंपनी ला नालेज ट्रान्स्फर देत आहोत. नालेज ट्रान्स्फर जवळ जवळ संपल होत आणि आम्ही प्रॉजेक्ट टेक ओवर करणार इतक्यात मेल आली की क्लाइंट नी आधीची पूर्ण प्रॉजेक्ट टीम उडवली म्हणून.
अनुभव २ - मनिला मधे आमच्या क्लाइंट टीम चा मेंबरहोता , नेटिव असल्या मुळे इंग्लीश ची बोम्बा बोम्ब.
त्यातून अमेरिकन टीम मेंबर नि मेल पाठवली कि प्रोडक्षन मधे ह्या फाइल सिस्टम ला फ्री स्पेस कमी आहे काही तरी कर म्हणून . ह्या फिलिपीनो ने अक्खि फाइल सिस्टम उडवली आणि वर रिप्लाइ केल कि आता बघा म्हणून . आम्ही चेक केल तर फाइल सिस्टम च गायब . तडक मेल पाठवली . त्याच्या मॅनेजर आणि सहकार्या ने कसा बसा इश्यू रिसॉल्व केला , दुसर्या दिवशी तो मेसेंजर वर दिसला नाही , जेव्हा ऑनसाइट कोवोर्डिनेटर ला विचार्ल तेव्हा म्हणाला "अरे उस्की कल ही छुट्टी हो गयी , उस्की वजह से सिस्टम ४ घनते डाउन था"
अनुभव ३ - आमच्याच टीम मेंबर सुट्टी वर होता , क्लाइंट नि हाइ प्राइयारिटी टास्क दिला , शिफ्ट ला जी मुलगी होती तिला त्या सिस्टम च एक्सेस नव्हत , मॅनेजर ला संगितल , मॅनेजर नि त्या मुलीला संगितल त्या सुट्टी वर असलेल्या मुलाला फोन कर त्याची आयडी घे आणि काम कर . मुलीने त्या टीम मेंबर ला फोन लावला , त्याला ब्रिफ केल आणि आयडी मागितला , मुलाने नकार दिला , मॅनेजर मधे पडला आणि कडक शब्दात आय डी शेर करायला लावली , मुलाने शांत पणे ऐक्ल आणि फोन ठेवून दिला. कंपनीच्या इन्फर्मेशन सेक्यूरिटी ला त्याने फोन केला आणि काय घडल ते सांगितल . त्या मुलीची आणि मॅनेजर ची पार वाट लागली.
17 Feb 2015 - 11:27 am | अत्रन्गि पाउस
कोण केव्हा काय करेल सांगता येत नाही...
अनुभव २ वाचून : ...फैल सिस्टीम उडवली ...बापरे ..मलाच धडकी भरली कि वाचून
17 Feb 2015 - 12:09 pm | गिरकी
मला याच्या विरुध्द किस्सा आठवला… माझ्या हापिसात एका मुलीने डेव्हलपर साईड टेस्टिंग साठी लिहिलेला एक कोड चुकून तसाच ठेवला आणि तो तसाच प्रोडक्शन मध्ये गेला. तो प्रोजेक्ट एका मोठ्या टेलीकॉम क्लाइन्टचा होता. त्या कोड मुळे ३ दिवस आणि २ रात्री सर्व ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळाला. लक्षात येईपर्यंत सुमारे २ मिलियन यूएस डॉलर चे नुकसान झाले. यथावकाश कंपनीला फाईन वगैरे बसला. आम्हाला वाटत होते कि आता हिचा जॉब गेला. पण तसं झालं नाहीच. माझ्या म्यानेजरने काहितरी खटपटी करून या मुलीला कुठे पुढे आणले नाही. उलट तिला त्यावर्षी म्यानेजर कृपेनी अॅवार्ड पण मिळाले. जेव्हा २-३ महिन्यातच या मुलीने दुसरा जॉब मिळवून रिझाईन केले तेव्हा म्यानेजरचा चेहरा बघण्यालायक झाला होता.
17 Feb 2015 - 11:48 am | पेट थेरपी
मला खूप चांगली माहिती मिळाली. काही वेळा टेन्शन मध्ये दिवस काढले आहेत. स्वतः बिझनेस चालवताना एक दोघांना काढले आहे तडक. त्यामुळे दोन्ही बाजूंचे अनुभव आहेत. फाइल सिस्टिमच उडवली हे वाचून मला पण भ्या वाटले.
17 Feb 2015 - 12:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुण्यात एक प्रसिद्ध आय. एस. पी. कंपनीमध्ये रात्री शॉर्ट सर्कीटमुळे एका ए.सी. ला आग लागली. सिक्युरिटीने ड्युटी ईंजीनीयरला कळवले आणि त्यानेही ईमानदारीत मॅनेजरला फोन केला. मॅनेजर झोपेत होता त्याने फार सिरीयसली घेतले नाही. पण ऑटोमेटेड सिस्टम मुळे सी. ई. ओ. पर्यंत सर्वांना मेसेज गेले आणि दुसर्या दिवशी कोर्ट मार्शल झाले. मॅनेजरने (१२-१४ वर्षे अनुभव) ड्युटी ईंजीनीयरला(३-४ वर्षे अनुभव) कोपर्यात घेतले आणि सांगितले की दोघांची लागेल. त्यापेक्षा ही बला तु अंगावर घे. मी तुझे रेसिग्नेशन घेतो. आणि तुला एक महीन्यात दुसरा जॉबपण लावतो.घाबरु नकोस.
पुढे यथावकाश ड्युटी ईंजीनीयरने दोष आपल्या माथी घेतला आणि सर्व सेटल झाले.
17 Feb 2015 - 1:45 pm | आनन्दा
माझ्या एका कंपनीत घडलेला किस्सा आठवकंपनी एक प्रथितयश प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी. ती एका मोठ्या आयटी जाएंटने टेकओव्हर केली. हळू हळू काम वाढत गेले, आणि भारतातील कर्मचार्यांमध्ये ग्रोथची स्पर्धा लागली. नंबर ऑफ रिपोर्टी वाढवणे, काही वेळेस ऑनसाईटवरून प्रॉजेक्टस पळवून आणणे वगैरे उद्योग झाले. आणि या सगळ्यात एकदा ऑनसाईटला लेऑफ्स झाले. मग त्या राजकारणाने जोर घेतला, आणि ऑनसाईटला ऑफशोअरिंग सपोर्ट करणार्यांना वेचून बाजूला काढण्यात आले.
त्यानंतर नंबर लागला तो ऑफ्शोअर टीमचा. आणि १२० लोकांची टीम ३महिन्यात ० वर आणली. नशीबाने कंपनी मोठी होती. लोकांना रीऑर्गच्या नावाखाली ईकडे तिकडे चिकटवले. पण फायनली १२०पैकी ८०-९० लोक सोडून गेले. २०-३० लोकांना चिकटवले, आणि राहिलेल्यांना नारळ.
तेव्हापासून लेऑफ म्हणले की माझ्या पोटात गोळाच उभा राहतो. ते ३ महिने कसे काढलेत ते फक्त माझे मलाच माहिती. मी त्या कंपनीत नवीन होतो, आणि कंपनी सोडायची म्हणजे जॉयनिंग बोनस पासून सगळ्यावर पाणी सोडावे लागले असते. (म्हणजे उलटे पाणी. खर्च केलेले पैसे पुन्हा निर्माण करून कंपनीला द्यायचे :) )