फायर एक करणे २

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
11 Feb 2015 - 10:25 pm
गाभा: 

फायर एक करणे १
मागील धाग्यातील प्रतिसादांवरून निघालेल्या काही मुद्द्यांचा उहापोह .

  • कितीही काळजी घेतली तरी मुलाखत पार पाडून नोकरी मिळवणे आणि प्रत्यक्ष मैदान गाजवणे ह्यात फरक पडू शकतो त्यामुळे मास रिक्रूटमेंट मध्ये असे 'पाशिंजर लोकस' घुसतात.
  • एच आर लोकांना मागे जाऊन अमुक पाशिंजर का / कसा आला हे माहित करून घेणे फारच जिकीरीचे असते आणि कुणी फार फंदात पडत नाही
  • नोकरी वरून डच्चू दिल्यावर लेबर कोर्टात जाऊन तक्रार केली तर भलतीच शुक्लकाष्ठ लागतात मागे ...त्यामुळे एच आर लोकस पूर्ण खात्री करून मगच फायनल कृती करतात ..पण ती करतात तेव्हा मात्र कसलीही दयामाया नसते ...

असो तर दुसरी केस ...

असाच एक बर्यापैकी सिनियर रिसोर्स ..दिसायला वागायला जरासा रावडीच ... कामाला सुरुवात केलेली ...बर्यापैकी तरबेज होता...अचानक मला एच आर ची मेल ..कि बग्रौंड चेक करतांना त्या इसमाने दिलेल्या सर्तीफिकीट पैकी एक युरोप मध्ये केलेला एक डिप्लोमा त्याने केलाच नाहीये असे लक्षात आले

प्रथम सामोपचार म्हणून त्याला एका आयसोलेटेड रूम मध्ये नेऊन २ जण बरोबर ...

त्याला विचारले कि का रे बाबा तुझ्याबद्दल अमुक अमुक रिपोर्ट आलाय तर ...तुझी क़्वालिफ़िकेश्न्स काय त्यात त्याने त्या डिप्लोमाचा उल्लेख केला आणि पुढे त्याचे सगळे क़्वलिफ़िकेश्न्स खरोखरीच असल्याचा हेका ... बग्रौंड चेक करणारा रिपोर्ट खोटा आहे असा दावा केला .. इथे आमचे मार्ग खुंटले ...
आता एच आर च्या वरिष्ठांना फोन वर घेतले आणि आम्ही साक्षीदाराच्या भूमिकेत गेलो ..एच आर वाल्याने मात्र एखाद्या कसलेल्या वकीला सारखे प्रश्नोपप्रश्न विचारून त्या कोपऱ्यात घेतले ..आणि कणाकणाने खचत गेलेला तो रावडी माणूस शेवटी हताश होऊन मान्य करता झाला कि मी खोटी प्रमाणपत्रे दिली आहेत ... पुढे घडले ते सिनेमातल्या सारखे कुणालाहि ती रूम सोडायची परवानगी नव्हती...२ सिक्युरीतीवले १ admin वाला येऊन त्याचे ओळखपत्र ताब्यात घेऊन त्याला ऑलमोस्ट हातांना धरून गेट बाहेर घेऊन गेले आणि मग ह्या प्रकरणावर पडदा पडला ...

संपूर्ण कार्यवाही ४ तासात पार पडली...

क्रमश:

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Feb 2015 - 11:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कधी कोणाला फायर करायची वेळ आजपर्यंत आलेली नाही आणि येउही नये ही अपेक्षा.

बाकी नोकरी देतानाचं जर पार्श्वभुमीची पडताळणी केली असती तर एवढा त्रास झालाचं नसता असं वाटतयं. अर्थात सॉफ्टवेअर कंपन्यांमधल्या कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेतली तर एक वेगळी डिटेक्टीव्ह एजन्सी चालु करता येईल =))

अत्रन्गि पाउस's picture

12 Feb 2015 - 5:39 am | अत्रन्गि पाउस

हे असे कुणीच आनंदाने करू शकत नाही ...आपला मनस्तापसुद्धा खूप असतो ...

नोकरी देतानाचं जर पार्श्वभुमीची पडताळणी

...त्याचं असंय कि माणूस जॉईन झाल्या शिवाय हा खर्च उगीच कोण करेल ...आणि अश्या रीतीने फायर करायची वेळ एकूण कर्मचारी संख्येच्या फारच नगण्य प्रमाणात येते ..

प्रसाद१९७१'s picture

12 Feb 2015 - 12:25 pm | प्रसाद१९७१

समजा त्या माणसाने सुरुवातीलाच कबूल केले असते की त्याने खोटे सर्टीफिकेट दीले आहे. आणि तो कोर्स तुमच्या कंपनी साठी फार काही उपयोगी नसता तर तुमच्या कंपनीची काय भुमिका राहीली असती?

अत्रन्गि पाउस's picture

12 Feb 2015 - 1:10 pm | अत्रन्गि पाउस

त्या माणसाने सुरुवातीलाच कबूल केले असते की त्याने खोटे सर्टीफिकेट दीले आहे. आणि तो कोर्स तुमच्या कंपनी साठी फार काही उपयोगी नसता

तर कदाचित
१. लेखी लिहून घेतले असते
२. कडक समज दिली असती.
३.अधिकृत नोंदींमध्ये त्या कोर्सचा उल्लेख काढून टाकला असता

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 12:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

आजकाल एक नवे वाचण्यात आले , आपण सोशल मीडिया वर काय लिहिता हे ध्यानात ठेवा प्रोस्पेक्टिव रिक्रूटर्स ते वाचून आपल्या बद्दल मते बनवु शकतात, नोकरी धोक्यात येऊ शकते, हे खरेच होत असते का? की फ़क्त भीती दाखवणे असते? सोशल मीडिया वर एखाद्या एम्प्लॉयी न व्यक्त केलेली कंपनी विरोधी मते ही फायर करताना पुरावा म्हणुन वापरली जाऊ शकतात का?

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 1:06 pm | कपिलमुनी

एका कंपनीमधे एंम्प्लोयीने क्ष प्रोजेक्ट सक्स ! असे टाकले होते ! त्या वरून त्याला काढण्यात आलेले पाहिले आहे.
आणि ही गोष्ट क्लायंटने लक्षात आणून दिली होती आणि कारवाईची मागणी केली होती.

अशा परिस्थितीत तर निरपराध माणूस देखील बळी जाऊ शकतो ...निदान भारतात ... कारण संपूर्ण करार रद्द होण्याची भीती असते ...

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा

असे असेल तर तो शुध्ध वायझेडपणा आहे...काम काय कर्तो ते बघा म्हणावे

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 1:22 pm | कपिलमुनी

तो प्रोजेक्ट भारतामध्ये आउटसोर्स केला आहे हे त्यामुळे जगजाहीर झाले असे क्लायंटचे म्हणने होते .

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा

तसे क्लाएंटने कंपनीला कळवलेले का...आणि मुख्य म्हणजे कंपनीने एम्प्लोयीला कळवलेले का?

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 1:40 pm | कपिलमुनी

ज्या बर्‍याच छोट्या छोट्या ओळी आपण वाचत नाही , कधीकधी तर प्रोजेक्ट साईन करताना मॅनेजर वाचत नाही त्यामुळे असा घोळ होतो !

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 1:50 pm | टवाळ कार्टा

:(

अत्रन्गि पाउस's picture

12 Feb 2015 - 1:28 pm | अत्रन्गि पाउस

सर्वोत्कृष्ट काम करणारा सुद्धा जर काही नियम/शर्तींचा भंग करत असेल तर ते सहन केले जात नाही ...
माझ्या टीम मधल्या सगळ्या ८५ जणांची कस्टमरच्या 'नवीन' अटीनुसार ड्रग टेस्ट करावी लागली होती ...कुणी सापडला नाही ते सोडले तरी चुकून जरी काही उलट सुलट निघाले असते तर घोळ झाला असता ...

अत्रन्गि पाउस's picture

12 Feb 2015 - 1:16 pm | अत्रन्गि पाउस

आपण सोशल मीडिया वर काय लिहिता हे ध्यानात ठेवा प्रोस्पेक्टिव रिक्रूटर्स ते वाचून आपल्या बद्दल मते बनवु शकतात,

रिक्रूटर कशाला सगळेच तसे मत बनवू शकतात त्या मुळे जे जे कुणी आपल्या साठी महत्वाचे आहे त्यांच्या समोर आपली इमेज काय असावी हे आपण ठरव्तोच ...हे तसेच आहे ...

नोकरी धोक्यात येऊ शकते, हे खरेच होत असते का? की फ़क्त भीती दाखवणे असते?
सोशल मीडिया वर एखाद्या एम्प्लॉयी न व्यक्त केलेली कंपनी विरोधी मते ही फायर करताना पुरावा म्हणुन वापरली जाऊ शकतात का?

अगदी निश्चित होऊ शकते ...एखादे उदाहरण मला माहित नसले तरी कायद्याच्या कक्षेत येणारी बदनामी होत असेल तर हे नक्की होऊ शकते ..आणि तसे व्हावे हे मान्य व्हायला हरकत नाही ..

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 1:46 pm | कपिलमुनी

१ माझ्या कंपनीमध्ये २०१० मधे काही लोकांना नॉन परफॉरमन्समुळे काढणार अशी कुणकुण होती . एके दिवशी ज्युनियर एच आर बरीच धावपळ करताना दिसला ( १०० हेडकाउंट ) त्यामुळे आज कायतरी होणार याचा अंदाज आला .
प्रथेप्रमाणे एच आर ने काहीजणांना केबिनमध्ये बोलावला .. तोवर अ‍ॅडमिनने त्यांचे पीसी बंद केले. पत्र \चेक दिले \चेक दिले आणि तात्काळ मुक्त केले .

दुखी लोकांच सांत्वन 'सुदामा'मध्ये करत असताना ज्यु. एच आर रडत रडत आला आणि मॅनेजमेंटला शिव्या देउ लगला.. दिवसभर यांचे डॉक्युमेंत बनवून एक्झूक्यूट झाल्यावर शेवटी सीनियर एच आर ने याला पण नारळ दिला होता..

मृत्युन्जय's picture

12 Feb 2015 - 2:00 pm | मृत्युन्जय

दिवसभर यांचे डॉक्युमेंत बनवून एक्झूक्यूट झाल्यावर शेवटी सीनियर एच आर ने याला पण नारळ दिला होता..

अरारारा. ते बिचारं लैच हळहळलं असणार. आणि तो सिनियर तरी कित्ती निगरगट्ट.

मराठी_माणूस's picture

12 Feb 2015 - 2:19 pm | मराठी_माणूस

नॉन परफॉरमन्स, टास्क फोर्स ऑप्टिमायझेशन अशी गोंडस नावे देउन ही कार्यवाही केली जाते . खरे नॉन परफॉरमर्स म्हणजे वर बसलेले स्व्तःच्या सुरक्षतीते साठी अशा योजना आखतात. ज्यांच्या वर बितते त्यातले सगळेच नॉन परफॉरमर्स नसतात. २००० साली काही अस्थापनां मध्ये अशी कारावाई झाली होती. त्यातल्या कित्येक कर्मचार्यानी आपले सर्व करीअर तिथेच व्यतीत केले होते. त्यांना सेक्युरीटी मार्फत गेट पर्यंत एस्कॉर्ट केले गेले. तेंव्हा पासुन लॉयल्टी ह्या शब्दाचा फोलपणा लक्षात आला.

पाहुण्याच्या काठीने साप मारणे तसं का?

विटेकर's picture

12 Feb 2015 - 3:06 pm | विटेकर

प्रदिर्घ कारकीर्द असल्याने होण्याचा आणि करण्याचा बर्‍यापैकी अनुभव. फायरिन्ग एकदाच झाले काढले मात्र ४-५ जणांना ...
माझे झाले तेव्हा :
एक जागतिक आटो एमेन्सी - पण खप नसल्याने घाईला आलेली म्हनून आमची बदली मुम्बईला मनाविरुद्ध ! नव्या घरात नुकताच रहायला गेलो होतो पण इलाज नव्हता. मुंबई कधीच आवडत नव्हती , बायको सारखी आजारी पडे. माझी चीड-चीड ! बॉसशी अजिबात पटत नव्हते .. रोज ताणाताणी ! एच आर ने ३-४ वेळा मध्यस्थी केली.
पण बॉस पावरफूल होता.. एकदिवशी सकाळी त्यानेच दहा वाजता बोलविले आणि थंड्पणे सांगितले ..युवर सर्विसेस नो मोअर रिक्वायर्ड ! उध्वस्त झालो ... घराचा हप्ता १४,३४२ /- एक स्कूल गोईन्ग , एक तान्हे !!!
ताडकन उठलो आणि एच आर सिनियर व्हाईस प्रेसिडेन्ट्ला फोन लावला .. जाम भडकलो होतो.. सगळी भडास काढली .... तो म्हणाला आज घरी जा उद्या सकाळी बोलू !
मी घरी गेलो .. जाण्यापूर्वी बाथरूम मध्ये पोट्भर रडून घेतले ! घरी फोन केला होताच आल्यावर बायकोने धीर दिला..
सकाळी बरोब्बर आठ वाजता एच आर चा फोन... ! झाले त्याला इलाज नाही , तू राजीनामा दे ! तीन महीने कामावर येऊ नकोस ... तीन महिन्याचा पगार मिळेले .. मुख्य म्हनजे रोलवर राहशील... मी तुझी आपल्या दुसर्‍या डिविजन मध्ये सोय करायचा प्रत्यत्न करतो !
मी राजीनामा मेल ने पाठवून दिला, त्याच दिवशी कलिगबरोबर ल्याप टोप आनि मोबाईलपण पाठवून दिला.
एक महिना भयानक अस्वस्थ होतो , दुसर्‍या महिन्यात स्पर्धक कंपनीने बोलावून घेतले. त्याच महिन्यात नोटिस पे देऊन जोइन झालो !
( त्याच बॉस चा मागच्या आठवड्यात फोन आला होता .. माझ्या पाठोपाठ त्यालाही नारळ दिला.. तो आता गल्फ मध्ये आहे आणि रिटायर होतोय .. मला विचारतोय ,माझी रिप्लेस्मेन्ट म्हनून येतोस का ? )
पण या घटनेने मी खूप काही शिकलो ... नोकरी कधीही जाऊ शकते आणि गेली तरी फारसे बिघडता कामा नये इतपतच आपले ओझे वाढवावे ... शेतकर्याच्या नशिबात जसा दुष्काळ तसे आप्ले फायरिन्ग .. तुमचा दोष असो अथवा नसो .. परीणाम भोगावे लागतातच ! )

स्नेहल महेश's picture

12 Feb 2015 - 3:34 pm | स्नेहल महेश

नोकरी कधीही जाऊ शकते आणि गेली तरी फारसे बिघडता कामा नये इतपतच आपले ओझे वाढवावे ... शेतकर्याच्या नशिबात जसा दुष्काळ तसे आप्ले फायरिन्ग .. तुमचा दोष असो अथवा नसो .. परीणाम भोगावे लागतातच
प्रतिसाद आवडला
अगदी जवळून अनुभव घेतला आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Feb 2015 - 8:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत.

विटेकर's picture

12 Feb 2015 - 3:31 pm | विटेकर

१. हैदराबादचा एक मुसलमान होतकरु मुलगा.. अतिशय उत्तम काम .. पण सारख्या दांड्या मारायचा.. नको नको ते उद्द्योग करायचा .. एक दिवशी एक मुलगी आणि तिची आई आली गेट्वर ... माझे नाव घेऊन ! भेटायला गेलो तर म्हणाले साहेब याला सांगा , लग्न लाऊन द्या प्लिज नाहीतर आम्हाला तोंड काळे करावे लागेल. .. याला कामावरुन काढायची धमकी द्या .. मी पेचात .. या एका कारणासाठी मी त्याला कामावरून कसा काढ्णार ? शेवटी एच आर ला मध्ये घातले, ते म्हणे पोलिस क्म्प्लेन्ट आहे का ? ( सोपा प्रश्न अवघड करण्याची त्यांची हातोटी लोकविल्क्श्ण असते ) ती मुलगी आणि आई बिचारे निघून गेले. मी याला केबिन मध्ये बोलावून झाप झाप झापला ! ह्याच्या डोळ्यात घळाघळा पाणी ! पण मख्ख ! मी शेवटी व्याव्सायिक कौन्सेलिन्ग करुन घेतले पण याच्या दांड्या वाढतच होत्या.
असे २-३ वेळा झाल्यावर एच आर ने बोलावून नारळ दिला .. पण सही माझी होती !

२. टृयावल बिलात फेरफार करुन अधिक पैसे मिळ्वण्याची चट्क लागलेला एकजण होता... ..त्याला मीच पकडले आणि त्याची नोकरी घालवली. एकदा कंपनीच्या ट्रकबरोबर जबाब्दार माणूस पाहीजे म्हणून पुणे - नागपूर प्रवासाला पाठवले. मुक्काम जालण्यात केला .. तिथल्या लॉ़जचे बील एका रात्रीचे १५०० / लावले होते. मला शन्का आली मी त्या लॉजला फोन लावला... आणि कोटेशन मागविले .. लॉजचा मालक खरोखर चांगला होता.. त्याने सांगितले हा ७०० वाल्या खोलित राहीला होता आणि आमची महाग रूम सुद्धा ११०० ला आहे.. माझ्याकडूनच त्याने कोरे बील घेतले आहे.
पुढच्या १५ मिनिटांत गेटवरून सिक्युरिटी येऊन त्याला घेऊन गेले ..

३. फ्रौड सर्टीफिकेट .. मी शिवथर घळीत होतो.. फोन लागत नव्हता .. शेवटी फाट्यावर येऊन फोन केले .. एच आर ने फक्त कळवले आम्ही याला काढतोय ... नुकतेच लग्न झाले होते त्याचे .. फार वाईट वाटले मला. पण करता येण्यासारखे काहीही नव्हते

४. एक मुलगी ... सहा महिने काम केल्यावर लग्न झाले. कामात अजिबात लक्श नाही ,तासंतास फोन वर .. मला वाटले लग्न झाल्यावर कमी होईल .. पण प्रकरण वाढले .. एकदिवशी शिव्या खाऊन आलो आणि जागेवर बसलो तर नाचत आली आणि म्हणाली सर जरा लवकर घरी जायचे आहे !
संतापलो होतोच , म्हणालो , कायमचे जायला सांगितले तर कसे ?
निर्लज्जपणे म्हणाली चालेल... ताबडतोब एच आर ला फोन लावला .. २ तासात विषय संपला. पण त्या दोन तासात तिने रडून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला .. माझी टिम मात्र खूष झाली. या केसमध्ये मात्र एच आर ने माझ्याकडून काही ब्याक डेटेड रिपोर्ट घेतल्याचे आठवते.

बाकीची कारणे ठीक आहेत.

ट्रॅव्हल बिलात फेरफार केला म्हणुन काढले हे काही पटले नाही. तो अप्रामाणीकपणा आहे हे मान्य करुन सुध्दा.

सहसा कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार्‍या मनुष्याला प्रत्येक खर्च नोंदवणे किंवा त्याची बीले घेणे शक्य नसते. बाहेर फिरताना कंपनी जरी खर्च देत असेल तरी बराच पैसा स्वतःच्या खिशामधुन पण जात असतो. उदा. नाटक किंवा सिनेमाला जाणे, आजुबाजुची प्रेक्षणीय स्थळे पहाणे, किंवा त्या गावातल्या एखाद्या सहकार्‍याने जेवायला वगेरे बोलावले तर त्याच्या साठी एखादी भेटवस्तु नेणे इत्यादी. असा खर्च मग बीलामधे अ‍ॅडजेस्ट करायचा प्रयत्न सर्वसामान्य कर्मचारी करत असतात.

जो वर असे खर्च एका मर्यादेपर्यंत केलेले असतात तो पर्यंत तरी मी, बर्‍याच वेळा, अशा बीलांकडे दुर्लक्ष करायचो. जर कोणी मर्यादा ओलांडु लागला तर त्याला बोलावुन समज द्यायचो . बर्‍याच वेळा बीलातली रक्कमही कमी करायचो.

या नंतर एच आर बरोबर चर्चा करुन एक ट्रॅव्हल पॉलीसीच बनवुन घेतली. ज्या मधे वेगवेगळ्या शहरांसाठी प्रत्येकाच्या ग्रेड प्रमाणे रहाण्याची, खाण्यापीण्याची रक्कम नक्की केली आणि तसे परीपत्रक जारी केले. जर एखादा मनुष्य एखाद्या गावात आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला तरी त्या परीपत्रकाप्रमाणे आमची कंपनी त्याला रोज रु ५०० देते.

आता तर कंपनीने प्रत्येक कर्मचार्‍याला ट्रॅव्हल कार्डच दिली आहेत. त्यामुळे अनावष्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अजुनच सोपे झाले आहे.

या पॉलीसी मधल्या बदला नंतर बाहेरगावी जाणार्‍या लोकांनाही कितपत आणि कसा खर्च करायचा याची कल्पना आल्या मुळे ते लोक आपोआपच मर्यादा पाळु लागले आणि अकाउंट्स डिपार्टमेंटचे कामही बरेच सोपे झाले.

यात कंपनीचाही फायदा आणि कर्मचार्‍यांचा देखील.

(कोणताही मनुष्य धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नसतो याची जाणीव असलेला) पैजारबुवा,

चटक लागली होती असं म्हणाले ते.... रीपीट ऑफेंडर की कायसं तसलं असावं ते.

खर आहे ते.

पण चटक लागलेलेल बरेच (बहुतेक) जण असतात. मउ लागल्यावर कोपर्‍याने खणायला कोणाला आवडणार नाही?
म्हणजे तो माणुस नालायकच असतो असे गृहित धरणे मला खटकले. (अर्थात विटेकर काकांकडे अजुनही काही कारणे असतीलच जी त्यांनी ईथे दिली नाही) पण जर तो इतर कामांमधे चांगला असेल तर त्याला संधी द्यायला काय हरकत आहे?

आणि त्यात माझा खरा मुद्दा असा होता कंपनीची कार्यपध्दतच अशी असावी कि लबाड लोकांना लबाडी करण्याची कमीतकमी संधी मिळेल. एखादा मनुष्य अप्रामाणिकपणा करतो तेव्हा त्या मनुष्या इतकाच दोश त्याला अशी संधी उपलब्ध करुन देणार्‍या कंपनी व्यवस्थापनाचा आणि व्यवस्थापनाने बनवलेल्या कार्यप्रणालीचा असतो. त्यात सुधारणा करणे जास्त गरजेचे असते.

(कोणालाही फायर करायच्या सक्त विरोधात असलेला) पैजारबुवा,

विटेकर's picture

16 Feb 2015 - 12:09 pm | विटेकर

पैजार बुवा ,

पैश्यातील अफरातफर किती पैशाची केली हा माझ्या दृष्टीने अत्यंत गौण मुद्दा आहे. कंपनीचे रुल्स अत्यंत चांगले आहेत.
पण ही "अधिकची हाव" होती. तुम्ही कंपनीच्या वतीने बाहेर असता त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये कंपनीचे प्रतिनिधित्व करत असता. तुमच्याकडे बघून तुमच्या कंपनीबद्दल लोक अंदाज बांधत असतात.
ज्यावेळी तुम्ही कोरे/ अधिक रकमेचे बील मागता त्यावेळी समोरचा माणूस तुमच्या कंपनीबद्दल अंदाज बांधत असतो...
आणि म्हणूनच बाहेर असताना प्रत्येकाने अत्यंत सावध असले पाहीजे.
आनि म्हणूनच ही चूक क्षम्य नाही.
या फायरिंगच्यावेळी मला सर्वात कमी त्रास झाला, कारण सज्जड होते म्हणून !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 7:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

या नंतर एच आर बरोबर चर्चा करुन एक ट्रॅव्हल पॉलीसीच बनवुन घेतली. ज्या मधे वेगवेगळ्या शहरांसाठी प्रत्येकाच्या ग्रेड प्रमाणे रहाण्याची, खाण्यापीण्याची रक्कम नक्की केली आणि तसे परीपत्रक जारी केले.

हे लै बेस ! पण...

जर एखादा मनुष्य एखाद्या गावात आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला तरी त्या परीपत्रकाप्रमाणे आमची कंपनी त्याला रोज रु ५०० देते.

हे पटले नाही.

जर कोणी आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला आणि कंपनीला नाही सांगितले असे कळले तर मग काय करणार ?

कंपनीने आपल्या कोअर बिझनेसला साजेसे नियम बनवावे... (अर्थात, तुमची कंपनी गुप्तहेर कंपनी नसल्यास) कर्मचार्‍याच्या मागे गुप्तहेरगिरी करायला लागावी असे नियम टाळावे... कमी गुंता होतो आणि कंपनीतून एखाद्या चांगल्या कर्मचार्‍याला क्षणिक आर्थिक मोहाच्या आहारी जायची वेळच येत नाही.

याबाबतीत माझ्या दोन परदेशी नोकर्‍यांच्या अनुभवांची आठवण झाली...

पहिल्या नोकरीच्या करारात सुट्टीवर घरी येताना "त्या देशाच्या विमानकंपनीने आकारलेले कर्मचार्‍याच्या भारतातल्या घराच्या सगळ्यात जवळ असलेल्या विमानतळापर्यंतचे विमानभाडे + एक ठराविक रक्कम टॅक्सीभाडे म्हणून मिळेल" असे लिहीलेले होते. रजेचा अर्ज मंजूर झाला की हे सगळे पैसे आपोआप बँकेत जमा केले जायचे. प्रवासाची सर्व व्यवस्था आपली आपण बघायची अशी पद्धत होती, जे फारच सोईचे होते... कारण कोणा कारकूनावर अवलंबून न राहता स्वतःला सोईची व्यवस्था करता येत होती.

नोकरीची पहिली सुट्टी जरा गडबडीत मंजूर करून बँकेत पैसे जमा होण्याअगोदर सुट्टीवर आलो. भारतात येताना मुंबईपर्यंत अर्थातच विमानप्रवास केला. पण मुंबई-पुणे विमानप्रवास केला नाही (आजपर्यंत एकदाही केलेला नाही), त्यापेक्षा टॅक्सी नेहमीच जास्त सोईची वाटली आहे. परतल्यावर बँकेत अपेक्षेपेक्षा जास्त पैसे जमा झाल्याचे दिसले. तेव्हा अकाऊंट डिपार्ट्मेंटमध्ये जाऊन एकदम सज्जनपणे "मी मुंबई-पुणे टॅक्सीने गेलो त्यामुळे माझ्या अकाऊंट्मध्ये जमा केलेल्या पैश्यांपेक्षा कमी पैसे खर्च झाले आहेत, त्यातला फरक कसा परत करायचा ते सांगा" असे विचारले. तिथला पाकिस्तानी अकाउंटंट जरा गोंधळलाच ! "हे काय बोलतोय हा बाबा ?" असा चेहरा करत तो मला अकाउंट डायरेक्टरकडे घेऊन गेला.

सगळी कथा ऐकून इंग्रज अकाउंट डायरेक्टर हसायला लागला. म्हणाला, "तुम्हाला तुमची व्हावचर्स/क्लेम असं काही सबमिट करायला लागेल असं तुमच्या करारात आहे का ?... नाही ना ? मग आम्ही जे काही ड्यू आहे ते तुमच्या बँक अकाऊंट्मध्ये जमा करू; ते कसे खर्च करायचे ते तुमचे तुम्ही पहा. तुमच्या सुट्टीत तुम्ही मायदेशाला जा, इथेच रहा किंवा इतर देशात जा; गेलात तर विमानाने जा, गाडीने जा किंवा पायी जा... आम्हाला ते कळवण्याची अजिबात गरज नाही. घ्या, चाय सुलेमानी घ्या"

आम्ही खुशीने शॉक्स, आमची संस्था रॉक्स. An elegant way to achieve employee satisfaction by spending not a farthing more and, in fact, saving on un-necessary process and paperwork !

.

त्याच्या विरुद्ध अनुभव दुसर्‍या नोकरीत आला. देश गब्बरातला गब्बर, नको तिथे मिलियनमध्ये खर्च आणि नको तिथे नको तितकी खुसपटं ! विमानाचे तिकीट ठराविक एजंट कडूनच घ्यायला पाहिजे आणि ते तिकीट मायदेशाचेच पाहिजे... मग ते ऐनवेळेला घेतल्याने, महागड्या विमानकंपनीचे असल्याने आणि 'नो स्टॉपओव्हर'वाले असल्याने त्याची किंमत सर्वसाधारणपेक्षा दीडदोनपट झाली तरी बेहत्तर ! मात्र, प्रवास करणार नसलात तर मग त्याच देशाच्या विमानकंपनीच्या ठरवलेल्या सर्वसाधारण किंमतीच्या फक्त निम्मी रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार !

याला म्हणतात, "दात कोरून पोट भरणे." किंवा "Penny wise and pound foolish." अगदी क्षुल्लक पेक्षाही कमी पैसे वाचवून "एम्प्लॉयी सॅटिसफॅक्शन" कसे कमी करावे याचा आदर्श वस्तूपाठ !

सुबोध खरे's picture

13 Feb 2015 - 7:44 pm | सुबोध खरे

माझा भाऊ एका मोठ्या जर्मन कंपनीत कामाला होता. तेथे त्यांना दर वर्षी वैद्यकीय भत्ता म्हणून रुपये ३०००/- (१९८५ साली) देत असत. मग त्याचे तुम्ही काय करता हा तुमचा प्रश्न. उगाच खोटी बिले सुद्धा सदर करायला नकोत आणि कुणाला खोटे आजारही दाखवायला नकोत. तसेच दर वर्षी सुट्टीचा प्रवासखर्च(LTA) म्हणून ३०००/- रुपये देत. कुठे आयचा तर जा नाही तर नको. उगाच अकाऊंटस विभागात जास्त माणसेहि नकोत आणि लोकांना मोहात पडायलाही नको. असेच नियम सर्व सरकारी/ निमसरकारी/ खाजगी आस्थापनांना असायला पाहिजे.
दर वर्षी रुपये १५०००/- ची खोटी बिले देण्यास नकार दिल्याने काही मित्र गमावलेला डॉक्टर

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

"पगार आणि फायदे" (सॅलॅरी अँड बेनेफीट्स) व्यवस्थापनाचा सर्वात पहिला नियमः

"जे काय द्यायचे ते असे द्या की ते देताना/घेताना करायला लागणार्‍या कारवाईमध्ये (प्रोसेस्/प्रोसिजर) ऐनवेळेस घ्यायचे निर्णय कमीत कमी वेळा घ्यायला लागावेत, कमीत कमी मानवी हस्तक्षेप असावा आणि योग्य वेळात/वेळेस हे काम व्हावे. मुख्य म्हणजे नियम असे असावेत की ते वापरून येणारी रक्कम कर्मचारी व व्यवस्थापन यांनी स्वतंत्रपणे काढली तरी त्यां दोन आकड्यांत काहीही (कमीत कमी लक्षणीय) फरक असू नये."

हे जेथे नसते तेथे... अगदी प्रमाणापेक्षा जास्त पगार आणि फायदे देणार्‍या संस्थांमध्येही... कर्मचारी असंतुष्ट असतात. बर्‍याचदा काय केले/दिले यापेक्षा जास्त ते कसे केले/दिले यावर मानवी संतोष अवलंबून असतो.

हाडक्या's picture

13 Feb 2015 - 8:31 pm | हाडक्या

+१

बर्‍याचदा काय केले/दिले यापेक्षा जास्त ते कसे केले/दिले यावर मानवी संतोष अवलंबून असतो.

हेच म्हणणार होतो. :)

अत्रन्गि पाउस's picture

13 Feb 2015 - 8:37 pm | अत्रन्गि पाउस

+१०००

बटाटा१'s picture

14 Feb 2015 - 6:01 am | बटाटा१

बर्‍याचदा काय केले/दिले यापेक्षा जास्त ते कसे केले/दिले यावर मानवी संतोष अवलंबून असतो.

अगदी सहमत.. पुण्याच्या एका सॉफ्टवेअर कंपनीचा अनुभव, वर्षाला एकदा दोघांसाठी मल्टीप्लेक्स ला चित्रपटाचा खर्च, बायकोच्या वाढदिवसाला कंपनीकडून बुके आणि रात्रीच्या रेस्त्राँच्या जेवणाचा खर्च, लग्नाचा वाढदिवस असेल तर अर्धादिवस सुट्टी आणि रेस्त्राँच्या जेवणाचा खर्च मिळायचा...

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Feb 2015 - 10:09 am | ज्ञानोबाचे पैजार

एक खुलासा :- आमच्या कंपनीने जरी खर्चाची कमाल रक्कम निश्चीत केली असली तरी अशा खर्चाची बीले कर्मचार्‍यांना क्लेम बरोबर जोडावी लागतात.

जर कोणी आपल्या नातेवाईकांच्या घरी राहिला आणि कंपनीला नाही सांगितले असे कळले तर मग काय करणार ?

अशा वेळी त्या मनुष्या कडे हॉटेलचे रहाण्याचे बील नसते. नातेवाईकांकडे राहिल्याने कंपनीला येणारा लॉजींगचा खर्च वाचतो. बर्‍याच वेळा रात्रीचे जेवणही हे कर्मचारी स्वतःच्या नातेवाईकांच्या घरीच घेतात. त्याचेही बील असणे शक्य नसते. तोच वाचलेला खर्च कर्मचार्‍या बरोबर वाटुन घेण्यासाठी रु ५०० ही रक्कम ठरवण्यात आली होती.

या पॉलीसी नंतर उगाचच अप्रामाणीकपणा करण्याची (चिंधी चोरी करण्याची) कर्मचार्‍यांची सवय आपोआप कमी झाली असा कंपनीचा अनुभव आहे.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Feb 2015 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

बनावट बिले काय चिंधीचोर कशीपण जमा करू शकतो.

माझा मुद्दा असा आहे की नियम असे असावे की, चोरीची शक्यता ठेवून ती पकडण्यापेक्षा चोरीची शक्यताच नाहीशी झाली पाहिजे. Prevention is always better than cure.

त्यांतले बिझनेस लॉजीक असे:

चिंधी चोरीची (कमी का होईना) शक्यता असणार्‍या नियमांची अंमलबजावणी करताना अनेक छुपे खर्च होतात आणि ते बहुदा दुर्लक्षित राहतातः

अ) नियम वापरात आणताना आणि त्यांचे उल्लंघन पकडण्यासाठी होणारा खर्च (4MT = Manpower, Money, Materiels, Mindware and Time)

आ) कर्मचार्‍यांच्या मनात येणारे कंपनीविरोधी विचार (काय किचकट/कटकटी/कंजूस कंपनी आहे, इ) आणि त्यांचा कंपनीशी होणार्‍या भावनिक जवळकीवर आणि कर्मचारी संतोषावर होणारा दुष्परिणाम. या सर्वामुळे वाढणारे कर्मचारी चलनवलन (टर्नओव्हर, अट्रीशन, इ) आणि त्यामुळे वाढणारा खर्च.

इ) कंपनीच्या मौखीक जाहिरातीवर (word of mouth) होणारे दुष्परिणाम. ह्याचा सतत नविन उत्तम बौद्धिक संपत्ती कंपनीकडे आकर्षित करण्यावर आणि राखण्यावर (continuously attracting and retaining promising new talent) काय परिणाम होतो हे सांगायला नकोच.

हे झाले मॉनेटाईयझेशनसंबंधात सहज समजण्यायोग्य महत्वाचे तोटे. आणखी इतर उघड्/छुपे तोटेही आहेत. हे सर्व तोटे सरळ अथवा वळणाने कंपनीचा खर्च वाढवतात.

मात्र, वरच्या खर्चांच्या तुलनेने चिंधी चोरीची शक्यता नसणारे नियम असल्याने झालेला खर्च कितीतरी पटीत कमी असतो. तो खर्च कंपनीच्या उज्वल भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक समजून केल्यास जवळच्या आणि दीर्घकालात उत्तम फायदा/खर्च गुणोत्तर (BCR; Benefit Cost Ratio) मिळते, असा अनुभव आहे.

खटपट्या's picture

13 Feb 2015 - 9:29 pm | खटपट्या

कधी कधी हे संगनमतानेदेखील होते.
मी टीम लीड असताना आमचा एक ज्युनीअर खूप चांगले काम करायचा. पण अनुभव कमी असल्यामुळे पगार खूप कमी होता. बॉसला सांगीतले पण एचार काही ऐकेना. शेवटी बॉसने त्याला विचारले की तु नाईट शीफ्टला यायला तयार आहेस का. तो हो म्हणाला. तो नाईट शीफ्ट्ला यायला लागल्यावर बॉसने रोज प्रवासाचे ५०० रू. चे वॉवचर द्यायला सुरवात केली. यावर तो मुलगा खूप आवडीने काम करु लागला. आणि त्याच्यावर रात्रपाळीला येण्याची सक्तीही नव्हती. जेव्हा जेव्हा त्याला "कडकी" असायची तेव्हा तो आठवडाभर कींवा १५ दिवस रात्रपाळी करायचा. हे फक्त आमच्यामधेच ठेवले. कालांतराने त्याला प्रमोशन देउन त्याचा पगार वाढवण्यात आला.

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 3:38 pm | कपिलमुनी

फायर झाल्यावर काय करावे ? किंवा अशा परीस्थितीला कसे तोंड द्यावे?

१. ३ महिने पुरेल एवढी लिक्विड कॅश : ज्यात सर्व इएमआय + महिन्याचा खर्च + इमरजन्सी खर्च हे सेव्हिंगमध्ये असावेत.

२. होम लोनचा हप्ता मोठा असेल आणि भरणे शक्य नसेल तर बँकेला तसे कळवावे.

३. शकयतो क्रेडीट कार्ड ई. ची बिले पेंडींग ठेउ नये.

४. सध्याच्या एच आरची कधीही भांडू नये ( पुढच्या कंपनीमधून रेफर्न्स साठी फोन येतो.)

५. घरी लपवू नये . सर्वांना स्पष्ट शब्दात कल्पना द्यावी म्हणजे दबाव कमी होतो . ६-८ वर्षांची मुले सुद्धा ही परीस्थिती समजून घेतात.

स्पंदना's picture

13 Feb 2015 - 2:51 am | स्पंदना

आत्ता या क्षणि याच परिस्थितीतून जात आहोत. ibm ची retrenchment सुरु आहे.५००० स्ट्रेंथ मधून १००० दोन महिन्यात काढले. :( सुरु आहे शोधशोध. काय करणार.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2015 - 6:36 pm | श्रीगुरुजी

>>> ibm ची retrenchment सुरु आहे

IBM चं हे नेहमीचंच आहे. २००८ मध्ये काही कारण नसताना ४०० ट्रेनींना काढून टाकले होते. किती काढायचे हा आकडा ठरविल्यावर सर्व ट्रेनींची एक इंग्लिश भाषेची परीक्षा घेतली आणि परीक्षेत कामगिरी खराब असल्याचे कारण सांगून ४०० जणांना नोकरी सोडायला लावली होती.

त्यावेळी माझ्या अकाउंट मध्ये एक ट्रेनी मुलगी होती. तिचे एका प्रोजेक्ट मध्ये कामाचे साडेपाच महिने पूर्ण झाले होते. तिला सुद्धा डच्चू देणार असल्याचे अंतर्गत वर्तुळातून समजले. साडेपाच महिन्यात तिला प्रोजेक्टचे काम व बँकिंग प्रोजेक्टचे बिझनेस व डोमेन ज्ञान बर्‍यापैकी समजायला लागले होते. तिला काढल्यावर तिच्या जागी बेंचवर असणार्‍या एका दुसर्‍याच ट्रेनीला मी घ्यावे असा एचआर कडून दबाव येत होता. तिच्या जागी नवीन ट्रेनी म्हणजे त्याला सगळे ज्ञान नव्याने द्यायला लागणार व त्यासाठी अनेक महिने फुकट जाणार. म्हणजे प्रोजेक्टचेच नुकसान. तिच्याऐवजी बेंचवर असणार्‍या एखाद्या ट्रेनीला डच्चू दिला असता तर कोणाचेच (तो ट्रेनी सोडून) नुकसान झाले नसते. तिला काढू नये यासाठी मी माझ्या बॉसबरोबर बराच वाद घातला. पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तिला जावेच लागले.

तिला काढणार हे अनधिकृतरित्या समजताच माझ्या काही ओळखीच्या कंपन्यांमध्ये तिचा रेझ्युमी पाठवून तिच्यासाठी खटपट केली. आयबीएम काढल्यावर लगेचच तिला टिसीएस मध्ये ट्रेनीचा जॉब मिळाला. तिचा रेझ्युमी मी टिसीएसमधील माझ्या ओळखीच्या एका वरीष्ठ व्यक्तीला आधीच पाठविला होता. एक जॉब गेला तर दुसरा लगेच मिळाला. गंमत म्हणजे आयबीएममधून बाहेर गेल्यावर तिने आजतगायत कोणताही संपर्क ठेवलेला नाही.

चालतच्चे हो गुर्जी...नेकी कर और दरिया मे डाल !

स्पंदना's picture

17 Feb 2015 - 5:21 am | स्पंदना

कहर म्हणजे त्यातच रिक्रुटमेंट्पण सुरु आहे. डोंबलाचा क्रायसीस यांचा. दोन की तीन रिझ्युमी पुन्हा IBM मध्येच टाकलेत (वेगवेगळ्या पोस्टस अन त्याप्रमाणे चेंज केलेले रिझ्युमी) .
जाउ दे. नवरा खडान खडा बातम्या देत असतो (किंवा त्याच न कंटाळता ऐकणारी मीच एकटी असावी ;) ) त्यामुळे मागचे पुढचे संदर्भ मलाच आठवत असतात. ह्याच बर आहे, भडभडा बोलायच माझ्यासमोर आणि विसरुन जायच. मग मी बसते विचार करुन टाके घालत.
आजवर तरी बरीच शिलाई झालीय, पुढच पुढं.

काळा पहाड's picture

17 Feb 2015 - 11:45 am | काळा पहाड

रेझ्युमे मध्ये बिग डाटा आणि क्लाऊड टाकायला सांग. बोल्ड मध्ये.

इरसाल's picture

17 Feb 2015 - 6:25 pm | इरसाल

इतक्या दिवसात स्वेटर झाला असतां तयार. जावुद्या आता काय फाय्दा गेला हिवाळा ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 3:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

कठीण आहे राव!!!

सॅगी's picture

12 Feb 2015 - 7:28 pm | सॅगी

लेखातील आणी प्रतिसादातील अनुभव रोचक आहेत.

पुढील भागाच्या प्रति़क्षेत..

आदूबाळ's picture

12 Feb 2015 - 8:19 pm | आदूबाळ

विटुकाका, कपिलमुनी - भारी अनुभव आहेत. भारीच!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Feb 2015 - 9:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फेक रीझ्युमे वरुन आठवण झाली. आमच्या कडे एक असा किस्सा घडल्याचं आठवतयं. पण तो फेक एक्स्पिरिअन्स सर्टिफिकेटचा होता. माझ्या सगळ्यात पहिल्या कंपनीमधे क्वालिटी कंट्रोल साठी एक डिप्लोमावाला एकाला नोकरी लागली. त्यावेळेस त्याचा डिपार्टमेंटचा सुपरवायझर रजेवर होता दोन आठवड्यांच्या. दोन आठवड्यांनी आल्यावर ओळख आणि कुठे आधी काम केलेलं ह्यावरुन विषय निघाला तेव्हा त्या मुलानी मी अमुक अमुक व्हेंडर कंपनी कडे १ वर्ष काम करत होतं असं सांगीतलं. त्यावेळेला त्या सुपरवायझर ला शंका आली. कारण तो कामानिमित्त सतत त्या व्हेंडरकडे जात येत असे आणि त्याच्या स्टाफशी ह्याच्या ओळखीही होत्या, त्याला ह्या मुलाला कधी पाहिल्याचं आठवलं नाही. मग ह्यानी थेट एच.आर. कडे असं लेखी स्टेटमेंट दिलं. त्यावर एच.आर. नी बॅकग्राऊंड चेक घेतला. त्यावेळेसं असं लक्षात आलं की ह्यानी त्या व्हेंडरच्या नावे बनावट सर्टिफिकिट बनवलं होतं. त्यावरचा फोन क्रमांक आपल्या मित्राचा दिला होता. एच.आर.नी सरळ त्याला शिफ्टमधुन चार कामगारांच्या मदतीनी चक्क कॉलर वगैरे धरुन सिक्युरिटी गेटला पाठवला होता. पोलिस केस केली आणि मो़कळे झाले.

ब़जरबट्टू's picture

13 Feb 2015 - 11:13 am | ब़जरबट्टू

फेक सर्टीफिकेट व इन्टरव्यूला उधारीचा आत्मविश्वास ह्या सुध्दा एक कलाच आहेत.. सर्वानाच जमेल असे नसते.. :)

अत्रन्गि पाउस's picture

13 Feb 2015 - 2:28 pm | अत्रन्गि पाउस

+१

कपिलमुनी's picture

13 Feb 2015 - 11:42 am | कपिलमुनी

आयटी मधला पहिलाच जॉब होता . छोटी कंपनी होती. दर वर्षी बॉण्ड केला जायचा . जे बॉण्ड करतील त्यांना चांगले इंक्रीमेंट मिळायचे बाकीच्यांना जोब थ्रेट असायचा . २००८ -१० चे दिवस होते . पहिले २ वर्ष गुमान बाँड केला . २ वर्षे पूर्ण झाला तेव्हा नाही केला. कारण आपण चांगला काम करतो याचा काँफिडन्स होता. त्याच वेळेस लग्न केला त्याला महिनाच झाला तेव्हा मालकांनी ( एम डी) ने आत बोलावला , एच आर होता आणि सांगितला , तु बाँड कर नाहीतर राजिनामा दे ! तु बाँड न केल्यामुळे बाकीच्यांना पण तसे करायला उत्तेजन मिळत आहे आणि हे कंपनी पॉलिसीला मारक आहे .
एच आरला वाटले आत्ताच लग्न झालय . झक्क मारत बाँड करेल .. पण मी सरळ राजीनामा दिला आणि बाहेर आलो .
नुकतेच लग्नात सर्व पैसे खर्च झालेले आणि नोकरी गेलेली . ( अशा वेळेस घरातल्या दोघांनी नोकरी करणे कित्ती गरजेचे असते ते कळते) .
सुदैवाने त्याच्या तिप्पट पगाराची नोकरी १५ दिवसात लागली . पण ते १५ दिवस ..

सौंदाळा's picture

13 Feb 2015 - 1:58 pm | सौंदाळा

ऑफिसमधे काही वर्षापुर्वी घडलेला विचित्र किस्सा.
एका मुलाचे त्याच्या काकांशी जमीनीवरुन काहीतरी भांडण, कोर्ट कचेर्‍या चालु होते.
काका आणि याचे एकमेकांना फोन असायचे आणि त्यात भांडाभांडी, धमक्या वगैरे प्रकार.
एकदा असाच फोन झाला आणि नंतर या पठ्ठ्याने फ्री एस्.एम. एस. साईट वरुन काकाला धमकीवजा मेसेज केला.
काकाने मेसेज दाखवुन जीवाला धोका आहे म्हणुन पोलिस कंप्लेंट केली. मेसेज कुठुन आला हे ट्रेस करुन कंपनीत पोलीस आले.
त्याच दिवशी याला डच्चु मिळाला.

तुषार काळभोर's picture

14 Feb 2015 - 10:59 am | तुषार काळभोर

असं पन असतं!!

सांगलीचा भडंग's picture

15 Feb 2015 - 12:51 am | सांगलीचा भडंग

साधारण असे फेक लोक एखादे काम मोठे असेल तर लगेच खपून जातात म्हणजे . १०-१२ लोकांचा ग्रुप एखाद्या प्रोजेक्ट वर काम करत असेल तर त्यामध्ये एखाद्या फेक माणसाचा समावेश झाला तर लगेच काही बाहेर पडत नाही . आईट मध्ये तरी बर्याच वेळा बिलिंग च्या नावाखाली माणसे असणे महत्वाचे असते तिथे तर सहज खपून जाते . पण अश्या माणसाला जर चुकून छोटी टीम मिळाली त(२-३ ) लोकांची तर फार वाईट हाल होतात आणि बाहेर पडतो .

चिकित्सक's picture

15 Feb 2015 - 3:07 pm | चिकित्सक

आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम लीड ला रात्र पाळीत काम करायला त्रास व्हायच , मेडिकल इश्यूस होते पण प्रॉजेक्ट मॅनेजर त्यालया जबरदस्तीने नाइट करायला लावायचा . जरी टेक्निकॅली स्ट्रॉंग असला तरी कम्यूनिकेशन चांग्ल नसल्या मुळे कॉल वर गंमती व्हायच्यात आणि त्याचेच टीम मेंबर त्याची खिल्ली उडवायचे. प्रॉजेक्ट मॅनेजर खूपच अतॉरिटेटिव होता , ह्या टीम लीड चे त्याच्याशी जमायचे नाही म्हणून अगोदर पासूनच बेड बुक मधे होता. असेच एकदा क्षुल्लकश्या कारणा वरुन दोघं जुंपली आणि तेंहवा पासून ह्याची इमेज आणखी डाउन झाली. कुठलस क्लाइंट शी मिस्कम्यूनिकेशन झाल आणि ह्याचा गेम झाला. ज्या शिफ्ट मधे हे झाल ती त्याने एका टीम मेंबर बरोबर बदली केली होती , ज्याच्या मुळे मिस कम्यूनिकेशन झळ त्याने काणा वर हात ठेवले , ह्याला शिव्या बसल्यात शिवाय मॅनेजर ने त्याला पीआईपी ला पाठवल अश्या प्रॉजेक्ट मधे टाकल जिथे ह्याच्या टेक्नालजी च काहीच काम नव्हत, अर्थात एच आर ला नेगेटीवे फीडबॅक दिल्या गेला कि हा काम करायला टाळातळ करतो ह्याला काम जमात नाहीत नाइट शिफ्ट करायला नकार देतो ह्याच्या मुळे टीम ला त्रास होतो ई. ह्याच्या जागी कुठल्या फेक हैदराबादी ला आणल , त्या हैदराबादी ला केटी वगैरे देण्याचे सोपस्कार पुन: ह्यालाच सोपवण्यात आले , आणि वर त्या फेकर हैदराबादी ने ह्याची कंप्लेन्ट केली की हा केटी नीट देत नाही म्हणून.

टीम पार्टी मधे सर्व टीम मेंबर्ज़ च्या समोर अत्यंत अनौपचारिक पणे ह्याला फायर करण्याची अनाउन्स्मेंट केली. ह्याने राजीनामा देण्याची तयारी दाखवली तर ह्याला ३ महिने नोटीस सर्व करायला भाग पाडले गेले, त्यातून अडीच महिना नाइट शिफ्ट. ३ महिन्याचा पगार कंपनी पॉलिसी म्हणून रोखण्यात आला आणि नोकरीच्या शेवटच्या दिवसा पासून ३० दिवसानी सेटल्मेंट करण्यात आली. दरम्यान ह्याने दुसरा जॉब बघितला होता तरी सुद्धा प्रॉजेक्ट मॅनेजर च्या आकरासटाळ्या स्वभावामुळे ती सुद्धा ऑफर हात ची गेली. अत्यंत पद्धतशीर पणे त्या मॅनेजर ने टीम लीड चा गेम वाजवला.

हा दिप्रेशन मधे गेला , २-३ महिने घरी रिकाम बसाव लागल , रम्यान च्या काळात आम्ही जवळच्या मित्र जमेल तशी मदत करत होतो. आणि नंतर महत प्रयासाने त्याला कुठे दुसरी नोकरी मिळाली , मधले ६-७ महिने हा अत्यंत टेन्शन मधे होता , दोन शाळकरी मुल आणि बायको वर्किंग नसल्या मुळे ह्याला ते दिवस कठीण गेलेत .

आणि कहर म्हणजे त्या फेकर हैदराबादी ला बेस्ट परफॉर्मर चा अवॉर्ड मिळाला !अर्थात मेहनत त्याच्या हात खाली काम करणारे टीम मेंबेर्सचिच होती पण रेकग्निशन ह्याने एकट्याने लाटला.
अर्थात तो कुचकामी आहे ह्याची जाणीव त्या टीम ला आता झाली , अजूनही ते म्हणतात ह्या फुकटया फेकर हैदराबादी हून जुना टीम लीड परवडला

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2015 - 5:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

"बेड बुक" या टर्मवर अडखळलो. तीनदा वाचले तेव्हा तुम्हाला "बॅड बुक" म्हणायचे आहे हे ध्यानात आले :)

बॅ = b+E

कपिलमुनी's picture

16 Feb 2015 - 1:34 pm | कपिलमुनी

मॅनेजरचा सत्कार करायचा की !

जर हे वरचं आपण शेवटपर्यंत वाचले असेल, आणि त्यातले काही प्रतिक्रिया देण्याइतपत कळले असेल, तर आपलाच पहिले सत्कार करायला हवा!!!

कपिलमुनी's picture

16 Feb 2015 - 3:06 pm | कपिलमुनी

चुकलं माझ !
माजाच सत्कार करा .. दंबूक आणा रे :(

काळा पहाड's picture

16 Feb 2015 - 3:32 pm | काळा पहाड

धुवायला टाकलीय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 8:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

स्पंदना's picture

17 Feb 2015 - 5:15 am | स्पंदना

द्या टाळी!!

:))))

आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम लीड ला रात्र पाळीत काम करायला त्रास व्हायच , मेडिकल इश्यूस होते पण प्रॉजेक्ट मॅनेजर त्यालया जबरदस्तीने नाइट करायला लावायचा . जरी टेक्निकॅली स्ट्रॉंग असला तरी कम्यूनिकेशन चांग्ल नसल्या मुळे कॉल वर गंमती व्हायच्यात आणि त्याचेच टीम मेंबर त्याची खिल्ली उडवायचे. प्रॉजेक्ट मॅनेजर खूपच अतॉरिटेटिव होता , ह्या टीम लीड चे त्याच्याशी जमायचे नाही म्हणून अगोदर पासूनच बेड बुक मधे होता. असेच एकदा क्षुल्लकश्या कारणा वरुन दोघं जुंपली आणि तेंहवा पासून ह्याची इमेज आणखी डाउन झाली. कुठलस क्लाइंट शी मिस्कम्यूनिकेशन झाल आणि ह्याचा गेम झाला. ज्या शिफ्ट मधे हे झाल ती त्याने एका टीम मेंबर बरोबर बदली केली होती , ज्याच्या मुळे मिस कम्यूनिकेशन झळ त्याने काणा वर हात ठेवले , ह्याला शिव्या बसल्यात शिवाय मॅनेजर ने त्याला पीआईपी ला पाठवल अश्या प्रॉजेक्ट मधे टाकल जिथे ह्याच्या टेक्नालजी च काहीच काम नव्हत, अर्थात एच आर ला नेगेटीवे फीडबॅक दिल्या गेला कि हा काम करायला टाळातळ करतो ह्याला काम जमात नाहीत नाइट शिफ्ट करायला नकार देतो ह्याच्या मुळे टीम ला त्रास होतो ई. ह्याच्या जागी कुठल्या फेक हैदराबादी ला आणल , त्या हैदराबादी ला केटी वगैरे देण्याचे सोपस्कार पुन: ह्यालाच सोपवण्यात आले , आणि वर त्या फेकर हैदराबादी ने ह्याची कंप्लेन्ट केली की हा केटी नीट देत नाही म्हणून.

टीम पार्टी मधे सर्व टीम मेंबर्ज़ च्या समोर अत्यंत अनौपचारिक पणे ह्याला फायर करण्याची अनाउन्स्मेंट केली. ह्याने राजीनामा देण्याची तयारी दाखवली तर ह्याला ३ महिने नोटीस सर्व करायला भाग पाडले गेले, त्यातून अडीच महिना नाइट शिफ्ट. ३ महिन्याचा पगार कंपनी पॉलिसी म्हणून रोखण्यात आला आणि नोकरीच्या शेवटच्या दिवसा पासून ३० दिवसानी सेटल्मेंट करण्यात आली. दरम्यान ह्याने दुसरा जॉब बघितला होता तरी सुद्धा प्रॉजेक्ट मॅनेजर च्या आकरासटाळ्या स्वभावामुळे ती सुद्धा ऑफर हात ची गेली. अत्यंत पद्धतशीर पणे त्या मॅनेजर ने टीम लीड चा गेम वाजवला.

हा दिप्रेशन मधे गेला , २-३ महिने घरी रिकाम बसाव लागल , रम्यान च्या काळात आम्ही जवळच्या मित्र जमेल तशी मदत करत होतो. आणि नंतर महत प्रयासाने त्याला कुठे दुसरी नोकरी मिळाली , मधले ६-७ महिने हा अत्यंत टेन्शन मधे होता , दोन शाळकरी मुल आणि बायको वर्किंग नसल्या मुळे ह्याला ते दिवस कठीण गेलेत .

आणि कहर म्हणजे त्या फेकर हैदराबादी ला बेस्ट परफॉर्मर चा अवॉर्ड मिळाला !अर्थात मेहनत त्याच्या हात खाली काम करणारे टीम मेंबेर्सचिच होती पण रेकग्निशन ह्याने एकट्याने लाटला.
अर्थात तो कुचकामी आहे ह्याची जाणीव त्या टीम ला आता झाली , अजूनही ते म्हणतात ह्या फुकटया फेकर हैदराबादी हून जुना टीम लीड परवडला

"७१".. हुश्श्य..!!!

कपिलमुनी's picture

16 Feb 2015 - 4:21 pm | कपिलमुनी

प्रॉजेक्ट : प्रकल्प
प्रॉजेक्ट मॅनेजर : प्रकल्प व्यवस्थापक
मेडिकल इश्यूस : वैद्यकीय समस्या / आरोग्यविषयक समस्या
टीम लीड : संघ नेता / गटनेता
नाइट : रात्रपाळी ( वरील अभिप्रेत अर्थ )
टेक्निकॅली स्ट्रॉंग : तांत्रिकदृष्ट्या समर्थ
कम्यूनिकेशन : संवाद कौशल्य
कॉल : ? (कॉलवर ? ) ? दूरध्वनीवर बोलताना
टीम मेंबर : सहकारी
अतॉरिटेटिव : मूळ शब्दच कळला नाही .

बेड बुक : अगोदर पासूनच नावडता होता / अगोदर पासूनच पाण्यात पहायचा ??
इमेज डाउन : प्रतिमा वाइट झाली
क्लाइंट :ग्राहक
मिस्कम्यूनिकेशन : विसंवाद

*dash1* *DASH* *WALL*

अत्रन्गि पाउस's picture

16 Feb 2015 - 8:41 pm | अत्रन्गि पाउस

authoritative : अधिकारदर्शक ....शब्दश:...खरं तर हुकुमशहा

चिकित्सक's picture

17 Feb 2015 - 9:40 am | चिकित्सक

पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल धन्यवाद . पण लेख लिहितांना ईंग्लिश शब्दांचे तत्सम शब्द नाही सुचत.

आपल्या मातृभाषेतुन लिहिताना शब्द सुचत नाहीत असं आपण म्हणत आहात यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. असं वाटतंय की इंग्लिशला मराठी प्रतिशब्द सुचत नाहीत हे म्हणताना आपल्याला थोडंही वाईट वाटत नाहीये...

शब्द सुचतात. थोडासा विचार करावा लागतो.

काळा पहाड's picture

17 Feb 2015 - 2:09 pm | काळा पहाड

कदाचित वाटतही असेल त्यांना वाईट. तुम्ही कशावरून म्हणता हे?

कपिलमुनी's picture

17 Feb 2015 - 1:27 pm | कपिलमुनी

शब्दसंग्रहामध्ये एवढे शब्द तरी वाढवा ( डिक्शनरीमध्ये एवढे वर्ड्स तरी अ‍ॅड करा ) ;)

चिकित्सक's picture

17 Feb 2015 - 9:37 am | चिकित्सक

कमाल आहे तुमची ७१ शब्दच मोज्लेत ? ७१ हून जास्त आहेत राव

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Feb 2015 - 9:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

तुम्ही पण आकडा नै टाकलात....!!! काय चिकित्रासक वृत्ती आहे ओ तुमची... =))

हाडक्या's picture

17 Feb 2015 - 5:05 pm | हाडक्या

अगदी अगदी .. ते म्हणतात ना ज्याच करावं भलं..

कमाल आहे तुमची ७१ शब्दच मोज्लेत ? ७१ हून जास्त आहेत राव

बादवे, आम्ही मोजले आणि आकडा टाकला, कपिलमुनींनी त्यावर पर्यायी शब्द सुचवले. तुम्ही काय केलेत .?
खेद वाटलाच असेल तर तेवढा तरी व्यक्त करावा. पुढच्या वेळेस सुधारणेचा प्रयत्न करावा.
पण असो, बाकी तुमची इच्छा..

कोंबडी प्रेमी's picture

15 Feb 2015 - 4:19 pm | कोंबडी प्रेमी

लहान वयात सत्ता मिळवतात त्यामुळे कधी कधी पोरकट पण आहे लीडरशिप मध्ये असे वाटते ???

मदनबाण's picture

16 Feb 2015 - 3:24 pm | मदनबाण

वाचतोय एक एक अनुभव !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }