ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच.
वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला. सैन्य ही युद्धघोष तिच्या मागे निघाले. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिथे लक्ष न देता केवळ शत्रूचा पराभव, हाच उद्देश्य ध्यानात ठेऊन तिने रणांगणावर वर रथ चौफेर उधळला. एका रथी प्रमाणे युद्ध करून तिने हजारो शत्रू सैनिकांचा पाडाव केला. युद्धात जय मिळवून दिला. गौ धन ही पुन्हा परत मिळाले. मुद्गलानीच्या नेतृत्व आणि पराक्रमा मुळे विजय मिळाला, सर्वांनी तिचे कौतुक केले. त्या वेळच्या इतिहासकार अर्थात मंत्रदृष्टा ऋषीनीं वीरांगना मुद्गलानीच्या पराक्रमाची नोंद घेतली. तिच्या पराक्रमाची गाथा ऋग्वेदात ऋचाच्यां रुपात आज ही जिवंत आहे.
उत् स्म॒ वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ भरे॑कृतं व्यचेदिन्द्रसेना ॥ २ ॥
(ऋग्वेद १०/१०२)
प्रख्यात योद्धा मुद्गल याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या जवळच रथांत बसली. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही. इंद्रसेनेत रथी होऊन तिने हजारो शत्रू सैनिकांचा पराभव केला आणि गायींना प्राप्त केले.
प्रतिक्रिया
9 Feb 2015 - 7:54 pm | पैसा
कथा आवडली. मला वाटते तिचे नावच मुद्गलानी असावे. अशा प्रकारचे खूप नावे सापडतात. जरत्कारू हे नाव तर पती पत्नी दोघांचेही होते बहुधा.
10 Feb 2015 - 10:20 am | स्पंदना
कथा मस्तच!!
तश्या योद्ध्या तर आम्हीपण आहोत. ;)
कैकयीपण युद्धभुमीवर दशरथाबरोबर होती त्या अर्थी ती सुद्धा योद्धा असावी.
10 Feb 2015 - 5:00 pm | एस
कुठे लढता म्हणे आपण?
10 Feb 2015 - 5:02 pm | टवाळ कार्टा
मिपा कोणत्या युध्धभूमीपेक्षा कमी आहे कै?? ;)
10 Feb 2015 - 5:20 pm | सूड
तात्या, तै कोल्लापूरातल्या हायेत. आता आजूनबी काय परस्न असत्याल तं ईच्यारा.
10 Feb 2015 - 6:30 pm | स्पंदना
सकाळी पोर पकडून पकडून खंगाळुन काढण्यापासून जे लढायला सुरवात होते ना ते मंग टिफीन मध्ये हे पाहिजे ते नको त कधी तह कधी बाजी कधी चीत कधी पट..मग सगळी प्रजा गाडीत घालून सक्काळी सक्काळी आरामात "यु मुर्ख" वगैरे बाकिच्या ड्रायव्हर्सना सुनवत (ऐकतय कोण म्हणा, पोर तेव्हढी पार आडवी पडुन लोळुन लोळूण हसतात) गाडी एकदा प्रायमरीच्या पार्किंग मध्ये, मग सेकंडरीच्या पार्किंग मध्ये मग ठेसना अशी घुसवायची. नवर्याला उतरताना चार तलवारीचे हात करुन्च पाठवायच. मग ग्रोसरी, फ्रेश मार्केट...घर. नेबरला हुलकावण्या देत देत काम आटपायची. ही झाली रोजची धुमश्चक्री.
स्पेशल एपिसोड जेंव्हा डोअर टू डोअर वाले येतात तेंव्हा, किंवा भारतात असताना रोजच्याला कधी याला तर कधी त्याला (यात स्त्रीयासुद्धा येतात) हिसका दाखवण्यात खर्ची पडायचे. एकूण हार माननेका नय. जीयेंगे तो और भी लडेंगे करत दिवस निघतात बघा. ट्रेन,बसेस ही तर युद्धाचीच ठिकाणे आहेत. त्यात कोल्हापूरच पाणी जर मुंबईत जीरवलं तर जी काय तरकारी उपजेल त्याच मुर्तीमंत उदाहरण हाय आमी.
आजकाल जरा तलवारीची धार कमी झालीय अशी शंका येते आहे. *sorry2*
10 Feb 2015 - 6:39 pm | टवाळ कार्टा
धार लावायला मिपासारखे ठिकाण दुसरे असेल का ;)
10 Feb 2015 - 7:27 pm | एस
माझ्या प्रश्नात 'कुठे' हा शब्द एकदाच आला होता. असो. आपल्या अष्टावधानी कार्यमग्नतेला समस्त कुटुंबवत्सल महिलावर्गाच्या 'सुपर वुमन स्टेटस' चे प्रातिनिधिक उदाहरण मानून सलामी देतो.
10 Feb 2015 - 7:42 pm | पगला गजोधर
नै तै, त्याच कथेप्रमाणे कैकैने, आपल्या सावत्र मुलांना वनवासाला धाडलं नै ?
11 Feb 2015 - 6:02 am | स्पंदना
ते नंतर
आता विषय आहे योद्ध्या स्त्रीया.
सो लढा!
11 Feb 2015 - 2:50 pm | पगला गजोधर
.
10 Feb 2015 - 10:55 am | सविता००१
कथा. आवडली
11 Feb 2015 - 10:54 am | मितान
कथा आवडली.