स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
अधून मधून चाणक्यला स्वप्नातून किंवा शकून म्हणून दर्शन देणारा आणि मार्गदर्शन करणारा सिंह (सम्राट चंद्रगुप्ताचा आत्मा) ही संकल्पना झकास जमून आलीय.
तसेच चाणक्य मेल्यानंतर बहुतेक त्याचा आत्मा सूत्रधारा सारखा त्याची "चाणक्य नीति" आपल्याला सांगत राहाणार आणि गोष्ट पुढे नेणार असे वाटते आहे, जसे कृष्ण महाभारतात सांगायचा तसेच! अर्थात अजून सिरीयल मध्ये चाणक्य जिवंत आहे.
नितीन देसाई चा सेट छान आहे. पुन्हा एकदा!
श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत.
स्पेशल इफेक्ट छान आहेत.
थोडे नाट्य जास्त आहे पण ठीक आहे, त्याने मनोरंजन मूल्यही वाढते आणि सोबत आपल्याला अशोकाची जीवनकथा सुद्धा कळते.
यात शुद्ध हिंदी बोलणारी जर्मन अभिनेत्री सुद्धा आहे ,जिने हेलेना चे काम केले आहे.
हेलेना हि सेल्युलस निकेटर ची मुलगी आणि चंद्रगुप्त मौर्य ची पत्नी. बिंदुसार ची सावत्र आई. सेल्युलस निकेटर हा अलेक्झांडर चा सेनापती असतो. खुरासन नावाचे एक पात्र आहे जे नूर या आपल्या मुलीचा विवाह बिन्दुसार शी करून मगध हडप करण्याच्या मार्गावर असतो.
आतापर्यंत ची कथा:
हेलेना आपल्या जस्टीन या मुलाच्या मदतीने बिंदुसारला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. शुभ्रदंगी त्याला वाचवते जिच्याशी लग्न करून बिंदुसारला काही कारणास्तव पुन्हा मगध मध्ये परतावे लागते . बिन्दुसार ला त्याचेवर हल्ला कुणी केला/करवला हे कळत नाही. मगध चा राजा जस्टीन ला बनवण्याचे तिचा डाव फसतो. दरम्यान चाणक्यवर बिंदुसार च्या आईवरच्या विष प्रयोगाबद्दल शंका घेतली गेल्याने तो दूर राहून अर्थ शास्त्र लिहितो. शुभ्रदंगी चा मुलगा अशोक मोठा होतो. दरम्यान एका युद्धात जखमी झाल्यावर बिंदुसार वर उपचार चालू असताना पुन्हा हेलेना त्याचेवर विषप्रयोग करते....
दरम्यान चाणक्य असे योगायोग घडवून आणतो की शुभ्रदंगी चा बिंदुसार बद्दलचा गैर समाज दूर व्हावा (जो खुरासन या राज्यकर्त्याने निर्माण केला असतो - तिला आणि पोटातल्या अशोक ला मारण्याचा प्रयत्न बिन्दुसारच्या नावे करून!) आणि तिचा मुलगा अशोक हा सम्राट व्हावा.....!!!
सर्वांनी ही मालिका बघावी अशी माझी इच्छा आहे. विनंती आहे.
बाकी आपली मर्जी.
जे बघतील त्यांनी आपली मते मतांतरे येथे मांडावीत ही अपेक्षा!
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 9:02 pm | जेपी
ते सिरीयल चा प्रोमो डोक्यात गेला.
धुम 3 मधल पोट्ट हाय त्यात .
बाकी चालु द्या.
6 Feb 2015 - 9:23 pm | धडपड्या
या पेक्षा एपिक चॅनल वरची सियासत ही अकबर - सलीम संबंधी व धर्मक्षेत्र, ज्यात चित्रगुप्त, महाभारतातल्या सगळ्या रथी - महारथींचा निवाडा करताना दाखवलाय, या जास्त बघणेबल वाटतात, व आवडतात...
6 Feb 2015 - 10:02 pm | जेपी
ते epic चा डिशटिवी नंबर काय आहे?
7 Feb 2015 - 8:37 am | धडपड्या
टाटा स्काय - १३३, एअरटेल - १२५ (एस्डी), १२६ (एच्डी), व्हिडिओकॉन - ११७, हॅथवे - २५ आणि रिलायन्स - २२३
7 Feb 2015 - 11:32 am | जेपी
धन्यवाद ..पण वरील पेकी नाही माझ्याकडे.. सुभाष चंद्राच डिश आहे.
8 Feb 2015 - 10:38 am | धडपड्या
बहुदा हॅथवेवर आहे... १५, १६ नंबर वर... लोकल केबलनेटवर्क चेक करा...
6 Feb 2015 - 10:40 pm | सिरुसेरि
संतोष सिवनचा अशोका (असोका) सुद्धा चांगला होता .
7 Feb 2015 - 2:24 pm | निनाद मुक्काम प...
शाहरूख चा अभिनय आवडलेला , सिवन ने नेत्रसुखद सिनेनिर्मिती केली , अभिनय व संवाद झकास मात्र स्क्रिप्ट मध्ये थोडी गडबड झाली.
मोदी पर्वात अश्याच चांगल्या मालिका येत राहोत ,
दूरदर्शन ची चाणक्य त्याकाळातील सर्वोत्तम मालिका होती , आता तर तंत्र व निर्मिती मुल्ये उंचावली आहेत तेव्हा ह्या मालीकेकडून ती न भरकटत जात आपल्या ट्रेप कथामालिकेसारख्या दर्जाची सुरवातीपासून शेवटपर्यंत
रोमांचक होवोत अशी आशा करूयात
7 Feb 2015 - 4:47 am | आनन्दिता
तो चक्रवर्तीन शब्द डोक्यात जातोय प्रोमो पाहुन.. नीट उच्चार केल्याने काय झोळीत धोंडा की काय काय माहीत या टीवी वाल्यांच्या. निदान अशा पुरातन मालीकेच्या टायटल चं तरी इंग्लिशीकरण टाळा की म्हणावं.. :(
7 Feb 2015 - 10:17 am | hitesh
आत्मा सिंहरुपात येतो.
ह्यारी प्वाटरवरुन ढापले की काय
7 Feb 2015 - 4:49 pm | निमिष सोनार
हॉलीवूडवाले पण भारतीय पुराण कथांवरून अनेक गोष्टी ढापतात. अनेक उदाहरणे देता येतील.
अवतार मध्ये "अवतार" हा शब्द तसेच रामाचा/शंकराचा नीळा रंग त्या अवताराला दिलेला आहे.
आपल्याकडचा हनुमान पाहून त्यांनी बनवला उडणारा सुपरमैन... वगैरे ...
24 Feb 2015 - 2:41 pm | कपिलमुनी
*lol* *ROFL*
24 Feb 2015 - 3:26 pm | खटासि खट
अॅक्चुअली तो सुपरमानच होता.
हनुमान, सुपरमान, स्पामान, बॅमान, आयर्नमान, सलमान, उस्मान
24 Feb 2015 - 4:57 pm | बॅटमॅन
होय. पण बॅटमॅनची व्युत्पत्ती वेगळी आहे. तिच्याबद्दल इथे वाचता येईल.
http://www.misalpav.com/comment/480027#comment-480027
7 Feb 2015 - 4:58 pm | निनाद मुक्काम प...
मुळात ह्या सिनेमाचे नाव अवतार हे आपल्या पुराणातील अवतार ह्या संकल्पनेपासून प्रेरित आहे ,
प्रगत ग्रह पृथ्वी वरील मानव व त्या ग्रहावरील जीव आपल्याला कार्टून सारखे दिसतात तेव्हा त्यांच्यात त्यांच्या सारख्या दिसणारा एक देह निर्माण करून एका मानवी योध्याचा आत्मा टाकला जातो जेणेकरून तो त्या ग्रहावरील प्राण्यांच्या मिसळून त्यांचा कडून आपले इप्सित साध्य करून घेईल ,थोडक्यात त्या योध्यचा
अवतार त्या ग्रहावर अवतरतो
आपल्या कडे पुराणानुसार विष्णूने मानवी देहाचा अवतार राम व कृष्ण तर मानवर हा शब्द क्रिश ३ मुळे सुचला
नरसिंह अवतार पृथ्वीवर अवतीर्ण झाले.
7 Feb 2015 - 8:55 pm | एस
धन्य!!!!
7 Feb 2015 - 11:41 pm | चिगो
मला हा प्रकार कळला नाही. एकतर माझ्या अल्प माहितीप्रमाणे सम्राट अशोकाच्या कारकीर्दीनंतर जवळपास ७०० वर्षांनी इस्लाम धार्म आला. आता हा खुरासन नेमका मुसलमानच दाखवलाय का आणखी कोण ते माहित नाही. (इतिहासाच्या जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा) आणि तो धाडधाड उर्दू बोलतो. इतिहासाची चिरफाड, जी बहुतेक सर्वच ऐतिहासीक (?) मालिका करतातच ती आवडत नसल्याने बघणार नाहीच कदाचीत..
मला स्वतःला उत्सुकता आहे ते "सिया के राम" ह्या मालिकेची. 'महाभारत'नंतर (बहुधा) देवदत्त पटनाईक ह्यांच्या 'सिता' ह्या पुस्तकावर आधारीत असावी ही मालिका..
24 Feb 2015 - 3:05 pm | बॅटमॅन
अशोकाचा काळ इसपू २०० च्या अगोदरचा. इस्लामसंस्थापक मुहंमदाचा जन्म इ.स. ५७० च्या आसपासचा. तेव्हा अशोककाळात मुसलमानच काय, ख्रिश्चन धर्मही नव्हता.
18 Feb 2015 - 7:01 pm | निमिष सोनार
खरा दानव सापडेल बरं का आज!
आणि तो सियामा किती क्युट आहे ना!
20 Feb 2015 - 11:50 am | निनाद मुक्काम प...
खुरासन हा इराणी असावा
त्याकाळात युनानी साम्राज्य इराण पर्यत पसरलेले होते
भारत व इराण चे हजारो वर्षांचे संबंध आहेत असे म्हणतात बुआ
बाकी हेलेना व जस्टीन हे राजमाता व युवराजांची आठवण करून देतात तर त्यःच्या समोर उभे ठाकलेले चाणक्य म्हणजे मोहन भागवत वाटतात.
आता अशोक म्हणजे नमो असे वाटते हे वेगेळे सांगायला नको
आपल्याला बाबा हेलेना व जस्टीन फार आवडतो.
21 Feb 2015 - 2:26 pm | निमिष सोनार
सांगा बरे! समजले नाही.
24 Feb 2015 - 1:06 pm | निमिष सोनार
सुशीम दानव निघाला. अशोक त्याचेपेक्षा वस्ताद निघाला. आणि चाणक्य सर्वापेक्षा उस्ताद निघाला. आता अप्रतिक्षा आहे बिंदुसार ला अशोक त्याचा मुलगा आहे हे केव्हा कळेल याची!
आणि आज चाणक्याचा कुणीतरी दुश्मन येणार आहे म्हणे! हेलेनाच्या सांगण्यावरून!
चाणक्याला मात देण्यासाठी!
बघुया काय होते ते!
24 Feb 2015 - 2:42 pm | कपिलमुनी
माबो इफेक्ट जाणवतो आहे
24 Feb 2015 - 3:21 pm | खटासि खट
माझं डीटीएच कनेक्षण पैसे भरले नाही म्हणून तोडण्यात आलेलं आहे. एक एक एपिसोड इस्कटून सांगणार का ?
24 Feb 2015 - 4:01 pm | मनीषा
यदाकदाचित नाटकात पात्रांची ओळख करून देताना " सम्राट धृतराष्ट्रं आणि सम्राटीण गांधारी.." असं सांगतात तसं काही आहे का असं वाटलं आधी .
24 Feb 2015 - 4:59 pm | बॅटमॅन
ओ गपा जरा....हपिसात हसवू नका.
च्यामायला ते यदाकदाचित समोर आलं ना एकदम डोळ्यांपुढं, ठ्ठो करून हस्ता हस्ता वाचलो.
24 Feb 2015 - 5:10 pm | सस्नेह
सम्राटीण गांधारी +))
मग चक्रवर्तीण कोण ? अशोका ?