मेक्सिको: भाग २ : सफरीची सुरुवात - मेरिदा

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
3 Feb 2015 - 10:54 pm

भाग १: प्रस्तावना

मेक्सिको विस्ताराने मोठा देश असल्याने एका कोप-यातून सुरुवात करून मग मध्य भागाकडे प्रवास केला. युकेतान द्विपकल्प हा मेक्सिकोचा दक्षिण-पूर्व कोपरा. हा संपूर्ण विभाग भूगर्भीय गुहा, भूमिगत तळी व नद्या अशा जगावेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. हवामान ऊष्ण-दमट, झाडी बरीच, तीन बाजूंनी चंदेरी वाळूचे कॅरिबिअन किनारे... पूर्वापारचे माया लोकांचे घर.

आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेली दोन मोठी शहरे, मेरिदा व कॅनकून. मेरिदा हे सर्वाधिक माया वंशाचे लोक असलेले शहर आहे, 'त:हो' (T'ho) या मूळ मायन नावाची ही मायानगरी. कॅनकून हे मायामी, हवानाच्या कुळातील 'वाईल्ड पार्टी टाऊन'; निराळ्या अर्थाने 'माया'नगरी! सहलीचा उद्देश वेगळा असल्याने कॅनकूनच्या वाटेला गेलो नाही. जगातील नविन सात आश्चर्यांपैकी 'चिचेन ईत्झा' चे पिरॅमिड म्हणजे या प्रदेशाचे हृदय. मेरिदा पासून सुरुवात करून पुढे या विभागातील महत्वाच्या जागा 'ऊश्माल', 'कबा', 'चिचेन ईत्झा', 'तुलुम' ची सफर व कॅनकूनबद्दलही थोडी माहिती.

मेरिदा हे शहर बरेच नीटस आणि आटोपशीर आहे. युरोपिय प्रभाव असलेल्या मेक्सिकन शहरांमध्ये काही गोष्टी ठळकपणे सारख्या असतात. शहराचा मध्यवर्ती भाग 'सोकालो' (zócalo) किंवा 'सेंत्रो' (centro) या नावाने ओळखला जातो. लगतच कॅथेड्रल, शासकीय इमारत व निवास. या देशांत फिरताना शक्यतो वास्तव्य याच परिसरात करणे फायदेशीर ठरते. मेरिदा साधारण सोळाव्या शतकात (आधीच्या त:हो चा नायनाट करून) वसवलेले शहर.

शहरातील एक चौक:

सोकालो: स्ट्रीट व्ह्यू

कॅथेड्रल:

जुन्या चर्चचा अंतर्भाग:

शासकीय इमारत

पॅलासिओ दे गोबिएर्नो - गव्हर्नरनिवास (बराचसा भाग आता संग्रहालय)

इथे अनेक मोठी तैलचित्रे व भित्तिचित्रे आहेत. 'मेक्सिकन म्युरल पेंटिंग्' हा स्वतंत्र धाग्याचाच विषय आहे, तेव्हा अधिक लेखन त्यामध्ये...

गव्हर्नरनिवासातील चित्रकलादालन:

मातृत्वस्मारक:

आधुनिक चर्च:

आकर्षक दुकान

राहते हॉटेल

भाग ३: ऊश्माल व कबाह भाग ४: चिचेन ईत्झा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2015 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

दमदार सुरुवात ! प्राचीन संस्कृतीच्या खुणांच्या प्रतिक्षेत.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 12:36 am | मुक्त विहारि

पुभाप्र

आदूबाळ's picture

4 Feb 2015 - 1:42 am | आदूबाळ

हॉटेल काय मस्त आहे हो!

शासकीय इमारत, गव्हर्नर निवास, व राहते हॉटेल यांच्या कमानीतील सारखेपणा लक्षात येतो. क्षणभर जुन्या भारतीय इमारतींची आठवण झाली.

खटपट्या's picture

4 Feb 2015 - 4:05 am | खटपट्या

खूप छान फोटो..

सुधीर कांदळकर's picture

4 Feb 2015 - 6:16 am | सुधीर कांदळकर

गर्दी नसलेला स्वच्छ रस्ता, आकर्षक बांधणीचे सुरेख कोरीवकाम असलेले कॅथीड्रल, दिलेला आगळावेगळा लालसर नारिंगी रंग अशा गोष्टी आवडल्या.

बहुधा स्पॅनिश बोलली जात असेल. अमेरिकेच्या सान्निध्यामुळे इंग्रजी चालते का? नाहीतर स्पॅनिश बोलता न येणार्‍यांची आम्हासारख्यांची पंचाईतच. जेवणाखाण्याचे, राहाण्याचे दर किती महाग आहेत, फसवाफसवी कितीशी आहे ते कृपया पुढील भागात आले तर आनंद होईल. तरी सुरेख लेखन आणि प्रकाशचित्रे. गव्हर्नर महालातले चित्रदालन फारच सुंदर

मस्त!ती लाल सरकारी इमारत ,हिरवळ आणि आकाश दिसणारा फोटो फार सुंदर आलाय.पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2015 - 9:18 am | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा व्वा!!! कित्ती छान छान! :HAPPY:

बोका-ए-आझम's picture

4 Feb 2015 - 8:48 pm | बोका-ए-आझम

म्युरलवरच्या लेखाची वाट बघत आहे. दिएगो रिव्हेरा आणि त्याची पत्नी/सखी फ्रीदा कालो यांनी मेक्सिकन म्युरल्सना जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली हा ऐतिहासिक संदर्भ सोडला तर म्युरल्सबद्दल एक कलाप्रकार म्हणून फार कमी माहिती आहे. तुमच्या लेखातून ती माहिती मिळेलच अशी खात्री आहे!

गणेशा's picture

5 Feb 2015 - 4:45 pm | गणेशा

वाचत आहे .. पुभाप्र