या लेखमालेत एका नव्या देशाविषयी. भारताशी खूप साधर्म्य असलेले काही देश आहेत त्यातील हा एक. सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध वारसा असलेला, भौगोलिक वैविध्य असलेला, चविने खाणा-यांचा, विविधरंगी देश! भारताप्रमाणे लोकसंख्या, प्रदूषण, गरिबी, बेकारी, अमली पदार्थांचा वाढता व्यापार इ. ला तोंड देत उदयाला येणारी एक महत्वाची बाजारपेठ!
थोडा इतिहास भूगोल, अतिप्राचीन नागरी संस्कृती जन्माला घालणा-या मोजक्या प्रदेशांपैकी हा एक. अॅझ्टेक, टोल्टेक, ओल्मेक, झापोटेक, माया हे काही महत्वाचे ऐतिहासिक समाज घटक. त्यातील माया व अॅझ्टेक हे त्यावेळच्या उपलब्ध साधनांचा वापर करून उत्कर्षाच्या परमावधीपर्यंत पोहोचले. पुढे माया संस्कृती बव्हंशी अज्ञात कारणाने उतरणीला लागली तर अॅझ्टेक लोक स्पॅनिश आक्रमणाचे बळी ठरले. माया जीवनपद्धती अजूनही जिवंत आहे, बाकी सगळे इतिहासजमा. हेमांगीके यांनी मिपावर याआधी मध्य अमेरिकेच्या इतिहासावर सखोल लेखन केले असल्याने त्यातील पहिल्या भागाचा दुवा देउन पुनर्लेखन टाळतो. पुढे वेळोवेळी त्या लेखमालेचा संदर्भ घेउच… मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप
हा प्रदेश उत्तर व दक्षिण अमेरिकेला जोडतो. १९व्या शतकात जवळजवळ एक तृतीयांश मूळ मेक्सिको अमेरिकन संघराज्याने गिळंकृत केला. आज आपण त्या भूभागाला पश्चिम टेक्सास, न्यू मेक्सिको, अॅरिझोना व कॅलिफोर्निया या नावांनी ओळखतो. स्पॅनिश प्रभाव तिथे आजही आढळतो. उर्वरित भूभाग पॅसिफिक व अॅटलांटिक सागराच्या मधोमध दक्षिणेकडे निमुळता होत कर्कवृत्त ओलांडतो, दक्षिण-पूर्वेकडे घनदाट जंगलं, उत्तरेकडे वाळवंट तर मध्यावर उत्तुंग ज्वालामुखीय शिखरे, तो आजचा मेक्सिको, उर्फ 'मेह्हीको'. सांप्रत ३१ राज्यांत विभागलेल्या या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ८ राज्यांतील हा एकल प्रवास.
मेक्सिको चा भौगोलिक इतिहास (संदर्भ: विकी; जीआयएफ सपोर्टींग ब्राउझर मध्ये पहा)
यूएसनिवासी लोकांसाठी महत्वाची माहिती; H1/L1/GC असेल तर या देशासाठी वेगळा व्हिझा लागत नाही, जमल्यास जरूर भेट द्या.
मेक्सिको चा भौगोलिक संदर्भ:
प्रतिक्रिया
1 Feb 2015 - 3:01 pm | सुहास झेले
वाह .... नयनरम्य अद्भुत फोटोग्राफी आणि सुंदर लेखमालेची मिपाकरांना मेजवानी निश्चिती :)
पुढील भागाच्या प्रतीक्षेत :)
3 Feb 2015 - 4:11 pm | एस
असेच म्हणतो. तेवढा भारताचा नकाशा सोडला तर बाकी प्रस्तावना सुंदर आहे आणि पुढील लेखांची आवर्जून वाट पाहिली जाईलच याची खात्री!
3 Feb 2015 - 11:10 pm | समर्पक
पहा बरं एकदा... आता ठीक आहे का?
4 Feb 2015 - 10:00 pm | एस
होय, धन्यवाद!
1 Feb 2015 - 6:03 pm | रेवती
वाचतिये.
1 Feb 2015 - 7:05 pm | अजया
पुभाप्र.
1 Feb 2015 - 7:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
वा वा ! अनेक संस्कृत्यांनी भरलेल्या देशाबद्दलच्या मालिकेचे स्वागत... होऊद्या बैजवार विस्तृत माहिती आणि बक्कळ प्रकाशचित्रांसह. *good*
1 Feb 2015 - 10:27 pm | सानिकास्वप्निल
पुभाप्र
1 Feb 2015 - 10:36 pm | खटपट्या
खूप छान मालीका वाचायला मिळणार..
हेमांगीके यांच्या लेखाचा जो दुवा आहे, त्यामधे नरबळीचे जे चित्र आहे, ते जसेच्या तसे "अॅपोकॅलीप्टो" या चित्रपटात रंगवलेले आहे.
पु.भा.प्र.
2 Feb 2015 - 3:47 pm | भुमन्यु
खूप छान मालीका वाचायला मिळणार..+११११
1 Feb 2015 - 11:48 pm | अर्धवटराव
पु.भा.प्र.
2 Feb 2015 - 2:26 pm | इशा१२३
पु.भा.प्र.आणि फोटोंच्या प्र.
2 Feb 2015 - 4:39 pm | मॅक
सुरवात खुप छान..... पुढील भाग लवकर येऊ देत.....
3 Feb 2015 - 2:40 pm | गणेशा
वाचतोय .. पुढील भाग येवुद्या
3 Feb 2015 - 3:30 pm | जागु
हेमांगी के यांचा लेखहीसुंदर.
ह्याच्या दुसर्या भागाच्या प्रतिक्षेत.
3 Feb 2015 - 9:58 pm | पैसा
उत्सुकतेने वाट बघत आहे!
3 Feb 2015 - 10:12 pm | श्रीरंग_जोशी
मेक्सिकोला भेट देण्यासाठी जिसी असणार्यांना मेक्सिकन व्हिसा लागत नाही हे ठाऊक होते पण एच १ किंवा एल १ वर अमेरिकेत राहणार्यांसाठीही लागत नाही ही माहिती नवी आहे.
मी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये सॅन्टा अॅना येथे राहिलोय. तेथील बर्याच ठिकाणी मेक्सिकोमध्ये असल्याचा भास व्हायचा (स्थापत्य व इंग्लिश ऐवजी स्पॅनिशचा अधिक प्रभाव).
पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
4 Feb 2015 - 8:10 am | सुनील
ऐकीव माहिती - उत्तरेहून कॅनडा बॉर्डरवरून निघणारा I-5 महामार्ग, दक्षिणेकडे पार मेक्सिकोच्या आत शिरतो. जर योग्य त्या ठिकाणी एक्झिट घेतले नाही तर, थेट मेक्सिकोत पोहोचाल आणि मग परत येण्याची भानगड होईल असा सल्ला दिला गेला होता, त्याची आठवण आली!
4 Feb 2015 - 8:22 am | श्रीरंग_जोशी
मी कॅलिफोर्नियामध्ये असताना मलाही असाच सल्ला मिळाला होता.
सॅन डिएगोपासून काही मैलांवर जो बॉर्डर चेकपोस्ट आहे तो दैनंदिन आवागमनाच्या बाबतीत जगातील सर्वाधिक व्यस्त आहे असे ट्रॅव्हल चॅनेलवरील कार्यक्रमात पाहिले होते. रोज सकाळी हजारो मेक्सिकन नागरिक रोजगारासाठी अमेरिकेत येतात अन संध्याकाळी परत जातात.
4 Feb 2015 - 12:18 pm | समर्पक
हो आणि एकदाका मेक्सिको मध्ये पोहोचलात कि मैलोनमैल लांब ट्राफिक मध्ये थांबल्याशिवाय परती अशक्य. पुन्हा कागदपत्र नसतील तर होणारा गोंधळ आणि त्रास वेगळाच; (कदाचित डीपोर्ट…)
एकदा तिह्हुवाना बॉर्डर च गूगल नकाशातील उपग्रहीय चित्र पहा. ती लांबच लांब गाड्यांची रांग सहज दिसून येते
https://www.google.com/maps/@32.5414717,-117.0293265,677m/data=!3m1!1e3