पुण्यदेवीची विनवणी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 7:09 pm

अनेक शतकी उमर गाठली, नावे मजला ठेवू नका।
मीच विनविते हात जोडूनी, पुण्यावरती जळू नका।।
शिवसूर्यचा दिव्य वारसा शहरवासियो तुम्हा मिळे।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।|
व्हा ज्ञानाचे जोतीबा इथे तुम्ही, शेणमारा हा करू नका ।
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।|
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।
इथेच गर्दी, इथेच महागाई, असे शंखच, पोकळ फुंकू नका।|
निव्वळ रस्ते मॉल बिल्डिंगा, म्हणजे शहर मानू नका।
लाख लाख जन माझ्याअंतरी रमले वसले, हे कदापी विसरू नका।|
गावं आपुले करा नामांकित परी, करमणुकीच्या गटारगंगेत मला तुम्ही क्षाळु नका।
मजला देवी म्हणुनी भजू नका, पण दासी म्हनोणही पिटू नका ।|
प्रकाश पेरा अपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटतसे।
हे ज्याच्या हृदयात ठसे, खरा मिपाकर तोच असे।|

राहती जागाप्रकटन

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

29 Oct 2014 - 7:43 pm | उगा काहितरीच

वा

आदूबाळ's picture

29 Oct 2014 - 7:56 pm | आदूबाळ

अरे अय.

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Oct 2014 - 10:20 pm | माम्लेदारचा पन्खा

पुणं तिथंच आहे.... कोणी काही करत नाहीये त्याला....

पान पडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं वाटतं कधीतरी पण तुम्ही नका व्यथित होऊ...

क्यारम रमवानू अने जूस पिवानू...मज्जानी लाईफ !

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2014 - 12:27 am | बोका-ए-आझम

च्यायला! काय हे?