मन कातर कातर...
फार जपलं जपलं...
पाणी गढूळ गढूळ...
उडे चिखल चिखल...
एक बोचला कातळ...
वाहे रक्त भळभळ....
मनी उठले काहूर...
एक वेदनेची लहर...
परत लाटांचा कल्लोळ...
पण जल निर्मळ निर्मळ...
मनी आशेचा मोहोर...
वाहू थांबले रुधिर....
मन कातर कातर...
झाले नितळ नितळ...
प्रतिक्रिया
6 Aug 2008 - 1:01 pm | विजुभाऊ
मोजक्या शब्दात मांडलय.
बहीणाबाई आठवली ( उदा : मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर...किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर)
सुरुवातीला अपूर्ण वाटते. काहितरी राहिले असे वाटते.
हाही बहुतेक बहिणाईची कविता आठवल्यामुळेच असेल.
पण त्याच्याशी तुलना करणे बंदकेल्यानन्तर. कविता चांगली आहे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
6 Aug 2008 - 2:16 pm | आनंदयात्री
मृगनयनीची ही सुंदर कविता पाहुन आमच्या मनात त्या बोचलेल्या कातळाच्या वेदनेनी हा असा जन्म घेतला :)
मन फत्थर फत्थर...
फार रापला रापला...
पाणी नित्तळ नित्तळ...
वाहे ओघळ ओघळ...
थरथरला कातळ..
पाही रक्ताचा ओघळ....
मन अशांत अशांत...
वाटे हताश हताश...
येती लाटा हळुवार...
घाली फुंकर फुंकर...
बघे हजार बधिर...
कसे थांबेना रुधिर....
मन फत्थर फत्थर...
झाले ठिक्कर ठिक्कर...
6 Aug 2008 - 2:51 pm | सहज
आंद्या [विडंबनाच्या] धंद्यावर बस. काव्य नको करुस ;-)
काय लिहलं लिहलं
नाही झेपलं झेपलं
काव्य कसलं कसलं
अस सुचलं सुचलं
शब्द फुटले सुसाट
करि गोंगाट गोंगाट
कंड सुटला प्रचंड
खाज जुनी फार फार
मग केले विडंबन
शांत झाले तन मन
6 Aug 2008 - 2:54 pm | आनंदयात्री
>>आंद्या [विडंबनाच्या] धंद्यावर बस. काव्य नको करुस
थांबा आलोच टुकारी घेउन !
7 Aug 2008 - 10:11 am | शेखर
वरील वेदना वाचुन मनात त्या बोचलेल्या कातळाच्या वेदना कधी बर्या होणार ह्या प्रश्नाने जन्म घेतला ....
मन कोमल कोमल...
फार लागल लागल...
पाणी गढूळ गढूळ...
फिरे तुरटी तुरटी...
पाणी बरेच नितळ...
मधुन अधुन गढुळ....
पाणी थोडेच गढुळ...
फिरे पुन्हा तुरटी ...
होणार परत कधी...
पाणी निर्मळ नितळ...
7 Aug 2008 - 11:34 am | मृगनयनी
शेखर भै.... तुम्ही ऍक्वागार्ड बसवून घ्या........
:)
23 Aug 2008 - 9:02 am | राघव१
तुम्ही ऍक्वागार्ड बसवून घ्या........
हा हा हा... झक्कास..!!
बाकी, मूळ कविता सुंदरच, शुभेच्छा! :)
राघव
23 Aug 2008 - 2:48 pm | टारझन
नयने .. वा काय सुंदर काव्य .... आणि आंद्याचं पण चपलख विडंबण... आत मधे काहीही डाळ शिजो ... मला तुमच्या काव्य आणि विडंबण प्रतिभेबद्दल आदर वाटतो ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
6 Aug 2008 - 3:23 pm | मृगनयनी
बघे हजार बधिर...
कसे थांबेना रुधिर....
मन फत्थर फत्थर...
झाले ठिक्कर ठिक्कर...
आन्दुल्या..... वरकरणी जरी तुझे काव्य विडंबन वाटले, तरी त्यामागची व्यथा.....
(माझ्यासारख्या) संवेदनाशील मनाला कळाली हो...
मुली/ स्त्रिया किमान रडून तरी त्यांचे दु:ख व्यक्त करतात.....
पण मुलांचे / पुरुषांचे तसे नसते....
कारण,आपल्या समाजात रडणार्या पुरुषाला ___ म्हणतात.....
बघे हजार बधिर...
कसे थांबेना रुधिर....
माझ्या डोळ्यांत पाणी आलं.....
आंदुल्या...... तू माझ्या कवीतेचं विडंबन केलंस......मला आवडलं.....
तुझी """मैत्रीण""", :-? ;) ;;) >:D<
मृगनयनी... :)
वन्दे त्वां भूदेवी आर्यमार्तरम..........
जयतु जयतु पदयुगुलम ते निरन्तरम.........
6 Aug 2008 - 3:47 pm | घाटावरचे भट
>>सुरुवातीला अपूर्ण वाटते. काहितरी राहिले असे वाटते.
सहमत....(आपन भैनाबै वाचलेल्या न्हाईत, तरीपन असं वाटलं)
बाकी नैनीतै, तुम्ही उभं उभं (पक्षी - कविता) चांगलं लिहिता....
येऊ द्यात आणखी
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
6 Aug 2008 - 3:50 pm | II राजे II (not verified)
कविता चांगली आहे.
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
6 Aug 2008 - 8:59 pm | प्राजु
अतिशय हळूवार कविता.
बहिणाबाई चौधरींची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Aug 2008 - 11:09 am | विसोबा खेचर
वा! सुंदर कविता...!
9 Aug 2008 - 12:23 pm | लबाड
वा! सुंदर कविता...!
आवडली, अजुन येऊ द्या.
4 Sep 2008 - 10:59 am | सागर
अहाहाहा... काय सुंदर कविता आहे... कमी शब्द आणि मोठा अर्थ... खूप कमी लोक असे लिहू शकतात.
एक बोचला कातळ...
वाहे रक्त भळभळ....
मनी उठले काहूर...
एक वेदनेची लहर...
हे म्हणजे शिखरच :)
असेच छान छान लिहीत रहा...
सागर
4 Sep 2008 - 1:41 pm | सर्किट (not verified)
नैनीतै,
सुरुवातीला बरे लिहिले, पण
परत लाटांचा कल्लोळ...
पण जल निर्मळ निर्मळ...
इथे सगळी लय खपली.
हे कसे झाले बॉ !
हे एक काढून टाकले कडवे, तर मग सगळे ठीक आहे.
दहा पैकी सहा मार्क !
(बाकी त्या स्तुतीपाठकांकडे लक्ष देऊ नका. ते उगाचच चढवतात, आणि पडायची वेळ आली की खालची जाळी काढून घेतात. खफ वर आपल्या रहिवासातून आपल्याला हे कळले असेलच.)
-- सर्किट