#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका"
सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा.
एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो.
पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो.
फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो.
कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो. झाडामागून शेतकऱ्याचा मित्र बाहेर येतो आणि रडणाऱ्या व शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या फोटोग्राफर चा फोटो काढतो व त्याच्या मित्राच्या न्यूज चैनेल ला पाठवतो.
शेतकरी म्हणतो: " काय रे तुम्ही सगळे माध्यम वीर !! लोकांच्या प्रत्येक भावनांशी खेळत राहाता आमच्या चेहेऱ्यावरची चिंता लाईव्ह कैच करून ती विकता तुम्ही? आणि छापता? तुम्हाला कुणाच्या भावनांशी घेणे देणे नाही. फक्त त्या भावना बंदिस्त करून ती विकण्यात तुम्हाला स्वारस्य असते, त्या भावनांशी तुम्ही स्वत:ला जोडत नाहीत. आणि हे सिद्ध झाले आहे जेव्हा तू मला मारायला धावलास!! हा तुझा फोटो कुठे छापुन येवू नये असे वाटत असेल तर येथून बऱ्या बोलाने चालता हो. पावसाचे काय करायचे ते मी पाहून घेईन."
#कल्पित_सत्य (२) "बुमरेंग"
सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा.
सुरेश, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा रितेश जेवण झाल्यावर उशिरा रात्री फिरायला जातांना एका फारशी ओळख नसलेल्या किराणा दुकानावर थांबले. रितेशला चॉकलेट हवे होते. खाल्ल्यावर दात घासले तरच चॉकलेट घेवून देतो असे कबूल करून दुकानात ते कुटुंब शिरले. दुकान फार मोठे नव्हते. तो बंद करण्याच्या तयारीत होता. त्याचे दुकान आणि घर जोडूनच होते.
"एक चॉकलेट द्या, काका" रितेश म्हणाला. डेस्कवर फारच थोडे चॉकलेट दिसत होते.
दुकानदाराला दुकान बंद करण्याची घाई असल्याने पैसे देऊन चॉकलेट घेऊन ते कुटुंब निघाले.
मुलगा हुशार.
थोडे पुढे गेल्यावर तो म्हणाला, "अरे मम्मी, चॉकलेट एक्स्पायर झाले आहे. एक महिना झाला एक्सपायरी डेट संपून."
ते दुकानदाराकडे परत गेले आणि तक्रार करायला लागले.
"तुम्ही एक्स्पायर झालेला माल ठेवता! योग्य नाही हे."
"चालता है ना यार इतना तो. कुछ नाही होता. खाले बेटा"
ते चॉकलेट थोडे लूज झाल्यासारखे सुद्धा वाटत होते.
"दुसरे चांगले चॉकलेट द्या नाहीतर पैसे परत द्या."
तो वाद विवाद करायला लागला.
तेवढ्यात त्या दुकानदाराचा छोटा मुलगा त्याला घरी बोलवायला आला.
"चलो पप्पा! खाना तय्यार है."
सुरेश ला एक आयडीया सुचली.
तो दुकानदाराच्या मुलाला म्हणाला,
"क्या नाम है बेटा तुम्हारा?"
"हिर्मेश"
"बडा अच्छा नाम है. चॉकलेट खाओगे बेटा? फ्री में देता हू! मेरी तरफ से!!"
तो दुकानदाराकडे बघायला लागला.
दुकानदार म्हणाला - "बेटा मत ले. खराब है वो" ... असे म्हणून त्याने लगेच जीभ चावली!
..... आणि रितेश ला नवे फ्रेश ताजे चॉकलेट मिळाले.
प्रतिक्रिया
5 Jul 2014 - 11:41 am | कवितानागेश
दुसरा किस्सा मस्त आहे.
5 Jul 2014 - 11:42 am | खटपट्या
चांगलंय !!!
5 Jul 2014 - 1:14 pm | स्पा
काय लिहिता हो सोनार काका तुम्ही, मस्तच
5 Jul 2014 - 3:45 pm | प्यारे१
+१११
स्पा सरांशी सहमत.
5 Jul 2014 - 4:50 pm | प्रचेतस
+२२२
आवले काकांशी सहमत.
6 Jul 2014 - 12:28 pm | धन्या
+३३३
वल्ली काकांशी सहमत.
6 Jul 2014 - 1:32 pm | संजय क्षीरसागर
कैमेरा भेग पडलेल्या जमिनीत जाण्याइतक्या दुष्काळाची कल्पना, केवळ प्रतिभावंतच करु जाणे.
यावरनं एक म्हण आठवली, पृथ्वी आहे गोल, म्हणून भाऊंचा विचार खोल!
म्हणजे दुष्काळ पडला तरी शेतकरी कैमेरा (किंवा सेलफोन) बाळगून आहे, काय हा ज्वलंत विरोधाभास! त्यातही तो स्मार्टफोन असून वॉट्स अॅप वगैरे सोयींनी युक्त आहे. इतकंच काय तर तळागाळातल्यांच्या सुद्धा न्यूज चैनेलवर ओळखी आहेत. श्यामची आई म्हणते तसं, `आम्ही बावळट असू, पण दरिद्री नाही!'.
तस्मात आपण स्ट्रेट, करुणासिंधू मानेगुरुजींशी बरोबरी साधली आहे.
या उत्तरातून `तू खा ऊस, तोपर्यंत मी पाडतो पाऊस' असा बाणेदार स्वभाव दिसतो.
`धरणं काय आम्ही झिप उघडून भरायची'? अशा बेताल वक्तव्यांपुढे, हे वाक्य शोषितांना दिलासा देणारं आहे.
`कितीही घाई असली तरी, अधाश्यासारखं उघडण्यापूर्वी, डेटाबेस न्याहाळा' असा संदेश जाणवला.
शिवाय चाचपून पाहा, लूज वस्तू, एक्सापयरी डेट उलटून गेलेल्या असू शकतात, ही गर्भित सूचना.
फुकटचा माल महागात पडू शकतो! हा नवा आयम.
माल खराब असला की जीभ सांभाळा!
बाळ रितेश, पुढच्या वेळी हातोहात होणारी फसवणूक टाळ, फ्रेशमालाचा हट्ट धर.
10 Jul 2014 - 12:10 am | भृशुंडी
बाळ संजय, लेखणी आवर! ते ऐसेवैसे शस्त्र नोहे
10 Jul 2014 - 11:10 pm | संजय क्षीरसागर
अजून बालीश विनोदानं हसू येण्याचे दिवस सरलेले दिसत नाहीत. वस्त्र सावरा, ते फेडण्याची वेळ येणे बरे नोहे.
6 Jul 2014 - 7:22 pm | यशोधरा
सगळ्या काका लोकांशी सहमत.
दुसरा किस्सा मस्त आहे. :)
5 Jul 2014 - 4:35 pm | ज्ञानोबाचे पैजार
दुसर्या कपोलकल्पित सत्य कथे च्या पात्रां पैकी
सुरेश चे अडनाव देशमुख होते का? आणि दुकानदाराचे रेशमीया?
हे दुकान ठाण्यात इस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ किंवा पोखरण रोड वर होते का?
कथा क्र. १ मधे जमिनीला पडलेली भेग साधारण केवढी मोठी असते?
बाकी स्पा बरोबर सहमत.
पैजारबुवा,
10 Jul 2014 - 1:13 pm | निमिष सोनार
तुमच्या प्रतिसादावरून मला लगेचच "कॉमेडी एक्स्प्रेस" मधील महाप्रश्ने या पात्राची आठवण झाली. त्याच स्टाईल ने तुम्ही प्रश्न विचारले आहे. मजा आली :-)
10 Jul 2014 - 3:57 pm | सूड
>>बाकी स्पा बरोबर सहमत.
असेच म्हणतो!!
6 Jul 2014 - 12:06 pm | भिंगरी
भेगेतून कैमेरा आत गेला.जमिनीतील पाण्याचा शोध घेऊ लागला. पण त्याला फक्त वेळोवेळी पेरलेली वाळून कुजून गेलेली बियाणेच दिसली............
6 Jul 2014 - 12:30 pm | धन्या
या तुमच्या प्रतिसादावरुन असाच एक चित्रिकरण करणार्या कॅमेर्याचा व्हिडिओ आठवला.
10 Jul 2014 - 12:13 am | भृशुंडी
निमिषभौ, चालू द्या. तुमचं काल्पनिक सत्य आवडलं. अजून काही सत्यं वाचायला मजा येईल.
वि.सू. -> मी दिलेला हा प्रतिसाद संपूर्ण काल्पनिक आहे पण तो सत्य व्हायला हवा का, हा विचार लेखकाने करायचा आहे.
10 Jul 2014 - 11:19 pm | मराठे
कॅमेरा कोरड्या ठण्ण विहीरीत टाकून दिला असं लिहीलं असतं तर चाललं असतं. पण तरीही पहिला किस्सा थोडा इल्लॉजिकल वाटला.
दुसरा चांगला आहे. एक छोटेखानी कथा होऊ शकली असती.