पुरुषांचं स्ट्रायव्हिंग हा जसा तमाम स्त्रीवर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच बायकांचं संसारींग हा पण आहे. पण याकडे तमाम स्री वर्ग जाणूनबुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत. महाभारतात नाही का, पाच पुरुष एकीशी लग्न करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या १००% स्त्रीयांना संसाराचे नियम हे दोन्हीकडून पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दीडदशकं मी सगळीकडे माझी बायको घेवून जातोयं (अर्थात माझं संसारींग हा विषय परत कधीतरी), आणि या दीड दशकात मला जे जाणवलं आहे तेच सांगतो आहे.
खरतरं लग्नाच्या ज्या अटी असतात त्या दोघांना सुरळीतपणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात. पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर नेमक्या वेळी मोडण्यासाठी असतात. यांना भलत्याच गोष्टींची एवढी घाई असते की त्या नवर्याचं प्रपोजल काय आहे याचा विचार न करता सरळ दुसराच विषय काढतात. विषय बदलत असताना धोक्याचा सिग्नल देणे, किंवा हातात हात घेऊन विचारपूस करणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता, पुढे काय वाढून ठेवलंय याचं नवर्यांना काही स्वप्न पडलेलं असतं का? की ही गेम बदलणार आहे म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातल्या काही दिव्यांगना संसार स्वत:च्या मालकी हक्काचा असल्यासारख्या वागतात. हळु बोलायचं तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मध्यरात्री किंवा मग एकदम काही डल्ला मारायच्या वेळी बोलतात. जशी यांना सावकाश बोलायला बंदीच केली आहे. तुम्ही कितीही सिग्नल द्या, यांना काहीही फरक पडत नाही. उपलब्ध सोयी आणि यांच्या डिमांडसमधे खंडीभर अंतर नक्कीच असतं.
सगळं सरळ होत असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात आळी-पाळीवाल्या, मूड-नाहीवाल्या पण आल्या. आपण दोन्ही बाजुच्या सुखाला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसतं. दोन्हीकडची सोय आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे नेमक्या वेळी भलत्याच विषयावर हुज्जत घालणे. अहो मान्य आहे आमचंही थोडं चुकलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण या गाडी जिथल्यातिथे थांबवणार. जरा म्हणून खाली उतरणार नाहीत आणि मागच्या प्रकरणांवरुन किंवा पुढच्या सुधारणांवरुन भांडत बसणार. यामुळे आपल्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी थांबून राहिल्या आहेत, आपण पुन्हा एकदा गैरसोय करुन ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. काम झाल्यावर मगं भांडाना अरे, कोण नाही म्हणतं? पण नाही, या तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात त्या, ज्यांना नातेवाईक आपल्यापुढे गेलेले चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर त्या संसार मोडतील, नवर्याला हार्ट-अॅटॅक देतील, पण त्या नातेवाईकांच्या गाडीच्या पुढे जातील.
मी असं नाही म्हणत आहे, पुरुष गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी बायकाच आहेत. तो हॉर्नसुद्धा वाजवत नसतांना इतका गोंधळ घालतात की तो बिचारा गोंधळून जातो.
प्रतिक्रिया
26 Jun 2014 - 12:19 am | कपिलमुनी
हिट विकेट
26 Jun 2014 - 12:32 am | संजय क्षीरसागर
आणखी गोंधळ झाला असता!
26 Jun 2014 - 12:51 am | अर्धवटराव
आवडेश.
26 Jun 2014 - 4:11 am | खटपट्या
बाप्रे !!!
26 Jun 2014 - 8:03 am | एस
बायकोचे शॉपिंग आणि नवर्याचा अनुभव. चला, कोण करतंय?
26 Jun 2014 - 9:33 am | भाते
पुरुषांचे ड्रायव्हिंग/डायेटिंग आणि हा धागा वाचल्यावर माझ्याही मनात हाच विचार आला होता.
मिपाच्या समुद्रात ऊडी मारून शोध घेतल्यावर हा मोती मिळाला. यासारखे चांगले धागे शोधुन वर काढल्यास आपल्या ज्ञानात बरीच भर पडेल. :)
26 Jun 2014 - 8:11 am | चौकटराजा
असून अडचण व नसून खोळंबा याची प्रचिती रोज देणार्या "या" गंभीर विषयावर उत्तम प्रकाश टाकला आहे.
26 Jun 2014 - 10:29 am | संजय क्षीरसागर
असा वाकप्रचार आला असावा.
26 Jun 2014 - 11:32 am | दिनेश सायगल
गाडी डिरेल झाली! signalman काय करत आहेत?
26 Jun 2014 - 11:39 am | ब़जरबट्टू
छान लिव्हलय.... :)
बाकी पिरा, पैसा, व रेवतीताईशी सहमत.... :)) इन अडवान्स...
म्हणजे संक्षी म्हंटल्यावर येथे जे काही होणार तेला पुर्ण अणूमोडन इन अडवान्स....
26 Jun 2014 - 12:59 pm | दिपक.कुवेत
विडंबन एक से बढकर एक आहेत. "तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत" हे वाक्य तर जाम आवडुन गेलं आहे स्पेशली त्यातला तो डांगडींग शब्द.
26 Jun 2014 - 6:56 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
कचकून सहमत ;)
26 Jun 2014 - 7:19 pm | कंजूस
कशाला तक्रारी करताय पळा लवकर हिमालयात.
26 Jun 2014 - 8:11 pm | संजय क्षीरसागर
हिमालयात गेलेले संसारात परत येतील *acute*
26 Jun 2014 - 8:16 pm | लंबूटांग
धिस एक्स्प्लेन्स अ लॉट.
27 Jun 2014 - 12:02 am | संजय क्षीरसागर
....लक्षपूर्वक न वाचता प्रतिसादाची घाई (पुन्हा) नडली!
27 Jun 2014 - 1:38 am | लंबूटांग
....विरोधाभासी लिहण्याची आणि सोयीस्करपणे दुर्लक्ष करायची, सवय (पुन्हा) नडली!
इतरांच्या संसारींगचा अनुभव रात्री बेरात्री जागून घेतला म्हणायचा का?
अरे हो तिथेही बायकोला घेऊन का? वैयक्तिक म्हणून नाही पण लेखात
असे वाचले म्हणून विचारले.
असो, विडंबन काही खास वाटले नाही, ठीक आहे.
पुलेशु.
27 Jun 2014 - 2:48 am | संजय क्षीरसागर
ती माझ्या संसाराची कहाणी असण्यापेक्षा जगाची कथा आहे. बहुतेक सर्व प्रतिसादकांना पोस्ट आवडलीये म्हणजे अर्थ पोहोचलायं. तुमच्या प्रतिसादातून वैयक्तिक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न फसल्यानं तुम्ही नाराज झालात. सो आय डोंट केअर.
27 Jun 2014 - 7:10 am | मदनबाण
टुकार !
इतरांसाठी...
डांगडींग असा नसुन डिंगडाँग असा आहे... { संदर्भ :- पाखरु गुजगोष्टी शब्दकोष} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन
27 Jun 2014 - 10:25 am | संजय क्षीरसागर
बाय द वे, लेखनाच्या अषयाशी सुसंगत शब्द, डांगडींग असाच आहे (संदर्भ : तरुणाईची बोली भाषा). `डिंगडाँग' हा डोअरबेलचा आवाज आहे.
27 Jun 2014 - 10:55 am | मराठी कथालेखक
सामान्य दर्जाचा फॉर्म्युलाबाज विडंबन लेख. असो.
पुढील लेखनास शुभेच्छा.
27 Jun 2014 - 11:39 am | संजय क्षीरसागर
त्याच्याशी एखादा रिलेट होईल, एखादा नाही. आपण निदान पिडलं तरी नाही कुणाला हे काय कमीये?