पक्षही हरला, मीही बुडालो,
तरी मोडीत काढू नका!
अन राया मला,
जेलात धाडू नका...
राया मला, जेलात धाडू नका |
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
गुरू अण्णांना उपासा बसविले,
प्राण तयांचे पणास लाविले...
साथ न देता लाभ उठविला
कृतघ्न ठरवू नका...
अन राया मला, जेलात धाडू नका |
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
जने विश्वासली, दिल्लीची सत्ता,
कशी राबवू, मला न पत्ता...
खोटी आश्वासने, राजीनामा नाटक
'भगोडा' हिणवू नका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
सिंहासामोरी दंड थोपटले
तरी तयाने मज दुर्लक्षियले,
मिडियाशी बोंबललो तरीही
गंगा न गिळे माझ्या चुका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
पुराव्याविना आरोप केले,
कोर्टात पितळ उघडे पडले,
तिहार जेलचे बूचच बसले,
महात्मा मी बनचुका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका|||
:)
प्रतिक्रिया
24 May 2014 - 9:47 am | प्रचेतस
24 May 2014 - 9:56 am | मुक्त विहारि
मस्त..
@ पिडां भाऊ,
आता लिहायला सुरुवात केलीच आहे, तर थांबू नका.
24 May 2014 - 9:57 am | अनुप ढेरे
=))
भारी!
केजरू पब्लिसिटी स्टंट्समध्ये राखी सावंतला कॉम्पिटिशन आहे.
24 May 2014 - 11:07 am | पैसा
या लावणीच्या निमित्ताने "आप"ल्या भाऊंसाठी "मी नाही ग बाई त्यातली न कडी लावते आतली" ही खास म्हण आठवली!
24 May 2014 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार
पिडा काकांसारख्या प्रतिभाशाली पुरुषाने एक लिहीलेली एखादी झकास तिहारी तडका असलेली लावणी वाचायला मिळणार अशी खात्री होती.
पण पहातो तर काय एका होउ घातलेल्या महात्म्याची घोर टवाळी करणारी कवीता निघाली.
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे, अशा एका थोर, आदरणीय, सन्माननिय, माननिय व्यक्तीमत्वाची अशी हेटाळणी करण्याच्या या ब्रिगेडी मनोवृत्तीचा जाहिर निशेढ
हे परमेश्र्वरा यांना क्षमा कर, भारतमातेच्या एका थोर सुपुत्राचा हे लोक अपमान करत आहेत.
24 May 2014 - 5:14 pm | तिमा
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे
आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!
25 May 2014 - 10:39 am | धन्या
भारीच.
25 May 2014 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे
:)
24 May 2014 - 11:08 am | सस्नेह
*lol*
पिडांकाका, वेल्कम !
24 May 2014 - 11:11 am | मनीषा
लावणी एकदम मस्तं
महात्मा मी बनचुका... मार्मिक
24 May 2014 - 11:19 am | माहितगार
:"काव्यरस: सांत्वना ! लेखनविषय:: गुंतवणूक" !!
:) लय भारी
गुंतवणूकीवर आपपाला बोनस मीळो हि शुभेच्छा !
24 May 2014 - 12:20 pm | इरसाल
काव्यरस:
सांत्वना
हेच भयानक होते. बाकी लावणी जब्राट ह्यावर माझी क्लास्मेट सुरेखा कुडचीकर छान नाचेल.
24 May 2014 - 12:38 pm | नंदन
कालिंदीतटपुलिंदलांछित जेलनत पादारविंद! :)
24 May 2014 - 1:02 pm | प्यारे१
___/\___
24 May 2014 - 1:18 pm | जेम्स बॉन्ड ००७
__/|\__
24 May 2014 - 4:41 pm | बॅटमॅन
धीरसमीरे एसि हपीसे वसति अहो खलु नंदन
कोटीपीनमहत्तरमर्दन खलु यः जनकृतवंदन ||
पिडांकाकांची लावणी तर खासच!
डांबिसो पीतचेष्टालु: युवकेषु महद्युवा |
विनोदकाव्यं तस्यैतद्दृष्ट्वाऽहं चाहसम् बहु ||
24 May 2014 - 12:44 pm | आतिवास
:-)
फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी 'मला काहीही करून जेलात धाडा, तेवढेच आणखी काही बाईट्स' असं म्हणताहेत हो आमचे (म्हणजे 'आप'ले) एके ४९!
चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त ;-)
26 May 2014 - 9:51 am | पुण्याचे वटवाघूळ
गैरसमजाचा प्रश्नच कुठे येतो? गडकरी हे भारतातील सर्वाधिक भ्रष्ट राजकारणींमध्ये एक आहेत हे तुमच्याच केजरीवालचे वाक्य होते.त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर स्वतःकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टाला द्यावा नाहीतर बिनशर्त माफी मागून मोकळं व्हावे. यापैकी दोन्ही गोष्टी केजरू करत नसेल तर जी काही प्रोसेस असेल त्याप्रमाणे त्याला कोर्टाने तुरूंगात धाडले.त्यात काय चूक आहे? अजूनही केजरीने नियमांप्रमाणे पाहिजे तो बाँड भरला तर त्याला तुरूंगातून सोडायला काहीच हरकत नसेल--कोणाचीच अगदी कोर्टाचीही. सुरवातीली तो बाँड भरायला तयार झाला होता पण प्रशांत भूषण या दिडशहाण्या च्या सल्ल्यामुळे त्याने तो भरायला नकार दिला असे पेपरात आले आहे. याचा अर्थ काय? फुकटची प्रसिध्दी मिळत असेल तर तुमचा केजरू तिथे सर्वात पहिला पोचेल हे नक्कीच.
युपीएच्या दहा वर्षाच्या अनागोंदीनंतर लोकांना काम करणारे आणि रिझल्ट देणारे सरकार हवे आहे.मोदींकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.लोकं रिझल्ट बघायला अधिरच नाही तर उतावळे आहेत.अशा परिस्थितीत या रस्त्यावरील धरणे, रस्त्यावर झोपणे या नौटंकीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे?मोदींनी चांगले काम करायची सुरवात जरी केली तरी सहा महिन्यात या केजरूपुढे रस्त्यावरचे उकिरडे फुंकणारे कुत्रंही तंगड वर करायचे नाही.
आम आदमी पक्ष या अजब रसायनातून कॅप्टन गोपीनाथ हा एक सेन्सिबल माणूस बाहेर पडला आहे. इतरही सेन्सिबल माणसे--आमचे इन्फोसिसचे बाळकृष्णन, मीरा सन्याल, संजीव आघा इत्यादी इतर सेन्सिबल माणसेही लवकरात लवकर बाहेर पडोत ही सदिच्छा.नंतर आआप म्हणजे प्रशासनाची काडीमात्र अक्कल नसलेल्या आणि नुसते अॅजिटेशन, फालतूची उपोषणे करून सवंग लोकप्रियता मिळवायचा केविलवाणा प्रयत्न करणार्या बिनडोकांचे टोळके बनून राहिल.
26 May 2014 - 2:08 pm | आतिवास
:-)
तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही - असं दिसतंय.
आणि शेवटचं वाक्यही स्मायलीविना वाचलेलं दिसतंय.
असो.
24 May 2014 - 1:06 pm | स्पा
ख्याक :-D
24 May 2014 - 1:06 pm | प्यारे१
पिडांकडून बर्याच दिवसांनी फर्मास लेखन!
अशाच 'प्रसुती' सुरु राहू द्या. ;)
बाकी ते 'आप' नि 'आपापले' ह्यांना दुर्लक्षावं असं वाटू लागलंय.
स्वतःच्याच बेसिक फंडामेंटलच्या अम्मलबजावणी अभावी वाया जाणारी (ऑलरेडी गेलेली) आणखी एक केस.
24 May 2014 - 2:02 pm | प्रभाकर पेठकर
खास लावणी.
तरीपण, दिल्लीतील सत्तेसाठी काँग्रेस सोबत आवळलेल्या, आय मीन, आळवलेल्या 'शृंगार'रसाचा अभाव जाणवला.
बाकी ही, निवडणूकीच्या रणधुमाळीतील 'फडाची' लावणी म्हणायची की काँग्रेसच्या 'बैठकी'तली?
24 May 2014 - 2:14 pm | विजुभाऊ
पेठकर काका. या लावणीत श्रुंगार रसाचा अभाव असला तरी "आम" रसाचा आंतर्भाव आहे.
24 May 2014 - 3:04 pm | शिद
समयोचित लावणी. ;)
24 May 2014 - 3:07 pm | शिद
'आप' नेत्या शाझिया इल्मींची पक्षाला सोडचिठ्ठी
24 May 2014 - 7:12 pm | प्रभाकर पेठकर
कॅप्टन गोपीनाथांनीही 'आम आदमी पार्टी' सोडली. - टिव्ही बातमी.
24 May 2014 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी ! =))
24 May 2014 - 6:42 pm | मदनबाण
डांबिसानु माका ह्यो लावणीचो तडको आवडलो बघा. ;)
24 May 2014 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा
मिडियाशी बोंबललो तरीही
गंगा न गिळे माझ्या चुका...
तिहार जेलचे बूचच बसले,
_/\_ 
महात्मा मी बनचुका...>>>
25 May 2014 - 10:09 am | प्रीत-मोहर
काकानु __/\__ घ्येवा!!!!
25 May 2014 - 10:43 am | धन्या
हे अगदी लावणीच्या मीटरमधी बसतंय. :)
25 May 2014 - 11:02 am | वेताळ
शेवटी एका खेचरात रुपांतर झालेने वाईट वाटते.भारतापेक्षा भारताबाहेर त्याचे प्रशंशक अधिक होते.परंतु पिंडाकाका नी त्याचे योग्य वर्णन केले आहे.महात्मा बनायच्या नादात त्याने पार वाट लावुन टाकली आहे.
अजुन एक खेचर योगेंद्र यादव ह्याने तर कहर केला आहे. अटक झाल्यावर झोपलेले फोटो काढण्याच्या नादात त्याने चक्क ९० डिग्री झोपत फिरला आहे्ए लोक प्रसिध्दीसाठी काय पण करतील.
25 May 2014 - 12:35 pm | असंका
निवडणूकी लढून हरला तो. केवढा मोठा गुन्हा. (का निवडणूकीला उभा राहिला हाच गुन्हा?) त्याला फक्त एवढीशीच शिक्षा? अहो अजून चार शिव्या घाला. हरलेल्याची हर तर्हेने हेटाळणी करणे हीच तर आपली थोर संस्कृति आहे.
25 May 2014 - 1:27 pm | प्यारे१
केजरी हरला म्हणून कुणी बोलत नै हो त्याला! भावना को समझो!
25 May 2014 - 1:42 pm | असंका
हो हो नक्कीच.
फक्त याचा मग कसा अर्थ घ्यायचा?
25 May 2014 - 2:21 pm | श्रीगुरुजी
:yahoo:
केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता ते तुरूंगात गेले ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी. माध्यमे व कॅमेरे बरोबर घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या उघडेबंब अवस्थेत ते नदीवर डुबक्या मारण्यासाठी गेले होते तेदेखील फक्त सवंग प्रसिद्धीसाठी. प्रसिद्धी मिळणार असेल तर तर कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही ते मागे राहणार नाहीत.
25 May 2014 - 9:04 pm | नानासाहेब नेफळे
केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी कोण? कालपर्यंत पाकीस्तानला शिव्या घालून मतांच्या तुंबड्या भरणारे मोदी आज शरीफचे तळवे चाटत आहेत. यात स्ट्रॅटेजी आहे असा समज पसरवला जातोय. वास्तविक पाकने खोड्या काढल्यावर आपला व्हावहारीक षंढपणा जगासमोर उघड होऊ नये यासाठि केलेलं लांगुलचालन आहे.कंदहार कारगिल व संसद हल्ल्यावेळी भाजपचा व्यावाहारीक षंढपणा उघड झाला होता व ते इलेक्शन हरले होते. अरेरे इलेक्शन जिंकण्यासाठी शत्रुचे तळवे चाटत आहेत.
28 May 2014 - 1:20 pm | विनोद१८
अरे नान्या शुद्धिवर ये
25 May 2014 - 7:09 pm | वेताळ
केजरीच काय त्याचे कार्यकर्ते व समर्थक देखिल कन्फ्युज्ड झाले आहे.काल त्यांची बायको चक्क टीव्ही वाल्याना शिव्याशाप देत होती.
25 May 2014 - 7:35 pm | असंका
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves and wiser people so full of doubts- Bertrand Russel
कुणी तरी असं काही म्हटलंय हे मला मिपाचा सदस्य होइपर्यंत माहित नव्हतं. इथे कुणाची तरी स्वाक्षरी होती ही.
25 May 2014 - 8:07 pm | विवेकपटाईत
लावणी आवडली, गेल्या ३० वर्षांपासून रोज-सकाळ संध्या काळी बस मधून (कार्यालयातून जाता येता), देशातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जिथे मोठ्या मोठ्या पुण्यात्मांचे चरण धूळ लागते (काही जास्त नाही झाल ना), रोज दर्शन करतो. काही वर्षांपूर्वी ही भकास दिसायची. पण आजकाल बाहेरच्या भिंतींवर सुंदर रंग रोगन शिवाय ग्राफिटी म्हणतात त्या प्रकारचे चित्र ही भिंतींवर आहेत. फक्त एकच ' जेलात धाडा" हा शब्द प्रयोग अधिक सार्थक आहे.
26 May 2014 - 10:01 am | स्पंदना
पिडां काका इज बॅक!!
26 May 2014 - 10:56 am | यशोधरा
झक्कास!
नंदन +१
29 May 2014 - 2:16 pm | बबन ताम्बे
मस्त तिहार लावणी.
3 Jun 2014 - 8:14 am | नरेंद्र गोळे
लावणी आवडली.
प्रतिष्ठितांची लफडी काढू
भ्रष्टांविरुद्ध शिमगा घडवू
राज्य चालवा असे मात्र
तुम्ही कधीही सांगू नका
अहो राया मला, जेलात धाडू नका
अहो सख्या मला, जेलात धाडू नका