नशीब

डोमकावळा's picture
डोमकावळा in जनातलं, मनातलं
28 Jul 2008 - 10:02 pm

"ओ काका, काही काम देता का?"
बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता.
"स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता.
"नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले. "कुठून आलास?"
"नागपूर हून आलो" त्या मुलाने उत्तर दिलं.
"कसा आलास?" मालक.
"रेल्वे नी..." मुलगा.
"अन् टिकीट ?"
"नाहीये....त्यांनी पन विचारलं टिकीट." तो टी.सी. बद्दल बोलत असावा.
"मग ?"
"नाहीये म्हणालो...पुन्हा नाही विचारलं". बहुतेक त्याच्याकडे बघून त्या टी.सी. ने दंड वगैरेची आशा केली नसेल.
एक आठ वर्षाचा मुलगा नागपूरहून जेजूरीला येतो आणि काम मागतो आहे...सगळं माझ्या कल्पने पलीकडचं होतं. चित्रपटांमध्ये शोभेल असं काहीतरी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो.
"घरी न सांगता आलास ना..." मालकानं जरा दरडावून विचारले.
"घरी कोणी नाही." कोवळ्या पण गंभीर आवाजात तो बोलला.
त्याच्या या उत्तराने मी जरा चमकलो. कोणी नाही म्हणजे नक्की काय असेल?
"आई बाप कुठयत तुझे?" आता जरा मालकाचा आवाज सौम्य झाला होता.
दोन मिनीट तो तसाच उभा राहिला. काहीतरी त्याच्या मनात चाललं होतं. काय ते त्यालाच ठाऊक. आणि त्या खंडेरायाला...
"आरे....आई बाप कुठयत ?" पुन्हा विचारलेल्या प्रश्नाने तो भानावर आला.
"आई....." सेकंदभर थांबला. तो काय बोलतोय याच्याकडे माझे कान लागून होते. आणि त्या मालकाचे देखील.
"आई.....मरून पडली." माझा माझ्या कानावर विश्वास बसेना.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 10:11 pm | यशोधरा

"आई.....मरून पडली."

आईगं.... :( :( काय प्रतिक्रिया द्यावी यावर? प्रतिक्रियेच्याही पलिकडलं.... :(

अवांतरः पुढचा भाग आहे का एवढंच? कारण, एवढंच असेल, तर जरा अपूर्ण वाटेल, असं वाटतय...

डोमकावळा's picture

28 Jul 2008 - 10:15 pm | डोमकावळा

ते चुकून अर्धवट प्रकशीत झालं आहे...
पूर्ण प्रकाशीत करतोच आहे...

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2008 - 10:21 pm | बिपिन कार्यकर्ते

लवकर करा प्रकाशित.... धक्क जबरदस्त आहे पण पुढे वाचायची उत्सुकता लागली आहे.

बिपिन.

मनिष's picture

28 Jul 2008 - 10:28 pm | मनिष

"आई.....मरून पडली." माझा माझ्या कानावर विश्वास बसेना.

अरे..............काय बोलू आता? करकचून ब्रेक लागावा, आणि पोटात खड्डा पडावा असे वाटले...पुढे काय होईल याची उत्सुकता आहे, पण त्याबरोबरच एक अनामिक भीती, अस्वस्थता वाटते आहे.

डोमकावळा's picture

28 Jul 2008 - 11:14 pm | डोमकावळा

हा लेख चुकून अर्धवट प्रकशीत झाला आहे...
पूर्ण प्रकाशीत या दुव्यावर मिळेल...
http://www.misalpav.com/node/2782