सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Mar 2014 - 11:26 am

सूर्य थकला आहे

पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई
अनुतापे बुजवत न्यावी
’अभय’तेचे एकेक एकक
ठिणगी शोधत आहे
अनर्जितांच्या पाडावाला
शिक्षा योजत आहे!
श्रमदेवाच्या उत्थानास्तव
शिक्षा योजत आहे!!

                         - गंगाधर मुटे ’अभय’
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==

अभय-काव्यअभय-लेखनवाङ्मयशेतीवीररसवाङ्मयकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2014 - 7:41 am | अत्रुप्त आत्मा

__/\__