मी १६ मार्च ला निघणार

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
14 Mar 2014 - 11:44 am

काल ५०० रुपये काढले आणि एकदम RELIEF आला
आजवर अनेकवेळा मला डेबिट/क्रेडीट कार्ड वापरण्याचा सल्ला मिळाला पण मी दुर्लक्ष केले
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात त्या प्रमाणे ती वेळ आली
आली म्हणजे मी ओढवून घेतली
सत्तरी ओलांडलेल्या आम्हा मित्रात बायकोला न घेता ट्रीपला जाण्याची कल्पना मांडली गेली आणि अंमलात आणण्याची सुरवात झाली
नेपाळ पाहण्याचे ठरले . आरक्षण झाले . गेले ५० दिवस बायको चुकूनही दुखावली जाणार नाही
याची काळजी घेतली !!
दोन दिवसापूर्वी कळले कि ५०० आणी १००० च्या नोटा नेपाळमध्ये वापरणे त्रासदायक होते
या नोटा स्वीकारल्या जात नाहीत . याला सोयीचा पर्याय डेबिट / क्रेडीट कार्ड .
बँकेत चौकशी केली तेंव्हा या सात आठ दिवसात मला कार्ड मिळेल याची शाश्वती वाटेना
४०/५० हजार रुपयाचे गाठोडे उशाला घेऊन दोन दिवसांचा रेल्वेचा प्रवास आरामदाई होणे अशक्यच !
तरुण वर्गमात्र शांत होता . पण समस्या मांडल्याखेरीज सुटणार कशी ? मी समस्या मांडली आणि
एकालाही ती समस्या वाटली नाही . मला एक डेबिट कार्ड देण्यात आले . ते वापरण्याच्या सूचना
दिल्या गेल्या . कितीही पैसे काढता येतील याची खात्री दिली गेली !!
मी एका ATM मध्ये गेलो आणि ५०० रुपये काढले . आता नेपाळमध्ये खर्चाची चिंता राहिली नाही
खिशात किती रुपये ठेवायचे हा प्रश्न सुटल्याने RELIEF मिळाला
आता MOBILE चा प्रश्न आला . आमचा MOBILE वापरला तर बोलण्यासाठी दर मिनिटाला १४० रुपये खर्च येईल असे कळले . [म्हणजे बायकोला नेणे स्वस्त पडणार तर]
त्यामुळे SMARTPHONE मला देण्यात आला ज्यावर ते WHATS UP आहे
WHATS UP ला पर्याय काय म्हणून विचारल्यावर VIBER असे उत्तर मिळाले
परंतु त्या फोन ने VIBER वर बोलता येत नाही म्हणून मला TAB देण्यात आला
WIFI असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम असल्याने VIBER वर फुकट बोलता येईल म्हणे
एकंदरीत माझी काळजी मिटली आहे
आता प्रश्न आहे
काटमांडू ,पोखरा गोरखपूर अशा ठिकाणी आवर्जून काय पहावे ?
आपल्या पैकी नेपाल दर्शन करून आलेले आणि नेपाळ माहित असलेले ट्रीप
आनंद दाई व्हावी म्हणून चार शब्द लिहितील तर मला बरे वाटेल
मी १६ मार्च ला निघणार

प्रवासप्रकटन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Mar 2014 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे

सहलीकरिता शुभेच्छा !

आल्यावर सचित्र वृत्तांत टाकायला विसरू नका.

सुनील's picture

14 Mar 2014 - 11:52 am | सुनील

हाय्-टेक झाल्याबद्दल अभिनंदन!

नेपाळ ट्रीपकरीता शुभेच्छा!

परत आल्यावर (फोटोसहित) वृतांत जरूर टाका.

अमेरिकेत प्रवेश करतांना १०००० डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम बरोबर कॅश च्या स्वरुपात ठेवता येत नाहीं हे तुम्हाला ठाऊक असेल. पण नेपाळला जातांना आपण १०००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवता येत नाहीं हे आम्हाला ठाऊक नव्हतं. याची कल्पना आम्हांला आमच्या टूर च्या संचालकांनीदेखील दिली नव्हती. एवरेस्ट विमानातून बघायचा म्हणून व त्या flight चंच तिकीट ९००० रुपये असल्याने आम्हा तीन मित्रांकडे १०००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. आमचा तिथं मुंबईतच)वादविवाद झाला पण शेवटी आम्ही आमच्या सर्व पैशांसाहित आंत गेलो. बाकी सर्व आहेच पण विमानातून घेतलेलं एवरेस्ट दर्शन मात्र मी तुम्हांला नक्कीच recommend करेन.

अत्रन्गि पाउस's picture

14 Mar 2014 - 10:18 pm | अत्रन्गि पाउस

हल्ली मला वाटते एक पै देखील नेऊ देत नही...
किंवा
वाटेल तितके दडपून न्या ...कुणी विचारात नही
(अपूर्वाई)
हे आठवले... =))

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2014 - 10:33 pm | पिवळा डांबिस

आणि त्यानंतरचे, 'दडपून म्हणजे कुठे दडपून ते समजले नाही!!' हे तर खासच!!!
:)

आदूबाळ's picture

14 Mar 2014 - 3:26 pm | आदूबाळ

येताना कुकरी घेऊन या

("मी आणि माझा शत्रुपक्ष" नक्की वाचा/ऐका)

नेपाळमध्ये मक्याची लालसर कणसं मिळतात. आपल्याकडच्या देशी कणसांपेक्षा वेगळी चव असते. जरूर खाऊन पहा.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2014 - 8:51 pm | अत्रुप्त आत्मा

@येताना कुकरी घेऊन या>>> http://www.smileyvault.com/albums/CBSA/smileyvault-cute-big-smiley-animated-013.gif

प्रथम प्रवासाला शुभेच्छा देतो .मी नेपाळला गेलो नाही परंतू माहितीची जमवाजमव करत आहे .तुमच्याबरोबर जाणारे कोणी तरूण मंडळी आहेत असं वाटतं त्यांपैकी कोणाला अनुभव असेलच .
मला मागच्या वर्षी वाचनात आले की सीमेवर (सोनौली ?) फक्त इलेक्शन वोटर काड पाहतात .पैन काड ,ड्रायविंग आधार चालत नाही .

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2014 - 9:48 pm | पिवळा डांबिस

सफरीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

खटपट्या's picture

14 Mar 2014 - 10:11 pm | खटपट्या

शुभेच्छा

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2014 - 10:35 pm | पिवळा डांबिस

येतांना रूद्राक्ष घेऊन या. नेपाळमध्ये रूद्राक्ष चांगले मिळतात....