ममराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा
भाषा किती छान आपुली भाषा किती छान महाराष्ट्राची शान आपुली भाषा किती छान
संत महत्मे होऊन गेले
मराठी ग्रंथ लिहुन गेले
आपुल्यासाठी ठेऊन गेले
अद्वयताचे ज्ञान 'आपुली भाषा किती छान
कवी लेखक अनेक झाले
मराठी साहित्य लिहुन गेले
आपल्यासाठी ठेऊन गेले
शब्दरत्नांची खाण आपुली भाषा किती छान
तिला बोलावी तशी ती बोलते
तिला ओळवावी तशी ती वळते
परप्रांतीयांना ही सहज कळते
वाटे मला अभिमान आपुली भाषा....
माय लेकराचे नाते आपुले
ह्रदयामध्ये त्याला मी जपले
नाजुक शब्दांमध्ये गुंफले
चरणी ठेऊन ध्यान आपुली भाषा किती छान
बी डी वायळ
प्रतिक्रिया
28 Feb 2014 - 9:16 am | सुनील
मराठी भाषा दिन होऊन गेला तरी ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या कवितेला एकही प्रतिसाद नव्हता म्हणून हा खटाटोप!
म्हणजे काय? हे वैशिष्ट्य केवळ मराठीचेच आहे काय?
याबाबत साशंक!