मी शिकले माझ्या वडलांकडून

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
24 Jul 2008 - 10:04 pm

"काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं, ते पण."

ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले.त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते.

मला म्हणाली,
"काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती. मी तुमचे उदाहरण माझ्या वडलाना नेहमी सांगत असायची.मला आठवतं तुम्ही नेहमी म्हणायचा,शरिर हे ही एक यंत्र आहे.कंप्युटर मधे त्याच्या मेमीरीच्या एखाद्दया मेमरी लोकेशन मधे जर बिघाड झाला तर कंप्युटर स्वतःच ते लोकेशन शोधून काढून बायपास करतो.आणि अशा तऱ्हेने आपलं काम अखंड चालू ठेवतो.तसंच काहीसं आपलं शरिर आपल्या व्याधी दुरुस्थ करतो. तरीपण आपण यंत्रालाही विश्रांती देतो,तशी शरिरालापण दिली पाहिजे हे मी माझ्या वडलाना नेहमीच सांगायची.ते त्यानी कधीच
ऐकलं नाही"

मी तिला म्हणालो,
"वृंदा, तू तरी आता तुझ्या प्रकृतीकडे लक्ष देतेस का?"
त्यावर ती म्हणाली,
"सध्या जे देशात वारे वाहत आहेत,ते सर्व पश्चिमेकडून येत आहेत.पाश्चिमात्य लोकांकडून ज्या अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत त्यात ज्याला "वर्क एथीक्स" म्हणतात त्याचा पगडा तरुणाबरोबर इतर सर्वांवर पडत आहे. एकदा सकाळी घरातून ऑफिसमधे गेल्यावर घरी परत येण्याची वेळ ठरलेली नसते.कारण काम संपतच नाही.पांच वाजता घड्याळ बघून ऑफिस सोडण्याचे दिवस आता गेले.तसं करणं अगदीच चमत्कारीक वाटतं. माझ्या वडिलानी मला मरमरेसो काम कसं करावं ते शिकवलं.तासनतास काम करणं आणि कामाला वाहून घेणं हे मी त्यांच्याकडून पाहिलं.पण काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं ते पण.

माझ्या वडलांचा स्वतःचा बिझीनेस होता.ते स्वतः कंपनीचे मार्केटींग करायचे.बऱ्याच ठिकाणी जावून त्यांच्या येणार्‍या नव्या

प्रॉडक्टबद्दल त्यांना लेक्चर द्दयावं लागायचं.बोलून बोलून खूप थकून जात असत.फिरतीचे काम बरंच असायचं. तशांत त्याना डायबेटीस होता.शिस्तीचे भोक्ते असल्याने शब्द दिल्यावर तो पाळण्याचा पराकाष्टा करायचे.या सर्व कारणानी त्यांना त्यांच्या या वागणूकीची किंमत शेवटी द्दयावी लागली.ते अठ्ठावन्न वर्षावर निर्वतले.

आता त्याला बरीच वर्षे होवून गेली,जेव्हा शेवटी माझे वडील त्या रात्री घरी आले होते.त्यानंतर मी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल खूप विचार केला.मी माझ्या मनात नक्की ठरवलं,मी धडपडत जिना चढणार नाही.माझा न्युझरिपोर्टरचा जॉब मला खूप आवडला असला तरी,मी मरमरेसो काम करणार नाही.पण तसं करणं मला अगदीच सोपं झालं नाही.बोलून चालून मी माझ्याच वडीलांची मुलगी होते ना! कॉलेजमधे लायब्ररीचा दरवाजा उघडण्या पुर्वी मी दरवाज्यात उभी असायची.

माझे वडील मला एकदा म्हणाले,
"मला कधी कधी चौपाटीवर जावून सूर्यास्थ पहायची इच्छा येते पण कामा मुळे मला तसं अजिबात करता येत नाही."
माझे वडील तसे सर्वपल्ली होते.वाचन,लिखाण,बुद्धिबळ खेळण्यात वाकबगार होते.संगीतातपण त्यांना दिलचस्पी होती. वसंतराव देशपांडे,सुधीर फडके,अरुण दाते यांची गाणी त्याना विशेषकरून आवडायची.म्हणजे ही झाली त्यांच्या आवडीनिवडीची
प्रकाश टाकणारी यादी.पण ही यादी संपवून झाल्यावर सूर्यास्थ पहायला चौपाटीवर जायला त्यांना वेळ मिळत नव्हता.मला त्यांच्या ह्या "डेडलाईन" ची संवय लावून घ्यायची नाही.

मग ह्यातून एक प्रश्न उभा राहतो,मी जर पांच वाजता काम उरकून परत येऊन सूर्यास्थ बघायला चौपाटीवर गेले तर त्याचे पडसाद काय होतील.
माझ्या करीयरच्या हाईटवर न पोहचण्याचा मी धोका घेते काय? कदाचीत शक्य आहे.पण निदान लवकर गेल्याने,माझ्या मंडळी बरोबर संध्याकाळी जेवण घेता येईल.आणि चौपाटीवर जावून त्यांच्याच बरोबर लांबवणार्‍या सावल्यातून जाताना भरपूर सूर्यास्थ पहाण्याचा आनंद लुटता येईल.आणि हे नक्कीच काहीतरी मिळाल्याच्या समाधानीला योग्य किंमत दिल्याचा आनंद होईल तो वेगळाच.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख