सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
22 Feb 2014 - 11:28 pm

सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी
(लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर)

जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष)
भास्कर जाधव (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष)
गणेश नाइक (नवी मुंबई, मंत्री)
विनायक मेटे ( राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष)
संजय निरुपम (खासदार)
छगन भुजबळ (सार्वजनिक बांधकाम, गृह अशी खाती सांभाळलेले मंत्री)
विनायक निम्हण(आमदार, पुणे)

आणि
नारायण राणे(मंत्री)

या सर्वांमधे एक समान धागा आहे, कोणता ते ओळखा
व्य. नि. करा

समाजमाहिती

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

22 Feb 2014 - 11:32 pm | शैलेन्द्र

सगळे शिवसेनेत होते, सगळे शिवसेनेचे माजी आमदार..

जितेंद्र आव्हाड शिवसेनेत होते ?

कापूसकोन्ड्या's picture

23 Feb 2014 - 8:43 am | कापूसकोन्ड्या

अहो त्यांनी सांगीतले आहे, व्य.नी.कर

जोशी 'ले''s picture

23 Feb 2014 - 8:47 am | जोशी 'ले'

जितेन्द्र अव्हाड अगदि सुरुवातीच्या काळात काॅलेजात असतांना दिलिप हाटेंच्या विद्यार्थी संघटनेत होते.. हाटे त्या वेळी शिवसेनेत होते, त्यांच्या मुळे ते शिवसेनेत गेले व दिघेंच्या आसपास असत...
दिघे असतांनाच त्यांनी सेना सोडली होती

उत्तरे धागाकर्त्यांना व्य. नि. करायची आहेत. येथे चुकून दिली जाऊ नयेत म्हणून (धागाकर्त्यांच्या इच्छेनुसार)धागा वाचनमात्र करत आहे.

आशु जोग's picture

4 Mar 2014 - 10:40 am | आशु जोग

राघव८२, ramjya, आदिजोशी, शैलेन्द्र,जोशी 'ले' यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. शैलेन्द्र यांचे उत्तर बरोबर आहे. सर्वजण मूळात शिवसैनिक आहेत.

याच धाग्यात सुरेश जैन, विखे-पाटील यांचे नाव टाकता आले असते पण हे दोघे मूळात शिवसैनिक नाहीत. केव्हातरी ते शिवसेनेच्या आसर्‍याला आले.

काही जणांना 'राष्ट्रवादी' हा यातला समान धागा वाटला. पण नारायण राणे काँग्रेसमधे आहेत.

सर्वजण मूळात शिवसैनिक आहेत.... हे बरोबर उत्तर आहे पण माझ्यामते सगळ्यंनी "शिवसेनेचा फायदा घेऊन स्वत्:च्या तुंबड्या भरल्या आहेत" हे जास्त योग्य वाटते.

शैलेन्द्र's picture

4 Mar 2014 - 1:27 pm | शैलेन्द्र

सगळ्यांनी जनतेचा फायदा घेऊन स्वत्:च्या तुंबड्या भरल्या आहेत" हे जास्त योग्य वाटते.

मारकुटे's picture

4 Mar 2014 - 2:30 pm | मारकुटे

सगळे पाठीत खंजीर खुपसणारे आहेत

रामपुरी's picture

4 Mar 2014 - 9:58 pm | रामपुरी

सगळे चोर आहेत. त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्याप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

नितिन थत्ते's picture

5 Mar 2014 - 8:53 am | नितिन थत्ते

मोरारजी देसाई
चरण सिंग
मोहन धारिया
चंद्रशेखर
जगजीवन राम
सुरेश कलमाडी
मेनका गांधी
सुखराम

यांच्यात काय साम्य आहे?

नितिन थत्ते's picture

5 Mar 2014 - 8:53 am | नितिन थत्ते

व्ही पी सिंग, अरुण नेहरू राहिले यात

आशु जोग's picture

5 Mar 2014 - 7:15 pm | आशु जोग

१. सर्वजण मूळात शिवसैनिक आहेत. एवढेच माझे म्हणणे होते
याला काही जणांनी जोडले आहे
२. "शिवसेनेचा फायदा घेऊन स्वत्:च्या तुंबड्या भरल्या आहेत"

यावर मी काय कमेंट करू... खाण तशी माती म्हणू का ?