... तुझ्यासाठी बहर होते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
13 Feb 2014 - 11:21 pm

कुठे वस्ती न घर होते.. मला सारे शहर होते
तुझ्यासाठी र्रुतू सारे,तुझ्यासाठी बहर होते

दिला तू कोणता प्याला, फुटे हा प्राण म्रुत्यूला..
कळेना काय ते होते: दवा होती, जहर होते..

घरांचे बंद दरवाजे, कुणी माणूसही नाही..
सुन्या गावात म्रुत्यूचे किती वेडे कहर होते !

नको कोठेच अश्रूंना मिळू दे माझिया थारा
तुझी दुःखे सुखी होती : तुझे अश्रू अमर होते

जरा पाहून घे राणी र्रुतूंच्या जिर्ण तसबीरी
कधी येथे फुले होती, कधी येथे भ्रमर होते

अता मी वेचतो आहे तुझ्या विरहातले मोती
मला स्मरते युगे होती ..तुझ्यासाठी प्रहर होते !

डॉ.सुनील अहिरराव

मराठी गझलकविता

प्रतिक्रिया

वैभवकुमारन's picture

15 Feb 2014 - 7:48 pm | वैभवकुमारन

मस्त आहे !!!

ह भ प's picture

15 Feb 2014 - 10:16 pm | ह भ प

व्वाह!! क्या बात है!! जिंकलत..!!

चाणक्य's picture

15 Feb 2014 - 11:16 pm | चाणक्य

जरा एक शेवटचा हात फिरवा. चांगली होईल अजून. भावना चांगल्या उतरल्या आहेत, शब्दयोजनाही चांगलीये. जर्राश्शी ठाकठीक केली तर मस्त होईल. आणि हो, तो मधे मधे विसर्ग नको.

@वैभवकुमारन, ह भ प, चाणक्य, खूप खूप आभार ।

काही किरकोळ बदल करावेसे वाटत आहेत. कितपत चांगले राहतीलं, माहित नाही. उदा.

मला कळते युगे होती
तुला स्मरते प्रहर होते