क्ष-गफ ला पत्र

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
19 Jan 2014 - 2:13 am

विनाकारण छोट्याशा गैरसमजावरून मोठ्ठंसं भांडण झालं. नेहमीप्रमाणेच माझे जुने माफ केलेले (माफ करण्यापूर्वी घातलेल्या थैमानाचा आता, 'तरी मी शांतपणे सहन केलं होतं ते सगळं' असा न विसरता उल्लेख) अक्षम्य गुन्हे पुन्हा वर उपसण्यात आले!! मी सगळ्या शंकां-कुशंकांचं निरसन केलं, पण रूळावर पडलेल्या तीन मेजर धोंड्यांपायी गाडी जागची हलेना. नुसतीच भोंगा वाजवत बसली. वाजून वाजून शेवटी भोंगा थकला आणि गाडीने ट्रॅकच सोडून दिला. पुन्हा कधी तुझ्या स्टेशनवर- आपलं, 'पुन्हा कध्धी-कधी तुझ्याकडे येणार नाही आता' असं वचन देऊन गाडीने रिव्हर्स गिअर टाकून यार्डाच्या दिशेने एकट्याच खितपत धूळ खात पडलेल्या इतर गाड्यांच्या दु:खांत सहभागी व्हायला कूच केली. मी लाल झेंडा फडकावून फडकावून दमलो, शेवटी हात दुखायला लागला. मग मनाशी म्हटलं, की पुरे आता. यापुढे आता नवी गाडी ट्रॅकवर येईपर्यंत या हातालाच सगळी मेहनत करावी लागणार आहे, तेव्हा हा झेंडा हलवणे थांबवूया. पण मन ऐकायला तयार नव्हतं.

साहजिकच मग मी सगळा इतिवृतांत मित्र-मैत्रींणींपुढे कथन करून मोकळा झालो. गाडी ज्या यार्डात जाऊन गुरफटून बसली होती तिथे पोचण्याचा काहीच स्कोप नव्हता. एक शेवटचा पर्याय म्हणून मी पत्र लिहावं, लव्ह-लेटर, असा उपाय अशाच एका दुस-या यार्डात खितपत पडलेल्या गाडीने दिला. मित्रांनी दुजोरा दिला(म्हणजे काई त्यांनी त्यांचे झेंडे हलवून दाखवले नाहीत. ते फक्त त्यांच्या त्यांच्या गाड्यांपुरते लिमिटेड अ‍ॅक्सेस वाले होते. असो). पण माझं अक्षर बेकार!!

'ए यार, माझं अक्षर बकवास आहे रे! अगदी कोंबडीचे पाय! तुम्ही कोणीतरी लिहून द्या ना यार! मुलींनो, मित्राच्या मदतीस येण्याची याहून मोठी सुवर्णसंधी मिळणं अवघड आहे. कृपया तुम्ही तुमचे हात कामाला लावा (मित्रांनी 'अह्म्म अह्म्म' केलं) म्हणजे लिहिण्यासाठी... पत्र लिहिण्यासाठी!!' लगेचच मुलींमधून 'श्शी तुम्ही मुलं कसले घाणेरडे असता रे' अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया!
'ए मला नाही जमणार माझी असाइन्मेंट नाही कम्प्लीट झाली अजून.'
'ए हो मलाही वर्कबुक कम्प्लीट करायचीय उद्या सब्मिशन आहे रे'
'माझं अक्षर म्हणजे दारू प्यायलेल्या कोंबडीच्या पायांसारखं आहे (आम्ही तिच्याकडे चकित दृष्टीने कटाक्ष टाकल्यावर) असं काय बघताय? मुलीचं अक्षर घाण असू शकत नाही का?'
एकंदर मला मदत करण्यास सगळ्या माझ्या प्रिय, जीवलग मैत्रीणींनी नकार दिला. मी मित्रांकडे वळलो.

'अरे बाबांनो... तुम्ही तरी मदत करा मला. तुम्हाला चांगलंच माहितीये की पत्रलेखन म्हटलं की शाळेत माझी कशी बोंब लागायची ते. कधीतरी २ पेक्षा जास्त मार्क मिळाल्येत का मला?'
'बघतो रे... आमची हालत सुद्धा तुझ्यापेक्षा काही वेगळी नाहीये. तरी काही सुचलं तर बघतो... सांगतो' माझे मित्रच आता मला या खड्ड्यातून खेचून बाहेर काढू शकले असते. त्यांच्याशिवाय माझं पानही हलत नाही. तेच माझ्यासाठी काहीतरी करू शकतात. माझं डोकं जराही चालत नव्हतं. घरी गेल्यावर हातात पेन आणि कागद घेऊन बराच वेळ, चालत नसलेलं डोकं धरून मी बसलो होतो. बराच वेळ पेनाची शेपूट चावल्यानंतर आणि पत्राची सुरुवातच चार वेळा खोडल्यानंतर शेवटी मी न राहवून त्या मित्रांतल्या प्रत्येकाला फोन लावून 'अरे माझ्यावतीने तूच तिला पत्र लिहीशील का? प्लीज? तुला जमेल तितक्या सुवाच्य अक्षरात' अशी विनवणी केली. तिघेही मित्र बराच वेळ उत्तरच देत नव्हते. सगळ्यांचा सूर 'अरे आम्ही काय लिहीणार? ही तुमच्यातली गोष्ट आहे आम्ही अशी कशी लुडबुड करू?' असा होता.
'अरे पण आता मी सांगितलं ना सगळं तुम्हाला?? काय घडलं होतं आणि तिला काय सांगायचंय तेही सांगितलं. तेच फक्त थोडक्यात सारांशात तुम्हाला लिहायचंय बास!!'
'बघतो, मला नाही वाटत रे मला जमेलसं. एकतर इथे इंग्लिशची बोंब आहे!'
'अरे मग माझं इंग्रजी तरी कुठे मार्क ट्वेनसारखं आहे? मराठीतच लिहायला सांगतोय मी'
'नाही यार नाही जमणार' असं म्हणून दोघांनी फोन ठेवून दिला. तिसरा 'बघू... ट्राय करतो' असं म्हणाला(याचं इंग्लिश तसं ब-यापैकी होतं, खरं तर धेडगुजरीच, पण आमच्या मानानं बरं. तरी त्याला मी मराठीतच लिही असं म्हटलं).

दुसरा दिवसभर मी वाट पाहिली, कुणाकडून काही खबर नाही. शेवटी 'आपलं काम आपल्यालाच करायला हवं' असं म्हणून मी पुन्हा कागद-पेन घेऊन बसलो, इतक्यात फोन थरथरला. ती होती. मी खुश झालो. यार्डाचा कंटाळा आला वाटतं. मी हलक्या आवाजात (काळोख्या खोलीचा दरवाजा उघडताना आत कोणी असल्याचा कानोस घेताना म्हणतात तसं) 'हॅलो' म्हटलं.
'आत्ताच्या आत्ता मला सीसीडीमध्ये भेट' मी शांत. 'हेलो?? ऐकलंस मी काय म्हटलं ते?'
'पैसे संपल्येत गं'
'मी भरते. ताबडतोब ये' फोन कट.

बापरे. चक्क ती पैसे काढणार होती आज? म्हंजे मॅटर सिरीअस दिसतंय. काय झालं आता? आमच्या भांडणास कारण ठरलेल्या संबंधित व्यक्तीशी तर हिने काही...? असो आपण सरळ जाऊन काय लोचा झालाय तो पाहू.

नव्याने उद्घाटन झालेल्या गाडीसारखी सजून धजून नटून-थटून ती (नेहमीचं आहे म्हणा) सीसीडीत येऊन बसली होती. हातात मी घेऊन दिलेल्या पर्सेस पैकी एक पर्स होती. एरवी कधी ही पर्स जास्त वापरली जात नाही, या टॉपवर तर अजिबात नाही(म्हणजे असं मला आधी सांगण्यात आलं होतं), मग काय प्रयोजन ही पर्स आणण्याचं? असो आपल्याला काय? मी जाऊन बसलो. काही बोलायला सुरुवात करायच्या आत 'एक मिनिट' असं म्हणून तिने ती पर्स उघडून तिच्यातून तीन लिफाफे बाहेर काढले. तिन्हींवर एकाच रंगाच्या स्केचपेननी पण वेगवेगळ्या अक्षरांत 'प्रिय जानूस' असं लिहीलं होतं. माझ्याकडे खुन्नसयुक्त कटाक्ष टाकले जात होते.

'हा काय प्रकार आहे? काय मिनींग आहे याचं?'
'काय?'
'हे... ही लेटर्स!! तुझ्या ३ इडीयट गुड ओल्ड फ्रेंड्सनी माझ्या घरी वन बाय वन येऊन ही दिली आणि प्रत्येकानं सांगितलं की तू स्वतःच्या हँडने लिहून दिलीयस म्हणून.'

मी गपगार झालो. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी माझ्याच सांगण्यावरून केलं खरं पण हा आगाऊपणा करताना मला आधी कल्पना तरी द्यायची. कल्पना सोडा पत्र मला आणून द्यायची. 'माझ्या वतीने पत्र लिहा' म्हणजे 'पत्र सरळ पोचती करा' असा अर्थ नाही होत. धन्य धन्य माझे मित्र! तरी निदान त्यांनी मदतीचा प्रयत्न तरी केला. स्केचपेन मात्र गधड्यांनी आमच्या चित्रकार मैत्रीणीकडून एकच उसनं मागून घेतलेलं दिसतंय. तिनं तरी तेच पेन पुन्हा दुस-याला द्यावं का? असो. इथे आता काहीतरी उत्तर देणं भाग होतं. गाडी सिग्नल केव्हा मिळतो याची वाट बघत होती.

'अं... ते... अं... तू कॉल-मेसेजला उत्तर देत नव्हतीस ना... म्हणून मग पत्र'
'म्हणून तीन? आणि तिन्ही वेगवेगळ्या हँडरायटिंगमध्ये? आणि ही अशी? मला मनवतोयस की माझी उडवतोयस?
'म्हंजे? असं काय लिहीलंय त्यांत?'
'तुला माहित नाही? तूच लिहीलीयस ना ती?'

मी पुन्हा गप्प.

'हो अगं पण असं काय लिहिलंय मी त्यात... एवढं चिडण्यासारखं?'
'जरा पुन्हा वाच, म्हणजे कळेल...' तिने ती पत्र उचलून माझ्या तोंडावर मारली. इतक्यात एक कप हॉट कॉफी तिच्यापुढ्यात आली. त्यात वरच्या थरावर हार्ट शेप होता. तिने ती लगेच ढवळायला घेतली आणि हार्ट शेप घालवून टाकला.

'वाचतोयस ना?'
'हो... हो'

मी ती पत्रं उघडून वाचायला घेतली, आणि माझ्या चेह-यावरचे रंग ट्रॅफिक सिग्नलच्या रंगांप्रमाणे बदलत गेले.
पत्रांत, चौकोनी कंसातल्या, माझ्या पत्र वाचतानाच्या मनात उमटलेल्या, उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत.
मी पहिलं उघडलेलं पत्र :

प्रिय जानूस,
सप्रेम नमस्कार शिसानविवि.
तुझे पत्र आले. [कधी? उगाचच?] घरी सगळे कसे आहेत? काका-काकू? छोटा चिंट्या कसा आहे? त्याला माझे अनेक आशिर्वाद! [शी दीर्घ हवा. असो] मध्ये वेळ मिळाला नसल्याने मी पत्र उशीरा लिहायला घेतले आहे त्याबद्दल क्षमस्व[मी तर रिकामटेकडाच असतो, आणि हे तिलाही माहितीये]. पत्र लिहीण्यास कारण असे, की नुकत्याच आपल्यात झालेल्या छोट्याशा वादळी तंट्याची कारणमीमांसा करण्याची, त्यामागील पार्श्वभूमी समजवण्याची तू मला संधीच दिली नाहीस, म्हणून मला हे पत्र लिहीण्याचे प्रयोजन करावे लागत आहे. तुला भ्रमणध्वनीवरून इतक्यांदा हाका मारूनही तू माझ्या हाकेला ओ देण्यासाठीची हिरवी कळ कधी दाबली नाहीस, सदैव लालच दाबत आलीस.[आयचा घो] पण मी खचलो नाही. मी तुला आसंसे(आखूड संदेश सेवा) [अरे बापरे] करत राहिलो तरी त्याला तू उत्तर दिले नाहीस. तरीही मी धीर सोडला नाही. व्हॉट्स अ‍ॅप 'काय आहे वरती' [कशाला, कशाला इतके चाळे] या कार्यक्रमाचा सदुपयोग करून मी तुला संदेश पाठवत राहिलो. पण तू मात्र मला ब्लॉक (सॉरी याला मराठी शब्द सुचला नाही. हवे तर खंड किंवा रोध म्हणू शकतेस.. डीक्शनरीत तेच अर्थ सापडले) करून टाकलेस. त्यामुळे आता हस्तलिखित पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर येऊन ठेपली आहे.

तुझ्याशिवाय हे आयुष्य अगदी नक्कोनकोसे झाले आहे बघ. कश्शात म्हणून मन रमत नाही. डोळे मिटले, की तू दिसतेस. उघडले, तरी तू दिसतेस. दात घासताना आरशात स्वतःऐवजी तुझा चेहरा समोर येतो. जेवता-खाता-पिता-हग सत्तत तुझा विचार मनात येत असतो. तू मला वेडापिसा करून टाकले आहेस. [मार खाणार आहे मी]

आता मुद्दाचे बोलूया हं. तुला आवडत नाही म्हणून मी निळ्या चित्रफिती पाहणे बंद केले होते (तुला कॉम्प्लेक्स येतो का गं ;) ) [अ‍ॅक्च्युअली मलाही तसंच वाटतं कधीकधी] अगदी खरे सांगत आहे मी. पण काय आहे ना, आमचा व्ह 'काय आहे वरती' वर एक गट आहे. त्या गटात सगळेजण मांसाहारी गोष्टी वर चढवत असतात. त्या माझ्या भ्रमणध्वनीवर माझ्या नकळत आपोआप खाली चढ उतरवल्या जातात. [अरे अपलोड आणि डाऊनलोड कळतं तिला, हे कळणार नाहीये तिला.] त्या माझ्या खिडकीत (गॅलरीला मराठी काय गं?) [इथे चार शिव्या हासडल्या होत्या मी] तुला दिसल्या, त्याला मी काय करू?? मला स्वतःला ठावूक नव्हते की त्यात त्या चित्रफिती आहेत ते. आणि तू पण कमालच करतेस तू त्या उडवून का टाकल्यास?? मी त्या बघितल्या नव्हत्या ना अजून [अरे नीट तरी खोड दिसणार नाही असं.] बरे ते जाऊ दे.

दुसरे असे की मी त्या संजूशी बोलतो म्हणून तुझा जळफळाट होतो. अगं तिच्याशी मी असेच उगाचच इकडचे तिकडचे आणि अभ्यासाचेच बोलत असतो. त्यादिवशी माझ्याकडे कोणी नसताना तू माझ्या घरी आलीस ना, तेव्हा ती चुकून तुझ्या आधी माझ्याकडे अभ्यासाचे पुस्तक मागायला आली होती[मी याला पकडून मारणार आहे]. आय स्वेअर जानू ती फक्त कामानिमित्त आली होती माझ्याकडे ['कामानिमित्त'!! एकदम बरोब्बर शब्द निवडलायस रे मित्रा]

तिसरे म्हणजे तुला माझ्या शुद्ध मराठी बोलण्याच्या आग्रहाशी असलेलाली प्रॉब्लेम अडचण. मी समजू शकतो. तुझे मराठी बरेच कच्चे आहे यात तुझी खरे तर काहीच चूक नाही. त्यामुळे त्याबद्दल तुला सतत बोलून, तुझ्या येता जाता सगळ्यांसमोर चुका काढून मी सारखे तुला खजील(म्हणजे एम्बॅरस) करतो, ते तुला आवडत नसणारच. पण काय करू, चुचित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात [अरे गधड्या जित्याची... जित्याची] त्याप्रमाणे माझी ही सवय इतक्या सहजासहजी जाणारच नाही. तू नसताना मी सगळ्यांच्याच मराठीच्या छोट्यामोठ्या चुका काढत असतो, फक्त्त तुझ्याच असे नाही हं. वाईट खोड आहे मला. पण काय आहे ना, तू असताना तूच इतक्या चुका करत असतेस, की सगळे जण तोंड दाबून तुझ्या दिव्य मराठीला हसत असतात. तुझे असे हसे होणे मला बघवत नाही म्हणून मी सतत तुला सुधारत असतो.

एवढे बोलून लिहून मी माझे चार शब्द संपवतो. तू माझ्याबद्दल जे गैरसमज करून घेतलेयस ते दूर व्हावेत आणि तुझा माझ्यावरचा राग शमावा, म्हणून मी हे पत्र लिहीले. रागवू नकोस ना जानू, तुला मी दिलेल्या ४३ प्रेम-चाव्यांची शप्पथ! [आता खपलो मी, आणि खपला हा] असो. तुझ्या पुढील पत्राच्या प्रतीक्षेत. कळावे लोभ असावा.
तुझा आणि फक्त तुझा,
अ.ब.क.

त्या पत्राच्या त्याच पानावर खाली त्याने दहावीच्या मराठीच्या परिक्षेत काढतात तसं पाकिट काढून, त्यात 'प्रति' आणि 'प्रेषक' लिहून माझं नाव -

अ. ब. क.
३७७, गौडबंगाल चाळ,
भंगारवाला नगर, मुंबई - ४०० ४२०

आणि प्रति पुढे तिचं नाव -

ज. झ. व.ञ. [नो कमेंट्स]
खोली क्र. ३६, चाळ क्र. २४
गल्ली क्र. ३६, उघडेदारपाडा,
मुंबई - ४०० ८४०

असं लिहीलं होतं.

मी ते पत्र ठेवलं. समोर हाताची घडी घालून मस्त पोझ देण्यात आली होती. मला घाम फुटला होता. मी थरथरत्या हातांनी दुसरं पत्र उघडलं.

(क्रमशः)

कथाविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 3:31 am | बर्फाळलांडगा

पण अशी अंडी घालणे म्हणजे जरा जास्तच ठरत नाही काय ?

चाणक्य's picture

19 Jan 2014 - 5:05 am | चाणक्य

पत्र वाचण्यास उत्सुक... सुरुवातीचा भाग वाचून काही कळेना पण पत्र वाचताना हहपुवा.

खटपट्या's picture

19 Jan 2014 - 6:49 am | खटपट्या

जबरी,
दुसरे आणि तिसरे पत्र लवकर लिवा (लिहा)

आता मुद्दाचे बोलूया हं. >> ओ! ओ! मित्राला सांगा की मुद्द्याचे. मुद्दाचे नव्हे :P गुद्दे आहेत का ते?
बाकी पत्र वाचून हहपुवा! तेही आत्ता ऑफिसमध्ये सक्काळी ७ वाजता वाचलेय. निषेध मेल्यांनो तुम्हां मित्रांचा!

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2014 - 9:46 am | टवाळ कार्टा

खत्री =))

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2014 - 10:55 am | संजय क्षीरसागर

आणि छान रंगवलायं.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2014 - 1:11 pm | अत्रुप्त आत्मा

=))

आईच्या गावात ! वाट लागली असेल ना!

प्यारे१'s picture

19 Jan 2014 - 1:17 pm | प्यारे१

काही ठिकाणचा अकारण विनोद निर्मितीचा अट्टाहास वगळता लेख छान जमलाय.
पुढच्या लेखात सॉरी पत्रात तो प्रयत्न टाळल्यास लेख/पत्र आणखी छान होईल.

(हाताला काम, आपापले हात, पत्त्यातले आकडे गरज नाहीये)

(उदाहरणार्थ : सगळा कच्चा माल व्यवस्थित झालेला असताना, मोहन बरोब्बर असताना, योग्य वेळात तळून कढईतून काढल्यावर चकलीची जी चव साधते (चकली गोल गुंडाळी, जिलेबी पण)
.
.
ती चव उगाच्च जास्त तिखट, मीठ, मोहन घातल्यानं,जास्त वेळ तळल्यानं साधू शकेल असं नाही.
चकली काही ठिकाणी कडक, काही ठिकाणी तिखट कधी अकारण खारट वाटते. कधी करपलेली सुद्धा दिसते.)

- समीक्षक मोडमध्ये प्यारे

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2014 - 2:16 pm | टवाळ कार्टा

तेव्हडे चालते हो....तोंडी लावण्यापुरते ;)

स्मिता चौगुले's picture

20 Jan 2014 - 3:16 pm | स्मिता चौगुले

सहमत..

काही ठिकाणचा अकारण विनोद निर्मितीचा अट्टाहास वगळता लेख छान जमलाय.

कपिलमुनी's picture

20 Jan 2014 - 4:54 pm | कपिलमुनी

लेख , विषय छान आहे !

>>काही ठिकाणचा अकारण विनोद निर्मितीचा अट्टाहास वगळता लेख छान जमलाय.
>>पुढच्या लेखात सॉरी पत्रात तो प्रयत्न टाळल्यास लेख/पत्र आणखी छान होईल.

काही ठिकाणी सुभाष घई झालाय ..

vrushali n's picture

19 Jan 2014 - 5:44 pm | vrushali n

Rofl..

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 6:52 pm | मुक्त विहारि

आवडला लेख..

पु भा प्र

नेहा_ग's picture

19 Jan 2014 - 8:01 pm | नेहा_ग

हेहे भारि

भन्नाट कल्पना, अत्यंत आवडेश :) पुढच्या पत्राच्या प्रतिक्षेत

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jan 2014 - 3:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

फुल २ आतषबाजी
पत्र वाचुन हहपुवा,दुसर्‍या आणि तिसर्‍या पत्राच्या प्रतिक्षेत...

सुरवात शष्प कळली नाही. पत्र मात्र झकास.

>>तुला आवडत नाही म्हणून मी निळ्या चित्रफिती पाहणे बंद केले होते
गफ ला आवडत नाही म्हणून असं काही बंद करु नये. या गोष्टींवरुन चारित्र्य ठरवणार्‍या मुलींना दूरुन रामराम करावा. कारण तुम्ही तो नाही केलात तर त्या अशी टुकार कारणं उपसून रामराम करतात. ;)

सानिकास्वप्निल's picture

20 Jan 2014 - 3:57 pm | सानिकास्वप्निल

पत्र वाचून मजा आली ;)
बाकी लेख चांगला आहे.

बन्डु's picture

20 Jan 2014 - 3:58 pm | बन्डु

@सूड - शष्प म्हणजे काय ?

>>@सूड - शष्प म्हणजे काय ?

तुम्हाला खरंच माहिती नाही?

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार!! :) सूचक टिप्पणी करणा-यांचे विशेष आभार.

@बर्फाळ लांडगा : विनोदनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न सतत चालू असतो. तुम्हाला आवडलं नाही, हे माझं दुर्दैव. यापुढील लेखनांत तुमच्या पसंतीचा स्तर आणायचा प्रयत्न करीन.
@यशोधर : मुद्याचे लिहिण्याऐवजी मुद्दाचे लिहीलं. टायपो!!
@चाणक्य आणि सूड : सुरुवात कळली नाही म्हणजे मी ट्रेन आणि मुलगी यांची (या कथेपुरतीच...) विनोदी तुलना करण्याच्या प्रयत्नांत थोडा कमी पडलो. 'थोडा' अशासाठी म्हणतोय की इतर प्रतिसादांवरून त्यांना कळलं असावं असा अंदाज आहे. पण पत्र वाचल्यानंतर पहिल्या परिच्छेदाचा आशय लक्षात आला असावा... तोही नसेल तर यापुढे मला अधिक स्पष्टपणे आणि स्वच्छपणे तुलना करायला हवी/उपमा द्यायला हवी असं दिसतं.
@प्यारे१ आणि स्मिता चौगुले : पुढच्या चकलीत तिखट-मीठ शक्य तितक्या योग्य प्रमाणात घालायचा प्रयत्न करेन. प्यारेकाका तुमचं समीक्षण खूप आवडलं :)

पत्त्यातल्या आकड्यांबद्दल : शाळेत असताना पत्रलेखनाचा विषय दिला की आम्ही सगळे मित्र असे(खरं तर याहून घाण) पत्ते (हेच आकडे घेऊन) लिहायचो. अगदी परिक्षेतसुद्धा :) त्यावर शिक्षक सगळ्यांसमोर प्रकटपणे प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी १-२ मार्क कमी किंवा प्रसंगी ० मार्क देऊन आम्हाला धडा शिकवायचे. १०वीत प्रिलीम झाल्यानंतर आम्ही ही मस्ती नाईलाजास्तव थांबवली होती. ;)

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2014 - 6:46 pm | टवाळ कार्टा

पत्त्यातल्या आकड्यांबद्दल : शाळेत असताना पत्रलेखनाचा विषय दिला की आम्ही सगळे मित्र असे(खरं तर याहून घाण) पत्ते (हेच आकडे घेऊन) लिहायचो. अगदी परिक्षेतसुद्धा Smile त्यावर शिक्षक सगळ्यांसमोर प्रकटपणे प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी १-२ मार्क कमी किंवा प्रसंगी ० मार्क देऊन आम्हाला धडा शिकवायचे. १०वीत प्रिलीम झाल्यानंतर आम्ही ही मस्ती नाईलाजास्तव थांबवली होती.

=))

प्यारे१'s picture

20 Jan 2014 - 6:53 pm | प्यारे१

शाळा संपली तरी शाळा संपली नाही म्हणा की! ;)
बेष्ट!

चिगो's picture

21 Jan 2014 - 4:15 pm | चिगो

जबराटच, वडापाव.. पत्र, क्षमस्व, क्ष-मुमिस (मुलगी मित्र की मैत्रिण ;-) ) पत्र आवडले.. पुढील पत्राच्या प्रतिक्षेत..